शास्त्रज्ञ चरित्र

डॉ.ए पी जे अब्दुल कलाम माहिती?

पूर्ण नाव : अबुल पाकीर ज़ैनुलाब्दीन अब्दुल कलाम
जन्म- 15 ऑक्टोबर 1931, (रामेश्वर, तमिळनाडू, भारत)
मृत्यू - 27 जुलै 2015 (मेघालयमधील शिलाँग)
वडील- जैनुलाबदिन अब्दुल
प्राथमिक शिक्षण : श्वार्त्ज हायस्कूल, रामअनंतपुरम
पदवी : सेंट जोसेफ कॉलेज, तिरुची (विज्ञान)

व्यावसायिक : 1954 ते 57 मध्ये एम.आय.टी. मद्रास येथून एअरोनॉटिकल इंजिनीअरिंगमध्ये डी.एम.आय.टी.

हे भारताचे अकरावे राष्ट्रपती होते.
आपल्या आगळ्या कार्यपद्धतीमुळे ते ‘लोकांचे राष्ट्रपती’ म्हणून लोकप्रिय झाले.
विज्ञानाचा परम भोक्ता असणारे डॉ. कलाम मनाने खूप संवेदनशील व साधे होते.
कलाम यांच्या सहकाऱ्यांनी कलाम यांचे ट्विटर अकाउंट सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला असून, ‘इन मेमरी ऑफ डॉ. कलाम’ या नावाने अकाउंट सुरू राहील

अब्दुल कलाम यांचे कार्य

1957 साली डिफेन्स रिसर्च अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनमध्ये (डीआरडीओ) वरिष्ठ वैज्ञानिकाचे सहायक म्हणून नोकरी.

भारताचे पहिले हलके विमान होवर क्राफ्ट विकसित करणाऱ्या चमूच्या प्रमुखपदी नियुक्ती. होवर क्राफ्ट विकसित.

1963 ते 1980 या कालावधीत इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनमध्ये (इस्रो) काम.

1980 : इंदिरा गांधी यांनी इंटिग्रेटेड, गाईडेड मिसाईल डेव्हलपमेंट प्रोग्राम सुरू केला. याचे सतीश धवन पहिले संचालक होते. त्यानंतर या महत्त्वाकांक्षी योजनेची जबाबदारी डॉ. अब्दुल कलाम यांच्याकडे सोपविण्यात आली आणि भारताने क्षेपणास्त्राच्या क्षेत्रात स्वयंसिद्ध होण्याच्या दिशेने आगेकूच सुरू केली.

11 व 13 मे 1998 : पोखरण येथे दोन यशस्वी अणुचाचण्या घेण्यात आल्या. यात अब्दुल कलाम यांची भूमिका महत्त्वाची होती.

17 जुलै 2002 ते 24 जुलै 2007 : भारताचे 11 वे राष्ट्रपती म्हणून कार्यभार सांभाळला. (त्यांच्या कार्यामुळे ते आजवरचे सर्वाधिक लोकप्रिय राष्ट्रपती ठरले.)

डॉ. अब्दुल कलाम यांना मिळालेले पुरस्कार :

१९८१-पद्मभूषण

१९९०-पद्मविभूषण

१९९७-भारतरत्न

१९९७-इंदिरा गांधी राष्ट्रीय एकात्मता

१९९८-वीर सावरकर पुरस्कार

२०००-रामानुजम पुरस्कार

२००७-ब्रिटिश रॉयल सोसायटीतर्फे किंग चार्ल्स (द्वितीय) पदक

२००७-वॉल्व्हरहॅम्फ्टन विद्यापिठातर्फे डॉक्टर ऑफ सायन्स मानद पदवी

२००९-अमेरिकन सोसायटी ऑफ मेकॅनिकल इंजिनिअर्स संस्थेतर्फे हूवर पदक

२००९-अमेरिकेतील कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीतर्फे आंतरराष्ट्रीय पुरस्कार

२०१०-वॉटलू विद्यापिठातर्फे डॉक्टर ऑफ इंजिनिअरिंग

२०११-एस. गुजराथी विद्यापीठाचा डॉक्टर ऑफ सायन्स

२०११-इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअर संस्थेचे मानाचे सभासदत्व

२०१२-डॉक्टर ऑफ लॉ (सिमॉन फ्रेजर विद्यापीठ)

२०१४-डॉक्टर ऑफ सायन्स (एबिनबर्ग विद्यापीठ, इंग्लंड)

1. डॉ. अब्दुल कलाम यांची ग्रंथसंपदा

डेव्हलपमेंट इन फ्ल्यूइड मेकॅनिक्स अॅण्ड स्पेस टेक्नोलॉजी

इंडिया २०२०: ए व्हिज‌न फॉर दी न्यू मिलेनियम

विंग्ज ऑफ फायर (मराठीत अनुवाद - अग्न‌पिंख)

