2 उत्तरे
2 answers

शरद पवार साहेबांचे महाराष्ट्रासाठी योगदान काय?

5
शरद पवार हे फक्त महाराष्ट्राचे नेते नसून भारतातील एक ज्येष्ठ नेते आहेत.. शरद पवारांचे महाराष्ट्राबरोबरच "देशभरातील" योगदान खालीलप्रमाणे आहे..

शरद पवार यांचे कार्य


● ज्येष्ठ बंधू अप्पासाहेब पवार यांच्या नेतृत्त्वाखाली 1971 साली बारामती कृषि प्रतिष्ठानची स्थापना केली. पथदर्शी प्रयोग राबवले.

● ‘घर तेथे संकरित गाय’, ‘गाव तेथे सहकारी दूध सोसायटी’ या सूत्राने बारामती तालुक्यात व नंतर हे मॉडेल राज्यभर नेऊन दूग्ध व्यवसाय वृद्धींगत केला.



● यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या माध्यमातून अनेक शेती, सहकार, शिक्षण, पर्यावरण अशा अनेक क्षेत्रात उपयुक्त कार्य .

● दिल्लीतील सेंटर फॉर इंटरनॅशनल ट्रोड इन अॅग्रीकल्चर अॅन्ड अॅग्रो बेस्ड इंडस्ट्रीज (सीटा) संस्थेच्या उभारणीत पुढाकार.

● पवार अध्यक्ष झाल्यानंतर रयत शिक्षण संस्थेच्या शाळा, महाविद्यालये, आश्रमशाळांमध्ये मोठी भर. आणि त्यातून अनेक विद्यार्थी मोठमोठ्या हुद्द्यावर रुजू आहेत.

● शिकत शिकत काम करणाऱ्यांसाठी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची स्थापना

● विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टी रुजावी, संशोधक तयार व्हावेत, यासाठी रयत विज्ञान परिषदेची स्थापना केली.

● 1993 पासून शरद पवार प्रसिद्ध नेहरु सेंटरचे अध्यक्ष आहेत. दर 3 वर्षांनी संस्थेचे सदस्य त्यांनाच अध्यक्ष करतात.

● नेहरु तारांगणमधील आधुनिक करण्यात श्री पवारांचा हात, आशियातल्या पहिला विशेष प्रोजेक्टरचा वापर केला.

● केंद्र आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यातील तफावत दूर करण्याचं श्रेय पवारांचच.

● आणिबाणीत 50 ते 55 वयाच्या सक्तीने निवृत्त केलेल्या कर्मचाऱ्यांना पवारांनीच पुन्हा कामावर घेतलं.

● प्राथमिक आरोग्य केंद्रातील मदतनिसांना पवारांनी वेतनवाढ केली. त्यानंतर अद्याप त्यांच्या वेतनात वाढ नाही.

● मराठवाडा विद्यापीठाला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्यात मोठं योगदान.

● हिंगोलीसाठी स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करण्याचा निर्णय, स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नावे विद्यापीठ.

● सीमाप्रश्न सोडवण्यासाठी बेळगावात मतदान घेण्याचा प्रस्ताव मांडला, मात्र सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ठ.

● मुंबईतील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्सला वलय मिळवून देण्यात महत्त्वाचं योगदान, सध्या हे संकुल मुंबईचा कणा आहे.



● 80च्या दशकात मुंबईच्या समुद्रात नै.तेलाचे साठे आढळले, त्यावर आधारित उद्योग महाराष्ट्रात ठेवण्यात यश.

● राज्यातील सर्वात मोठी औद्योगिक वसाहत विदर्भातील बुटीबोरीला उभारली गेली त्याचं श्रेय शरद पवार यांनाच.

● पुण्याच्या आसपास ऑटोमोबाईल आणि IT कंपन्यांच्या उभारणीला शरद पवार यांनीच हात दिला, हा भाग भारताचं डेट्राईट झाला.

● माथाडी मंडळांच्या स्थापनेत शरद पवारांचा सिंहाचा वाटा, दिवंगत अण्णासाहेब पाटील यांना मोलाची मदत.

पंतप्रधान शरद पवार? दिल्लीचेही तख्त राखतो, महाराष्ट्र माझा
लोकनेते शरद पवार आले धावून
● माथाडी कामगारांच्या घरांसाठी शरद पवारांनी वडाळा-चेंबूरमध्ये 42 एकर जमीन दिली, काही वादामुळे 18 एकरच मिळाली.

● शरद पवारांनी नवी मुंबईच्या कोपर खैरणेत सिडकोकडून 5 हजार घरं बांधून ती माथाडी कामगारांना दिली.

● केंद्रीय कृषिमंत्री असताना शरद पवार यांनी माथाडी मंडळावरचा 248 कोटींचा आयकर माफ करून घेतला.

● माथाडी कामगारांचे नेते शशिकांत शिंदे यांना 1999 पासून शरद पवार यांनी जावळीतून वेळोवेळी उमेदवारी दिली.

● रमेश वांजळे यांच्या मृत्यूनंतर मनसेसह सर्व पक्षांनी त्यांच्या कुटुंबाला वाऱ्यावर सोडले. पवारांनी त्यांच्या पत्नीला खासदारकीची उमेदवारी दिली. आज वांजळेंची 18 वर्षांची कन्या वारजे-माळवाडीची नगरसेवक आहे.

● चातुर्वण्य हेच देशातील पहिले आरक्षण असल्याची मांडणी शरद पवार यांनी केली.

● इंदिराजींच्या हत्येनंतर निर्माण झालेली परिस्थिती निवळण्यात शरद पवार यांचं महत्त्वाचं योगदान.

● पंजाब शांत करणारा ‘राजीव-लोंगोवाल करार’ प्रत्यक्षात आणण्यामागे शरद पवार यांचे महत्त्वाचे प्रयत्न.

● 1989 साली शरद पवार मुख्यमंत्री असताना नाशिकला यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची स्थापना.

● शऱद पवार यांची खेळाशी नाळ कधीही तुटली नाही. कुशल क्रीडा संघटक अशी त्यांची आजही ओळख आहे.

● राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष असताना लाल मातीसोबतच गादीवरील कुस्तीला शरद पवार यांनी सुरुवात केली.

● देशातील सर्वश्रेष्ठ अशा महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला शरद पवार यांनीच प्रतिष्ठा मिळवून दिली.



● खो-खो खेळासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे शरद पवार यांचा वाढदिवस खो-खो दिवस म्हणून साजरा केला जातो.

● 1990 साली बिजिंगमधील एशियाड स्पर्धेत कबड्डीचा समावेश झाला तो शरद पवार यांच्या प्रयत्नामुळे.

● 1993 साली पुण्यात राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचं आयोजन, त्यावेळी 11 महिन्यात शिवछत्रपती क्रीडा नगरीची उभारणी केली.

● संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे शाहीर अमर शेख यांच्या नावाने पुरस्कार सुरु करण्याची कल्पना शरद पवारांनीच उचलून धरली.

● साहित्यिक आणि कलावंतांमध्ये रमणारा राजकारणी अशी शरद पवार यांची खरी ओळख आहे.

● सहित्य अकादमी पुरस्कार मिळाल्यावणाऱ्या मराठी कलाकारांना राज्याकडून 1 लाख रुपये देण्याचा निर्णय शरद पवार यांचाच.

● कवी ना.धों. महानोर, लक्ष्मण माने यासारख्या साहित्यिकांचा विधान परिषद प्रवेश शरद पवार यांच्यामुळेच झाला.

● अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेला अनेक अडचणींतून सोडवलं, यशवंत नाट्यगृह उभारण्यात मोलाची मदत.

● घाशीराम कोतवाल नाटकाच्या बंदीविरोधात शरद पवार ठाम उभे राहिले. सतीश आळेकरांनी याविषयी भरभरुन लिहिलंय.

● 1988 मध्ये मुख्यमंत्री असलेल्या पवारांनी भटक्या-विमुक्तांना घरे बांधण्यासाठी पुण्यात 140 एकर जमीन मंजूर केली.

● 1990 मध्ये शरद पवारांनी फलोत्पादन कार्यक्रम राबवला. हा यशस्वी कार्यक्रम केंद्र सरकारनेही स्वीकारला.

● प्रसिद्ध कृषीशास्त्रज्ञ एम.एस.स्वामीनाथन श्री. पवार यांचा गौरव फलोत्पादन क्रांतीचे जनक असा करतात.

● पवार मुख्यमंत्री असताना कोकण रेल्वेसाठी केरळने निधी देण्यात असमर्थता दर्शवल्यानंतर महाराष्ट्राने ती जबाबदारी घेतली.

● शरद पवार यांनी पैठणला संतपीठाची घोषणा केली, 17 एकर जमीनही दिली. मात्र त्यांच्या मुख्यमंत्रीपदानंतर काहीच घडलं नाही.

● शरद पवार यांनी शाहू-फुले-आंबेडकरांचं लिखाण प्रकाशित करण्यासाठी समित्या स्थापन केल्या, संकलित साहित्य प्रकाशित केलं.

● महाराष्ट्रासाठी 3 वैधानिक विकास महामंडळ स्थापन करण्याचा निर्णयही शरद पवार मुख्यमंत्री असतानाच झाला.

● राजकीय आकसापोटी पवारांच्या संकल्पनेतील एन्रॉन प्रकल्पाला विरोधकांनी विरोध केला. याची किंमत महाराष्ट्र आजही चुकवत आहे.

● महिलांना सैन्यदलात प्रवेश देण्याचा ऐतिहासिक निर्णय सरंक्षणमंत्री शरद पवार यांनी घेतला. लष्करात महिलांना 11 टक्के आरक्षण दिलं.



● लातूरच्या किल्लारी भूकंपावेळी तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी केलेल्या कामाला तोड नाही, 3 महिने तळ ठोकून होते. त्यामुळेच भूज भूकंपात तत्कालीन गुजरात मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मागणीवरून शरद पवार हे केंद्राच्या आपत्कालीन मदत व्यवस्थेचे प्रमुख होते.

