2 उत्तरे
2
answers
जीएसटीमुळे होणारे फायदे कोणते?
3
Answer link
सरकार आणि विरोधी पक्ष यांच्यामध्ये उत्तम संवाद असेल तर देशाच्या हिताची अनेक चांगली विधेयक कायद्यात रूपांतरीत होऊ शकतात. याचे उत्तम उदाहरण म्हणजे जी.एस.टी. आहे.
महाराष्ट्र विधानमंडळाचे विशेष अधिवेशन आज मुंबईत बोलावण्यात आले आहे. उद्देश आहे, केंद्र सरकारने मंजूर केलेला जी.एस. टी. म्हणजे वस्तू-सेवा कर या नव्या कायद्याला विधानमंडळाची मान्यता मिळवणे. अनेक केंद्रीय कायदे असे आहेत की, ज्या कायद्यांना राज्य सरकारच्या विधानमंडळाची मंजुरी लागते. ते ते कायदे मुंबईच्या आणि महाराष्ट्राच्या विधानमंडळाला ‘नियमित सर्वसाधारण अधिवेशनात अनुसंमत केले आहेत..’ मात्र विशेष अधिवेशन बोलावून पहिल्या प्रथमच विधानसभा आणि विधान परिषद या वस्तू-सेवा कराच्या केंद्र सरकारच्या विधेयकाला मंजुरी देणार आहे. हे विधेयक लोकसभेत अनेक दिवस लटकले होते. कारण मोदी सरकारने आणलेल्या विधेयकात काही जाचक अटी होत्या. राज्यसभेत मोदी सरकारचे बहुमत नाही.
जनतेच्या हितासाठी राज्यसभेतील विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेस सरकारने हे विधेयक रोखून धरले. त्यात अतिशय चांगल्या सुधारणा सुचवल्या. सुरुवातीला सरकार त्या सूचना स्वीकारायला तयार नव्हते. पण विधेयक जेव्हा पुढे सरकेना तेव्हा अखेर या पावसाळी अधिवेशनापूर्वी खुद्द पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चा केली आणि काही सुधारणा स्वीकारल्या आणि मग संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला काँगेस पक्षाच्या पाठिंब्यानंतर हे विधेयक संमत करण्यात आले आहे. आता राज्य विधानमंडळाने या विधेयकाला मान्यता दिल्यानंतर १ एप्रिल २०१७ पासून या विधेयकाची देशभर अंमलबजावणी सुरू होईल. सरकार आणि विरोधी पक्ष यांच्यामध्ये उत्तम संवाद असेल तर देशाच्या हिताची अनेक चांगली विधेयक कायद्यात रूपांतरीत होऊ शकतात. याचे उत्तम उदाहरण म्हणजे जी.एस.टी. आहे.
काय आहे जी. एस. टी.?
जी. एस. टी. म्हणजे वस्तू व सेवा कर. हे विधेयक मंजूर झाले की, देशभरात एकच कर लागू राहील. विविध राज्यांतील वेगवेगळे कर आता संपुष्टात येतील. १ एप्रिल २०१७ पासून देशभरात समान करपद्धती अमलात येईल. स्वातंत्र्यानंतरची ही सर्वात मोठी करसुधारणा मानली जात आहे. जी.एस.टी.चा अर्थच असा आहे की, देशभरात एकच करप्रणाली. सर्व प्रकारच्या वस्तू आणि सेवांसाठी एकच करपद्धती लागू करणे, असेही या विधेयकाचे उदात्त स्वरूप आहे. त्याचे फायदेही आहेत आणि तोटेही आहेत. कोणत्या विषयात पूर्णपणे फायदा असू शकत नाही आणि प्रत्येक गोष्ट तोटय़ाची कधीच असत नाही. काही ना काही फायदे असू शकतात. काही तोटे असणारच. प्रथम फायदे पाहूयात.