इग्नायटेड माईंड्स: अनलिशिंग दी पॉवर विदिन इंडिया

दी ल्यूमिनस स्पार्क्स

म‌शिन इंडिया

इन्स्पायरिंग थॉट्स

इनडॉम‌टिेबल स्पिरीट्स

एनव्हिजनिंग अॅन एम्पॉवर्ड नेशन

यू आर बॉर्न टू ब्लॉसम : टेक माय जर्नी बियाँड

टर्निंग पॉईंट्स : ए जर्नी थ्रु चॅलेंजेस

टार्गेट थ्री ब‌लि‌यिन

माय जर्नीः ट्रान्सफॉर्मिंग ड्रीम्स इन्टू अॅक्शन्स

ए मॅनीफेस्टो फॉर चेंज : ए सिक्वेल टू इंडिया २०२०

ट्रान्सेंडिंग माय स्पिरिच्युअल एक्सपिरियन्स विथ प्रमुख स्वामीजी

रिइग्नायटेड : सायंटिफ‌कि पाथवेज टू ए ब्रायटर फ्यूचर


1 उत्तर
1 answers

डॉ.ए पी जे अब्दुल कलाम माहिती?

21
*डॉ.ए पी जे अब्दुल कलाम यांच्याबद्दल माहिती*

📖 _अब्दुल कलाम यांचे वडील रामेश्वरमला येणाऱ्या यात्रेकरूंना होडीतून धनुष्कोडीला नेण्या-आणण्याचा व्यवसाय करीत. मुलाच्या काॅलेजच्या प्रवेशासाठी लागणारे पैसेही त्यांच्याकडे नव्हते. त्यांच्या आत्याने स्वतःचे दागिने गहाण ठेवून त्यांना पैसे दिले. त्या काॅलेजातून एरॉनॉटिक्सचा डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर त्यांनी अमेरिकेतील 'नासा' या प्रसिद्ध संशोधन संस्थेत चार महिने एरोस्पेस टेक्नॉलॉजीचे प्रशिक्षण घेतले._

💫 _अब्दुल कलाम यांचा 15 ऑक्टोबर हा जन्म दिवस 'जागतिक विद्यार्थी दिवस' म्हणून साजरा केला जातो. तसेच कलाम यांना भारत सररकारने 'पद्मविभूषण', 'पद्मभूषण' आणि १९९८ साली 'भारतरत्न' या सर्वोष्कृष्ट किताबानी सन्मानित केले होते._
*पूर्ण नाव*-अबुल पाकीर ज़ैनुलाब्दीन अब्दुल कलाम
----------------------------------
*जन्म*-१५ ऑक्टोबर १९३१, रामेश्वरम
-----------------------------------
*नागरिकत्व*-भारतीय
-----------------------------------
*राष्ट्रीयत्व*-भारतीय
-----------------------------------
*धर्म*-मुस्लिम
-----------------------------------
*पुरस्कार*-पद्मभूषण’, ‘पद्मविभूषण’, ‘भारतरत्न'
-----------------------------------
*वडील*-जैनुलाबदिन अब्दुल
-----------------------------------
अबुल पाकीर ज़ैनुलाब्दीन अब्दुल कलाम (तमिळ) (जन्म ऑक्टोबर १५, १९३१, तमिळनाडू, भारत) यांना डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम ह्या नावाने ओळखले जाते. हे भारताचे अकरावे राष्ट्रपती (कार्यकाळ २५ जुलै, इ.स. २००२ ते २५ जुलै, इ.स. २००७) होते. आपल्या आगळ्या कार्यपद्धतीमुळे ते ‘लोकांचे राष्ट्रपती’ म्हणून लोकप्रिय झाले.
--------------------------------------
*शिक्षण*

त्यांचे वडील रामेश्वरमला येणाऱ्या यात्रेकरूंना होडीतून धनुष्कोडीला नेण्याआणण्याचा व्यवसाय करीत. डॉ. कलाम यांनी आपले शालेय शिक्षण रामनाथपुरम्‌ला पूर्ण केले. लहान वयातच वडिलांचे छत्र गमावल्याने डॉ. कलाम गावात वर्तमानपत्रे विकून, तसेच अन्य लहान मोठी कामे करून पैसे कमवीत व घरी मदत करीत. त्यांचे बालपण खूप कष्टात गेले. शाळेत असताना गणिताची त्यांना विशेष आवड लागली. नंतर ते तिरुचिरापल्ली येथे सेंट जोसेफ कॉलेजमध्ये दाखल झाले. तेथे बी.एस्‌‍सी. झाल्यानंतर त्यांनी ‘मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीत प्रवेश घेतला. प्रवेशासाठी लागणारे पैसेही त्यांच्याकडे नव्हते. बहिणीने स्वतःचे दागिने गहाण ठेवून त्यांना पैसे दिले. या संस्थेतून एरॉनॉटिक्सचा डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर, त्यांनी अमेरिकेतील ‘नासा’ या प्रसिद्ध संशोधन संस्थेत चार महिने एरोस्पेस टेक्नॉलॉजीचे प्रशिक्षण घेतले.

त्यानंतर अब्दुल कलाम यांचा १९५८ ते ६३ या काळात संरक्षण संशोधन व विकास संस्थेशी(DRDO) संबंध आला.
-----------------------------------
*कार्य*
१९६३ मध्ये ते भारतीय अवकाश संशोधन संस्थेत (इस्रो) क्षेपणास्त्र विकासातील एसएलव्ही(सेटेलाइट लॉन्चिंग व्हेईकल) च्या संशोधनात भाग घेऊ लागले.इंदिरा गांधी पंतप्रधान असताना भारताने क्षेपणास्त्र विकासाचा एकात्मिक कार्यक्रम हाती घेतला त्या वेळी डॉ. कलाम पुन्हा डीआरडीओमध्ये आले.

