डोळे खगोलशास्त्र दुर्बिणी

हबल दुर्बिणीचे फायदे काय आहेत?

2 उत्तरे
2 answers

हबल दुर्बिणीचे फायदे काय आहेत?

10
🔭 *हबल दुर्बिणीचे फायदे काय ?* 🔭
**********************************

*एक मोठा डोळा अवकाशात डोळा👀 ठेवून आहे  बरं का...!*

*हबल (hubble)* नावाची २.४ व्यासाची एक मोठी 🔭 *दुर्बीण* ही अवकाशाचा वेध घेण्यासाठी
*नासा व युरोपियन अवकाश संस्था* यांनी संयुक्तपणे अवकाशात सोडलेली दुर्बिण आहे.
ही दुर्बिण १९९० साली सोडण्यात आली. 🚀
ही अवकाशात सोडण्यात आलेली आत्तापर्यंतची
सर्वात मोठी तसेच सर्वात प्रगत दुर्बिण आहे.
या दुर्बिणीचे नाव अमेरिकेच्या *एडविन हबल*  या खगोलशास्त्रज्ञाच्या नावावरून देण्यात आले.
ही दुर्बिण नासाच्या मोठ्या वेधशाळांच्या प्रकल्पातील एक प्रकल्प आहे.
इंटरनेट वर हबल दुर्बिणीतून काढलेले 👌🏻 सुंदर फोटो उपलब्ध आहेत.

मित्रहो दुर्बिणीच्या माध्यमातून उघड्या डोळ्यांनी न दिसणारे असंख्य विलोभनीय आविष्कार आपणाला पाहावयास येतात. दुर्बीण प्रामुख्याने दूरच्या वस्तूकडून येणाऱ्या प्रकाशाच्या आधारे सदर वस्तूंचा वेध घेत असते. दुर्बीण जर अंधाऱ्या प्रकाश प्रदूषणविरहित ठिकाणी असेल तर मग व वस्तूंची स्पष्टता अधिक खुलण्याची शक्यता असते. मानवाने हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठीच हबल दुर्बिणीचा उपयोग केलेला आहे.
पृथ्वीभोवती तीनशे पन्नास किलोमीटर उंचीपर्यंत वातावरण आहे. त्यामुळे तार्‍यापासून येणारा प्रकाश काही प्रमाणामध्ये या वातावरणात नष्ट होतो. तसेच वातावरणातील थरांमध्ये होणाऱ्या दोलनामुळे प्रकाशाची दिशा कमी जास्त प्रमाणात बदलते. त्यामुळे तारे फिकट दिसतात. त्याचबरोबर त्यांच्या जागाही बदलतात. तारे स्पष्ट दिसावेत यासाठी वातावरणाच्या पलीकडे जाण्याची आवश्यकता आहे. अंतराळात वातावरण नसल्यामुळे आकाश काळेकुट्ट दिसते. त्यामुळे ताऱ्यांचे निरीक्षण अत्यंत सुलभ होते.
  या सर्व बाबींचा विचार करून अमेरिकेने २४ एप्रिल १९९० रोजी डिस्कवरी स्पेस शटलच्या सहाय्याने अंतराळामध्ये हबल दुर्बिण पाठवून विश्वाच्या आणखी जवळ जाण्याचा प्रयत्न केला. भूपृष्ठापासून सहाशे तीस किलोमीटर उंचीवर असणारी हबल दुर्बिण तासाला जवळपास तीस हजार किलोमीटर इतक्या प्रचंड वेगाने नव्वद मिनिटांमध्ये पृथ्वीभवती प्रदक्षिणा पूर्ण करते. अंतराळातील हबल दुर्बिण एका ठिकाणी स्थिर नाही हे लक्षात घेण्याची गरज आहे. आणि हो या विश्वामध्ये कोणीही स्थिर नाही. प्रत्येकजण फिरत आहे. कारण 'थांबला तो संपला' हे वाक्य सर्वांसाठी लागू पडते. 'एडविन हबल' या खगोलशास्त्रज्ञाच्या नावे अंतराळात विहार करत असलेल्या ११६०० किलोग्रॅम वजनाच्या या दुर्बिणीची लांबी १३.१ मीटर तर व्यास ४.३ मीटर आहे. या दुर्बिणीमध्ये वापरण्यात आलेल्या अंतर्वक्र आरशाचा व्यास अडीच मीटर आहे.
  विश्व प्रसरणाचा वेग, क्वेसारकडून येणाऱ्या किरणांचा अभ्यास, दहा अब्ज प्रकाशवर्षे अंतरावरील अवकाशातील वस्तूंचा वेध, ही प्रमुख उद्दिष्टे हबलची निश्चित केलेली आहेत. याचबरोबर विश्वाचे वयोमान, परग्रहांवेध यासाठीही हबलचा उपयोग होण्याची शक्यता आहे.
  पृथ्वीवरील दुर्बिण अवकाशाचा वेध फक्त रात्रीच्या वेळेसच येऊ शकतो. परंतु हबलचे वैशिष्टय़ हे आहे की ती अवकाशाचा वेध सलगपणे घेत असते. कारण अवकाशामध्ये ना दिवस, ना रात्र. अवकाश काळेकुट्ट असते, सूर्य तळपत असतो, पृथ्वी, इतर ग्रह आणि तारे आपले अस्तित्व ठळकपणे दाखवत असतात. असे दृश्य अनुभवायचे असेल तर अंतराळवीरांच्या भूमिकेत जाण्याची आवश्यकता आहे.
  दीड अब्ज डॉलर्सपेक्षाही जास्त खर्चाची ही दुर्बिण तारकाविश्व, तारकापुंज, सुपरनोव्हा, दीर्घिका यांची नयनरम्य छायाचित्रे पृथ्वीवरील मानवाला नित्यनियमाने पाठवत आहे. दुर्बिणीला विद्युतऊर्जेचा पुरवठा करण्यासाठी सोलर पॅनलचा वापर केलेला आहे. अंतराळाच्या संशोधनासाठी येणारा खर्च प्रचंड असला तरी त्यातून मानवी जीवन सुखी आणि समृद्ध होण्यासाठीच उपयोग होणार आहे. हा एकमात्र नक्की की, आजही विकासाची गंगा न पोहोचलेले मानवी समूह आहेत. त्यांच्यासाठीची तजवीज विकासाचे फायदे मिळालेल्यांनी घेण्याची नितांत आवश्यकता आहे.
*- नितीन शिंदे*
*'अंतराळ समजून घेताना' या पुस्तकातून*
उत्तर लिहिले · 7/10/2018
कर्म · 569245
0

