स्थळभेट
पुणे शहराची यात्रा करणे एक आनंददायी अनुभव असू शकते. पुणे शहर हे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे शहर आहे आणि तेथे अनेक ऐतिहासिक स्थळे, सांस्कृतिक ठिकाणे आणि आधुनिक आकर्षणे आहेत. तुम्ही पुण्याला भेट देऊन कसे आनंद घेऊ शकता यासाठी काही सूचना:
- शनिवार वाडा: हा ऐतिहासिक किल्ला पेशव्यांचे निवासस्थान होता. महाराष्ट्र पर्यटन शनिवार वाडा
- आगा खान पॅलेस: हे एक ऐतिहासिक स्थळ आहे जेथे महात्मा गांधींना कैद केले होते. आगा खान पॅलेस
- दगडूशेठ हलवाई मंदिर: हे गणपतीचे प्रसिद्ध मंदिर आहे. दगडूशेठ हलवाई मंदिर
- लाल महाल: शिवाजी महाराजांचे बालपण येथे व्यतीत झाले.
- राजीव गांधी प्राणी उद्यान: (katraj zoo) कात्रज येथे असलेले हे मोठे प्राणी संग्रहालय आहे. राजीव गांधी प्राणी उद्यान
- सिंहगड किल्ला: पुणे शहराच्या जवळ असलेला हा किल्ला ट्रेकिंगसाठी उत्तम आहे. सिंहगड किल्ला
- बस: पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (PMPML) बसेस शहरात फिरण्यासाठी उपलब्ध आहेत.
- ऑटो रिक्षा: शहरात ऑटो रिक्षा सहज मिळतात.
- टॅक्सी/ App based cab: ओला (Ola) आणि उबर (Uber) यांसारख्या ॲप-आधारित टॅक्सी सेवा देखील उपलब्ध आहेत.
पुण्यात बजेट हॉटेल्सपासून ते लक्झरी हॉटेल्सपर्यंत अनेक पर्याय उपलब्ध आहेत. तुम्ही तुमच्या गरजेनुसार निवड करू शकता.
पुणे शहरात तुम्हाला पारंपरिक महाराष्ट्रीयन पदार्थांपासून ते आधुनिक खाद्यपदार्थांपर्यंत अनेक पर्याय मिळतील. मिसळ पाव, बाकरवडी आणि पुरण पोळी हे इथले प्रसिद्ध पदार्थ आहेत.
- पुण्यात हवामान उष्ण आणि दमट असू शकते, त्यामुळे त्यानुसार तयारी करा.
- शहरात फिरताना पाण्याची बाटली सोबत ठेवा.
- स्थानिक लोकांशी आदराने बोला.
पुणे शहरात करण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत, त्यामुळे तुम्ही तुमच्या आवडीनुसार योजना बनवू शकता.
अलिबाग हे जोडप्यांसाठी एक सुंदर ठिकाण आहे. येथे फिरण्यासाठी काही पर्याय:
- समुद्रकिनारे: अलिबागमध्ये अनेक सुंदर समुद्रकिनारे आहेत. अलिबाग बीच, किहीम बीच आणि मांडवा बीच हे प्रसिद्ध आहेत. या किनाऱ्यांवर तुम्ही फिरू शकता, खेळू शकता किंवा फक्त शांत बसून समुद्राचा आनंद घेऊ शकता.
- historischen स्थळे: अलिबागमध्ये अनेक ऐतिहासिक स्थळे आहेत. कुलाबा किल्ला, कोर्लाई किल्ला आणि मुरुड जंजिरा किल्ला हे पाहण्यासारखे आहेत.
- निसर्गरम्य स्थळे: अलिबागमध्ये अनेक निसर्गरम्य स्थळे आहेत. कर्नाळा पक्षी अभयारण्य आणि फणसाड वन्यजीव अभयारण्य हे पक्षी आणि प्राणी पाहण्यासाठी उत्तम आहेत.
- Water Sports: अलिबागमध्ये तुम्ही water sports चा आनंद घेऊ शकता. येथे स्कूबा डायव्हिंग, पॅरासेलिंग आणि जेट स्कीइंगसारख्या ॲक्टिव्हिटीज उपलब्ध आहेत.
राहण्याची सोय: अलिबागमध्ये राहण्यासाठी अनेक हॉटेल्स आणि रिसॉर्ट्स उपलब्ध आहेत. तुमच्या बजेटनुसार तुम्ही निवड करू शकता.
