2 उत्तरे
2
answers
पेट्रोल आणि डिझेल यांमध्ये फरक काय आहे?
19
Answer link
पेट्रोल आणि डिझेल हे दोन्हीपण खनिज तेलापासून बनवतात. खनिज तेल खूप जास्त कार्बनचे बनलेलं असते म्हणून ते दिसायला अतिशय काळे आणि घट्ट असते. जेव्हा खनिज तेलाला रिफाइन केले जाते तेव्हा त्याच्यामध्ये असलेल्या कार्बनच्या श्रुंखला तुटतात. ज्या जड श्रुंखला असतात त्या रिफाइन करताना खाली तळाशी राहून जातात आणि ज्या हलक्या असतात त्या वर राहतात.
पेट्रोल हलक्या श्रुंखलेचे बनलेले असतात आणि त्यामानाने डिझेल जड श्रुंखलेचे बनलेले असतात म्हणून त्यांना वेगळे करायला जास्त त्रास होत नाही.
जे इंजिन आपण वापरतो ते ह्या तेलांचे रासायनिक ऊर्जेला मेकॅनिकल ऊर्जेत रूपांतर करतो आणि टायर फिरतो. इंजिनमध्ये ह्या तेलाला एक विशिष्ट दबाव दिला जातो आणि मग त्यातून ऊर्जा बाहेर पडते.
ज्या जड श्रुंखला असतात त्यांना तोडायला वेगवेगळे करायला जास्त शक्तीचे गरज लागते म्हणून डिझेल मोठ्या गाड्यांमध्ये वापरतात. डिझेलचा उत्कलनांक बिंदू अर्थात बॉयलिंग पॉईंट खूप जास्त असतो म्हणून इंजिनाला डिझेल मधून ऊर्जा तयार करायला खूप जास्त दबाव द्यावे लागते. तसेच डिझेल जास्त इंफ्लेमेबल जास्त ज्वलनशील नसते म्हणून त्याला ऊर्जेसाठी खूप जास्त दबाव द्यावा लागतो.
इकडे पेट्रोल हलक्या श्रुंखलेपासून बनलेले असते म्हणून त्याला तोडायला जास्त शक्ती लागत नाही. आणि पेट्रोल हे डिझेलपेक्षा जास्त ज्वलनशील असते म्हणून थोड्याश्या दबावाखालीसुद्धा लगेच पेट घेते. कमी दबावाखाली असतांना पेट्रोल ऊर्जा देऊ शकते म्हणून पेट्रोल कमी शक्तीचे कमी आकाराच्या वाहनामध्ये वापरतात.
पेट्रोल इंजिने एक विशिष्ट पण कमी दबाव बनवून एक छोटासा स्पार्क छोटीशी ठिणगी वापरून ऊर्जा बनवतात. हि उर्जा बनण्याची क्रिया फास्ट असते म्हणून पेट्रोल अश्या वाहनांसाठी वापरतात जे कमी वेळेत जास्त अंतर कापतात जसे बाईक.
दुसरीकडे डिझेल जास्त शक्ती खर्च करायला भाग पाडते म्हणून त्याचे इंजिने सुद्धा जास्त शक्तिशाली असतात. परिणामी डिझेल लांब पल्ला कमी गतीत गाठणाऱ्या वाहनांमध्ये वापरतात जसे की ट्रक.
मग प्रश्न हा पडतो ना की पेट्रोल जास्त ऊर्जा देते आणि त्याला जास्त दबाव पण लागत नाही तर त्याला मोठ्या वाहनांमध्ये का वापरत नाही ???
तर त्याच कारण असे की पेट्रोल जास्त ज्वलनशील असल्यामुळे त्याची ऊर्जा जास्त वेळ टिकून राहत नाही परिणामी आपल्याला जर जास्त लांब जायचं राहील तर पेट्रोल जास्त लागेल. आणि पेट्रोल जास्त प्रमाणात साठवू नाही शकत कारण दबाव कमी जास्त होऊ शकतो आणि पेट्रोल पेट घेऊ शकते. इकडे डिझेल ला खूप जास्त दबाव पाहिजे असतो म्हणून तेवढा दबाव मिळणे अशक्य असते.
0
Answer link
petrol आणि डिझेलमध्ये खालीलप्रमाणे फरक आहेत:
पेट्रोल (Petrol):
- उत्पादन: हे कच्चे तेल (Crude Oil) पासून तयार होते.
- इंजिन: पेट्रोल इंजिनमध्ये स्पार्क प्लग (spark plug) वापरले जाते.
- ज्वलन: हे सहजपणे जळते.
- कार्यक्षमता: पेट्रोल इंजिन डिझेल इंजिनच्या तुलनेत कमी कार्यक्षम असतात.
- प्रदूषण: पेट्रोलमुळे डिझेलच्या तुलनेत कमी प्रदूषण होते.
- किंमत: साधारणपणे डिझेलपेक्षा महाग असते.
डिझेल (Diesel):
- उत्पादन: हे देखील कच्चे तेल (Crude Oil) पासून तयार होते.
- इंजिन: डिझेल इंजिनमध्ये कॉम्प्रेशन इग्निशन (compression ignition) वापरले जाते.
- ज्वलन: हे पेट्रोलच्या तुलनेत हळू जळते.
- कार्यक्षमता: डिझेल इंजिन पेट्रोल इंजिनच्या तुलनेत जास्त कार्यक्षम असतात.
- प्रदूषण: डिझेलमुळे पेट्रोलच्या तुलनेत जास्त प्रदूषण होते.
- किंमत: साधारणपणे पेट्रोलपेक्षा स्वस्त असते.