2 उत्तरे
2
answers
दुसऱ्यांच्या शेतातून पाईपलाईन टाकायची असल्यास काय करावे?
19
Answer link
*दुसऱ्याच्या शेतातून पाइपलाइन टाकायची असेल तर..?*
------------------------- ------------------
लगतच्या शेतकऱ्याशी असलेले संबंध सामंजस्याचे असतील तर अशी पाइपलाइन नेण्यात अडचण येत नाही. जर काढण्यास कोणाचीही हरकत नसेल तर वाद निर्माण होत नाहीत व अशा प्रकरणी कोणत्याही परवानगीचा देखील प्रश्न उद्ध्वत नाही. तथापि लगतचा शेतकरी पाइपलाइन नेण्यासाठी अडथळा निर्माण करत असेल तर अडचण होते.
अशी पाइपलाइन नेण्यासंदर्भात महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 च्या कलम 49 मध्ये आणि महाराष्ट्र जमीन महसूल (पाण्याचे पाट बांधणे) नियम 1967 अन्वये तरतूद केलेली आहे. या अंतर्गत, ज्या शेतकऱ्याला दुसऱ्या शेतकऱ्याच्या शेतजमिनीतून, स्वत:च्या शेतापर्यंत पाइपलाइन किंवा पाण्याचा पाट बांधण्याची इच्छा असेल, त्याने विहीत नमुन्यामध्ये, पाइपलाइन कशी टाकणार याचा कच्चा नकाशा व सात-बारा उतारा जोडून तहसीलदाराकडे अर्ज करणे आवश्यक असते. असा अर्ज मिळाल्यानंतर तहसीलदार सर्व संबंधितांना नोटीस काढून त्यांना आपले म्हणणे मांडण्याची संधी देतात. शेजारच्या शेतकऱ्याची हरकत असेल तर हरकतीचे मुद्दे तपासले जातात. अर्जदाराची गरज विचारात घेऊन पाइपलाइन टाकण्याची किंवा पाण्याचा पाट बांधण्याची परवानगी दिली जाते.
पाईपलाईनबाबत किंवा पाण्याच्या पाटाबाबत तहसीलदारानी दिलेल्या आदेशाविरुद्ध अपील करता येत नाही तथापि, यात जर अन्याय झाला असेल तर जिल्हाधिकाऱ्यांकडे दाद मागता येते.
*पाइपलाइनला कोणी नुकसान पोहोचवण्याचा प्रयत्न केल्यास संबंधित शेतकऱ्याने तहसीलदाराकडे दाद मागावी. जमीन महसूल अधिनियम 1966 कलम 49(10) अन्वये अशा नुकसानीसाठी दंडाची तरतूद आहे.*
अशी परवानगी देतांना खालील अटी लादल्या जातात…
👉 शेजारच्या शेतकऱ्याचे कमीत कमी नुकसान होईल अशा पद्धतीने पाट टाकावे.
पाट किंवा पाइपलाइन ही जवळच्या अंतराने टाकावी.
👉 पाण्याच्या पाटाची रुंदी ही किमान आवश्यक आणि कोणत्याही बाबतीत दीड मीटरपेक्षा जास्त असू नये.
👉 पाइपलाइन टाकताना ती किमान अर्ध्या मीटरपेक्षा जास्त खोलीवर टाकावी.
शेजारच्या शेतकऱ्याला वाजवी भाडे द्यावे.
पाइपलाइन टाकताना तसेच तिची दुरुस्ती करताना कमीतकमी जमीन खोदावी.
तसेच खोदलेली जमीन अर्जदाराने पुन्हा स्वखर्चाने पूर्ववत करावी.
👉 पाट किंवा पाइपलाइन टाकताना जर शेतात उभी पिके असतील तर कमीतकमी नुकसान पोहोचेल याची दक्षता घ्यावी. तरीही पिकांचे नुकसान झाल्यास, अर्जदाराने नुकसानभरपाई द्यावी.
👉 अशी नुकसानभरपाई देण्यात कसूर झाली तर ती रक्कम जमीन महसुलाची थकबाकी म्हणून वसूल करावी.

0
Answer link
दुसऱ्यांच्या शेतातून पाईपलाईन टाकायची असल्यास काय करावे हे खालीलप्रमाणे आहे:
पाइपलाईन टाकण्यापूर्वी, ज्या व्यक्तीच्या शेतातून पाइपलाइन टाकायची आहे, त्याची लेखी परवानगी घेणे आवश्यक आहे.
परवानगी घेण्यासाठी, तुम्ही त्यांना पाइपलाइन टाकण्याचा उद्देश, मार्ग आणि त्यामुळे होणारे फायदे समजावून सांगा.
परवानगी मिळाल्यानंतर, एक कायदेशीर करारनामा तयार करा. ज्यात पाइपलाइन टाकण्याचा मार्ग, नुकसान भरपाई, आणि इतर अटी व शर्ती स्पष्टपणे नमूद करा.
करारनाम्यात दोन्ही पक्षांच्या सह्या असणे आवश्यक आहे.
पाइपलाईन टाकताना शेतात काही नुकसान झाल्यास, त्याची भरपाई देण्याची तयारी ठेवा. नुकसान भरपाईची रक्कम करारनाम्यात नमूद करावी.
शेतकऱ्याला त्याचे नुकसान भरून मिळाल्यास त्याला कोणताही आक्षेप असणार नाही.
काहीवेळा, तुम्हाला स्थानिक प्रशासनाकडून किंवा संबंधित विभागांकडून पाइपलाइन टाकण्यासाठी परवानगी घ्यावी लागू शकते. त्यामुळे आवश्यक परवानग्यांसाठी अर्ज करा.
शक्य असल्यास, सार्वजनिक मार्गाचा किंवा तुमच्या मालकीच्या जमिनीचा वापर करून पाइपलाइन टाका.
अशक्य असल्यास, दुसऱ्या शेतकऱ्याच्या शेतातून पाइपलाइन टाकण्यापेक्षा इतर मार्गांचा विचार करा.
या प्रक्रियेत तुम्हाला कोणत्याही कायदेशीर अडचणी येऊ नयेत, यासाठी वकिलाचा सल्ला घेणे उचित राहील.
1. संबंधित व्यक्तीची परवानगी:
2. करारनामा:
3. नुकसान भरपाई:
4. शासकीय परवानग्या:
5. पर्यायी मार्ग:
6. कायदेशीर सल्ला:
अधिक माहितीसाठी, तुम्ही खालील संकेतस्थळांना भेट देऊ शकता: