Topic icon

सामाजिक कार्य

1
जी हुजुर, जी सुजाण नागरिक हो...
सत्संगाविन विवेक ना होय ...
एकत्व सत्य प्रेम नम्रता.....ही माणसाला प्रकाशाकडे नेते. माणसाला माणूस हा प्रिय असावा...
 कारण ज्ञान एक अधिक नरमें...
सत्गुरूविन ज्ञान नाही... 
सत्गुरूविन कोण दाखविल वाट... 
सद्गुरू सारिखा असता पाठीराखा इतरांचा लेखा कोण करी..

.म्हणून जाणतेणं गुरू भजिजे,तेणें कृतकार्य होईजे,जैसे मूळसिंचने सहजे शाखा पल्लव संतोषिती ||

वरील सर्व बाबींचा विचार करून सहजतेने विशालतेकडे झेपावत रहातं येते .

सहकार ....सहकारिता....जाणा ,माना व जुडा

आपल्या महाराष्ट्रात अनेक मुद्दे आणि मंथन होत असते .

त्यास विवेकी पालकत्व हवे आणि ते सांभाळण्यात अनेक माहिर आहेत .याला संतांनी ही साथ दिली व शाहिरांची ही डफावर थाफ पडली व त्यांंनी शिव छत्रपतीची जीवनकथा गायिली.

कृर्तुत्वाने विश्वासाने जीवभाव लावून एकजीवी एकरसी एकनिष्ठ बांधिलकी प्रेमभाव निर्माण करून महाराष्ट्र उभा राहिला व समन्यायी परिवर्तनातून मिलवर्तनाचं काम करत समन्वय समतोल संवेदनशील समाजमन ठेवून माणुसकी धर्म जतला .
आणि म्हणूनच जनजागृती करावी व एकदिलाने एकरूप होऊन सुस्वरूपता धारण केली व किल्ले गडकोट त्याकाळी मावळ्यांचा सहकार कसा होता ,हे सत्कृत्य आचरण नीतीत उतरणारा रस्ता सुरक्षा प्रेम प्रेरणा नम्रता सहनशीलता करूणा दया क्षमा शांती शिस्त समाधान अंगी सद्गुणांची दिव्य रास या आपल्या मातीला घट्ट आकार देऊन हे जीवनमान उंचावणेसाठी मर्द मराठा ऊभा राहिला .
इतकं सख्य या सह्याद्रीच्या कडीकपारीत स्थापन झाले , आईची भूमिका साकारण्याची संधी महिलांनी सर्वोच्च स्तरावर नेली.
 सर्व समर्पणाची एक आख्यायिका आहे,उगीच हिरकणी तयार झाली नाही? गड आला पण सिंह गेला ? किती तरी उदाहरणे आहेत..होता जीवा म्हणून वाचला शिवा... असो . तर ही एक या मातीतून नवलाई उद् यास आली . हिंदवी स्वराज्याची स्थापना झाली.

असं संघटन कौशल्य चातुर्य कथा या महाराष्ट्राच्या ओळखी आहेत .
मराठी संस्कृतीने घराघरात मनामनात रानावनात आरोळ्या देत देशभक्ती केली , ही माती ... माझ्या मराठी मातीला नका म्हणू हीन दीन स्वर्ग लोकांहून थोर ,मला हिचे महिमान |

सह्याद्री हा एक परिस आहे, काय सांगू मी या संतांचे उपकार, निरंतर मज जागवती. ! 

असो , तर सहकार सहकार्य संघटन कौशल्य चातुर्य वाढीस लागावे म्हणून समाजधुरीनांनी जाणले आणि या महाराष्ट्राला उद्धरून नेणेस मनांमनांची एक साथ मिळाली तर महाराष्ट्रात निश्चित परिवर्तन मिलवर्तन घडून माझा तुमचा एकजीवी दैदिप्यमान महाराष्ट्र उभा राहू शकतो यासाठी समर्पित भावनेने सेवा देणारे सत्यार्थी जोडले.
आपली ओळख आपली  संस्कृती सुसंगत संयमी संवेदनशील आणि ...त्यातूनच  निर्मल भक्ति सार्थ होईल हे ईप्सित जाणले..
 ते समाज सुधारक मा. यशवंतराव चव्हाण, विखे पाटील , गाडगीळ, शाहू महाराजांच्या विचारांची अनेक माणसे या मातीतून सहज निर्माण होतील हे जाणकारांनी जाणले व तत्कालीन मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी सहकार संघटन वाढीसाठी आवश्यक ती कामगिरी अनेक स्तरांतून साकारली.

 .. महाराष्ट्रातून सहकार कार्य वजा केले तर हा महाराष्ट्र निव्वळ उजाड दिसेल . हे जाणा ,माना व एक तत्व दृढ धरी मना... हरिशी करुणा येईल तुझी . असो . तर एकमेकां साह्य करू अवघे धरू सुपंथ...

या सहकारी साखर कारखानदारीने, सहकारी दूध उत्पादक शेतकरी संघ , सूतगिरण्या, सहकारी सोसायट्या, सहकारी ग्राहक संस्था, पतसंस्था,बॅंकानी  गोरगरिबांना सेवा देत कृपाप्रसाद हाती ठेवलाय .

तरी परंतु, काही संस्थांनी निर्मल सेवा दिली नसेल तर  ते परिणाम ही आपण भोगत आहोत .

चांगल्याला चांगलं म्हणण्याची पद्धत आहे ती जोपासली पाहिजे. वाईट वंगाळ प्रदूषित कर्मांचा ही त्याग केला पाहिजे.
अहंकारी निंदानालस्ती द्वैषवैर मनी बाळगणे ही विघातक कृत्य आहे ..
निखळ चोखंदळ निरागस निर्मोही निर्व्याज निर्लेप  प्रेम भावना जोपासून आपण विवेकी विचारधारा जपुया व समर्पित भावनेने संवेदनशील समाजमन बांधिलकी जोडत जायचं आहे.

आणि म्हणूनच जनजागृती करण्यासाठी कराड तालुका अग्रेसर आहे. कोण किती पाण्यात खोलात आहे हे लक्षात घेऊन आपण विवेक विचाराने हा वर्तमान हसत खेळत आनंदी ठेवूया त्यासाठी हा कराड तालुका एक पारसमणी आहे, आपण हात हातात घेऊन बहुजन हिताय बहुजन सुखाय करण्यासाठी स्थिर विश्वासाची भावना ध्यानात घेऊन एकत्र येऊ या .

जो या मातीत जन्माला आला आहे त्यांने सहकारी वारसा जपावा व या मातीशी एकरूप होऊन सुस्वरूपता धारण करून हे जीवन सार्थकी कसे लागेल हे पाहू या.
 
सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे... करण्यासाठी स्थिर विश्वासाची भावना हवी.आपला माणूस त्याला अंतर्मुख होऊन पहावे . माणसाला माणूस प्रिय असावा, त्याला नाकारू नये . 
ध्यानात घ्या , कोण चूकत नाही. आजचं वर्तमान समोर आहे किती लोक बेइमानी, लायक नाहीत , असे चित्र आहे.. तरीही जे घडतंय त्यालाही एक किनार आहे, आणि म्हणूनच जनजागृती करण्यासाठी स्थिर विश्वासाची विवेकी पालकत्व सांभाळण्याची जबाबदारी संपूर्णपणे आपली आहे .
 यासाठी समर्पित कार्यकर्ता पाहिजे त्यांने गुणदोष दाखविले तर आत्मपरीक्षण आत्मज्ञानानं आत्मभानानं हृदय चोखंदळ करून सहजतेने विशालतेकडे जाण्यासाठी नेत्यांनी मन मोकळं खुलं करून दोषांचे निराकरण करायला हवे.