● स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना 50 टक्के आरक्षण आणि राज्य महिला आयोग स्थापन करण्यात योगदान.

● अर्थसंकल्पात आदिवासींसाठी लोकसंख्येच्या प्रमाणात तरतूद करण्याचा निर्णय, पवारांचा हा निर्णय केंद्रानेही राबवला.

● कृषी क्षेत्रातील शरद पवार यांच्या कामगिरीबद्दल संयुक्त पुरोगामी सरकारने शेवटच्या बैठकीत अभिनंदनपर प्रस्ताव मांडला.

● दुसऱ्या हरित क्रांतीचे शिल्पकार म्हणून देश आज शरद पवार यांच्याकडे गौरवाने पाहतो.

● गहू आणि तांदळाच्या उत्पादनात भारताने जी यशस्वी झेप घेतली ती तत्कालीन कृषिमंत्री शरद पवार यांच्या कार्यकाळात.

● कृषिमंत्री झाल्याबरोबर शरद पवार यांनी शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं. 3 कोटी 69 लाख शेतकऱ्यांना याचा फायदा झाला. आत्तापर्यंत सर्वात मोठी कर्जमाफी शरद पवार यांनीच दिली होती.

● शेती कर्जावरचा 12 टक्क्यांचा व्याजदर शरद पवार यांनीच टप्प्याटप्प्याने 4 टक्क्यांवर आणला.

● झी महाराष्ट्र कुस्ती दंगल सुरू करून पाहिलवानांना पैसे आणि प्रसिद्धी मिळवून देण्यात शरद पवार यांचे मोलाचे योगदान आहे.

● IPL सारख्या क्रिकेट लीग ची स्थापणा करण्यात शरद पवार यांनी काम केले आहे. IPL मधून पैसा मिळाल्याने BCCI आज जगात सर्वात जास्त पैसे कमावणारी आणि ICC वर पकड असणारी संस्था बनली आहे.

असे अनेक जगविख्यात निर्णय मा. शरद पवार यांनी घेतले.
उत्तर लिहिले · 2/1/2020
कर्म · 2570
0

शरद पवार यांचे महाराष्ट्रासाठी मोठे योगदान आहे. खाली काही प्रमुख योगदान दिले आहेत:

कृषी क्षेत्र:
  • सिंचन प्रकल्प: त्यांनी अनेक सिंचन प्रकल्प सुरू केले, ज्यामुळे राज्यातील शेतीला पाणीपुरवठा सुधारला.

  • शेतकरी धोरणे: शेतकऱ्यांसाठी त्यांनी अनेक धोरणे तयार केली, ज्यामुळे त्यांना आर्थिक मदत मिळाली.

उद्योग क्षेत्र:
  • औद्योगिक विकास: महाराष्ट्रात औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी त्यांनी अनेक उपाययोजना केल्या.

  • रोजगार निर्मिती: त्यांच्या धोरणांमुळे राज्यात रोजगाराच्या संधी वाढल्या.

सामाजिक क्षेत्र:
  • शिक्षण: त्यांनी शिक्षण क्षेत्रात सुधारणा करण्यासाठी अनेक नवीन योजना सुरू केल्या.

  • आरोग्य: आरोग्य सेवा सुधारण्यासाठी त्यांनी ग्रामीण भागात वैद्यकीय सुविधा वाढवण्यावर लक्ष केंद्रित केले.

  • दलित आणि मागासवर्गीय: त्यांनी दलित आणि मागासलेल्या लोकांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबवल्या.

राजकीय योगदान:
  • राजकीय स्थिरता: महाराष्ट्रात स्थिर सरकार स्थापन करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

  • राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी: त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची स्थापना केली आणि पक्षाला मजबूत केले.

अधिक माहितीसाठी आपण खालील संकेतस्थळांना भेट देऊ शकता:

उत्तर लिहिले · 19/3/2025
कर्म · 3500

Related Questions

पद्मश्रीचा फायदा काय?
सामर्थ्य पाहिजे चळवळीचे, जो जो करील तयाचे? कराड तालुका व परिसर एक पारस आहे.. जो सत्कर्म करून दिशा दाखवतो व इतरांचा सहज उद्धार म्हणजेच विकास करतो... हा एक परिणाम आशीर्वाद समजावा? उत्तर विवेकी विचार मंथनातून द्यावे?
समाजकार्याचे मुख्य सविस्तर विषद काय आहेत?
तुमचे मन हेलावून टाकणारा एखादा प्रसंग कोणता? त्या प्रसंगात तुम्ही तुमचे कर्तव्य पार पाडले का?
राजर्षी शाहू महाराज यांचे सामाजिक कार्य: एक समाजशास्त्रीय अध्ययन?
शरीरात योग्य नियंत्रण ठेवण्याचे कार्य कोण करते? स्वच्छ भारत अभियानाचे जनक कोण?
समाजकार्य ही संकल्पना स्पष्ट करून समाजकार्याचा अर्थ सांगा.