Topic icon

यांत्रिकी

1
मोटार म्हणजे मोटर असे एक साधन आहे जे गती तयार करते. हे सहसा काही प्रकारचे इंजिन दर्शवते. हे विशेषतः खालील गोष्टींचा संदर्भ घेऊ शकते: ▪ इलेक्ट्रिक मोटार, एक यंत्र जे वीजेला यांत्रिक हालचालीमध्ये रूपांतरित करते ▪ एसी मोटर, विद्युत् प्रवाहाद्वारे चालविली जाणारी विद्युत मोटर; सिंक्रोनस मोटर, कॉइलर्स पासिंग मॅग्नेटसह रोटर स्पिनिंग पर्यायी वर्तमान आणि परिणामी चुंबकीय क्षेत्र ज्या प्रमाणे चालतात त्याच प्रमाणे ▪ प्रेक्षण मोटर, ज्याला गिलहरी-पिंजरा मोटर असेही म्हणतात, एक प्रकारचा अतुल्यकालिक पर्यायी मोटर ज्यामध्ये इलेक्ट्रॉमॅग्नेटिक प्रेरणांच्या माध्यमाने विद्युत उपकरण पुरविले जाते ▪ डीसी मोटर , थेट विद्युतीय वीजवर चालणारी विद्युत मोटर * ब्रश डीसी इलेक्ट्रिक मोटर, थेट चालू शक्तीच्या स्रोतापासून चालविली जाण्यासाठी डिझाइन केलेली एक आंतरिक विद्युत मोटर ▪ ब्रशलेस डीसी मोटर, एक सिंक्रोनस इलेक्ट्रिक मोटर जो थेट विद्युतीय वीजद्वारे समर्थित आहे आणि त्याच्याकडे आहे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने ...
व्याख्या..शब्दकोशातील मोटरची पहिली परिभाषा इंजिन आहे, एखाद्या वाहनाच्या अंतर्गत-दहन इंजिनसह. मोटरची इतर परिभाषा देखील असे म्हणतात: विद्युत मोटर. चुंबकीय क्षेत्रामध्ये ठेवलेल्या वर्तमान-वाहणा-या कुंडलीवर उद्रेक केलेल्या शक्तींच्या माध्यमाने विद्युतीय ऊर्जाला यांत्रिक ऊर्जा बनविणारी मशीन. मोटार हा कोणत्याही प्रकारचा उपकरणा आहे ज्यामध्ये वेगळ्या ऊर्जेला यांत्रिक ऊर्जा बनवितात जी गति तयार करते.
उत्तर लिहिले · 10/12/2021
कर्म · 121765
0
ITI (आयटीआय) मेकॅनिकलनंतर नोकरीच्या संधी:

ITI मेकॅनिकलनंतर तुम्हाला विविध क्षेत्रांमध्ये नोकरीच्या संधी मिळू शकतात. काही प्रमुख क्षेत्रे खालीलप्रमाणे आहेत:

  • उत्पादन (Manufacturing): उत्पादन कंपन्यांमध्ये मशिन ऑपरेटर, फिटर (Fitter), वेल्डर (Welder) आणि तंत्रज्ञ (Technician) म्हणून काम करू शकता.
  • ऑटोमोबाइल (Automobile): ऑटोमोबाइल कंपन्यांमध्ये असेंबली लाइन (Assembly line), देखभाल (Maintenance) आणि दुरुस्ती (Repair) विभागात नोकरी मिळू शकते.
  • सरकारी नोकरी (Government Jobs): सरकारी कंपन्या जसे की रेल्वे (Railway), संरक्षण (Defense), आणि सार्वजनिक बांधकाम विभाग (Public Works Department) मध्ये तंत्रज्ञ पदांसाठी अर्ज करू शकता.
  • खाजगी क्षेत्र (Private Sector): अनेक खाजगी कंपन्यांमध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंग (Mechanical Engineering) संबंधित कामे उपलब्ध असतात.
  • स्वयंरोजगार (Self-Employment): तुम्ही स्वतःचा गॅरेज (Garage) किंवा वर्कशॉप (Workshop) सुरू करू शकता.

नोकरी शोधण्यासाठी तुम्ही खालील वेबसाइट्स आणि माध्यमांचा वापर करू शकता:

  • नोकरी शोध पोर्टल (Job search portals): Naukri.com, Indeed, Monster India.
  • भरती मेळावे (Recruitment drives): ITI च्या भरती मेळाव्यांमध्ये सहभागी व्हा.
  • रोजगार बातम्या (Employment News): स्थानिक वर्तमानपत्रे आणि वेबसाइट्सवर लक्ष ठेवा.