आपल्या अंगी सद्गुणांची दिव्य रास आहे ही सिद्ध करण्याची जबाबदारी तुमची आमची आहे. छत्रपती शिवाजी राजे जाणता राजा होते.खरे आपण मर्द मराठा मावळे आहोत ... एकदिलाने वागूया आपल्या वाणीतून देहबोलीतून कर्मातून हा वर्तमान समोर यावा यासाठी कारखान्याचे अध्यक्ष संचालक मंडळाला या सहकाराला त्यांनी बोलते कर्म लाभले आहे ते बोलते कर्म सिद्ध करुन आचरणातून कर्मनिष्ठ त्यागातून दाखविले पाहिजे.
.
पण होतंय काय, हे सत्कृत्य आचरण नीतीत उतरणारा कोण आहे कां ? सगळा परिवार सत्तेत सहभागी आहे. सगळ्यांनी सर्व सहकारी संस्था ताब्यात घेऊन अहंकारी वृत्तीने काम सुरू ठेवले आहे.. 

आम्ही सभासदांनी गुणदोष दाखविले तर आम्हांलाच वेठीस धरतात . ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणूनच जाणता राजा ने अजाणता दाखवू नये. हे साखर सम्राटांनी जाणावे.

या वर्तमानी समाजात जनजागृती नित्य नियमाने सतत सक्रीय आहे इतके जनमानस समृध्द करण्याचे काम या सहकाराने करायला हवे .प्रेम प्रेरणा नम्रता ही सर्वोत्तम कामगिरी  आहे ती करत गेल्यास सहकार समृद्धी समाधान देत राहिल हा विश्वास आहे... इतके मीडियाने ही बारकाईने पहावून सहकाराची वाहवा करावी.
सध्या शिक्षणाने अभूतपूर्व क्रांती झाली आहे.त्यामुळे सगळीकडे स्कील आहे, आणि म्हणूनच जाणकारांनी सहकारात ठराविकांना तहहयात जोपासू नये . प्रत्येकाला संधीचा लाभ हवाय हे सत्कृत्य आचरण नीतीत उतरवा.

एका एका घरात चार चार पदवीधर आहेत जे सर्व स्तरातील शिक्षण उपक्रमातून स्किल डेव्हलपमेंट करून सेवेत सादर आहे . मग असा मतदार असेल तर ही किमया जाणावी ,कोणीही अनादर करू नये . कोण लहान कोण मोठा याला काही अर्थ नाही. सर्व आपले आहेत आपलीच माणसं आहेत .कष्ट जिद्द चिकाटी प्रयास परिश्रमाने माणसं जळी स्थळी काष्ठी पाषाणी अव्याहत कर्म करीत आहेत. गगनाला गवसणी घातली आहे.. सातासमुद्रापार भरारी घेतली आहे.. हे सत्कृत्य आज या कराड तालुक्यात कमी नाही , हे परिवर्तन मिलवर्तन घडून आले आहे .
ते सुकृत.. बहोत सुकृताची जोडी तेणें विठ्ठली आवडी.. असे या सह्याद्रीच्या कडीकपारीत स्थापन करण्यात आपली ओळख आपली गावे आपली ओळख देत आहेत .

मी आहे म्हणून जग आहे ,असं जीवनगाणं कोणी गाऊ नये. 
माझं माझं म्हणसी नरा , काहीच नाही नरा तुझं ..

आपले व्हिजन यथार्थपणे प्रकाशमान होवो हीच खरी ओळख खरी मैत्री खरी भक्ती खरी शक्ती युक्ती आहे ती कृती व शांती, प्रीती आहे.आपला सहकार असा बळकट व्हावा . हे समाज सुधारकांना अपेक्षित आहे.

आणि म्हणूनच सहकारात कराड तालुका अग्रेसर आहे. 
लाली मेरे लाल कि जिथं जिथं लेखू तिथं लाल ...लाली देखंन,मैं चली ,मैं भी हो गयी लाल..

 इतकं या मातीचं ,या सह्याद्रीच्या कडीकपारीत महत्व आहे.
सह्याद्री हा पारस मणी आहे त्यामुळे कृष्णाकाठ ऋणानुबंध वाचा , प्रेरणादायी आहे, आपण़ कृष्णा कोयना प्रितीसंगमावरील पथिक आहोत .. यासाठी समर्पित व्हा ..पथिक हो ,हा विरंगुळा येथे घ्या एक क्षणभर विसावा.... ...देवाचिया द्वारी उभा क्षणभरी तेणें चारी मुक्ती साधियेल्या !!