स्वदेशी बनावटीची क्षेपणास्त्रे तयार करण्याची त्यांची जिद्द तेव्हापासूनचीच आहे. भारतीय अवकाश संशोधन संस्थेत (इस्रोमध्ये) असताना सॅटेलाईट लाँन्चिंग व्हेईकल -३ या प्रकल्पाचे ते प्रमुख झाले. साराभाईनी भारतात विज्ञान तंत्रज्ञानाची आघाडी डॉ. कलाम यांनी सांभाळावी, असे वक्तव्य केले होते, ते पुढे कलामांनी सार्थ करून दाखविले. साराभाईंचेच नाव दिलेल्या ‘विक्रम साराभाई अवकाश केंद्रा’चे ते प्रमुख झाले.
वैयक्तिक कामापेक्षा सांघिक कामगिरीवर त्यांचा भर असतो व सहकाऱ्यांमधील उत्तम गुणांचा देशाच्या वैज्ञानिक प्रगतीसाठी उपयोग करून घेण्याची कला त्यांच्यामध्ये आहे. क्षेपणास्त्र विकासकार्यामधील ‘अग्नी’ क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीमुळे डॉ. कलाम यांचे जगभरातून कौतुक झाले. पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार म्हणून काम करतांना देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांनी अनेक प्रभावी धोरणांची आखणी केली. त्यांनी संरक्षण मंत्र्यांचे वैज्ञानिक सल्लागार व डीआरडीओ चे प्रमुख म्हणून त्यांनी अर्जुन हा एम.बी.टी.(मेन बॅटल टँक) रणगाडा व लाइट काँबॅट एअरक्राफ्ट (एलसीए) यांच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका पार पाडली.
विज्ञानाचा परम भोक्ता असणारे डॉ. कलाम मनाने खूप संवेदनशील व साधे आहेत. त्यांना रुद्रवीणा वाजण्याचा, मुलांशी गप्पा मारण्याचा छंद आहे. भारत सरकारने ‘पद्मभूषण’, ‘पद्यविभूषण’ व १९९८ मध्ये ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च किताब देऊन त्यांचा सन्मान केला. डॉ. कलाम हे अविवाहित आहेत व पूर्ण शाकाहारी आहेत. पुढील वीस वर्षांत होणाऱ्या विकसित भारताचे स्वप्न ते पाहतात. बालपण अथक परिश्रमांत व्यतीत करून विद्येची अखंड साधना करीत खडतर आयुष्य जगलेले, आणि जगातील सर्वात मोठया लोकशाही राष्ट्राच्या राष्ट्रपतिपदी निवड झालेले डॉ. कलाम, हे युवकांना सदैव प्रेरणा देणारे व्यक्तिमत्त्व आहे.