जी.एस.टी.चे फायदे
१) जी.एस.टी. विधेयक पारदर्शक असून, कायद्यात रूपांतरीत झाल्यावर अप्रत्यक्ष करांची आता कुठलीही व्यवस्था असणार नाही. म्हणजेच अप्रत्यक्ष कर शून्यावर येतो. विक्रीच्या इनव्हॉईसवर म्हणजे वस्तुविशेषावर वस्तू-सेवाकराची नोंद असेल. म्हणजे ग्राहकाने दिलेला कर कशासाठी दिलेला आहे. कोणत्या सेवेसाठी दिलेला आहे की, वस्तू खरेदीसाठी दिलेला आहे तो नक्की किती दिला आहे, वस्तूची मूळ किंमत किती आणि वस्तू सेवाकर किती, याचा पूर्ण तपशील स्पष्टपणे समजेल, अशी पारदर्शकता या विधेयकात आहे.
२) नोंदणीकृत व्यापा-यांना जी.एस.टी.ची वेगळी किंमत मोजावी लागणार नाही. त्यामुळे छुपे कर दडून राहणार नाहीत. व्यवसाय करण्याचा खर्च कमी होईल. याचा फायदा निर्यात अधिक स्पर्धात्मक होण्यात होईल, असे आता तरी सांगितले गेले आहे.
३) केंद्र सरकारची प्रामुख्याने प्राप्तीची दोन साधने होती. त्यात एक प्राप्तीकर आणि दुसरा पेट्रोल-डिझेल कर. आता या करात वैचित्र्य राहणार आहे.
४) जी.एस.टी. प्रणालीत उत्पादन क्षेत्र व सेवा यांच्यात कराचा बोजा समान वाटला जाईल. कराचा पाया विस्तारित करून तसेच सवलती कमी करून हे साध्य करता येईल, असे विधेयकाच्या मूळ प्रारूपात सांगण्यात आले आहे.
५) केंद्राचा वस्तू-सेवा कर आणि राज्यांचा वस्तू-सेवाकर याच्यावर उत्पादन खर्चावर कर लावला जाईल आणि विक्रीच्या ठिकाणी तो वसूल केला जाईल. त्यामुळे वस्तूच्या किमती कमी होऊन ग्राहकाचे उपभोगकर्ता प्रमाण वाढेल. तसेच कंपन्यांचा पाया विस्तारला जाईल, असेही सांगण्यात येत आहे.
६) जकात, केंद्रीय विक्रीकर, राज्याचा विक्रीकर, प्रवेशकर, परवाना शुल्क, उलाढालकर असे विविध कर आता यापुढे संपुष्टात येतील. व्यवसाय करणे उद्योजकाला जास्त सोपे जाईल. लिखापढी कमी राहील. छुपे कर नसल्यामुळे व्यावसायिकाला त्याचा व्यवसाय करणे अधिक निरामय वाटेल.
७) ज्या वस्तू व सेवांवर सध्या ३० ते ४० टक्के कर आहे त्या स्वस्त होतील. कारण वस्तू- सेवाकराची मर्यादा आता जास्तीत जास्त १८ टक्के ठेवण्यात आली आहे. असे सांगितले जात आहे की, या वस्तू सेवाकरामुळे वाहने स्वस्त होतील.
८) जगातील १५० हून अधिक देशांनी वस्तू-सेवाकर कायदा लागू केला आहे. मात्र ते देश महागाईचा जबरदस्त सामना करीत आहेत. या वस्तू-सेवाकरांमध्ये त्यांच्या देशात तरी निदान महागाई आटोक्यात आलेली नाही.
जी.एस.टी.चे तोटे
वस्तू-सेवाकर कायद्याचे जसे काही फायदे आहेत तसे तोटेही आहेत. जे संभाव्य तोटे आहेत ते प्रामुख्याने गरिबांच्याच मुळावर येणार आहेत. आणि कोणी काही सांगितले तरी त्यामुळे महागाई नक्की होईल आणि ती गरिबांच्या मुळावर येईल. नेमक्या तोटय़ाचे स्वरूप असे आहे..
