3 उत्तरे
3 answers

उद्योग म्हणजे काय?

6
उद्योग म्हणजे अर्थव्यवस्थेवर आधारित खरेदी विक्री करता येईल अश्या मालाची / वस्तूची निर्मिती करणे तसेच सेवा देणे.

एखाद्या उद्योग हा माणसाच्या गरजा पूर्ण करणाऱ्या वस्तूंची निर्मिती करतो, तर त्या त्यातून नोकरी, तसेच आर्थिक उलाढाल होत असते.

लोकांचे जीवनमान सुधारते तसेच जीवनात आवश्यक गोष्टींचा समावेश झाल्याने जीवन सहजतेने चालते.

उदा. कापड उद्योग, कागद उद्योग, पेट्रोलियम उद्योग, विद्यूत उद्योग, औषध उद्योग, प्लास्टिक उद्योग इ.

तर अश्या उद्योगांमुळे मानवी जीवनात बदल घडत असतो, व जीवनमानात सहजता येत असते, आणि सोबत पर्यावरण सुरक्षेवर प्रश्नचिन्ह येत असतात ...
उत्तर लिहिले · 14/10/2018
कर्म · 85195
0
उद्योग म्हणजे कच्च्या मालाचे पक्क्या मालात रूपांतर करण्याची प्रक्रिया म्हणजे उद्योग होय.
उत्तर लिहिले · 3/3/2023
कर्म · 0
0

उद्योग म्हणजे वस्तू आणि सेवांचे उत्पादन करणे किंवा त्यांची निर्मिती करणे. हे उत्पादन नैसर्गिकरित्या उपलब्ध असलेल्या कच्च्या मालाचा वापर करून किंवा मानवनिर्मित घटकांचा वापर करून केले जाते.

उदाहरणार्थ:

  • वस्त्रोद्योग (Textile industry)
  • information technology (IT)
  • वाहन उद्योग (Automobile industry)
  • बांधकाम उद्योग (Construction industry)

उद्योग अर्थव्यवस्थेचा एक महत्त्वाचा भाग आहे. हे रोजगार निर्माण करतो, वस्तू आणि सेवा पुरवतो आणि त्यामुळे जीवनमान सुधारण्यास मदत होते.

industries चे वर्गीकरण खालील प्रमाणे केले जाते:

  1. कृषी आधारित उद्योग (Agro based industries)
  2. खनिज आधारित उद्योग (Mineral based industries)
  3. रसायन आधारित उद्योग (Chemical based industries)
  4. वन आधारित उद्योग (Forest based industries)
उत्तर लिहिले · 19/3/2025
कर्म · 5240

Related Questions

उद्योगाचे केंद्रीकरण आणि विकेंद्रीकरण स्पष्ट करा?
उद्योग संस्थेचे अल्पकालीन संतुलन स्पष्ट करा?
एमआयडीसीसाठी जमिनीचे व्यवहार कोण पाहते?
MIDC सातारा शिरवळचे अधिकृत ऑफिस कोठे असेल?
flange म्हणजे काय आणि ते कुठे युज करतात?
गृह उद्योग उत्पादन पद्धतीची वैशिष्ट्ये कोणती?
आधुनिक भारतातील उद्योग यावर माहिती लिहा?