भारत सरकारने ‘पद्मभूषण’, ‘पद्मविभूषण’ व १९९७ मध्ये ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च 1 किताब देऊन त्यांचा सन्मान केला.
------------------------------- ------
*वर्ष पुरस्कार व पुरस्कार देणारी संस्था*
१९८१--पद्मभूषण-- भारत सरकार
---------------------------------
१९९०--पद्मविभूषण--भारत सरकार
---------------------------------
१९९७--भारतरत्न--भारत सरकार
---------------------------------
१९९७--इंदिरा गांधी राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार--भारत सरकार
----------------------------------
१९९८--वीर सावरकर पुरस्कार--भारत सरकार
----------------------------------
२०००--रामानुजम पुरस्कार--मद्रासचे अल्वार रिसर्च सेंटर
----------------------------------
२००७--किंग चार्ल्स (दुसरा) पदक--ब्रिटिश रॉयल सोसायटी
------------------------------------
२००७--डॉक्टर ऑफ सायन्स ही मानद पदवी--वॉल्व्हरहॅम्फ्टन विद्यापीठ, U.K
----------------------------------
२००८--नान्यांग टेक्नॉजिकल युनिव्हर्सिटी--सिंगापूर सिंगापूर
------------------------------------
२००९--हूवर पदक--ASME Foundation(अमेरिकन सोसायटी ऑफ मेकॅनिकल इंजिनिअर्स)
-----------------------------------
२००९--आंतरराष्ट्रीय von Kármán Wings पुरस्कार--अमेरिकेतील कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, U.S.A
-----------------------------------
२०१०--डॉक्टर ऑफ इंजिनिरिंग डॉक्टर ऑफ इंजिनिरिंग--वॉटरलू विद्यापीठ
------------------------------------
२०११--न्यू यॉर्कच्या IEEE (इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्टिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअर्स) या संस्थेचे समासदत्व--IEEE
----------------------------------
*डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची कारकीर्द*
◆ जन्म : १५ ऑक्टोबर १९३१ रामेश्वर येथे.
◆ शिक्षण : श्वात्र्झ(?) हायस्कूल, रामनाथपुरम. सेंट जोसेफ कॉलेज, त्रिचनापल्ली येथे विज्ञान शाखेतील पदवी(१९५४). नंतर चेन्नई येथून एरोनॉटिकल इंजिनियरिंगची पदविका घेतली(१९६०).
◆ १९५८ : डी.आर.डी.ओ.मध्ये सीनियर सायंटिस्ट. तेथे असताना प्रोटोटाईप हॉवरक्रॉफ्ट (हॉवरक्राफ्टचे कामचलाऊ मॉडेल) तयार केले. हैद्राबादच्या डी.आर.डी.ओ.(डिफेन्स रिसर्च ॲन्ड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन)चे संचालकपद.
◆ १९६२ : बंगलोरमध्ये असताना भारतीय अवकाश कार्यक्रमात सहभागी. एरोडायनॅमिक्स डिझाइनच्या फायबर रीएनफोर्स्ड प्लास्टिक (FRP) या प्रकल्पात सहभागी.
◆ १९६३ ते ७१ :विक्रम साराभाई यांच्याबरोबर काम केले. तिरुअनंतपुरम (त्रिवेंद्रम) येथील विक्रम साराभाई स्पेस रिसर्च सेंटर(ISRO) येथे सॅटेलाईट लॉन्च व्हेईकल(SLV) प्रोग्रॅमचे प्रमुख.
◆ १९७८ ते ८६ : प्रा. सतीश धवन यांच्याबरोबर काम.
◆ १९७९ : SLVच्या उड्डाण कार्यक्रमाचे संचालक
◆ १९७९ ते ८० : थुंबा येथे एसएलव्ही-३ चे प्रोजेक्ट डायरेक्टर. (जुलै १९८० अवकाशात रोहिणी हा कृत्रिम उपग्रह प्रक्षेपित)
◆ १९८१ : पद्मभूषण पुरस्कार प्राप्त
◆ १९८५ : त्रिशूल या अग्निबाणाची निर्मिती.
◆ १९८८ : पृथ्वी अग्निबाणाची निर्मिती. रिसर्च सेंटरची इमारत तयार करवली.
◆ १९८९ : अग्नी या अग्निबाणाची निर्मिती.
◆ १९९० : आकाश व नाग या अग्निबाणांची निर्मिती.
◆ १९९१ : वैज्ञानिक सल्लागार, संरक्षण मंत्री डी. आर.डी. ओ. चे प्रमुख म्हणून त्यांनी अर्जुन हा एम.बी.टी.(मेन बॅटल टँक) हा रणगाडा व लाइट काँबॅट एअरक्राफ्ट (एल.सी.ए.) यांच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका पार पाडली.
◆ १९९४ : ‘माय जर्नी ‘ हा कवितासंग्रह प्रकाशित.
◆ २५ नोव्हें. १९९८ : भारतरत्‍न हा पुरस्कार प्राप्त.
◆ २००१ : सेवेतून निवृत्त.
◆ २००२ : भारताच्या राष्ट्रपतीपदावर नेमणूक.
------–-------–------------–--------
*अब्दुल कलाम यांनी लिहिलेली पुस्तके*

●अदम्य जिद्द (मराठी अनुवाद : सुप्रिया वकील)
● इग्नाइटेड माइंड्‌स: अनलीशिंग द पॉवर विदिन इंडिया (’प्रज्वलित मने’ या नावाचा मराठी अनुवाद, अनुवादक : चंद्रशेखर मुरगुडकर)
● ‘इंडिया २०२०- ए व्हिजन फॉर द न्यू मिलेनियम’ (इंग्रजी, सहलेखक अब्दुल कलाम आणि वाय.एस. राजन); ‘भारत २०२० : नव्या सहस्रकाचा भविष्यवेध’ या नावाने मराठी अनुवाद : अभय सदावर्ते)
● इंडिया – माय-ड्रीम
● एनव्हिजनिंग ॲन एम्पॉवर्ड नेशन : टेक्नालॉजी फॉर सोसायटल ट्रान्सफॉरमेशन
● ए.पी.जे. अब्दुल कलाम – एक व्यक्तिवेध (मराठी अनुवाद : माधुरी शानभाग)
● विंग्ज ऑफ फायर (आत्मचरित्र). मराठीत अग्निपंख नावाने अनुवाद, अनुवादक :माधुरी शानभाग.
● सायंटिस्ट टू प्रेसिडेंट (आत्मकथन)
● टर्निंग पॉइंट्‌स (याच नावाचा मराठी अनुवाद : अंजनी नरवणे)
● दीपस्तंभ (सहलेखक : अरुण तिवारी; मराठी अनुवाद कमलेश वालावलकर)
--------–-----------------------
*डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्यासंबंधी लिहिली गेलेली पुस्तके*

■इटर्नल क्वेस्ट : लाइफ ॲन्ड टाइम्स ऑफ डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम (इंग्रजी, लेखक : एस.चंद्रा)
■ डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम – एक मानवतावादी शास्त्रज्ञ.’ (हिंदी, मूळ लेखक अतुलेंद्रनाथ चतुर्वेदी; मराठी अनुवाद – मंदा आचार्य).
■ ए पी जे अब्दुल कलाम : द व्हिजनरी ऑफ इंडिया (इंग्रजी, लेखक : के. भूषण आणि जी. कात्याल)
■ प्रेसिडेंट एपीजे अब्दुल कलाम (इंग्रजी, लेखक :आर के पूर्ती)
■ रामेश्वरम ते राष्ट्रपतीभवन- डॉ. अब्दुल कलाम. (मराठी, लेखक : शां. ग.1 महाजन)
-------------–-----------–------
*डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम : ‘अतीसामान्य ते असामान्य’ प्रवासाचा यात्री !*