खाण्याची सोय: अलिबागमध्ये खाण्यासाठी अनेक रेस्टॉरंट्स आहेत. येथे तुम्हाला सी-फूड आणि इतर प्रकारचे खाद्यपदार्थ मिळतील.
प्रवासाची सोय: अलिबागला मुंबई आणि पुण्याहून बस किंवा ट्रेनने जाता येते. स्वतःचे वाहन असल्यास ते अधिक सोयीचे आहे.
तुम्ही तुमच्या आवडीनुसार आणि वेळेनुसार योजना आखू शकता.
उदाहरणार्थ, तुम्ही खालीलप्रमाणे योजना बनवू शकता:
- पहिला दिवस: सकाळी मुंबई/पुणेहून अलिबागला प्रस्थान, हॉटेलमध्ये चेक-इन, दुपारचे जेवण आणि अलिबाग बीचवर फेरफटका.
- दुसरा दिवस: कुलाबा किल्ला आणि कोर्लाई किल्ला भेट, दुपारचे जेवण आणि किहीम बीचवर सूर्यास्त.
- तिसरा दिवस: मुरुड जंजिरा किल्ला भेट आणि सायंकाळी मुंबई/पुण्याला परत.
तुम्ही तुमच्या आवडीनुसार या योजनेत बदल करू शकता.
अलिबाग हे जोडप्यांसाठी एक रोमँटिक आणि मजेदार ठिकाण आहे.
आनंदवनला कसे जावे:
आनंदवन हे महाराष्ट्र राज्याच्या चंद्रपूर जिल्ह्यात आहे. येथे जाण्यासाठी तुम्ही खालील मार्गांचा वापर करू शकता:
-
विमानाने:
सर्वात जवळचा विमानतळ नागपूरमध्ये आहे. नागपूर विमानतळावरून आनंदवन सुमारे 200 किलोमीटर अंतरावर आहे. विमानतळावरून तुम्ही टॅक्सी किंवा बसने आनंदवनला पोहोचू शकता.
-
रेल्वेने:
सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन चंद्रपूर आहे. चंद्रपूर रेल्वे स्टेशनवरून आनंदवन सुमारे 45 किलोमीटर अंतरावर आहे. रेल्वे स्टेशनवरून तुम्ही बस किंवा टॅक्सीने आनंदवनला जाऊ शकता.
-
बसने:
चंद्रपूर आणि वरोरा या शहरांमधून आनंदवनसाठी नियमित बस सेवा उपलब्ध आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या (MSRTC) बसेस चंद्रपूर आणि वरोरा बस स्थानकांवरून मिळतात.
-
खाजगी वाहन:
तुम्ही स्वतःच्या वाहनाने देखील आनंदवनला जाऊ शकता. नागपूर-चंद्रपूर महामार्गावरून वरोरा मार्गे आनंदवनला पोहोचता येते.
आनंदवनला भेट देण्यासाठी उपयुक्त माहिती:
-
आनंदवनला भेट देण्यासाठी अगोदर संपर्क साधून वेळ निश्चित करणे चांगले राहील.
-
तुम्ही आनंदवनातील लोकांसाठी आवश्यक असणाऱ्या वस्तू किंवा देणगी देऊ शकता.
-
आनंदवन हे एक सामाजिक केंद्र आहे, त्यामुळे तेथील नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.
१. भुशी धरम: इ.स. १८६० च्या दशकात इंद्रायणी नदीच्या पाण्याचा वेग अडवण्यासाठी भुशी धरणाची उभारणी करण्यात आली होती परंतु आता ती लोणावळा येथील प्रसिद्ध व गर्दीच्या पर्यटनस्थळांपैकी एक आहे.
शुल्क: विनामूल्यव्हिसीटींग टाईम: सकाळी 9 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंतलोणावळा पासून अंतर: 7 किमीपत्ता: भुशी धरण, लोणावळा, पुणे, महाराष्ट्र, ४१०४०१
२. सुनीलची सेलिब्रिटी वॅक्स संग्रहालय:लोणावळा येथील सेलिब्रिटी वॅक्स संग्रहालय हे सुनील कंदल्लूर यांच्या मार्गदर्शनाखाली झाले आहे. संग्रहालयात जगभरातील प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वाचे उत्तम मोम पुतळे आहेत.
