5 उत्तरे
5 answers

ध्यान कसे करावे व कधी करावे?

13
ध्यान हे शक्यतो सकाळी करावे. कारण सकाळी आपले मन शांत असते.कुठलेच विचार नसतात. आपली नित्य कर्मे उरकून ध्यानात बसावे.
डोळे मिटून आसनावर बसावे. ताठ बसावे. सुरवातीची दोन मिनिटे श्वासोच्छ्वासावर लक्ष केंद्रीत करावे.
नंतर ओम नमः शिवाय किंवा नुसता ओम: ओम: असा दीर्घोच्चार करावा.
त्याने मनाला एक वेगळीच ऊर्जा प्रदान होते. विलक्षण शांतीचा अनुभव होतो.
उत्तर लिहिले · 8/11/2018
कर्म · 2750
8
नमस्कार ।

ध्यान म्हणजे काय आधी ते तुम्ही समजून घ्या
ध्यान म्हणजे आपलं अंतरात्मा ला बघणे व त्याला अनुभव घेणे म्हणजेच ध्यान होय.

ध्यान तुम्ही २४ तासात कधीही व कुठेही करू शकता.

ध्यान करायची पहिली प्रक्रिया
१.ध्यान तुम्ही तुम्हाला कधी वेळ जमत तेव्हा करा एक ठराविक वेळेत करा ।
२.ध्यान करताना मांडी घालून बसावे . सुखासन व पद्मासन तुम्हाला कुठलं आसन जमत ते आसन घालून बसा. । पाठ व डोकं सरळ रेषेत यावे तस बसावे
३.तुम्ही ज्ञान मुद्रेत बसा.सर्व तुमचं अंग ढिला करावे
डोक्यात व मनात कसलाही विचार करायचा नाही विचार येत असेल तर तुम्ही त्याला विचारला आडवा आणि तुम्ही तुमच्या नाकपुड्यातून येणारा जाणारा श्वासाकडे लक्ष द्या.तुम्ही श्वास घेताना किंवा श्वास सोडताना मुद्दामून घेऊ नका सोडू नका
श्वास घेणे व सोडणे naturaly असावं 
४.भरपूर विचार येतात तस तुम्ही करत असताना तरी तुम्ही कुठेही लक्ष न देता फक्त श्वासावर लक्ष केंद्रित असावे

अस तुम्ही ३० ते ४० मिनिट करावे

आधी तुम्ही ५ मिनिटच करा हळूहळू वेळ वाढवा


तुम्ही तस करा मी सांगितल्याप्रमाणे आणि ते तुम्ही करत असताना अनुभव कसे येत ते तुम्ही मला कळवा

धन्यवाद!


" ॐ नमः शिवाय  "
उत्तर लिहिले · 27/2/2020
कर्म · 16930
0

ध्यान कसे करावे:

  1. शांत जागा निवडा: ध्यानासाठी शांत आणि आरामदायक जागा निवडा. जेथे तुम्हाला कोणी disturb करणार नाही.
  2. आरामदायक स्थितीत बसा: खुर्चीवर बसा किंवा जमिनीवर मांडी घालून बसा. पाठीचा कणा सरळ ठेवा.
  3. डोळे बंद करा: हळूवारपणे डोळे बंद करा.
  4. श्वासावर लक्ष केंद्रित करा: आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करा. श्वास घेताना आणि सोडताना होणाऱ्या बदलांवर लक्ष ठेवा.
  5. विचार येऊ द्या: विचार येऊ शकतात, त्यांना येऊ द्या. त्यांना resist करू नका. हळू हळू आपले लक्ष पुन्हा श्वासावर आणा.
  6. वेळेचे नियोजन: सुरुवातीला 5-10 मिनिटे ध्यान करा. हळू हळू वेळ वाढवा.

ध्यान कधी करावे:

  • सकाळ: सकाळी उठल्यावर ध्यान करणे खूप फायदेशीर आहे. यामुळे दिवसभर उत्साह टिकून राहतो.
  • संध्याकाळ: संध्याकाळी झोपण्यापूर्वी ध्यान केल्याने ताण कमी होतो आणि झोप चांगली लागते.
  • जेव्हा ताण वाटेल तेव्हा: जेव्हा तुम्हाला ताण किंवा anxiety जाणवते, तेव्हा 5-10 मिनिटे ध्यान करा.
  • नियमित वेळ: रोज एकाच वेळी ध्यान केल्याने ते तुमच्या दिनचर्येचा भाग बनते.

टीप:

  • सुरुवातीला guidance साठी meditation apps किंवा online resources चा वापर करा.
  • धैर्य ठेवा, नियमितपणे सराव करत राहा.

तुम्हाला हे उपयुक्त वाटेल.

उत्तर लिहिले · 19/3/2025
कर्म · 980

Related Questions

बॉलीवूड संगीताचे उदाहरण कोण आहे?
हिंदी किंवा मराठी गाणी डाउनलोड करण्यासाठी ॲप्स?
मला करमत नाही, ऋतिक भाई मला खूप मारतो, राम राम दीपिका माणसं, काय भाई?
मुस्लिम देशातील ब्युटिफुल प्रिन्सेस कोण आहेत?
2006 साली प्रदर्शित झालेल्या 'गाढवाचं लग्न' या मराठी चित्रपटात राजकुमारीची भूमिका कुणी केली आहे?
भाषा शिकण्यासाठी मानवी मेंदू किती मेगाबाइट माहिती साठवतो?
माझं मित्र कोण होईल सांगा?