भारताचे 11 वे राष्ट्रपती हे कोणीतरी तर बनणारच होते, म्हणून ‘झालेले’ किंवा ‘कोणीतरी नामधारी म्हणून बनवलेलेे’ असे परंपरागत नव्हे; तर आयुष्याच्या अंतिम क्षणापर्यंत लोकांसाठी जगुन लोकांचेच बनुन राहिलेले असे एक व्यक्तिमव होते कारण ते डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम होते.

एका बाजूला शांततेसाठी तरीही शत्रुच्या मनात धडकी भरवणारी पोखरण अणुचाचणी होती तर दूसरीकड़े
*“when there is order in the nation then, there is peace in the world”*
 म्हणत यूरोपियन देशांच्या संसदेत केलेल्या सर्वकालीन सर्वश्रेष्ठ भाषणांपैकी एक असे जागतिक शांततेचे आवाहन करणारे भाषण होते. E.U.ची संपूर्ण संसद जेंव्हा आनंदाने भारावलेल्या अवस्थेत, बराच वेळ टाळ्या पिटत असतांनाच उभी राहुन मानवंदना देते होती तेव्हा, “भारताकडुन शांततेचा जगाला दिला जाणारा संदेश व न्युक्लीअर टेस्ट ह्या दोन्ही परस्पर विरोधाभास असणाऱ्या गोष्टी आहेत”,असे ओरडणाऱ्या पाकिस्तानला आपोआप उत्तर मिळाले. ह्या प्रसंगातुन एका शांततावाद्याची विविध देशांच्या प्रतिनीधी मनावर, जादु करणाऱ्या वक्तृत्वाची झलकही दिसली व 
*strength respects strength only* ह्या वाक्याचा अर्थही कळाला.

पेपर वाटण्यापासून खडतर आयुष्याची सुरवात करणाऱ्या एका व्यक्तिवर जेव्हा जगातील लहानमोठ्या सर्व पेपर्समधे स्तुती करणारे रकानेच्या रकाने लिहुन येतात तेंव्हा ‘अतीसामान्य ते असामान्य’ ह्या प्रवासाचे ते एक उदाहरण ठरते.

अनेक मार्गदर्शक पुस्तकांतुन आशावादी लिखाण करुन जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत विद्यार्थी व युवकांना सत्य, विकास, नीतिमत्ता व राष्ट्रनिर्माणाचा मार्ग दादाखवणाऱ्या ह्या महापुरुषाचा जन्मदिन 15 ऑक्टोबर हा विश्व विद्यार्थी दिवस म्हणुन साजरा केला जातो तो ह्यासाठीच.

एकदा डॉ.साहेब मिसाईल चाचणीत इतके रममाण झाले की, स्वतःच्या भाचीचेही लग्न विसरून गेले. कधी शाळेत जेवणाच्या पंगतीत आनंदाने लहान मुलांना वाढणे, तर कधी आपली खुर्ची इतरांपेक्षा वेगळी आहे हे आढ़ळल्याने ‘मलाही साधीच खुर्ची द्या’ म्हणत बड़ेजाव टाळणे, अगदी 2012 ला देशाच्या सर्वोच्च पदाच्या निवडणुकीत ‘राष्ट्रपती पदाबाबत राजकारण होणे योग्य नसुन सर्वसंमती असेल तरच मी उभा राहील’ म्हणत राष्ट्रपतीपदावर सुद्धा पाणी सोडणे, वयाच्या 83 व्या वर्षीही युथ आयकॉन असणे किंवा राष्ट्रप्रमुख असतांनाही आपल्यात एक कॉमन मॅन जपणे, असे कितीतरी पैलु आपल्याला डॉ. कलामांनी आधुनिक काळातही एका साधुप्रमाणे निर्मोही आयुष्य व्यतीत केल्याचे दाखले देतात.

जगातील सर्वश्रेष्ठ संशोधकांपेेकी एक असूनही शिक्षणाचे महत्व ओळखून आपली ओळख केवळ एक शिक्षकाची रहावी, कारण ‘शिक्षकांची राष्ट्रनिर्माणातील भूमिका अतुलनीय असते’, असे म्हणत ज्ञानदानाच्या पवित्रकार्याचा केलेला योग्य असा गौरव करणे असो, नातलग दिल्लीला आल्यावर स्वतःच्या खिशातुन केलेला त्यांच्यावरचा खर्च असो किंवा कायम गरजु संस्थाना केलेले आपल्या मासिक मानधनाचे वाटप असो, ही उदाहरणे अगदी सहज सांगतात की, ह्या आदर्श व्यक्तिमत्वाची, ट्रक भरून असणारी एकमेव संपत्ती म्हणजे पुस्तके का होती?



