शिक्षण अभ्यास वाचन

वाचनाचे महत्त्व काय?

6 उत्तरे
6 answers

वाचनाचे महत्त्व काय?

11
वाचनाचे महत्व आपण आपल्या शालेय जीवनापासून ऐकत आलोय. प्रत्येकजण आपल्याला वाचन किती महत्वाच आहे हे सांगत असतो. परंतु आपण खरचं वाचन करतो का? वाचायला आवडते का? वाचून काही फायदा होतो का? लोक वाचनाला एवढे महत्व का देतात?



१. वाचनामुळे मेंदुला चालना मिळते नवनवीन शब्दांमुळे त्याच्यात प्रगती होत असते. वाचनामुळे आपल्याला नवनवीन माहीती मिळतेच तसेच ज्ञानात भर पडते.

२. सध्या आसपास अनेक मनोरंजनाची साधने उपलब्ध आहेत. दुरदर्शन, संगणक व त्यावर खेळले जाणारे खेळ, मोबाईलवरील खेळ अशी साधने आपल्याला मानसिक आनंद देतात परंतु वाचनामुळे आपण लेखकाने लिहीलेल्या ठिकाणी जाऊन आल्याचा आनंद मिळतो. आपण त्यातील प्रत्येक पात्र जगत असतो.

३. वाचताना आपण लेखकाचं म्हणणे ऐकत असतो. सध्याच्या जीवनात ऐकण्यासाठी कोणाला वेळ नसतो. वाचनामुळे आपल्याला इतरांच ऐकायची सवय लागते. ऐकण्यासाठी संयम असायला हवा. वाचनामुळे आपण आपोआप संयम राखायला शिकतो.

४. अनेक नोकरीच्या संधी वाचनामुळे निर्माण होतात. अनेक ठिकाणी वाचनीय ज्ञान चांगले असते त्याला उत्तम प्रकारच्या नोकरीच्या संधी असतात. उत्तम वाचन असेल तर काम करताना ईमेल लवकर समजून घेण्यास मदत होते. त्यामुळे कामाची गती वाढते.

५. सामान्य ज्ञान वाढते. आपल्याला जर वाचनाची आवड असेल तर मित्रमंडळी किंवा लोकांमध्ये वावरताना आपण एखाद्या विषयावरील चर्चेत आपले मुद्दे योग्य प्रकारे मांडू शकतो. त्यामुळे त्यांच्यात मिसळण्यात मदत होते. वाचनामुळे आपण आपली मते ठळकपणे मांडू शकतो.

वाचनाचा आनंद लुटा. आपल्याला आवडणार्‍या विषयापासून सुरु करा. सवय आपोआप लागेल.

