मी 9 वी ला शिकतो आणि माझ्या शाळेची वेळ 11am ते 5:30 pm पर्यंत असते आणि माझी सकाळी 7 ते 11 ट्युशन असते. शाळा दूर असल्यामुळे मला घरी यायला 7pm वाजतात, तर मी माझ्या अभ्यासाचे वेळापत्रक कसे तयार करू? कृपया मला लवकरात लवकर सांगा, एक महिन्यानंतर माझी परीक्षा चालू होणार आहे.
मी 9 वी ला शिकतो आणि माझ्या शाळेची वेळ 11am ते 5:30 pm पर्यंत असते आणि माझी सकाळी 7 ते 11 ट्युशन असते. शाळा दूर असल्यामुळे मला घरी यायला 7pm वाजतात, तर मी माझ्या अभ्यासाचे वेळापत्रक कसे तयार करू? कृपया मला लवकरात लवकर सांगा, एक महिन्यानंतर माझी परीक्षा चालू होणार आहे.
आपणास ब्रम्हमुहूर्तला उठायला जमेल का ? ब्रम्हमुहूर्त म्हणजे ४ ते ४.३० ची वेळ पहाटेची. ही अशी वेळ आहे ज्यात प्राणवायुचे प्रमाण वातावरणात अधिक असते. ह्या वेळेला उठणारी व्यक्तीला काही नं करता बरेच फायदे होतात.
मला वाटते आपण आपला अभ्यासाचा वेळ ह्या दोन भागात विभागावा.
१. पहाटे ३.३० किंवा ४ नंतर उठूण ६ पर्यत. ह्या वेळेत वाचणाचे विषय अभ्यासा लक्षात ठेवण्यासारखे. जसे मराठी, इतिहास, नागरिकशास्त्र..
२. रात्री ९ पर्यत जेवणं, थोड्या गप्पागोष्टी करुन झाल्यावर ९ ते ११ पर्यत परत सराव अपेक्षित असलेले विषय अभ्यासा. जसे गणित, भुमिती, विज्ञान असे.
सकाळी वातावरण खुप शांत असते त्यावेळेस जे वाचले ते पटकन लक्षात राहते. आणि ब्रम्हमुहूर्त वेळ ही एकदम जादूमय असते. आणि रात्री सराव करा उदाहरणे सोडवायचा.
म्हणजे सकाळीचे २ तासं आणि रात्रीचे २ तास म्हणजे एका दिवसाला ४ तासचा अभ्यास खुप झाला.
शनिवार आणि रविवारपण आपल्याला मिळतात. आपण म्हटलं परिक्षा १ महिन्यानंतर आहे ना म्हणजे कमीत कमी आपल्याला ५ शनिवार आणि रविवार मिळतात म्हणजे १० सुट्टीचे दिवस. ह्या सुट्या "सोन्याचे अंडे देणारी कोंबडी" आहे आपल्यासाठी.
ह्या दोन भागात वेळापत्रक ठरवा आणि कामाला लागा..
अॉफ द बेस्ट :-)
तुला जर शाळेत चांगलं शिकवत असेल तर tution सोडून दे, किंवा जो विषय शाळेत समजत नसेल त्याच विषयाची ट्युशन लाव. जर शाळा अजिबात चांगली नसेल तर मग त्या दूरच्या शाळेत ऍडमिशन घेऊन फायदा नाही. तू शाळा घराच्या जवळ ची बघ . वरील पैकी कोणत्याही गोष्टीवर विचार करून तू वेळ वाचवू शकतो......
वेळापत्रक:
1. सकाळी (7:00 AM - 11:00 AM):
7:00 AM - 11:00 AM: ट्युशन (नियमित)
2. दुपार (11:00 AM - 5:30 PM):
11:00 AM - 5:30 PM: शाळा (नियमित)
3. संध्याकाळ (7:00 PM - रात्री):
7:00 PM - 7:30 PM: घरी पोहोचल्यावर आराम
7:30 PM - 8:30 PM: अभ्यास (1 तास) - शाळेत शिकवलेल्या विषयांची उजळणी
8:30 PM - 9:00 PM: जेवण
9:00 PM - 10:00 PM: अभ्यास (1 तास) - आवडत्या विषयाचा अभ्यास किंवा गृहपाठ
10:00 PM - 10:30 PM: दिवसातील अभ्यासाचे नियोजन आणि उजळणी
10:30 PM: झोप
शनिवार व रविवार:
सकाळ: मागील आठवड्यात शिकलेल्या विषयांची उजळणी आणि गृहपाठ पूर्ण करणे.
दुपार: मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (question papers) सोडवणे.
रात्री: आवडत्या गोष्टींसाठी वेळ (खेळणे, चित्रकला, संगीत).
टीप:
प्रत्येक तासाला 5-10 मिनिटे ब्रेक घ्या.
पुरेशी झोप घ्या (7-8 तास).
वेळेनुसार वेळापत्रकात बदल करा.
सकाळचा वेळ fresh असल्याने अवघड विषयांसाठी वापरा.