एकीकडे “स्वप्न म्हणजे ते नाही जे तुम्हाला झोपेत पड़ते, स्वप्न म्हणजे ते जे तुम्हाला झोपुच देत नाही” म्हणणारे राष्ट्रसमर्पित व्यक्तिमव तर दुसरीकडे, ‘low aim is a crime, स्वप्ने मोठीच बघा आणि त्यांना पूर्ण करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करा’ म्हणणारे मार्गदर्शक व्यक्तिमत्व.

‘नि:संशय देशाने सर्वाधीक प्रेम केलेला राष्ट्रपती’ अशी ओळख असणाऱ्या ह्या मिसाईल मॅन च्या आठवणी जनतेच्या मनात कायमच राहतील ह्यावर कोणाचेही दुमत असु शकत नाही.

*‘मी मरेन त्या दिवसाला सुट्टी जाहिर करु नका तर एक दिवस जास्त काम करा’ म्हणत *always nation first* हा त्यांच्याच संदेश अंगीकारुन आधुनिक स्वप्नातिल भारताचे निर्माण करु शकतो.
*निधन*
निधनसंपादन करा

ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची प्रकृती शिलाँग येथील आय.आय.एम.च्या कार्यक्रमात व्याख्यान देताना बिघडली. शिलाँगमधीलच एका रुग्णालयात त्यांनी २७ जुलै, इ.स. २०१५ रोजी अखेरचा श्वास घेतला.कलाम यांनी केलेल्या कार्याचा उपयोग भारतासाठी विविध कार्यात झाला आहे.


😍 *डॉ. कलाम यांच्या आयुष्यातील प्रेरक प्रसंग*


💁‍♂️ डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचे संपूर्ण आयुष्य प्रत्येकासाठी आदर्शवत आहे. मोठी माणसं आयुष्यात आलेल्या प्रसंगांना कसे तोंड देतात त्यावरून त्यांचे मोठेपण ठरत असते. डॉ. कलाम यांच्या आयुष्यातील काही प्रेरक प्रसंग आपण जाणून घेऊयात.

▪️ *प्रसंग पहिला :* डॉ कलाम DRDO मध्ये काम करत असताना तिथे एका संरक्षक भिंतीचे काम चालू होते. या भिंतीच्या वरच्या पृष्ठभागावरून कुणी आत येऊ नये म्हणून त्या भागांवर काचा लावण्याचे काम चालू असताना कलाम यांनी त्याला विरोध केला. यामुळे पक्षी भिंतीवर बसल्यास पक्षांच्या पायाला इजा होईल हा कलाम यांचा उदात्त विचार त्यामागे होता.

▪️ *प्रसंग दुसरा :* एकदा डॉ. कलाम कुठेतरी शाळेमध्ये मुलांना व्याख्यान देत असताना अचानक लाईट गेली. अशावेळी कलाम यांनी व्याख्यान न थांबवता ते थेट मुलांमध्ये गेले. 400 मुलांच्या घोळक्यात उभे राहून त्यांनी विनामाईक व्याख्यान दिले.

▪️ *प्रसंग तिसरा :* राष्ट्रपती असताना ते एकदा केरळमधील त्रिवेंद्रमच्या राजभवनाला एका कार्यक्रमासाठी गेले होते. त्यांच्यासोबत आणखी 2 व्यक्ती आणण्याची अनुमती देण्यात अली होती. मात्र कलाम यांनी कोणत्याही सेलिब्रेटींना सोबत न नेता त्या कार्यक्रमासाठी एक मोची आणि एका हॉटेलमालकाला सोबत नेले होते. राष्ट्रपती बनण्यापूर्वी अब्दुल कलाम त्रिवेंद्रम मध्ये शास्त्रज्ञ म्हणून काम करत असताना या दोन लोकांना ओळखत होते.

▪️ *प्रसंग चौथा :* डॉ. कलाम DRDO मध्ये काम करत असताना एका कॉलेजमध्ये त्यांना मुख्य पाहुणे म्हणून आमंत्रित केले होते. यासाठी जय्यद तयारी चालू असतानाच कलाम कार्यक्रमाच्या आदल्या दिवशी रात्री कार्यक्रमस्थळी पोहोचले व कार्यक्रमाची तयारी करणाऱ्या श्रमिकांना भेटले. 'मला खरी मेहनत करणाऱ्या लोकांना भेटायचे होते म्हणून यावेळी इथे आलो', असे ते यावेळी म्हणाले.

♐ _*हि महत्वपूर्ण माहिती नक्की शेअर करा.!*_

*कलामांच्या नावावर काहीही मालमत्ता नाही!*
-------------–----------------
माणसाने आपल्या जीवनात कितीही पैसा मिळवला, तरी मृत्यूनंतर त्याचा काहीही उपयोग नसतो. जोडलेली माणसे हीच खरी संपत्ती…सर्व धर्मांच्या संतांची ही शिकवण असली, तरी तिचा प्रत्यक्षात अवलंब करणारी माणसे तशी दुर्मीळच. सर्वांच्या हृदयाला चटका लावून नुकतीच अकस्मात ‘एक्झिट’ घेतलेले भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम हे त्या दुर्मीळ माणसांपैकीच एक असल्याचा आणखी एक पैलू सोमवारी उघड झाला आहे. देशातील सर्वोच्च पद भूषवल्यानंतर राष्ट्रपती भवनातून केवळ दोन बॅग घेऊन बाहेर पडलेल्या या निर्मोही मनुष्याच्या नावावर कोणतीही स्थावर आणि जंगम मालमत्ता नसल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे त्यांनी लिहिलेली पुस्तके आणि त्यांच्या मृत्यूनंतर सद्गदित झालेला अथांग जनसागर हीच त्यांची संपत्ती आहे. 