प्रवेश शुल्कः 150 प्रति व्यक्तीभेटीची वेळ: सकाळी ९ ते १० पर्यंतलोणावळ्यापासूनचे अंतर: ० किमीपत्ता: ओल्ड मुंबई पुणे हाई, गौतम पार्क सोसायटी, पुणे, महाराष्ट्र ४१०४०१
३.लायन पॉइंट: लायन पॉइंट वर सह्याद्री पर्वतांचे एक लाक्षणिक दृश्य बघायला भेटते.
फोटोग्राफीसाठी उत्तम स्थानप्रवेश: विनामूल्यलोणावळ्यापासूनचे अंतर: १२ किमीपत्ता: लायन पॉईंट, हडको कॉलनी, लोणावळा, महाराष्ट्र ४१०४०१
४. कार्ला लेणी: कार्ला लेणी ही भारतात सर्वात बौद्धकालीन लेणी आहे
व्हिसीटींग टाईम: ९ ते ५ वाजेपर्यंतप्रवेश: रु. ५ प्रति व्यक्तीलोणावळ्यापासूनचे अंतर: ११ किमीपत्ता: कार्ला, लोणावळा, पुणे, महाराष्ट्र ४१०४०५
५. पवना लेक: पवना लेक हे लोणावळ्यापासून ३५ किलोमीटर दूर असलेले एक सुंदर तलाव आहे. आपण जर लोणावळ्यामधे असाल तर या पवना लेक ला अवश्य भेट द्या.
प्रवेश: विनामूल्यलोणावळ्यापासूनचे अंतर: ३५ किमीपत्ता: पवना लेक, पुणे, महाराष्ट्र ४१०४०१
६.मंकी हील:मंकी हील हा सगळ्यांचाच आवडता पिकनिक स्पॉट आहे. जवळजवळ सगळ्याच ट्रेन ज्या खंडाळ्यावरून पळसदरी ला जातात त्या मंकी हील पॉइंटला ला ट्रेन चे ब्रेक्स चेक करायला थांबतात.
प्रवेश: विनामूल्यलोणावळापासून अंतर: १४ किमी
७. किनारा ढाबा: आपल्या कुटुंबासोबत किव्हा मिंत्रांसोबत मेजवानी करण्यासाठी परिपूर्ण ठिकाण.
लंच व डिनर साठी उत्तम ठिकाणव्हिसीटींग टाईम: सकाळी ११ - रात्री ११:३०लोणावळ्यापासूनचे अंतर: ६ किमीपत्ता: टोल प्लाझा, ओल्ड मुंबई-पुणे हाई, वक्साई, वरोसोली, लोणावळा, महाराष्ट्र ४१०४०१
८. लोहगड किल्ला
प्रवेश: विनामूल्यट्रेकिंग साठी योग्य ठिकाणलोणावळा पासून अंतर: १५ किमीपत्ता: लोहागड, लोहगड ट्रक रोड, महाराष्ट्र ४१०४०६
९. एकविरा मंदिर: एकविरा मंदिर हे कार्ला लेणींसमोरील एक टेकडीवर वसलेले आहे आणि तिथे पोहोचण्यासाठी 300 पायऱ्या चढाव्या लागतात.
प्रवेश: विनामूल्यलोणावळ्यापासूनचे अंतर: ९ किमीपत्ता: एकविरा देवी रोड, कार्ला, महाराष्ट्र ४१०४०५
१०. कामशेठ पॅराग्लाइडिंगः तुमहाला जर पॅराग्लाइडिंग ची आवड असेल तर कामशेठ पॅराग्लाइडिंग ला नक्की भेट द्या.
२४९९ ते ५९९९ प्रति व्यक्तीलोणावळ्यापासून अंतर: २० किमी
गणपतीपुळ्याला सुंदरसा समुद्र किनारा लाभला आहे. गणपतीपुळ्याला जाण्यासाठी मुंबई आणि पुण्यावरुन एसटीची एशियाड बस सेवा आहे. जवळच भंडारपुळे हे सुंदर गाव आहे. भंडारपुळे गावचा समुद्रकिनाराही रमणीय आहे. इथून काही अंतर पुढे गेल्यावर ६ किमी अंतरावर नेवरे गाव आहे, नेवरे गावाजवळे सुरूचे बन व वाळूचा किनारा आहे. ह्या सर्व गावांत प्रामुख्याने भंडारी, कुणबी आणि कोकणस्थ ब्राह्मण समाज आहे.
इथून जवळच २ किमी अंतरावर मालगुंड ह्या गावात कवी केशवसुत ह्यांचे स्मारक आहे.
गणपतीपुळे हे रेवस रेड्डी सागरी महामार्गावर वसलेले पर्यटन स्थळ आहे. ह्या गावाच्या इतिहासात असेही म्हटले जाते की गणपतीपुळे आणि आसपासच्या नेवरे, मालगुंड आणि भंडारपुळे ह्या गावांत गणेशोत्सव काळात गणपतीची मूर्ती आणून पूजा केली जात नाही. गणपतीपुळ्याचा लंबोदर हाच या सर्व रामस्थांचा गणपती अशी येथील ख्याती आहे.
त्याच रस्त्याला लागून रत्नागिरीच्या दिशेने ’आरे वारे’ हा सनसेट पॉइन्ट आहे.. ’नवरा माझा नवसाचा’ आणि ’फुल थ्री धमाल’ ह्या चित्रपटांचे शूटिंग गणपतीपुळ्याला झाले होते.
थिबा पॅलेस
थिबा पॅलेस हे रत्नागिरीतले मोठे आकर्षण आहे. थिबा रोड थेट या ठिकाणी नेतो आणि भव्य पटांगणातील लाल रंगाची, मेंगलोरी कौलांची सुंदर वास्तु दृष्टीस पडते. बशह्मी पद्धतीच्या या वास्तूचे सौंदर्य विस्तीर्ण पटांगणामुळे अधिकच नजरेत भरते. ९७ वर्षांपुर्वीच्या या राजवाड्याचे धागे ब्रह्मदेशाशी (आताचे म्यानमार) जोडलेले आहेत. १८८५ च्या सुमारास ब्रह्मदेशाचा राजा थिबा - ज्याने तेथे सात वर्ष राज्य वेत्र्ले. त्याचा पराभव करुन ब्रिटीशांनी ब्रह्मदेश आपल्या ताब्यात घेतला आणि थिबा राजाला कैद वेत्र्ले. त्यानंतर त्याने पुन्हा उठाव करु नये, त्याचा त्याच्या प्रजेशी काहीही संबंध राहु नये यासाठी ब्रिटीशांनी त्याला रत्नागिरीत बंदिवान म्हणुन ठेवायचे ठरवले. १७ एप्रिल १८८६ रोजी थिबा राजाला त्याच्या परिवारासह कॅनिंग बोटीने मद्रासला (चेन्नई) व तेथुन क्लाईव्ह बोटीने रत्नागिरीत आणले गेले. रत्नागिरीत प्रथम ऑट्रम बंगल्यात व नंतर बेकर बंगल्यात ठेवण्यात आले. पुढे २७ एकर आणि साडे अकरा गुंठे विस्ताराच्या मोठ्या भुखंडावर एक लाख सदतीस हजार चारशे शहाऐंशी रुपये खर्च करुन तीन मजली प्रशस्त राजवाडा उभारला गेला आणि १३ नोव्हेंबर १९१० रोजी थिबा राजा आपल्या परिवारासह तेथे राहण्यास गेला. ३० वर्षांच्या कैदेनंतर १५ डिसेंबर १९१९ रोजी वयाच्या ५८ व्या वर्षी थिबा राजाचा मृत्यू झाला. अशा अनेक घटनांचे साक्षीदार असलेल्या या राजवाड्याच्या तळमजल्यावर संगमरवरी फरशीचं नृत्यगृह आहे. उंच गच्चीवरुन समोर पसरलेल्या विस्तीर्ण सागराचे दर्शन होते. छताला सुंदर नक्षीकाम केलेल्या लाकडी पट्टया लावलेल्या असून अर्धवर्तुळाकार खिडक्यांना रंगबिरंगी इटालियन काचा लावलेल्या आहेत. या राजवाड्याच्या मागे थिबा राजाने ब्रम्हदेशातुन आणलेली बुद्धाची मुर्ती स्थापन वेत्र्लेली आहे. राजवाड्याच्या मागील बाजूच्या भागात आता पुरातन वस्तूसंग्रहालय आहे. तळमजल्यावर कोकणातील व देशातील इतर भागात सापडलेल्या विविध प्राचीन मूर्ती मांडल्या आहेत, तर वरच्या मजल्यावर टूटू यांचा फोटो, जुन्या लाकडी खुर्च्या आणि कोकणातील प्राचीन मंदिरांची चित्र प्रदर्शनी आहेत. दुपारी १ ते १.३० जेवण वेळ व सोमवार साडून इतर दिवशी हे म्युझियम सर्वांसाठी खुले असते. येथून पूढे थिबा पॅाईंट नामक स्थानावर आता जिजामाता गार्डन उभे राहिले आहे. इथल्या मनोऱ्यावरून मोठे विहंगम दृश्य दिसते. भाट्ये नदी, राजीवडा बंदर, अथांग समुद्र आणि भगवती किल्ला या पार्श्वभूमीवर सुर्यास्त पाहण्यासाठी येथे नेहमीच गर्दी असते. अस्ताला जाणाऱ्या नारायणाचे वाटोळे बिंब हळूहळू क्षितिजाआड होत असते. दिवसभर राज्य करणारा तेजोभास्कर निस्तेज होत जातो, पाठीमागून अंधारही झाकोळुन येत असतो आणि नकळत त्या वेळी थिबा राजाच्या करुण कहाणीची आठवण होते.
लोकमान्य टिळकांचे जन्मस्थान
रत्नागिरी शहरात मध्यवर्ती भागात टिळक आळीत एक टुमदार, कौलारु कोकणी घर आहे. दीडशे वर्षापुर्वी २३ जुलै १८५६ रोजी याच घरात लो. बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म झाला. मुळच्या श्रीमती. इंदिराबाई गोरे यांच्या या घरात टिळक कुटुंबीय भाड्याने राहत होते. लोकमान्यांचे वडील त्या वेळी शिक्षक म्हणून रत्नागिरीत नोकरीस होते. टिळकांचे मूळ गाव दापोली दाभोळ रस्त्यावरील चिखलगाव, ज्या ठिकाणी आता त्यांच्या घराच्या जोत्यावर टिळक १० वर्षे वास्तव्य होते. या ठिकाणी आता महाराष्ट्र राज्याच्या पुरातत्व व वस्तुसंग्रहालयाचे विभागाचं कार्यालय आहे. बाहेरच्या आवारात लो.टिळकांचा पूर्णाकृती पुतळा आहे.
गंगातीर्थ राजापूर
मुंबई - गोवा महामार्गावर राजापूरच्या पुढे गंगातीर्थाचे ठिकाण आहे. या ठिकाणी चौदा कुंड आहेत. सभोवताली जांभ्या दगडाची तटबंदी आहे. मुख्य प्रवेशद्वारासमोरच काशीकुंड व गोमुख आहे. त्या शेजारी मोकळ्या जागेत वटवृक्षाखाली मूळ कुंड आहे. या मुळ कुंडात गंगेचे प्रथम आगमन होते. ही दोन्ही कुंडे भरुन वाहू लागली की इतर कुंडात पाणी येते. निसर्ग नवल म्हणजे गंधकाचा वास येणाऱ्या प्रत्येक कुंडातील पाण्याच्या तापमानात जाणवण्या इतका फरक असतो. काशी कुंडात्तील गोमुखातून पडणाऱ्या पाण्याखाली उभे रहून गंगा स्नान करता येते. काणत्याही दिवशी प्रकट होणारी गंगा हा सृष्टीचा चमत्कार मानावा लागेल. साधारपणे दर तीन वर्षांनी गंगेचे आगमन होते. अन्य वेळी ही सर्व कुंड रिकामी असतात.
नागपूर जिल्हयात नागपूरपासून 80 किलोमीटर अंतरावर असलेल्या रामटेकजवळील पेंच नदीवर असलेले तोतलाडोह नावाचे धरण आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 7 वर हा परिसर आहे. हे धरण पेंच नदीच्या जलविद्युत प्रकल्पाचा एक भाग आहे. येथील परिस्थिती सर अतिशय मनमोहक आहे.
रामटेक तालुक्यात असलेल्या खिंडसी तलावाच्या सभोवताल घनदाट जंगल आहे. नागपूरपासून 53 किलोमीटर आणि रामटेकपासून 3.5 किलोमीटर अंतरावर हा तलाव आहे. वैदर्भिय जनतेसाठी गेल्या अनेक वर्षांपासून हे स्थळ आकर्षक आणि आवडीचे पर्यटन स्थळ बनले आहे. येथे येणारे पर्यटक मोटरबोट्स, पेडल बोट्स, रोवींग बोट्स, वॉटर स्कूटर्स आदींच्या माध्यमातून जलतरणाचा आनंद घेऊ शकतात. लहान मुलांसाठी येथे साहसी पार्कही आहे.
नागपूरपासून 65 किलोमीटर अंतरावर असलेल्या खाप्रा येथील खेकरा नाला हे सौंदर्याने ओतप्रोत असलेले धरणाचे ठिकाण आहे. खापाजवळील छिंदवाडा मार्गावर ते आहे. साहसी कृत्य करणा-यांसाठी विशेषत: पर्वतरोहकांसाठी हे ठिकाण अतिशय आदर्श असेच आहे. येथील मुख्य आकर्षण म्हणजे, खेकरा नाला धरणाच्या सभोवताल असलेला अतिशय शांत आणि निश्चल असा तलाव, सभोवताल असलेले घनदाट जंगल, हिरवागार निसर्ग, आरोग्यासाठी पोषक वातावरण हे होय. हे सौंदर्य पाहण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातील पर्यटक येथे येत असतात. यामुळेच महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने पर्यटकांसाठी येथे लॉंजिंग सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
नागपूरच्या फुटाळा तलावाजवळील सेमिनरी हिल्स भागात असलेले सातपुडा बॉटनिकल गार्डन हे अतिशय अदभुत गार्डन असून, हजारो लोकांसाठी ते आकर्षणाचे केंद्रिंबदू ठरले आहे. सिटी सेंटरच्या ईशान्येकडे असलेल्या या सातपुडा बॉटनिकल गार्डनमध्ये अनेक दुर्मिळ वनस्पती आहेत. जीवशास्त्र, प्राणीशास्त्र आणि पर्यावरण विज्ञानाचा अभ्यास करणार्यांसाठी हे गार्डन अतिशय उपयुक्त ठिकाण आहे. कारण, येथे विविध वनस्पतींची महत्त्वूपर्ण माहिती उपलब्ध आहे. सातपुडा गार्डन आणि आसपासच्या परिसराच्या आल्हाददायक वातावरणात पक्षी तर आहेतच, तरुण जोडपीही वातावरणाचा आनंद घेण्यासाठी येत असतात.
नागपुरच्या महाल भागात असलेला गांधीसागर तलाव हा शुक्रवारी तलाव आणि जुम्मा तलाव या नावानेही ओळखला जातो. रमण सायन्स सेंटरच्या अगदी समोर हा तलाव आहे. सुमारे 275 वर्षांपूर्वी नागपूरचे तत्कालीन राज्यकर्ते चांद सुल्तान यांच्या पाणी पुरवठा योजनेच्या माध्यमातून हा तलाव अस्तित्त्वात आला असल्याचे बोलले जाते. नाग नदीला सोडण्यात येणा-या पाण्यातून या तलावाची निर्मिती करण्यात आली आहे. जलसाठ्याशी संबंधित या तलावाचे नाव जुम्मा तलाव असेही ठेवण्यात आले आहे.
1742 मध्ये पहिले रघुजी यांनी आपल्या राज्याची राजधानी म्हणून नागपूरला घोषित केले आणि भोसले व ब्रिटीशांच्या राज्यकाळात या तलावाचे नाव शुक्रवारी तलाव असेही ठेवण्यात आले. या तलावाच्या मधोमध एक छोटेसे बेट आहे. या बेटावर आकर्षक शिवमंदिर आणि बगिचाही आहे. पिवळ्या रंगांच्या मर्क्युरी दिव्यांमुळे रात्रीच्या वेळी या तलावाचे सौंदर्य अधिकच मोहक असते. येथे येणा-यासाठी नौकाविहाराचीही सोय आहे.
आळशी विश्रांती देण्याशिवाय एखाद्याला निसर्गाच्या अद्भुत गोष्टींचा आनंद घेण्यासाठी जागा शोधायची असेल तर, या उद्देशासाठी लेक गार्डन सक्करदातरांपेक्षा अधिक चांगले स्थान नाही. कोणत्याही शनिवार व रविवारच्या फायद्यासाठी एक उत्तम ठिकाण म्हणून सेवा देणे, लेक गार्डन, सक्करदातर, सुट्ट्यांचे सुट्ट्यांचे हाल होत आहे. या बागेत खेळण्याच्या क्षेत्रातील 5 विस्तार आहेत. तसेच, बागेच्या निसर्गरम्य सौंदर्याचं वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या अद्वितीय विक्रय बिंदू. सक्करदारे तलावाच्या किनार्यावर वसलेले बाग उद्यानातील सुंदर सूर्यास्तापासून आणि सूर्योदयापेक्षा खूपच सुंदर आहे, हे पाहणे आवश्यक आहे. जवळच तलाव आहे म्हणून, सौंदर्यपूर्णतेच्या संदर्भात बागेतील वातावरण बर्याच वेळा वाढते आणि नेहमीच शांत राहते, दिवस किंवा रात्र असते.