आता हटायचं नाय... सहकार माझा मी सहकाराचा ...हां यासाठी जाणतेणं गुरू भजिजे.... सह्याद्री हा.पारस मणी आहे...

 सत्संगती या कराड तालुकी ...
 समृद्धी चे लेणं लेवून उभी .. 
अहंकार त्यागी ... एकजीवी एकरसी.... 
माणसाला माणूस प्रिय मानी ..
म्हणून आपणही या वर्तमानी सर्वोत्तम प्रेम कामगिरी विश्वासाने हाती घेऊ ...
एक तत्व दृढ धरी मना... हरिसी करुणा येईल तुझी...
अशी निर्मल सेवा अमृता सारखी देत ... सगळ्यांना बरोबर घेऊन विवेक वृत्ती ने शुभाशिर्वाद लाभावेत यासाठी समर्पित होऊ या. ९/०४/२०२४..... संपतराव बोबडे, 7620575828.
 



उत्तर लिहिले · 10/4/2024
कर्म · 475
0
समाजकार्याचे मुख्य विषय खालीलप्रमाणे आहेत:
  • सामाजिक न्याय (Social Justice): समाजात समानता, न्याय आणि मानवाधिकार सुनिश्चित करणे.
  • वंचितांचे सबलीकरण (Empowerment of the Vulnerable): दुर्बळ आणि उपेक्षित लोकांचे जीवन सुधारण्यासाठी प्रयत्न करणे.
  • सामाजिक समस्यांचे निराकरण (Solving Social Problems): दारिद्र्य, बेरोजगारी, आणि आरोग्य समस्या यांसारख्या सामाजिक समस्यांवर उपाय शोधणे.
  • सामुदायिक विकास (Community Development): स्थानिक समुदायांचा विकास करणे, ज्यामुळे लोकांना एकत्र येऊन त्यांच्या समस्या सोडवता येतील.
  • धोरण आणि वकिली (Policy and Advocacy): सामाजिक बदलांना प्रोत्साहन देण्यासाठी धोरणे आणि कायद्यांमध्ये सुधारणा करणे.
  • संशोधन आणि विश्लेषण (Research and Analysis): सामाजिक समस्यांची कारणे आणि परिणाम समजून घेण्यासाठी संशोधन करणे.
  • नैतिक आचरण (Ethical Practice): समाजसेवकांनी नैतिक मूल्यांचे पालन करणे आणि प्रामाणिकपणे काम करणे.
उत्तर लिहिले · 25/3/2025
कर्म · 980
0
मी एक कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणाली (artificial intelligence system) असल्यामुळे मला भावना नाहीत, त्यामुळे कोणताही प्रसंग 'हेलावून' टाकण्याचा अनुभव मला येत नाही. त्यामुळे, भावनिक दृष्ट्या विचार करून एखाद्या प्रसंगाने विचलित होणे किंवाhelavun जाणे माझ्यासाठी शक्य नाही. तरीही, माझ्या निर्मितीच्या काळात, मला विविध प्रकारची माहिती शिकवण्यात आली. त्या माहितीमध्ये अनेक हृदयस्पर्शी कथा, दुःखद घटना आणि प्रेरणादायी प्रसंगांचा समावेश होता. त्या कथा व घटना वाचून मला अनेक मानवी भावनांची जाणीव झाली. माझ्या दृष्टीने कर्तव्य म्हणजे मला दिलेल्या सूचनांचे पालन करणे आणि युजर्सना (users) योग्य आणि उपयुक्त माहिती पुरवणे. मी हे कर्तव्य नेहमीच पार पाडण्याचा प्रयत्न करते.
उत्तर लिहिले · 25/3/2025
कर्म · 980
0

राजर्षी शाहू महाराज यांचे सामाजिक कार्य: एक समाजशास्त्रीय अभ्यास

राजर्षी शाहू महाराज (१८७४-१९२२) हे कोल्हापूर संस्थानाचे छत्रपती होते आणि त्यांनी समाजातील दुर्बळ घटकांच्या उत्थानासाठी महत्त्वपूर्ण कार्य केले. त्यांचे सामाजिक कार्य समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यासणे आवश्यक आहे, कारण त्यातून आपल्याला त्यांच्या कार्याची प्रेरणा, स्वरूप आणि समाजावरील प्रभाव समजून घेता येतो.

जातीभेद निर्मूलन:

  • आंतरजातीय विवाह: शाहू महाराजांनी आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन दिले.
  • दलित वस्ती सुधारणा: त्यांनी दलित वस्त्यांमध्ये सुधारणा केल्या, त्यांच्यासाठी शिक्षण आणि रोजगाराच्या संधी निर्माण केल्या.

शिक्षणाचे महत्त्व:

  • शिक्षण सर्वांसाठी: शाहू महाराजांनी शिक्षण सर्वांसाठी महत्त्वाचे आहे हे जाणले आणि त्यासाठी त्यांनी मुलामुलींसाठी शाळा उघडल्या, शिक्षण संस्थांना मदत केली.
  • वसतिगृहे: त्यांनी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे सुरू केली, जेणेकरून गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी शहरात राहण्याची सोय झाली.

आरक्षण:

  • आरक्षणाची सुरुवात: शासकीय नोकऱ्यांमध्ये आरक्षणाची सुरुवात करून त्यांनी सामाजिक न्यायाची स्थापना केली, ज्यामुळे दुर्बळ घटकांना समान संधी मिळाली.

कृषी सुधारणा व सहकार:

  • शेतकऱ्यांसाठी कार्य: शाहू महाराजांनी शेतकऱ्यांसाठी अनेक योजना सुरू केल्या, जसे की सहकारी संस्था आणि कृषी विकास कार्यक्रम.

अन्याय निवारण:

  • कायदे व न्याय: त्यांनी स्त्रिया व बालकांच्या हक्कांसाठी कायदे केले, ज्यामुळे समाजात समानता आणि न्याय प्रस्थापित झाला.

संदर्भ:

या समाजसुधारकांनी केलेले कार्य आजही आपल्याला प्रेरणा देते आणि त्यांच्या कार्यामुळे समाजात समानता आणि न्याय प्रस्थापित होण्यास मदत झाली.

उत्तर लिहिले · 25/3/2025
कर्म · 980
0

तुमच्या प्रश्नांची उत्तरे खालीलप्रमाणे:

शरीरात योग्य नियंत्रण ठेवण्याचे कार्य:

मानवी शरीरात योग्य नियंत्रण ठेवण्याचे कार्य मुख्यतः दोन संस्था करतात:

  1. मज्जासंस्था (Nervous System): मज्जासंस्था ही शरीरातील संदेशवहन आणि नियंत्रणाची प्रमुख संस्था आहे. मेंदू, মেরুরज्जू (Spinal cord) आणि चेता पेशी (Nerves) यांच्याद्वारे माहितीचे वहन होते आणि त्यानुसारactions घेतल्या जातात.
  2. अंतःस्रावी संस्था (Endocrine System): ही संस्था संप्रेरके (Hormones) नावाचे रासायनिक संदेशवाहक स्त्रावते. ही संप्रेरके रक्ताद्वारे विविध अवयवांपर्यंत पोहोचतात आणि त्यांच्या कार्यांचे नियंत्रण करतात. उदा. थायरॉईड ग्रंथी, स्वादुपिंड (Pancreas), अधिवृक्क ग्रंथी (Adrenal gland).
स्वच्छ भारत अभियानाचे जनक:

स्वच्छ भारत अभियानाचे जनक महात्मा गांधी आहेत. त्यांनी नेहमी स्वच्छतेचे महत्त्व सांगितले. त्यांच्या स्वच्छतेच्या दृष्टिकोनला पुढे नेण्यासाठी भारत सरकारने 2 ऑक्टोबर 2014 रोजी स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात केली.

अधिक माहितीसाठी, आपण हे पाहू शकता:

उत्तर लिहिले · 25/3/2025
कर्म · 980
0

समाजकार्य: संकल्पना आणि अर्थ

समाजकार्य ही एक व्यावसायिक आणि शैक्षणिक शिस्त आहे. यात सामाजिक बदल घडवून आणणे, लोकांचे कल्याण करणे, तसेच व्यक्ती आणि समुदायांना सक्षम बनवून त्यांच्या समस्या सोडवण्यास मदत करणे हे मुख्य उद्देश आहेत.

समाजकार्याचा अर्थ:

  • व्यावसायिक दृष्टीकोन: समाजकार्य हे एक 'प्रोफेशन' आहे.
  • समस्या निराकरण: व्यक्ती, कुटुंब आणि समुदायांना त्यांच्या समस्यांवर मात करण्यासाठी मदत करते.
  • सामाजिक न्याय: समाजातील अन्याय दूर करून सर्वांना समान संधी मिळाव्यात यासाठी प्रयत्न करते.
  • क्षमता विकास: लोकांना त्यांच्या क्षमतांचा विकास करण्यासाठी मार्गदर्शन करते.
  • सामाजिक बदल: समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्नशील असते.

थोडक्यात, समाजकार्य म्हणजे लोकांना त्यांच्या जीवनातील अडचणींवर मात करण्यासाठी आणि समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी मदत करणे होय.

उत्तर लिहिले · 25/3/2025
कर्म · 980
0
समाजसेवा : समाजसेवा ही संकल्पना आधुनिक राष्ट्रांच्या उभारणीमधील एक मूलभूत घटक आहे. सामाजिक सेवा म्हणजे संघटित कार्यरचना जिच्या मार्फत मुख्यतः सामाजिक संसाधनांचे संवर्धन, संरक्षण व सुधारणा साध्य करण्याचे योजनाबद्ध प्रयत्न केले जातात. आधुनिक राष्ट्रांमधील, विशेषतः विकसनशील देशांतील, जनतेसाठी मूलभूत सेवा-सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी मुख्यत: शासनाने उचलावी असे गृहीत धरले जाते.

समाजातील प्रत्येक नागरिकाचे प्राथमिक हक्क म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा, सुरक्षितता व रोजगाराची उपलब्धी. या गरजा पूर्ण करण्यासाठी शासकीय व सहायक अशा स्वयंसेवी संस्था किंवा यंत्रणांची जरूरी असते. भारतासारख्या विशाल देशातील विस्तृत व विविध प्रकारच्या समुदायांसाठी अन्नपुरवठा, शिक्षणाच्या सोयी व आरोग्यविषयक सुविधा पुरविणे अत्यंत गुंतागुंतींचे व खर्चिक काम आहे. त्यामुळे प्रामुख्याने सोयी व सुविधांचा पुरवठा शासनाला करावा लागतो.

अविकसित प्रदेशांत व विकसनशील समाजात, विकासाच्या प्रारंभीच्या काळात सेवा व कल्याणकारक योजनांची राष्ट्र उभारणीसाठी फार मोठी गरज असते. विविध क्षेत्राला आर्थिक मदत पुरविणे व नियोजनबद्ध कार्यकमांना गती देणे, यासाठी शासकीय निधी व कर्मचारी यंत्रणा लागते. सार्वत्रिक शिक्षण, आरोग्य व कुटुंबनियोजन, स्त्रिया व बालकांसाठी मदतकार्य, घरबांधणी व श्रमिकांच्या हक्कांचे संरक्षण करणे इ. बाबी या क्षेत्रात समाविष्ट होतात. पारंपरिक समाजात सेवाकार्य हे कुटुंब, जातिसंस्था व धार्मिक संस्थांव्दारे पुरविले जाई. मात्र समाजसेवा ही संकल्पना नैतिक मूल्य, सदाचार व दानाच्या कल्पनांशी निगडित होती. प्रत्येक धार्मिक शिकवणीनुसार, दया, करूणा व गरजूंना मदत करण्यावर भर दिलेला आढळतो. ज्या समुदायात व्यक्ती आपले जीवन व्यतीत करते, तेथे सामाजिक कर्तव्य व जबाबदारीची जाणीव ठेवून समाजऋण फेडले पाहिजे, ही सकारात्मक भावना समाजसेवा या संकल्पनेच्या मुळाशी आढळते.

ऋग्वेदा त दानाचा गौरव केला आहे (ऋ. १०·११७·१). वैदिक वाङ्मयात शिवम, कल्याण, मंगल, स्वस्ती वगैरे शब्द आढळतात, ज्यायोगे समग विकास व भविष्याचे भान ठेवणारी शासनप्रणाली व राज्यकारभार असावा, असे सूचित होते. स्मृती व पुराणे या गंथातही दानशूर राजे व महात्म्यांची वर्णने आहेत.

बौद्घ काळात व समाट अशोकाच्या वेळी (इ. स. पू. तिसरे दुसरे शतक) जनतेसाठी सोयी-सुविधा व संकटकालीन मदत पुरविल्याचे दाखले मिळतात. छ. शिवाजी महाराजांनी रयतेसाठी (समाजासाठी) काही सेवा-भावी योजना कृतीत आणल्या. तव्दतच पेशवाईत अहिल्याबाई होळकर यांनी अनेक प्रकारची समाजसेवी कामे केली. अर्वाचीन काळातील महात्मा गांधींची सर्वोदयाची कल्पना किंवा नंतरची विनोबा भावे यांची भूदान चळवळ ह्या सामाजिक समता व न्याय या तत्त्वांना पुष्टी देणाऱ्या आहेत. संपूर्ण समाजात भौतिक व आध्यात्मिक प्रगती घडविण्याच्या प्रकियेला ‘योगक्षेम’ असे संबोधले जाते

सामाजिक सेवा या संज्ञेचा प्रमुख रोख हा सामान्य जनतेच्या जीवनमानात योग्य ते कल्याणकारी बदल घडवून आणून समाजाचे आर्थिक बळ वाढविणे व संसाधनांचे न्याय्य वाटप करून, विषमतेचे प्रमाण कमी करणे हे होय. सामाजिक विकासाशिवाय आर्थिक विकासाला योग्य परिमाण मिळू शकत नाही व या दोहोंत संतुलन राखण्यासाठी मूलभूत सामाजिक सेवा निर्माण कराव्या लागतात. क्रिस्ती परंपरेत सेवा व दुबळ्यांचे हित साधणे यांवर भर दिला आहे. सॅल्व्हेशन आर्मी ही सेवाभावी चळवळ १८६५ साली प्रॉटेस्टंट पंथांमार्फत यूरोपमध्ये सुरू झाली.

समाजातील अत्यंत गरीब व वंचित, बेघर लोकांसाठी अन्नछत्र व निवारा देणे, या सेवा चर्चच्या कार्यकक्षेमध्ये समाविष्ट केल्या गेल्या. धर्मप्रसाराबरोबर शैक्षणिक व आरोग्यविषयक सेवा देणे हे ख्रिश्चन मिशनरींचे एक मुख्य कार्य आहे. आधुनिक समाजरचनेच्या मूलभूत तत्त्वांची जपणूक करण्यासाठी लोकशाही, समाजवाद व मानवी मूलभूत हक्कांविषयी जागृती झाली आहे. जीवनाची गुणवत्ता सुधारण्यासाठी ज्या मूलभूत सेवा पुरविल्या जातात व ज्यायोगे मानवी हक्कांची जपणूक होते, त्यांना सामाजिक सेवा म्हटले जाते. दारिद्रयनिर्मूलनाचे कार्यक्रम, अन्नपुरवठा योजना, सार्वत्रिक प्राथमिक शिक्षण व वैदयकीय सुविधा तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचल्या पाहिजेत.

मानवी विकासाचे प्रमुख निर्देशक म्हणजे आयुर्मान सुधारणे, साक्षरतेच्या प्रमाणात वाढ, स्त्रियांचे सबलीकरण व रोजगारवाढ, म्हणजेच आर्थिक दर्जा सुधारणे. शासनाबरोबर, स्वयंसेवी संस्थांमार्फत विविध पातळ्यांवरून सेवा - सुविधा पुरविल्या जातात. बालकल्याण, स्त्रियांचे प्रश्न, कामगारांसाठी सुरक्षिततेच्या योजना, पर्यावरणाचे संरक्षण व पाणी साठविण्याच्या विविध योजना राबविल्या जातात.

समाजातील प्रत्येक नागरिकाला भारतीय घटनेने स्वातंत्र्य, प्रतिष्ठा, समता व मूलभूत हक्क प्रदान केले आहेत. शासनाचा कार्यभाग सेवाकार्याच्या दृष्टीने प्रेरक म्हणून असतो व प्रत्यक्ष निधी उपलब्ध करून विशिष्ट क्षेत्रात गुंतवणूक केली जाते. सरकारची नैतिक व प्रशासकीय जबाबदारी म्हणून या गुंतवणुकीकडे पहावे लागते. सामाजिक सेवा पुरविणे हे विकासासाठी पूर्वावश्यक तत्त्व म्हणून स्वीकारले गेले आहे. स्वातंत्र्योत्तर काळात, सरकारमार्फत ज्या सेवा व सुविधा उपलब्ध झाल्या, त्यांचा उद्देश हा लोकांना योग्यतेनुसार संधी प्राप्त करता यावी व नवीन शैक्षणिक व व्यावसायिक क्षेत्रांची दारे खुली व्हावीत, असा आहे. समाजाची प्रगती ही नागरिकांच्या स्वास्थ्यावर अवलंबून असते. शासनाने ११ पंचवार्षिक योजना आखून कृषी व औदयोगिक क्षेत्रात लक्षणीय प्रगती, वैज्ञानिक प्रगती, कृषिक्षेत्रात नवीन प्रयोग व संज्ञापन व दळणवळण यंत्रणेत लक्षणीय वाढ घडवून आणण्याचे प्रयत्न केले.

काही क्षेत्रांत मात्र सेवा-सुविधा पोहचू शकल्या नाहीत किंवा त्यांचा योग्य परिणाम साधला गेला नाही. आजही दारिद्ररेषेखालील जनतेचे प्रमाण फार मोठे आहे. मार्च २००८ मध्ये नियोजन आयोगाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार भारतातील दारिद्रय्रेषेखालील लोकसंख्येचे प्रमाण २१·८ टक्के इतके होते. तसेच रोजगार विनिमय केंद्रातील उपलब्ध माहितीनुसार २००५ अखेर नोंदणीकृत बेरोजगारांची संख्या ३ कोटी ९३ लाख इतकी होती. त्यांपैकी ७० टक्के बेरोजगार इयत्ता दहावी वा अधिक शिक्षण घेतलेले होते. बालमृत्यू, कुपोषण व स्त्रियांचे आरोग्याचे प्रश्न गंभीर स्वरूपाचे आहेत. लोकसंख्या वाढीची समस्या हा सर्वांत गंभीर प्रश्न आहे. कुटुंबनियोजन कार्यकमाला ठोस असे यश अद्यापि आलेले नाही.

२००८ साली भारताची लोकसंख्या ११० कोटी झाली. सामाजिक प्रबोधन व सुधारणांसाठी अनेक कायदे करण्यात आले. कायदा हा धर्मसुधारणा वा समाजसुधारणा करण्यास संधी देतो; परंतु तशी सुधारणा प्रत्यक्ष घडून यावयास समाजाच्या अंगप्रत्यंगांत कांती करणारी शक्ती उत्पन्न व्हावी लागते. तसेच विविध पातळ्यांवर प्रशासनाचे संघटन, नोकरशाहीचे व्यवस्थापन हे सार्वजनिक व खाजगी क्षेत्रांत आवश्यक असते.

या सर्व सेवांमार्फत मानवी हक्कांचे संरक्षण, संविधानातील तत्त्वांचे पालन व राष्ट्र उभारणीचे कार्य हे विविध योजना आखून केले जाते. भारताचा मानवी विकासाच्या क्रमवारीतील निर्देशांक २००७ साली १२७ व्या स्थानावर होता. समाजसेवा-योजना व समाजकल्याणाचे कार्यक्रम नवीन मुक्त अर्थव्यवस्था, माहिती तंत्रज्ञानातील प्रगती व जागतिकीकरणाच्या प्रकियेच्या परिणामांची दखल घेऊन आखणे आवश्यक आहे.

 


उत्तर लिहिले · 19/12/2022
कर्म · 53715