उत्तर लिहिले · 13/10/2018
कर्म · 13485
1
वाचनाने महत्व
          वाचनाचे महत्व आपण आपल्या शालेय जीवनापासून ऐकत आलोय. प्रत्येकजण आपल्याला वाचन किती महत्वाचा आहे हे सांगत असतो. आपण खरचं वाचन करतो का? वाचायचे चांगले? वाचून काही फायदा होतो का? लोक वाचनाला अभ्यास महत्वाचा? वाचनाने माणूस सुसंस्कृत होतो.
डॉक्टर बाबासाहेब म्हणतात, “वाचाल तर वाचाल”. हे खरेच आहे.
माणूस आपले वाचन समृद्ध करून आपला विकास साधू शकतो.
          वाचना मुळात चालना चालना नवनवीन शब्द त्याच्यात गुसवत असते. वाचना मूल आपल्याला नवनवीन माहीतीच तसेच ज्ञानात पडते.
वाचनाने शब्द संपत्ती. त्याचा उपयोग तो निबंध, वकृत, लेखन शब्द करू शकतो.
लेखकांच्या कथा, कादंबरी, ललितलेख, कविता याविषयी माहिती. आपले सामान्य ज्ञान.
त्याचा उपयोग त्याला भावी जीवनात करू शकतो.
आपल्याला वाचनाची आवड असेल तर मित्र जर सदस्यी किंवा लोकांमध्ये वावरताना आपण एखाद्या विषयावर योग्य प्रकारे मांडू. त्यांच्यात मिसळण्यात मदत होते. वाचना मूल आपण आपली मते मांडू शकतो.
           शिक्षक, आईबाप घरातील गणमाणसे यांच्या मार्गदर्शनाने पुस्तके वाचली पाहिजेत. वाढदिवस दणक्यात सांगून दाखवला छान छान छान पुस्तकी पाहिजेत. दिवाळीला फटाके वाजवण्या दिवाळी अंक विकत वाचले पाहिजेत. गाव तेथे ग्रंथालय ही लोकचळवळावे. आपण स्वत: पुस्तक वाचले पाहिजे. इतरांना वाचण्यास प्रोत्साहित केले तर वाचनसंस्कृती जपता येईल.
          वाचनासाठी मार्गदर्शन केले पाहिजे. त्यांच्यामध्ये वाचनाची आवड निर्माण होईल.
रॉयल इंटरनेशनल स्कूल या गेममध्ये आमच्या बाजारपेठेच्या विश्‍वासाच्या अर्जाने १ डिसेंबर ते १० डिसेंबर वाचन दिवस राबण्यात आला. त्याचा लाभार्थी विद्यार्थ्यांना. प्रत्येक विद्यार्थी आपण वाचनास प्रवृत्त होते.
शेवटी असंतुष्ट म्हणावे लागेल “वाचाल तर वाचाल”.



उत्तर लिहिले · 1/12/2021
कर्म · 121765
0
वाचनाचे महत्व

वाचन एक महत्वपूर्ण कौशल्य आहे जे आपल्याला ज्ञान प्राप्त करण्यास, नवीन कल्पनांना समजून घेण्यास आणि आपल्या क्षितिजांना विस्तारित करण्यास मदत करते. वाचनाचे काही महत्वाचे फायदे:

  • ज्ञान आणि माहिती: वाचनामुळे आपल्याला विविध विषयांवर माहिती मिळते. पुस्तके, लेख आणि इतर वाचन सामग्री आपल्याला जगाला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यास मदत करतात.
  • भाषा कौशल्ये: वाचन आपल्या भाषेच्या ज्ञानाला सुधारते. नवीन शब्द आणि वाक्य रचना शिकायला मिळतात.
  • विचार कौशल्ये: वाचनाने आपली विचार करण्याची क्षमता वाढते. आपण अधिक टिकात्मक विचार करू शकतो.
  • एकाग्रता आणि स्मरणशक्ती: वाचनामुळे एकाग्रता वाढते आणि स्मरणशक्ती सुधारते.
  • मनोरंजन: वाचन एक उत्कृष्ट मनोरंजन आहे. चांगली पुस्तके आपल्याला ताण कमी करण्यास मदत करतात.

थोडक्यात, वाचन आपल्या जीवनातील एक अविभाज्य भाग आहे.

उत्तर लिहिले · 19/3/2025
कर्म · 1620

Related Questions

जिल्हा परिषद शाळा चांगली की इंग्लिश शाळा चांगली?
इयत्ता दहावी, शास्त्रीय कारणे: सगळ्या पुस्तकांतील?
एका परीक्षा केंद्रामध्ये एका वर्गामध्ये 7 रांगा आहेत असे एकूण 3 वर्ग आहेत. एका रांगेत 25 विद्यार्थी बसतात, एका रांगेसाठी 2 शिक्षक आणि एका वर्गासाठी एक पर्यवेक्षक आहे. तर एका केंद्रप्रमुखासह परीक्षाकेंद्रामध्ये एकूण किती लोक उपस्थित आहेत?
ITI परीक्षा कधी आहे?
Badati mhnje kay badatiche uddhesh spshta kara?
बदती म्हणजे काय? बदतीचे उद्देश स्पष्ट करा?
मुद्दे: शिक्षणाचे तत्त्वे?