प्रवास पर्यटन स्थळभेट

गणपतीपुळेला ट्रिप काढली तर कोणकोणते पॉईंट पाहता येतील?

2 उत्तरे
2 answers

गणपतीपुळेला ट्रिप काढली तर कोणकोणते पॉईंट पाहता येतील?

5
गणपतीपुळे हे रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे. येथील गणपतीची मूर्ती स्वयंभू आहे अशी मान्यता आहे. सह्याद्री पर्वतातील डोंगराळ भागात विराजलेली नैसर्गिक मूर्ती आणि जवळच पश्चिमेला अरबी समुद्र ह्यामुळे हे देऊळ आगळेवेगळे आहे. गणपतीची मूर्ती डोंगराच्या बाजूला असल्याने तिला प्रदक्षिणा घालण्यासाठी संपूर्ण डोंगराला प्रदक्षिणा घालणे क्रमप्राप्त असते. १ किलोमीटर लांबीचा हा प्रदक्षिणामार्ग समुद्र, वाळूचा किनारा आणि नारळ पोफळीच्या झाडांमुळे अतिशय विलोभनीय आहे. या ठिकाणी समुद्र आणि वाळूचा किनारा असल्याने तेथे पर्यटकांची गर्दी पहावयास मिळते.
गणपतीपुळ्याला सुंदरसा समुद्र किनारा लाभला आहे. गणपतीपुळ्याला जाण्यासाठी मुंबई आणि पुण्यावरुन एसटीची एशियाड बस सेवा आहे. जवळच भंडारपुळे हे सुंदर गाव आहे. भंडारपुळे गावचा समुद्रकिनाराही रमणीय आहे. इथून काही अंतर पुढे गेल्यावर ६ किमी अंतरावर नेवरे गाव आहे, नेवरे गावाजवळे सुरूचे बन व वाळूचा किनारा आहे. ह्या सर्व गावांत प्रामुख्याने भंडारी, कुणबी आणि कोकणस्थ ब्राह्मण समाज आहे.

इथून जवळच २ किमी अंतरावर मालगुंड ह्या गावात कवी केशवसुत ह्यांचे स्मारक आहे.

गणपतीपुळे हे रेवस रेड्डी सागरी महामार्गावर वसलेले पर्यटन स्थळ आहे. ह्या गावाच्या इतिहासात असेही म्हटले जाते की गणपतीपुळे आणि आसपासच्या नेवरे, मालगुंड आणि भंडारपुळे ह्या गावांत गणेशोत्सव काळात गणपतीची मूर्ती आणून पूजा केली जात नाही. गणपतीपुळ्याचा लंबोदर हाच या सर्व रामस्थांचा गणपती अशी येथील ख्याती आहे.

त्याच रस्त्याला लागून रत्नागिरीच्या दिशेने ’आरे वारे’ हा सनसेट पॉइन्ट आहे.. ’नवरा माझा नवसाचा’ आणि ’फुल थ्री धमाल’ ह्या चित्रपटांचे शूटिंग गणपतीपुळ्याला झाले होते.
  थिबा पॅलेस
      थिबा पॅलेस हे रत्नागिरीतले मोठे आकर्षण आहे. थिबा रोड थेट या ठिकाणी नेतो आणि भव्य पटांगणातील लाल रंगाची, मेंगलोरी कौलांची सुंदर वास्तु दृष्टीस पडते. बशह्मी पद्धतीच्या या वास्तूचे सौंदर्य विस्तीर्ण पटांगणामुळे अधिकच नजरेत भरते. ९७ वर्षांपुर्वीच्या या राजवाड्याचे धागे ब्रह्मदेशाशी (आताचे म्यानमार) जोडलेले आहेत. १८८५ च्या सुमारास ब्रह्मदेशाचा राजा थिबा - ज्याने तेथे सात वर्ष राज्य वेत्र्ले. त्याचा पराभव करुन ब्रिटीशांनी ब्रह्मदेश आपल्या ताब्यात घेतला आणि थिबा राजाला कैद वेत्र्ले. त्यानंतर त्याने पुन्हा उठाव करु नये, त्याचा त्याच्या प्रजेशी काहीही संबंध राहु नये यासाठी ब्रिटीशांनी त्याला रत्नागिरीत बंदिवान म्हणुन ठेवायचे ठरवले. १७ एप्रिल १८८६ रोजी थिबा राजाला त्याच्या परिवारासह कॅनिंग बोटीने मद्रासला (चेन्नई) व तेथुन क्लाईव्ह बोटीने रत्नागिरीत आणले गेले. रत्नागिरीत प्रथम ऑट्रम बंगल्यात व नंतर बेकर बंगल्यात ठेवण्यात आले. पुढे २७ एकर आणि साडे अकरा गुंठे विस्ताराच्या मोठ्या भुखंडावर एक लाख सदतीस हजार चारशे शहाऐंशी रुपये खर्च करुन तीन मजली प्रशस्त राजवाडा उभारला गेला आणि १३ नोव्हेंबर १९१० रोजी थिबा राजा आपल्या परिवारासह तेथे राहण्यास गेला. ३० वर्षांच्या कैदेनंतर १५ डिसेंबर १९१९ रोजी वयाच्या ५८ व्या वर्षी थिबा राजाचा मृत्यू झाला. अशा अनेक घटनांचे साक्षीदार असलेल्या या राजवाड्याच्या तळमजल्यावर संगमरवरी फरशीचं नृत्यगृह आहे. उंच गच्चीवरुन समोर पसरलेल्या विस्तीर्ण सागराचे दर्शन होते. छताला सुंदर नक्षीकाम केलेल्या लाकडी पट्टया लावलेल्या असून अर्धवर्तुळाकार खिडक्यांना रंगबिरंगी इटालियन काचा लावलेल्या आहेत. या राजवाड्याच्या मागे थिबा राजाने ब्रम्हदेशातुन आणलेली बुद्धाची मुर्ती स्थापन वेत्र्लेली आहे. राजवाड्याच्या मागील बाजूच्या भागात आता पुरातन वस्तूसंग्रहालय आहे. तळमजल्यावर कोकणातील व देशातील इतर भागात सापडलेल्या विविध प्राचीन मूर्ती मांडल्या आहेत, तर वरच्या मजल्यावर टूटू यांचा फोटो, जुन्या लाकडी खुर्च्या आणि कोकणातील प्राचीन मंदिरांची चित्र प्रदर्शनी आहेत. दुपारी १ ते १.३० जेवण वेळ व सोमवार साडून इतर दिवशी हे म्युझियम सर्वांसाठी खुले असते. येथून पूढे थिबा पॅाईंट नामक स्थानावर आता जिजामाता गार्डन उभे राहिले आहे. इथल्या मनोऱ्यावरून मोठे विहंगम दृश्य दिसते. भाट्ये नदी, राजीवडा बंदर, अथांग समुद्र आणि भगवती किल्ला या पार्श्वभूमीवर सुर्यास्त पाहण्यासाठी येथे नेहमीच गर्दी असते. अस्ताला जाणाऱ्या नारायणाचे वाटोळे बिंब हळूहळू क्षितिजाआड होत असते. दिवसभर राज्य करणारा तेजोभास्कर निस्तेज होत जातो, पाठीमागून अंधारही झाकोळुन येत असतो आणि नकळत त्या वेळी थिबा राजाच्या करुण कहाणीची आठवण होते.

  लोकमान्य टिळकांचे जन्मस्थान
       रत्नागिरी शहरात मध्यवर्ती भागात टिळक आळीत एक टुमदार, कौलारु कोकणी घर आहे. दीडशे वर्षापुर्वी २३ जुलै १८५६ रोजी याच घरात लो. बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म झाला. मुळच्या श्रीमती. इंदिराबाई गोरे यांच्या या घरात टिळक कुटुंबीय भाड्याने राहत होते. लोकमान्यांचे वडील त्या वेळी शिक्षक म्हणून रत्नागिरीत नोकरीस होते. टिळकांचे मूळ गाव दापोली दाभोळ रस्त्यावरील चिखलगाव, ज्या ठिकाणी आता त्यांच्या घराच्या जोत्यावर टिळक १० वर्षे वास्तव्य होते. या ठिकाणी आता महाराष्ट्र राज्याच्या पुरातत्व व वस्तुसंग्रहालयाचे विभागाचं कार्यालय आहे. बाहेरच्या आवारात लो.टिळकांचा पूर्णाकृती पुतळा आहे.
 
गंगातीर्थ राजापूर
        मुंबई - गोवा महामार्गावर राजापूरच्या पुढे गंगातीर्थाचे ठिकाण आहे. या ठिकाणी चौदा कुंड आहेत. सभोवताली जांभ्या दगडाची तटबंदी आहे. मुख्य प्रवेशद्वारासमोरच काशीकुंड व गोमुख आहे. त्या शेजारी मोकळ्या जागेत वटवृक्षाखाली मूळ कुंड आहे. या मुळ कुंडात गंगेचे प्रथम आगमन होते. ही दोन्ही कुंडे भरुन वाहू लागली की इतर कुंडात पाणी येते. निसर्ग नवल म्हणजे गंधकाचा वास येणाऱ्या प्रत्येक कुंडातील पाण्याच्या तापमानात जाणवण्या इतका फरक असतो. काशी कुंडात्तील गोमुखातून पडणाऱ्या पाण्याखाली उभे रहून गंगा स्नान करता येते. काणत्याही दिवशी प्रकट होणारी गंगा हा सृष्टीचा चमत्कार मानावा लागेल. साधारपणे दर तीन वर्षांनी गंगेचे आगमन होते. अन्य वेळी ही सर्व कुंड रिकामी असतात.

उत्तर लिहिले · 11/10/2018
कर्म · 1160
0

गणपतीपुळे येथे भेट देण्यासाठी अनेक सुंदर स्थळे आहेत. खाली काही प्रमुख स्थळांची माहिती दिली आहे:

गणपतीपुळे मंदिर:

हे स्वयंभू गणपती मंदिर भारतातील प्रसिद्ध मंदिरांपैकी एक आहे. येथील गणपतीची मूर्ती स्वयंभू आहे असे मानले जाते.

गणपतीपुळे समुद्रकिनारा:

गणपतीपुळे हे सुंदर समुद्रकिनाऱ्यासाठी प्रसिद्ध आहे. येथे तुम्ही समुद्रात डुंबण्याचा आणि जलक्रीडांचा आनंद घेऊ शकता.

मालगुंड:

मालगुंड हे प्रसिद्ध कवी केशवसुत यांचे जन्मस्थान आहे. येथे त्यांचे स्मारक आहे आणि एक सुंदर समुद्रकिनारा देखील आहे.

आरे-वारे बीच:

गणपतीपुळ्याच्या जवळ आरे आणि वारे हे दोन सुंदर समुद्रकिनारे आहेत. हे शांत आणि सुंदर स्थळ पर्यटकांना खूप आवडते.

जयगड किल्ला:

जयगड किल्ला गणपतीपुळ्यापासून थोड्या अंतरावर आहे. हा किल्ला ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचा आहे आणि येथून समुद्राचा सुंदर नजारा दिसतो.

वेळणेश्वर:

वेळणेश्वर हे एक सुंदर गाव असून तेथील शिवमंदिर प्रसिद्ध आहे.

हेदवी:

हेदवी गावी श्री दशभुज गणपती मंदिर आहे.

गणपतीपुळ्याला भेट देण्यासाठी अनेक खाजगी आणि शासकीय बस उपलब्ध आहेत. मुंबई, पुणे आणि महाराष्ट्रातील इतर प्रमुख शहरांमधून येथे जाण्यासाठी बसेस मिळतात. स्वतःच्या वाहनाने प्रवास करणे देखील सोपे आहे.

गणपतीपुळे हे पर्यटकांसाठी एक सुंदर ठिकाण आहे.

उत्तर लिहिले · 19/3/2025
कर्म · 5400

Related Questions

पुणे दर्शन कसे करावे?
अलिबागला जोडीने (कपल) कसे फिरावे?
मनोऱ्यावर उभे राहिल्यास मुंबईचे दर्शन कसे घडते?
बाबा आमटे यांच्या आनंदवनला कसे जावे याविषयी माहिती मिळेल का?
लोणावळ्याला फिरण्यासारखे काय आहे आणि कसे फिरावे?
नागपूरमध्ये पर्यटनासाठी चांगली ठिकाणे कोणती?
मला दिल्ली फिरायची आहे, कोणती टूर बेस्ट आहे?