‘काही पुस्तके आणि देशातील ६४ कोटी युवक हीच माजी राष्ट्रपती ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची संपत्ती होती. याशिवाय इतर काहीही स्थावर व जंगम मालमत्ता त्यांच्या नावावर नाही,’ असे कलाम यांचे वैज्ञानिक सल्लागार व्ही. पोनराज यांनी म्हटले आहे. त्यामुळे ‘लोकांचे राष्ट्रपती’ म्हणून ओळख असलेले कलाम ‘उपभोगशून्य स्वामी’ असल्याचे सिद्ध झाले आहे. 
पोनराज हे दोन दशकांपासून कलाम यांच्या जवळ होते. कलामांच्या संपत्तीबाबत पत्रकारांनी विचारले असताना पोनराज म्हणाले, ‘मध्यंतरी कलाम यांच्या नावावर बेंगळुरूमध्ये काही स्थावर मालमत्ता होती; मात्र ती त्यांनी विकून टाकली होती. त्याशिवाय त्यांच्या नावावर अन्य काहीही नाही. सध्या त्यांना विविध पुस्तकांच्या विक्रीतून येणारी रॉयल्टी आणि सरकारकडून पेन्शन मिळायची. या रकमेबाबत त्यांनी कुणी वारस नेमलेला आहे की नाही, हे स्पष्ट झालेले नाही. त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधून याबाबत माहिती घेतली जाईल.’ 

काहींचे सन्माननीय अपवाद वगळता प्रत्येक क्षण पैशासाठी धडपड करणाऱ्या माणसांच्या सध्याच्या जगात कलामांची ही निरिच्छ वृत्ती नक्कीच आदर्श ठरावी.

*डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे 40 मोटीव्हेशनल विचार*
-------------------------------
भारतरत्न ए पी जे अब्दुल कलाम (Dr. APJ Abdul Kalam) हे भारताचे अकरावे राष्ट्रपती (कार्यकाळ २५ जुलै, इ.स. २००२ ते २५ जुलै, इ.स. २००७) होते. आपल्या आगळ्या कार्यपद्धती मुळे ते ‘लोकांचे राष्ट्रपती’ म्हणून लोकप्रिय झाले. ते एक असे व्यक्तिमत्व ज्यांनी आपले उभे आयुष वेचले देशासाठी. त्यांनी देशाला स्वतःची मिसाइल टेक्नोलॉजी दिली, आणि भारताला विश्वात वेगळे स्थान मिळवून दिले. ते  एक राष्ट्रपति म्हणून करोडों भारतवासीयांना, नेहमी स्वप्न बगायला आणि त्या पूर्ण करायला शिकवत आणि प्रेरित करत. चला तर मग बघूया त्यांचा जबरदस्त प्रेरणादायी असे 40 विचार.

