गणित खरेदी ऑनलाईन खरेदी सूत्र

एखाद्या वस्तूच्या किमतीवर काही टक्के सूट द्यायची असेल तर त्याचे सूत्र काय आहे?

2 उत्तरे
2 answers

एखाद्या वस्तूच्या किमतीवर काही टक्के सूट द्यायची असेल तर त्याचे सूत्र काय आहे?

12
सुट देण्यासाठी खाली दिलेल्या सिंमल पद्धती वापरा.

पद्धत १. सुट बर्याचदा शेकडामध्ये असते Percentage मध्ये मग अशा वेळेला वस्तुची किंमत * सुट करावी आणि आलेलं उत्तर वस्तुंच्या किंमतीमधून वजा करावे.

उदाहरणार्थ : समजा एका लाईटची किंमत १५० रुपये आहे आणि आपल्याला त्यावर २०%(शेकडा २०रु.) सुट द्यायची आहे तर मी वर सांगितले तसे करा..

१५० * (२०/१००) = ३० रूपये..

आता हे आलेले ३० रुपये वस्तूची किंमतीतून वजा करा..( आपण वजा का करतोय तर सूट देतांना किंमत कमी होते म्हणून.)

१५० - ३० = १२० रुपये.. ३०% सूट देऊन १२० रुपायाला आपण तो लाईट विकू.

पद्धत २ : ही पद्धत मला खुप आवडते आणि लगेच पण उत्तर मिळते. शेकडा सुट म्हणजे १०० रुपयांवर किती रुपये कमी बरोबर ना.. मग अगोदर शेकडा सुटला १०० मधून वजा करा आणि आलेल्या उत्तराला सरळ किंमतसोबत वजा करा.. सिंपल

उदाहरणार्थ : लाईटवर सूट किती तर २०%..
१०० - २० = ८०%..

१५० * (८०/१००) = १२० रुपये.. (सरळ उत्तर मिळाल ना)

अजून दूसरं उदाहरण : एका टिव्ही ची किंमत २००० रूपये तर शेकडा ३०% सुट ने किंमत किती ?

१०० - ३० = ७०%

२००० * (७०/१००) = १४०० रुपये..( डायरेक्ट उत्तर)

आपण सूट देण्याचे सूत्र विचारले तर ते आपण असं लिहू शकता..

सुट = x%, वस्तुंची किंमत = y रूपये

सूट वजा किंमत = y * (१०० - x)
उत्तर लिहिले · 5/11/2018
कर्म · 75305
0
एखाद्या वस्तूच्या किमतीवर काही टक्के सूट द्यायची असेल, तर सूट काढण्याचे सूत्र खालीलप्रमाणे आहे:

सूट = (MRP * सूट%) / 100

Net Price = MRP - सूट

येथे:

  • MRP म्हणजे वस्तूची मूळ किंमत (Maximum Retail Price).
  • सूट% म्हणजे MRP वर किती टक्के सूट (discount) आहे.
  • Net Price म्हणजे सूट वजा केल्या नंतर येणारी किंमत.

उदाहरण:

एका वस्तूची MRP ₹ 1000 आहे आणि त्यावर 20% सूट आहे. तर सूट किती असेल?

सूट = (1000 * 20) / 100 = ₹ 200

Net Price = 1000 - 200 = ₹ 800

म्हणजे, त्या वस्तूची सूट ₹ 200 असेल आणि सूट नंतर ती वस्तू ₹ 800 ला मिळेल.

उत्तर लिहिले · 19/3/2025
कर्म · 1040

Related Questions

विरंजक चूर्णाचे सूत्र कोणते आहे?
मिथेनॉलचे रेणू सूत्र कोणते?
रास = मुद्दल + ?
साखरेचा रेणू सूत्र काय आहे?
सूट काढायचे सूत्र काय आहे?
धुण्याचा सोडा रेणू सूत्र काय आहे?