ITI मेकॅनिकलनंतर चांगल्या नोकरीसाठी, तुम्ही अप्रेंटिसशिप (Apprenticeship) करणे फायदेशीर ठरू शकते. अप्रेंटिसशिप दरम्यान तुम्हाला प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळतो आणि कंपन्यांमध्ये नोकरी मिळण्याची शक्यता वाढते.

तुम्हाला विशिष्ट क्षेत्रात नोकरी हवी असल्यास, त्या कंपनीच्या वेबसाइटवर किंवा नोकरी पोर्टलवर (Job portal) नियमितपणे तपासा.

उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 2300
9
📙 *डायनॅमो म्हणजे काय ?* 📙
*******************************

डायनॅमो म्हणजे वीजउत्पादनाचे यंत्र. या यंत्राची ताकद व आकारावरून त्याला निरनिराळी नावे दिली जातात. डायनॅमो म्हटला की, सायकल वा मोटारसायकलसाठी वापरला जाणारा वीजउत्पादक समोर येतो. जनरेटर म्हटला की, घरासाठी, छोट्या कारखान्यांसाठी वीज निर्माण करणारे यंत्र समोर येते. वीजकेंद्रांसाठी याचीच मोठी भावंडे म्हणजे भलीमोठी विद्युतजनित्रे वापरली जातात.

डायनॅमोचे तत्त्व *मायकल फॅरडे* यांनी १८३१ साली शोधले. त्याआधीच्या काळात वीज छोट्या बॅटरीत रासायनिक प्रक्रियेतूनच मिळवली जात असे. सलग वीज वापरणे हे त्यामुळे अर्थातच महागडे व अवघडही होते. डायनॅमोचे तत्त्व वापरून विजेचा वापर सुरू झाला आणि सारे चित्रच बदलून गेले.

कोणत्याही डायनॅमोमध्ये मुख्यत: लोहचुंबक तांब्याच्या तारेच्या वेटोळ्याभोवती फिरतो व त्यामुळे उत्पन्न होणाऱ्या विजेचा वापर तारेच्या वेटोळ्याच्या दोन टोकांमधून घेऊन केला जातो. याउलट परिस्थिती पण असू शकते. म्हणजेच एखाद्या स्थिर चुंबकाभोवती तारेचे वेटोळे फिरत राहते. चुंबकीय क्षेत्र ज्यावेळी तारेच्या वेटोळ्याने छेडले जाते, त्यावेळी वीजनिर्मिती होते. डायनॅमो फिरवण्यासाठी वापरली जाणारी यांत्रिक ताकद हीच या पद्धतीत विद्युतनिर्मितीमध्ये बदलली जाते. एका ऊर्जेचे दुसऱ्या स्वरूपात रूपांतर केले जाऊन हीच ऊर्जा आपण दिव्याच्या उष्णतेच्या स्वरूपात उजेड पाडण्यासाठी वापरतो.

डायनॅमोचा वापर सुरू झाला आणि वीजनिर्मितीच्या क्षेत्रात झपाट्याने प्रगती सुरू झाली. १८६७ साली मोठ्या प्रमाणावर वीजनिर्मिती करणारी केंद्रेही कार्यरत झाली होती. पण मुख्यतः डायनॅमोचा फायदा दुचाकी वाहनांसाठी आजही होतो. आडनिडय़ा अंधार्‍या रस्त्याला जाताना विजेरी वापरण्याऐवजी डायनॅमो चाकाला लावून फिरेल, अशी व्यवस्था केली की, सायकलचा पुढचा रस्ता स्वच्छ दिसू लागतो. एवढी त्यातून निर्माण होणाऱ्या विजेची दिव्याला पुरवली जाणारी शक्ती असते.

सर्व प्रकारच्या वाहनांमध्ये दिवे, हाॅर्न्स, वाहनांमधील छोटी मोठी यंत्रे, (रेडिओ, पाणी साफ करणारा वायपर, निरनिराळे इंडिकेटर्स) चालवण्यासाठी जास्त ताकदीचा डायनॅमोचा वापर केला जातो. एवढेच नव्हे, तर यातून तयार होणारी जास्तीची वीज रासायनिक विद्युतघटात साठवून ठेवण्याची पण अंगभूत व्यवस्था सर्व चारचाकी वाहनात केलेली असते. वाहन सुरू करत असताना किंवा वाहन बंद असताना हीच विद्युतघटातील ऊर्जा वापरून यंत्राकरवी काम करून घेता येते.

सहसा दुचाकी वाहनांसाठी वापर केला असता डायनॅमोमधून दीड ते बारा व्होल्ट या दाबाची वीज निर्माण केली जाते.

*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*

उत्तर लिहिले · 25/9/2018
कर्म · 569245