हबल दुर्बिणीचे (Hubble Telescope) फायदे खालीलप्रमाणे आहेत:

  • उत्कृष्ट प्रतिमा: हबल दुर्बिण पृथ्वीच्या वातावरणाबाहेर असल्याने, वातावरणातील अडथळे आणि प्रदूषणामुळे प्रतिमा अस्पष्ट होत नाहीत. यामुळे हबल दुर्बिणीद्वारे अतिशय स्पष्ट आणि उच्च-गुणवत्तेच्या प्रतिमा मिळतात.
  • दूरवरच्या वस्तूंचे निरीक्षण: हबल दुर्बिणीमुळे खगोलशास्त्रज्ञांना विश्वातील दूरवरच्या आकाशगंगा, तारे आणि इतर खगोलीय वस्तूंचे निरीक्षण करणे शक्य झाले आहे.
  • विश्वाच्या उत्पत्ती आणि विकासाचा अभ्यास: हबल दुर्बिणीने घेतलेल्या निरीक्षणांमुळे वैज्ञानिकांना विश्वाची उत्पत्ती, आकाशगंगांचा विकास आणि ताऱ्यांचे जीवनचक्र यांसारख्या विषयांवर महत्त्वपूर्ण माहिती मिळाली आहे.
  • नवीन शोध: हबल दुर्बिणीने अनेक नवीन गोष्टींचा शोध लावला आहे, ज्यात कृष्ण ऊर्जा (dark energy), कृष्ण पदार्थ (dark matter) आणि ग्रहमालांचा समावेश आहे.
  • वैज्ञानिक प्रगती: हबल दुर्बिणीने खगोलशास्त्र आणि भौतिकशास्त्र यांसारख्या विज्ञान शाखांमध्ये मोठी प्रगती केली आहे.

इतर फायदे:

  • हबल दुर्बिणीमुळे वैज्ञानिकांना अवकाशातील घटनांचा अचूक अभ्यास करता येतो.
  • ग्रह, तारे आणि आकाशगंगांच्या निर्मिती प्रक्रियेला समजून घेणे सोपे होते.
  • विश्वाच्या विशालतेचा आणि जटिलतेचा अंदाज येतो.

अधिक माहितीसाठी उपयुक्त स्रोत:

  • हबल दुर्बिणीबद्दल अधिक माहितीसाठी नासाचे (NASA) हे अधिकृत संकेतस्थळ उपयुक्त आहे: https://www.nasa.gov/mission_pages/hubble/main/index.html
  • स्पेस टेलिस्कोप सायन्स इन्स्टिट्यूटचे (Space Telescope Science Institute) संकेतस्थळ: https://www.stsci.edu/hubble
उत्तर लिहिले · 19/3/2025
कर्म · 1820

Related Questions

इसवी सन सोळाशे 90 मध्ये अधिक सुधारित दुर्बिण कोणी तयार केली?
तारा छावण्या कशासाठी वापरले जातात?
आशियातील सर्वात मोठ्या व्यासाची दुर्बीण कोणती आणि तिचा व्यास किती आहे?
दुर्बिणीची रचना व कार्य काय आहे?
सर, मी एक दुर्बीण घेऊ इच्छितो आहे, तर कोणती चांगली ते सविस्तर सांगा?