व्हाट्सअँप लॉटरी फसवणूक

मला WhatsApp वर +923026312455 या नंबरवरुन मेसेज आला आहे की तुमच्या नंबरवर 3500000 ची लॉटरी लागली आहे, हे खरे असते का?

3 उत्तरे
3 answers

मला WhatsApp वर +923026312455 या नंबरवरुन मेसेज आला आहे की तुमच्या नंबरवर 3500000 ची लॉटरी लागली आहे, हे खरे असते का?

6
अजिबात नाही. विचार करा, तुम्ही लॉटरीचे तिकीट घेतले नसेल तर तुम्हाला लॉटरी लागल्याचा प्रश्नच उद्भवत नाही. तसाच हा प्रकार आहे. हे लोकांना लुबाडण्याचे धंदे आहेत. मुख्य म्हणजे या नंबरची सुरुवात +९२ पासून होते, अर्थात हा नंबर पाकिस्तानचा आहे. त्यामुळे फसवणूकीची शक्यता वाढते.
उत्तर लिहिले · 29/9/2018
कर्म · 3275
1
अशा अफवांवर विश्वास ठेवू नका.

आणि आपली कोणतीही माहिती देऊ नका.

आपली माहिती चोरीला जाते.
उत्तर लिहिले · 29/9/2018
कर्म · 5130
0
WhatsApp वर +923026312455 या नंबरवरुन तुम्हाला 3500000 ची लॉटरी लागल्याचा मेसेज आला असेल, तर हे खरे असण्याची शक्यता खूपच कमी आहे. अशा प्रकारचे मेसेज फ्रॉड (Fraud) असू शकतात.
यामागे काही कारणे आहेत:
  • अनोळखी नंबर: लॉटरी लागल्याचे मेसेज सहसा अनोळखी नंबरवरून येतात.
  • आर्थिक माहिती मागणे: फ्रॉड करणारे लोक बक्षीस देण्यासाठी बँक खाते किंवा इतर आर्थिक माहिती मागू शकतात.
  • खोट्या वेबसाइट्स: ते तुम्हाला एका बनावट वेबसाइटवर क्लिक करायला सांगू शकतात, जी तुमची माहिती चोरू शकते.
या परिस्थितीत काय करावे:
  1. मेसेजला प्रतिसाद देऊ नका.
  2. कोणतीही वैयक्तिक किंवा आर्थिक माहिती देऊ नका.
  3. त्या नंबरला ब्लॉक (Block) करा.
  4. संदिग्ध मेसेजची तक्रार करा.
लक्षात ठेवा, कोणतीही कायदेशीर लॉटरी तुम्हाला कधीही अनोळखी नंबरवरून संपर्क साधून माहिती विचारणार नाही.
उत्तर लिहिले · 19/3/2025
कर्म · 980

Related Questions

गजानन विवाह संस्था यांच्यामार्फत कॉल आला व विश्वासात घेऊन पैसे भरेपर्यंत दोन बायोडाटा पाठवले, आता ते कॉल उचलत नाहीये. काय करावे? काही मार्ग सांगा.
मोबाईल मधील बातम्या खऱ्या असतात का, जसे की पोस्ट ऑफिसमधील स्कीम, बँकेतील स्कीम बद्दल माहिती देतात?
नोकरी लावतो असे सांगून २००००० लाखाची फसवणूक झाली आहे तर कायद्याने काय करता येईल?
मला एक फोन आला होता. मला असं सांगितले की मी विजय शर्मा बोलतोय, तुम्हाला 25 लाख लॉटरी लागली आहे. हे खरं असेल का? मी लॉटरी कधी लावली नाही.
मला एका हळद व्यापाऱ्याने 2.5 लाखांनी फसवले आहे. घर बांधकामासाठी मी कर्ज काढले होते. मला कोर्टात न जाता पैसे कसे काढता येतील?
मार्केटिंग जॉबसाठी एक मेसेज येतो, ऑफिसचे काम आहे. पहिले १५००० भरायचे आहेत आणि पगार १५००० आहे. हे खरं आहे का, याबद्दल माहिती सांगा?
कोणी जर कामासाठी पैसे घेतले आणि त्या बदल्यात काम ही दिले नाही, आणि पैसे ही देण्यास नकार देत असेल तर काय करावे?