दारू शोध विज्ञान

दारूचा शोध कोणी लावला?

2 उत्तरे
2 answers

दारूचा शोध कोणी लावला?

1


दारूचा जन्म कसा झाला माहितीये? वाचा दारूच्या उगम व निर्मितीची रोचक कहाणी !

Saturday, 16 Jun, 6.18 am
दारू म्हटलं की आपल्यापैकी बऱ्याच जणांच्या तोंडाला पाणी सुटतं. परंतु आपल्या प्राणाहून प्रिय असलेल्या दारूची निर्मीती कशी झाली? कोणी लावली दारू प्यायची सवय? खरंच दारू म्हणजे अमृत आहे का, की नुसतं रसायन? या सगळ्या गोष्टी जाणून घेणं आपल्यासाठी कुतूहलाचा विषय नक्कीच आहे शिवाय दारू घर संसारांची कशी राखरांगोळी करते हे पण जाणून घेतलंच पाहीजे ना !

असं म्हटलं जातं की दारूची निर्मीती सुमारे ९ हजार वर्षांपूर्वी चीनमध्ये झाली. ही दारू म्हणजे वाईन आंबवलेल्या तांदळाचं पाणी आणि मधाची मिसळ असायची.

२ हजार वर्षांनंतर ही दारू युरोपीय देशातही निर्मीली जाऊ लागली. पुरातत्वीय उत्खननात इतक्या वर्षांनंचतर सुध्दा दारू बनवण्याचं साहित्य आणि दारूच्या साठ्यांसाठी बनवलेली विशेष भांडी सापडलीत.
अशाच काही प्रकारची उत्खनने युरोपीय देश, पश्चिम आशिया या ठिकाणी केली असता तिथेही दारूचं अस्तित्व असल्याचं जाणवतं. परंतु दारूची खरी सवय ही चीनने साऱ्या जगाला लावली.
इसवी सन पूर्व ७०००-६६०० मध्ये चीनमध्ये दारूची निर्मीती केली जायची याचे भक्कम पुरावे आपल्याला पहायला मिळतात.

तांदूळ,मध आणि टार्टारिक एसिड असणारी काही फळांचा वापर करून ही दारू बनवली जायची. जी तेव्हा घरातील सर्रास प्रत्येकजण प्राशन करत असे. द्राक्षांच्या बीया, हॉथर्न, लाँगयान किंवा कॉर्लियान चेरी यांच मिश्रण अथवा या फळांपैकी कोणत्याही दोघांचं मिश्रण बनवून वाईन तयार केली जायची.

चीनच्या झोऊ डायनॅस्टी या प्रांतात इसवी सन पूर्व १०४६ ते २२१ या कालखंडात ही फळे वापरल्याचे पुरावे सापडतात. चीनमध्ये केवळ वाईनसाठीचे ४० ते५० प्रकारचे द्राक्ष वापरल्याचे पुरावे मिळतात.

इसवीसन ५४०० ते ५००० मध्ये पूर्वी आशियामध्ये दारू अस्तित्वात असल्याचे पुरावे मिळतात. दारूसाठी बनवलेले मोठे मोठे जार आजही अस्तित्वात आहेत. युरोपीय देशात प्रामुख्याने ग्रीस आणि फ्रांसमध्ये सुमारे १० ते १२ हजार वर्षांपूर्वी दारू अस्तिवात असल्याच्या कथा आहेत मात्र केवळ इसवीसन पूर्व ४०००वर्षांपूर्वीचेच पुरावे इथे पाहायला मिळतात. फ्रान्समध्ये प्रामुख्याने दारू ही द्राक्षांपासूनच बनवली जायची.त्यामुळे पुरावे जर पाहिले तर सगळ्यात आधी दारूडा देश कोणता होता तर चीन असं म्हणायला हरकत नाही.

भारतामध्येसुधा पुराण कथांमध्ये मदिरेचा उल्लेख आढळतो. दारू पिऊन नशेत झुलणारे मालिकांमधले राक्षस आणि देवता अजूनही डोळ्यासमोर उभे राहतात अर्थात झुलत- झुलत. याचाच अर्थ भारत देखील दारू निर्मीतीत मागे नव्हता. पुर्वी दारू हे विरंगुळ्याचं किंवा थकावट दूर करण्याचं साधन होतं.
उत्तर लिहिले · 11/4/2021
कर्म · 110
0

दारूचा शोध नेमका कोणी लावला हे निश्चितपणे सांगणे कठीण आहे, कारण दारूचा इतिहास खूप जुना आहे आणि ती वेगवेगळ्या संस्कृतीत वेगवेगळ्या प्रकारे तयार झाली.

इतिहास:

  • प्राचीन काळ: पुरातत्वीयshow संशोधनानुसार, सुमारे 9,000 वर्षांपूर्वी चीनमध्ये (China) fermentation च्या प्रक्रियेतून दारू तयार झाली होती. तसेच, मध्यपूर्वेकडील (Middle East) संस्कृतीतही दारू आढळल्याचे पुरावे आहेत.
  • भारतात: भारतात वैदिक काळात 'सोम' नावाचा मादक पेय वापरला जात होता, जो धार्मिक विधींमध्ये महत्त्वाचा होता.

त्यामुळे, दारूचा शोध एका व्यक्तीने लावला असे म्हणणे योग्य नाही, कारण ती अनेक वर्षांच्या मानवी प्रयत्नांचे आणि अनुभवांचे फलित आहे.

अधिक माहितीसाठी आपण खालील लिंक बघू शकता:

उत्तर लिहिले · 19/3/2025
कर्म · 1440

Related Questions

चलाची मोजपट्टीचे प्रकार कोणते?
Kinvnachi vyakhya liha?
किंमतची व्याख्या लिहा?
डॉ. सन एम. सेल यांचे कार्य 20 ते 25 ओळीत लिहा?
खरी प्रतिमा कोणत्या प्रकारच्या आरश्यात दिसते?
दूध कशामुळे बनते?
अतिनील किरणांना बघून डास आकर्षित होतात का?