लोकसंख्या लोकसंख्याशास्त्र आदिवासी

आदिवासींची लोकसंख्या महाराष्ट्रात किती आहे?

2 उत्तरे
2 answers

आदिवासींची लोकसंख्या महाराष्ट्रात किती आहे?

2
आदिवासींच्या प्रश्नांकडे वळण्याअगोदर आधी महाराष्ट्रातले आदिवासी नेमके किती आणि कुठे आहेत, तसेच आज ते कुठल्या परिस्थिती जगत आहेत हे आपण समजून घेऊ.

महाराष्ट्रात आदिवासींच्या एकूण ४७ जमाती आहेत. यापैकी २०११ च्या जनगणनेनुसार भिल्ल, गोंड, महादेव कोळी, वारली, कोकणा आणि ठाकूर यांची एकत्रित संख्या महाराष्ट्रातील एकुण आदिवासींच्या ७३.३% एवढी आहे. भिल्लांची संख्या सर्वात जास्त, म्हणजे (२१.२%), त्यानंतर गोंड (१८.१%), महादेव कोळी (१४.३%), वारली (७.३%), कोकणा (६.७%) आणि ठाकूर (५.७%) अशी लोकसंख्येची विभागणी आहे. महाराष्ट्रात एकुण १९ आदिवासी जमाती अशा आहेत ज्यांची संख्या १००० पेक्षाही कमी आहे. महाराष्ट्रातील तीन आदिवासी जमाती या आदिम जमाती (Primitive Tribes) म्हणून भारत सरकारने जाहीर केल्या आहेत. यामधे कोलाम (यवतमाळ जिल्हा), कातकरी (ठाणे आणि रायगड जिल्हा) आणि माडिया गोंड (गडचिरोली जिल्हा) या जमातींचा समावेश आहे १.

भारताच्या जवळ जवळ प्रत्येक राज्यात आदिवासी राहतात ( आदिवासींचे राज्य निहाय्य प्रमाण). २०११ च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील आदिवासींची संख्या राज्याच्या एकूण लोकसंख्येच्या ८.८७% एवढी म्हणजे १ कोटी ५ लाख एवढी आहे . देशाच्या आदिवासी लोकसंख्येच्या ५.१% आदिवासी हे महाराष्ट्रात आहेत. आदिवासी लोकसंख्यच्या बाबतीत पूर्वेकडील राज्ये सोडल्यास महाराष्ट्र हे मध्यप्रदेश पाठोपाठ दुसर्‍या नंबरचे राज्य आहे.
उत्तर लिहिले · 9/10/2018
कर्म · 3395
0

महाराष्ट्रामध्ये आदिवासींची लोकसंख्या 2011 च्या जनगणनेनुसार 1,05,10,213 आहे. हे प्रमाण राज्याच्या एकूण लोकसंख्येच्या 9.35% आहे.

सर्वाधिक आदिवासी लोकसंख्या नंदुरबार जिल्ह्यात आहे.

स्रोत: Census 2011

उत्तर लिहिले · 19/3/2025
कर्म · 2580

Related Questions

भारतात लोकसंख्या शिक्षणाची आवश्यकता का आहे?
अपेक्षित वय म्हणजे काय?
लोकसांख्यिकीय वृद्धत्वाचे निर्देशांक घटक कोणते?
वृद्धांची संख्या वाढण्याची कारणे कोणती?
भारतातील वृद्ध लोकसंख्येची वैशिष्ट्ये सांगा?
लोकसंख्या शिक्षण विषयक नागरिकांचा दृष्टिकोन स्पष्ट करा?
लोकसंख्येतील बदलास कारणीभूत असणारे घटक स्पष्ट करा?