१) वस्तू सेवाकरात १८ टक्क्यांची मर्यादा घालण्याचे ठरवलेले आहे. पण ती मर्यादा वाढणार नाही. (shall not) असे आश्वासन देण्यात आलेले नाही. त्यामुळे ही करमर्यादा वाढू शकते. सध्या ज्या वस्तू आणि सेवांवर १८ टक्क्यांपेक्षा कमी कर आहेत त्या वस्तूंना विधेयक कायद्यात रूपांतरीत झाल्यापासून लगेच १८ टक्क्यांवर नेण्यात येईल. म्हणजे समजा सिनेमाच्या तिकिटावरील कर ६ टक्के आहे तो १८ टक्के होऊ शकतो. हॉटेलातील खाणे महाग होईल. सध्या हॉटेलच्या वस्तूंवरील सेवा कर १२ टक्के आहे. तो लगेच १८ टक्के होईल म्हणजे खाद्य पदार्थाच्या किमती भडकतील.
२) रिअल इस्टेट क्षेत्राला मोठा फटका बसेल. नव्या घरांच्या किमती ८ टक्क्यांनी वाढतील. सध्याच फक्त मुंबईत दीड लाख फ्लॅट पडून आहेत. ते आणखीन महाग होतील आणि त्या फ्लॅटचा खरेदीदार मिळणे आणखी अवघड होईल. बिल्डर अडचणीत आले तर मजुरांपासून तंत्रज्ञांपर्यंत बेकारी वाढेल.
३) केंद्र आणि राज्य यांचे संबंध भडकू शकतील. केंद्राचा जी. एस. टी. आणि राज्याचा जी. एस. टी. स्वतंत्र असेल अशी तरतूद आहे. पण त्यातील जमा होणारा महसूल राज्यांच्या उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत त्यातून नाहीसा होईल. उदाहरणार्थ : महापालिकेची जकात. ती रद्द होईल. आता त्या जागेवर महापालिकेच्या उत्पन्नाची दुसरी व्यवस्था काय? याचा भयानक परिणाम म्हणजे महापालिका भिकारी होतील. राज्य सरकार किंवा केंद्र सरकारला जकात कराच्या उत्पन्नाची वेगळी व्यवस्था करून द्यावी लागेल. विकासकामांना पैसा उपलब्ध होणार नाहीत. त्याहीपेक्षा भयानक म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या कर्मचा-यांना पगार देणेही सरकारला शक्य होणार नाही. राज्यांची किंमतच शून्य होऊन जाईल. संघराज्य पद्धतीला हा मोठा धोका आहे.
४) देशातील किमान १६ राज्यांनी या वस्तू- सेवाकर विधेयकावर मंजुरी दिली पाहिजे. तरच हे विधेयक कायद्यात रूपांतरीत होईल. आसाम सरकारने ते अगोदर मंजूर केलेले आहे. महाराष्ट्र, गोवा, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, राजस्थान, गुजरात, हरयाणा या राज्यांत भाजपाची सत्ता असल्यामुळे तिथे हे विधेयक मंजूर होईल. मात्र १६ राज्यांचा पाठिंबा अवघड आहे.
सौजन्य .....
प्रहार

0
Answer link
वस्तू व सेवा कर (Goods and Services Tax - GST) लागू झाल्यामुळे अर्थव्यवस्थेमध्ये अनेक सकारात्मक बदल झाले आहेत. त्यातील काही प्रमुख फायदे खालीलप्रमाणे:
- करांची संख्या कमी झाली: पूर्वी अनेक प्रकारचे कर लागत होते, ज्यामुळे गोंधळ निर्माण होत होता. जीएसटीमुळे करांची संख्या कमी झाली आहे.
- वस्तू व सेवांची किंमत कमी झाली: जीएसटीमुळे उत्पादन खर्चात घट झाली आहे, त्यामुळे वस्तू व सेवा स्वस्त झाल्या आहेत.
- व्यवसाय करणे सोपे: जीएसटीमुळे कर भरण्याची प्रक्रिया सुलभ झाली आहे, ज्यामुळे व्यवसाय करणे अधिक सोपे झाले आहे.
- अर्थव्यवस्थेची वाढ: जीएसटीमुळे कर संकलनात वाढ झाली आहे, ज्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळाली आहे.
- पारदर्शकता: जीएसटीमुळे कर प्रणालीमध्ये अधिक पारदर्शकता आली आहे, ज्यामुळे कर चुकवेगिरीला आळा बसला आहे.
अधिक माहितीसाठी, आपण खालील संकेतस्थळांना भेट देऊ शकता: