फोन आणि सिम सुरक्षा लॉटरी फसवणूक

मला एक फोन आला होता. मला असं सांगितले की मी विजय शर्मा बोलतोय, तुम्हाला 25 लाख लॉटरी लागली आहे. हे खरं असेल का? मी लॉटरी कधी लावली नाही.

6 उत्तरे
6 answers

मला एक फोन आला होता. मला असं सांगितले की मी विजय शर्मा बोलतोय, तुम्हाला 25 लाख लॉटरी लागली आहे. हे खरं असेल का? मी लॉटरी कधी लावली नाही.

9
😱😱😱

फेक असतं ते भाऊ. काही दिवसांपूर्वी मला पण 20 लाख रुपयांची लॉटरी लागली होती असा फोन आला. मी म्हंटल पाठवा मग खात्यावर पैसे, तर म्हणे 20 लाख पाठवायला शासनाचं 30000 रुपये टॅक्स लागतो आणि ते अगोदर पाठवा म्हणून. म्हणून मी तरी म्हंटल त्या वीस लाखातून तीस हजार काढा आणि पाठवा. तरी ते तयार नव्हते. मी म्हंटल जाऊद्या 1 लाख घ्या बाकीचे पाठवा, तरी तयार नाहीत. त्यांना 1 लाख नको म्हणे, टॅक्स पाहिजे फक्त तीस हजार. शेवटी म्हंटल सगळे राहूद्या 1 लाख फक्त पाठवा, फोनच कट केला राव. तेव्हापासून काय मला फोन आला नाही.
🙂😆
थँक u
उत्तर लिहिले · 4/12/2019
कर्म · 20585
4
उत्तर भारतात प्रचंड वाढलेली लोकसंख्या, कमी विकास दर, उत्तर भारतीय बांधवांमध्ये वाढलेली बेरोजगारी भारताच्या कुठल्याही क्षेत्रापेक्षा जास्त आहे, त्याचे हे परिणाम आहेत! आणि कॉल नेहमी युपी-बिहारी पद्धतीची हिंदी बोलणाऱ्यांचा असतो.
उत्तर लिहिले · 7/12/2019
कर्म · 120
0
नमस्कार,
तुमच्या प्रश्नाचं उत्तर देणं आवश्यक आहे. तुम्हाला आलेला फोन खरा असण्याची शक्यता कमी आहे. अनेकदा अशा प्रकारचे फोन फ्रॉड (Fraud) असतात. यामध्ये लोकांना लॉटरी लागल्याचं खोटं सांगितलं जातं आणि नंतर पैसे उकळण्याचा प्रयत्न केला जातो.
खाली काही गोष्टी लक्षात ठेवा:
  • जर तुम्ही कोणतीही लॉटरी (Lottery) खरेदी केली नसेल, तर तुम्हाला लॉटरी लागणे शक्य नाही.
  • फ्रॉड करणारे लोक अनेकदा तुमच्याकडून बँक (Bank) खात्याची माहिती किंवा काही फी (Fee) भरण्यास सांगतात. त्यामुळे अशा कोणत्याही गोष्टींना बळी पडू नका.
  • तुम्हाला जर कोणताही संशय आला, तर तुमच्या जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये (Police station) तक्रार करा.
तुम्ही सावधगिरी बाळगा आणि कोणत्याही अज्ञात व्यक्तीला तुमची वैयक्तिक माहिती देऊ नका.
Disclaimer: मी एक AI मॉडेल आहे आणि माझा उद्देश तुम्हाला योग्य माहिती देणे आहे. कोणतीही कायदेशीर कारवाई करण्यापूर्वी अधिकृत स्रोतांकडून माहिती तपासा.
उत्तर लिहिले · 21/3/2025
कर्म · 980

Related Questions

लोकांना लॉटरीचं तिकीट घेतल्यावर लॉटरी लागते का?
मी मुंबईत ठिकठिकाणी महाराष्ट्र राज्य लॉटरी, मुंबई लक्ष्मी लॉटरी, चे १० ते ५० रूपयांचे तिकीटं मिळतात आणि त्यावर लाखो व करोडोंची बक्षिसं असतात. ह्या लॉटरी खऱ्या असतात का? जर खऱ्या असतील तर पेपरमध्ये कधी वाचायला मिळत नाही की अमुक व्यक्ती लॉटरीमध्ये करोडपती झाला म्हणून, याबद्दल कुणाला काही माहिती असेल तर सांगा?
मला WhatsApp वर +923026312455 या नंबरवरुन मेसेज आला आहे की तुमच्या नंबरवर 3500000 ची लॉटरी लागली आहे, हे खरे असते का?
लॉटरी म्हणजे काय?
ऑनलाईन लॉटरी व्यवसायाबद्दल काही माहिती आहे का? हा व्यवसाय कसा सुरू करायचा, काय प्रोसेस आहे?
लॉटरी कशी जिंकायची?
लॉटरी खरी असते का?