3 उत्तरे
3
answers
समाजशास्त्र म्हणजे काय?
4
Answer link
समाजशास्त्र (Sociology) म्हणजे माणसाचा समाजाशी असलेल्या आंतरसंबंधांचा अभ्यास होय. समाजशास्त्र हे समाजाचे विज्ञान आहे. यात सामाजिक घटक व सामाजिक घडामोडींचा समावेश असतो. समाजाचे मन, मनाचा एकूण कल व समाज पाळत असलेले रीतिरिवाज यांचा शोध या शास्त्रात घेतला जातो. सामाजिक प्रश्नांची उकल करण्यासाठी समाजशास्त्र उपयुक्त असते. हे शास्त्र आंतरविद्याशाखीय स्वरूपाचे आहे. यामुळे याचा मानववंशशास्त्र, भाषाशास्त्र, राज्यशास्त्र, इतिहास व संख्याशास्त्र अशा अनेक शाखांशी संबंध येतो.
समाजशास्त्राला इंग्रजीत "Sociology" म्हणतात,
ऑगस्ट कॉम्ट हा समाजशास्त्राचा जनक मानला जातो. इ.स. १८३९मध्ये त्याने सामाजिक भाषणात आणि नंतर Positive philosophy या ग्रंथात "समाजशात्र" या शब्दाचा पहिल्यांदा वापर केला. हो

0
Answer link
समाजशास्त्र म्हणजे समाज, सामाजिक वर्तन आणि मानवी सामाजिक संबंधांचा अभ्यास करणारे शास्त्र आहे.
हे शास्त्र सामाजिक संरचना, संस्था, आणि व्यक्तींच्याInteractionsचा अभ्यास करते.
समाजशास्त्रज्ञांना समाजाचा आणि व्यक्तीच्या वर्तनाचा संबंध समजून घ्यायचा असतो.
समाजशास्त्राच्या अभ्यासाचे मुख्य विषय:
- सामाजिक असमानता
- सामाजिक बदल
- संस्कृती
- राजकारण
- धर्म
अधिक माहितीसाठी: विकिपीडिया