2 उत्तरे
2
answers
डायनॅमो म्हणजे काय?
9
Answer link
📙 *डायनॅमो म्हणजे काय ?* 📙
*******************************
डायनॅमो म्हणजे वीजउत्पादनाचे यंत्र. या यंत्राची ताकद व आकारावरून त्याला निरनिराळी नावे दिली जातात. डायनॅमो म्हटला की, सायकल वा मोटारसायकलसाठी वापरला जाणारा वीजउत्पादक समोर येतो. जनरेटर म्हटला की, घरासाठी, छोट्या कारखान्यांसाठी वीज निर्माण करणारे यंत्र समोर येते. वीजकेंद्रांसाठी याचीच मोठी भावंडे म्हणजे भलीमोठी विद्युतजनित्रे वापरली जातात.
डायनॅमोचे तत्त्व *मायकल फॅरडे* यांनी १८३१ साली शोधले. त्याआधीच्या काळात वीज छोट्या बॅटरीत रासायनिक प्रक्रियेतूनच मिळवली जात असे. सलग वीज वापरणे हे त्यामुळे अर्थातच महागडे व अवघडही होते. डायनॅमोचे तत्त्व वापरून विजेचा वापर सुरू झाला आणि सारे चित्रच बदलून गेले.
कोणत्याही डायनॅमोमध्ये मुख्यत: लोहचुंबक तांब्याच्या तारेच्या वेटोळ्याभोवती फिरतो व त्यामुळे उत्पन्न होणाऱ्या विजेचा वापर तारेच्या वेटोळ्याच्या दोन टोकांमधून घेऊन केला जातो. याउलट परिस्थिती पण असू शकते. म्हणजेच एखाद्या स्थिर चुंबकाभोवती तारेचे वेटोळे फिरत राहते. चुंबकीय क्षेत्र ज्यावेळी तारेच्या वेटोळ्याने छेडले जाते, त्यावेळी वीजनिर्मिती होते. डायनॅमो फिरवण्यासाठी वापरली जाणारी यांत्रिक ताकद हीच या पद्धतीत विद्युतनिर्मितीमध्ये बदलली जाते. एका ऊर्जेचे दुसऱ्या स्वरूपात रूपांतर केले जाऊन हीच ऊर्जा आपण दिव्याच्या उष्णतेच्या स्वरूपात उजेड पाडण्यासाठी वापरतो.
डायनॅमोचा वापर सुरू झाला आणि वीजनिर्मितीच्या क्षेत्रात झपाट्याने प्रगती सुरू झाली. १८६७ साली मोठ्या प्रमाणावर वीजनिर्मिती करणारी केंद्रेही कार्यरत झाली होती. पण मुख्यतः डायनॅमोचा फायदा दुचाकी वाहनांसाठी आजही होतो. आडनिडय़ा अंधार्या रस्त्याला जाताना विजेरी वापरण्याऐवजी डायनॅमो चाकाला लावून फिरेल, अशी व्यवस्था केली की, सायकलचा पुढचा रस्ता स्वच्छ दिसू लागतो. एवढी त्यातून निर्माण होणाऱ्या विजेची दिव्याला पुरवली जाणारी शक्ती असते.
सर्व प्रकारच्या वाहनांमध्ये दिवे, हाॅर्न्स, वाहनांमधील छोटी मोठी यंत्रे, (रेडिओ, पाणी साफ करणारा वायपर, निरनिराळे इंडिकेटर्स) चालवण्यासाठी जास्त ताकदीचा डायनॅमोचा वापर केला जातो. एवढेच नव्हे, तर यातून तयार होणारी जास्तीची वीज रासायनिक विद्युतघटात साठवून ठेवण्याची पण अंगभूत व्यवस्था सर्व चारचाकी वाहनात केलेली असते. वाहन सुरू करत असताना किंवा वाहन बंद असताना हीच विद्युतघटातील ऊर्जा वापरून यंत्राकरवी काम करून घेता येते.
सहसा दुचाकी वाहनांसाठी वापर केला असता डायनॅमोमधून दीड ते बारा व्होल्ट या दाबाची वीज निर्माण केली जाते.
*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*

0
Answer link
डायनॅमो (Dynamo) म्हणजे एक प्रकारचे विद्युत जनरेटर (electrical generator) आहे. हे उपकरण यांत्रिक ऊर्जेचे विद्युत ऊर्जेमध्ये रूपांतर करते.
डायनॅमोची काही मुख्य वैशिष्ट्ये:
- डायनॅमो फेऱ्यांच्या साहाय्याने (electromagnetic induction) विद्युत ऊर्जा निर्माण करतो.
- यामध्ये फिरणारा भाग (armature) आणि स्थिर चुंबक क्षेत्र (magnetic field) असतो.
- आर्मेचरमध्ये कॉइल्स (coils) असतात, जे फिरल्यावर चुंबकीय क्षेत्रात बदल घडवतात आणि विद्युत प्रवाह निर्माण करतात.
डायनॅमोचा उपयोग अनेक ठिकाणी होतो, जसे की वीज निर्माण करणे, गाड्यांमध्ये बॅटरी चार्ज करणे, इत्यादी.
अधिक माहितीसाठी, आपण हे पाहू शकता: