राजकारण संविधान व्यवस्थापन

भारतीय राज्यघटनेच्या घटना समितीचे अध्यक्ष कोण होते?

3 उत्तरे
3 answers

भारतीय राज्यघटनेच्या घटना समितीचे अध्यक्ष कोण होते?

7
भारताला १५ ऑगस्ट १९४७ या दिवशी स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लगेचच देशाच्या राज्यकारभारासाठी घटना समिती नेमण्याचे ठरले. त्याप्रमाणे २८ ऑगस्ट १९४७ रोजी महात्मा गांधी यांनी सत्यनारायण सिन्हा यांना बोलावून घेतले आणि घटनेचा मसुदा बनविणार्‍या आगामी समितीच्या सदस्यांच्या नावांचा कागद त्यांच्याकडे सुपूर्द केला. दुसर्‍याच दिवशी घटना समितीच्या बैठकीत गांधीजींचा संदर्भ देऊन सिन्हांनी मसुदा समिती सदस्य म्हणून सात नावांची घोषणा केली. घटना समितीचे अध्यक्ष डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी व सर्व सदस्यांनी अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, एन. गोपालस्वामी अय्यंगार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कन्हैयालाल मुनशी, सय्यद मोहम्मद सादुल्ला, बी.एल. मित्तल अणि डी.पी. खेतान या सात नावांना मान्यता दिली. ३० ऑगस्ट १९४७ रोजी मसुदा समितीच्या अध्यक्षपदी बाबासाहेबांची एकमताने निवड झाली. त्यांनी त्याच दिवसापासून मसुदा समितीचे कामकाज सुरू केले.
उत्तर लिहिले · 10/10/2018
कर्म · 1160
0
सतेंद्र सिन्हा हे सुरवतीचे अध्यक्ष होते पण नंतर डॉ राजेंद्र प्रसाद हे घटना समितीचे अध्यक्ष झाले होते.
तसेच मसुदा समितीचे अध्यक्ष हे डॉ बाबासाहेब आंबेडकर होते.
उत्तर लिहिले · 11/10/2018
कर्म · 85
0

भारतीय राज्यघटनेच्या घटना समितीचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद होते.

डॉ. राजेंद्र प्रसाद हे भारताचे पहिले राष्ट्रपती देखील होते.

उत्तर लिहिले · 19/3/2025
कर्म · 3520

Related Questions

आज पर्यंत किती पंतप्रधान भारतात होऊन गेलेत?
जर एखाद्या व्यक्तीला तीन मुले असतील आणि त्याला नगरसेवक बनायचे असेल, तर त्यासाठी काय पर्याय आहे का?
निवडणूक घेणारी यंत्रणा कोणती?
उपराष्ट्रपतीची निवड कोणत्या कलमानुसार होते?
उपराष्ट्रपती कलम ७०?
उपराष्ट्रपतीला शपथ कोण देतात?
उपराष्ट्रपतीचे कलम ६६ काय आहे?