2 उत्तरे
2
answers
शरीरात बीपी वाढतं म्हणजे काय होतं?
7
Answer link
बीपी म्हणजे ब्लड प्रेशर होय.
मराठीत यास रक्तदाब म्हणतात.
आणि बीपी वाढणे म्हणजे उच्च रक्तदाब होय.
हृदय हा एक स्नायूंनी बनलेला पोकळ अवयव आहे. त्याच्या तालबद्ध हालचालीमुळे (आकुंचन पावणे (Systole) आणि प्रसरण पावणे (Diastole) रक्त शरीरभर फिरत असते. शरीरात रक्त वाहताना रक्तवाहिन्यांवर जो दाब पडतो किंबहुना ज्या दाबाने रक्त सर्व शरीरातील रक्तवाहिन्यांतून फिरत असते त्या दाबाला ‘रक्तदाब’ (Blood Pressure) असे म्हणतात.
सर्व अवयवांना त्यांच्या त्यांच्या आवश्यकतेप्रमाणे रक्तपुरवठा मिळण्यासाठी हा विशिष्ट प्रकारचा दाब आवश्यक असतो. तो निर्माण होण्यासाठी हृदयाची लयबद्ध हालचाल, रक्तवाहिन्यांची लवचीकता, रक्ताचे प्रमाण, हृदयाची गती आणि शरीरातील इतर स्रावांचे परिणाम (Hormones) या गोष्टी जबाबदार असतात. हृदय आकुंचन पावते तेव्हा रक्त जोराने रक्तवाहिन्यांमध्ये ढकलले जाते त्याचा रक्तवाहिन्यांच्या अंतर-स्तरावर दाब अधिक असतो, त्या दाबाला सिस्टोलिक रक्तदाब (Systolic Blood Pressure) असे म्हणतात. जेव्हा हृदय आरामदायी पूर्वस्थितीत (Relaxation Stage) येते तेव्हा रक्तवहिन्यांच्या अंतर-स्तरावरील दाब कमी होतो त्याला ‘डायास्टोलिक रक्तदाब (Diastolic Blood Pressure) असे म्हणतात.
दोन्ही प्रकारचे रक्तदाब ‘स्फिग्मोमॅनोमीटर’ या यंत्राच्या साहाय्याने मोजता येते. वयाच्या ५० वर्षांपर्यंत सिस्टोलिक रक्तदाब हा ११० ते १४० (मी. मी. पारा.. mm of Hg) असायला हवा आणि डायास्टोलिक रक्तदाब हा ९०च्या पेक्षा कमी असायला हवा. सिस्टोलिक रक्तदाब हा १४० च्या वर किंवा डायास्टोलिक रक्तदाब हा ९० पेक्षा जास्त असेल तर अशा व्यक्तींना उच्च रक्तदाब किंवा अति रक्तदाब (Hypertension)आहे असे समजावे.

0
Answer link
उच्च रक्तदाब, ज्याला हायपरटेन्शन (Hypertension) देखील म्हणतात, ही एक अशी स्थिती आहे ज्यामध्ये रक्तवाहिन्यांमध्ये रक्ताचा दाब सामान्यपेक्षा जास्त असतो.
उच्च रक्तदाब म्हणजे काय?:
- सिस्टोलिक दाब (Systolic pressure): जेव्हा हृदय धडकते तेव्हा रक्तवाहिन्यांवर पडणारा दाब (reading ≥ 130 mmHg).
- डायस्टोलिक दाब (Diastolic pressure): जेव्हा हृदय दोन धडक्यांच्या मध्ये असते तेव्हा रक्तवाहिन्यांवर पडणारा दाब (reading ≥ 80 mmHg).
उच्च रक्तदाबाची कारणे:
- जीवनशैली: जास्त मीठ खाणे, लठ्ठपणा, शारीरिक हालचाल कमी असणे, जास्त मद्यपान करणे.
- आनुवंशिकता: कुटुंबात उच्च रक्तदाबाचा इतिहास असणे.
- अंतर्निहित रोग: मधुमेह, किडनीचे आजार, थायरॉईड समस्या.
- औषधे: काही औषधांमुळे रक्तदाब वाढू शकतो.
उच्च रक्तदाबाची लक्षणे:
- बरेच लोकांना कोणतीही लक्षणे जाणवत नाहीत.
- काही लोकांना डोकेदुखी, चक्कर येणे, श्वास घेण्यास त्रास होणे, छातीत दुखणे अशी लक्षणे दिसू शकतात.
उच्च रक्तदाबाचे दुष्परिणाम:
- हृदयविकार
- स्ट्रोक (आघात)
- किडनीचे आजार
- डोळ्यांचे आजार
उपाय:
- आहार बदलणे (कमी मीठ, फळे आणि भाज्या जास्त खाणे)
- नियमित व्यायाम करणे
- वजन कमी करणे
- धूम्रपान आणि मद्यपान टाळणे
- डॉक्टरांनी दिलेली औषधे नियमित घेणे
जर तुम्हाला उच्च रक्तदाबाची लक्षणे जाणवत असतील, तर डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
अधिक माहितीसाठी: