समाजशास्त्र समाज सेवा समाजसुधारक इतिहास

सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली?

3 उत्तरे
3 answers

सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली?

4

सत्यशोधक समाज
सामाजिक समता व समताप्रधान समाजनिर्मितीसाठी महाराष्ट्रात स्थापन झालेला एक कांतिकारक पंथ. समाजाच्या आमूलाग मौलिक परिवर्तनाकरिता हिंदू समाजरचनेतील माणसांना उच्चनीच मानणारा जातिभेद, कर्मकांड, मूर्तिपूजा, स्त्रीदास्य, अंधश्रद्धा यांचे निर्मूलन करून वैचारिक क्रांती घडविण्याकरिता महात्मा जोतीराव फुले यांनी समाजातील काही समविचारी मंडळींच्या सहकार्याने २४ सप्टेंबर १८७३ रोजी पुण्यात सत्यशोधक समाजाची स्थापना केली. त्याच्या निर्मितीमागील पार्श्वभूमी, तात्त्विक बैठक, कार्य व उपक्रम यांसंबंधी माहिती म. फुले व त्यांच्या अनुयायांनी लिहिलेल्या प्रासंगिक निबंध व छोटीखानी पुस्तिकेतून (सार्वजनिक सत्यधर्म) मिळते.
उत्तर लिहिले · 11/10/2018
कर्म · 3395
1
सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा ज्योतिबा फुले यांनी केली.
उत्तर लिहिले · 11/10/2018
कर्म · 7485
0

सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा ज्योतिबा फुले यांनी 24 सप्टेंबर 1873 रोजी केली.

हा समाज महाराष्ट्रातील सामाजिक समानता आणि शिक्षणासाठी लढला.

या संस्थेचा मुख्य उद्देश समाजातील अन्याय दूर करणे, सामाजिक समानता स्थापित करणे, आणि शिक्षणाला प्रोत्साहन देणे हा होता.

सत्यशोधक समाजाची उद्दिष्ट्ये:

  • समाजातील जातीभेद नष्ट करणे.
  • स्त्रिया आणि पुरुषांना समान अधिकार मिळवून देणे.
  • शिक्षणाचे महत्त्व पटवून देणे.
  • अंधश्रद्धा आणि रूढीवादी विचार दूर करणे.

अधिक माहितीसाठी, आपण खालील लिंकला भेट देऊ शकता:

सत्यशोधक समाज - विकिपीडिया
उत्तर लिहिले · 19/3/2025
कर्म · 980

Related Questions

मराठी किती जुनी भाषा आहे?
औद्योगिक क्रांती कुठे झाली?
पंडित जवाहरलाल नेहरू हे आशियानचे संस्थापक होते का?
पूर्व युरोपातील सोव्हिएट रशियाच्या दबावाखालील ५ देशांची नावे लिहा?
पूर्व युरोपातील अनेक देश सोव्हिएत रशियाच्या प्रभावाखाली होते का?
ॲनी बेझंट यांच्या होमरूल चळवळीचे भारतात झालेले परिणाम लिहा?
1975 चा पेठ मधील दुष्काळ?