1- पाऊसात इतर पक्षी आसरा शोधत असतात पण गरुड पक्षी मात्र पाऊस टाळण्यासाठी ढगांच्या वरती जाऊन उडत असतो. समस्या एकच असते पण दृष्टिकोन वेगळा असतो.
2- सक्रिय व्हा! जिम्मेदारी घ्या ! त्या गोष्टींवर काम करा ज्या वर तुम्हाला विश्वास आहे. जर असे तुम्ही करत नसाल तर तुम्ही तुमचे भाग्य दुसऱ्याच्या हवाली (समर्पित)करत आहात.
3- काळा रंग हा अशुभ समजला जातो. पण प्रत्येक काळा रंगाचा फळा हा अनेक विद्यार्थांचे आयुष्य उजलवत असतो.
4- अपयश नावाच्या रोगासाठी आत्मविश्वास आणि अथक परिश्रम हे जगातील सर्वात गुणकारी औषधे आहेत.
5- जी इच्छा मनातून आणि शुद्ध अंतकरणातून निघत असते व जे खूप तीव्र देखील असते, त्यात खूपच जास्ती सकारात्मक ऊर्जा समाविष्ट असते.
6- आयुष्यात येणाऱ्या कठीण परिस्थीती ह्या काही तुम्हाला उध्वस्त करायला येत नसतात, ते तर तुम्हाला तुमच्या मधील सुप्त क्षमता आणि ताकतीची ओळख करून देण्यासाठी येत असतात. म्हणून कठीण परिस्थितींना देखील कळू द्या कि तुम्ही देखील खूप कठीण आहात.
7- आत्मनिर्भरते मुळेच आत्मसम्मान मिळत असते याची आपल्याला जाणीव नसते.
8- यशस्वी लोकांचे किंवा यशाच्या गोष्टी वाचू नका, त्यात तुम्हाला फक्त संदेश मिळेल. अपयशाच्या गोष्टी वाचा त्यातून तुम्हाला नवीन यशाच्या नवीन आयडिया मिळतील.
9- झोपल्यावर दिसतात ती स्वप्नं नसून स्वप्ने ही अशी गोष्ट आहे जी तुम्हाला झोपू देत नाही.
10- आपल्या यशाची व्याख्या जर का भक्कम असेल तर आपण सदैव अपयशाच्या दोन पाऊले पुढे असू.
11- देवाने आपल्या सर्वांच्या मध्ये महान अशी शक्ती आणि क्षमता दिलेली असते. आणि प्रार्थना त्या शक्ती क्षमता ना बाहेर आणायला मदत करत असते.
12- चला आपले आज आपण येणाऱ्या पिढीच्या उज्वल भविष्या साठी त्याग करू.
13- जेंव्हा तुमची सही हि ऑटोग्राफ बनते तेंव्हा तुम्ही यशस्वी झालात समजा.
14- त्रास हा यशाचा सार आहे.
15- देशातील सर्वोत्तम डोके हे सर्वात शाळेतील शेवटच्या बाकावर सापडतात.
16- विचार हे भांडवल, उदयोग हे मार्ग तर कठीण परिश्रम हे उत्तर आहे.
17- समस्या आणि कठीण परिस्थिती हे देवाने आपल्याला मोठं बनण्यासाठी दिलेली संधी असते या वर माझा ठाम विश्वास आहे.
18- स्वप्ने सत्यात उतरवण्या अगोदर प्रथम त्या तुम्हाला बघावे लागतील
19- तुम्ही तुमचे भविष्य बदलू शकत नाही पण तुम्ही तुमच्या सवयी बदलू शकता आणि तुमच्या सवयी नक्कीच तुमचे भविष्य बदलतील.
20- मी हँडसम (देखणा) व्यक्ती नाहीये पण मी माझे हात एखादया गरजू (hand someone)व्यक्ती ला मदत म्हणून देऊ शकतो. सुंदरता हि मनात असते तोंडावर नव्हे.
21- आपल्या सर्वांमध्ये एकसमान प्रतिभा नसते, पण आपल्या सर्वांना प्रतिभेचा विकास करण्याची संधी समान मिळत असते.
22- तुमच्या कामात यशस्वी होण्यासाठी, तुम्हाला एका मानाने ध्येया कडे समर्पित असायला हवे.
23- आकाशा कडे बघा आपण एकटे अजिबात नाही. ससर्व भ्रमंड तुमचं मित्र आहे. पण ते भरभरून त्यालाच देते जो स्वप्न बघतो आणि त्यावर काम करतो.
24- यशाचा मनसोक्त आनंद घेण्यासाठी अपयश आणि कठीण परिस्थिती यांची अत्यंत गरज असते.
25- आयुष्य हा खूप अवघड खेळ आहे. तुम्हाला ते माणुसकीच्या जन्मसिद्ध हक्कानेच जिंकता येईल.
26- तुमच्या सहभागा शिवाय तुम्ही यशस्वी होणार नाही. आणि तुमच्या सहभागा सोबत तुम्ही कधी अपयशी होणार नाही.
27- यशाचे रहस्य काय? योग्य निर्णय घेणे.योग्य निर्णय कशे घ्यावे?? अनुभवाने.अनुभव कशे घावे?? चुकीचे निर्णय घेऊन
28-तुमच्या नौकरी वर प्रेम करा पण कंपनी वर करू नका. कारण तुम्हाला कधीच कळणार नाही तुमची कंपनी तुम्हाला प्रेम करणे सोडून देईल.
29- एखाद्याला हरवणे खूप सोप्पे आहे, पण त्याला जिंकणे खूप अवघड असते.
30- मोठी स्वप्ने पाहणारेच मोठी स्वप्ने सत्यात उतरवतात.
31- इंगजी शब्द end चा अर्थ शेवट नसून तो “Effort Never Dies” म्हणजेच प्रयत्न कधीच वाया जात नाही असा होतो. तर NO म्हणजे नाही चा अर्थ  “Next Opportunity” असा होत जो नवीन संधी असा होतो.
32- तुमच्या पहिल्या यशा नंतर अजिबात थांबू नका कारण जर तुम्ही दुसऱ्या प्रयत्नात अयशस्वी झालात तर पहिले यश हे फक्त नशिबामुळे मिळाले हे बोलायला लोक तयारच असतात.
33- जर तुम्हाला सुर्या सारखं चमकायचे असेल तर प्रथम त्याचा सारखं जाळावे लागेल.
34- तुमच्या जीवनात कसले हि उतार चढाव आले तरी तुमचे विचार हेच तुमचे प्रमुख भांडवल असायला हवे.
35- शिक्षणाने माणसात सर्जनशीलता येते. सर्जनशीलतेने तुमच्यात प्रगल्भ विचार येतात. विचाराने ज्ञान वाढते, आणि ज्ञानाने माणूस महान बनतो.
36- F.A.I.L. चा अर्थ
First Attempt In Learning
असाच आहे.
37- कधी कधी वर्ग बुडवून मित्रांसोबत वेळ घालवणे चांगले असते कारण आज मी मागे वळून बघतो तर मला माझे मार्क मला हसवत नाहीत पण आठवणी हसवतात.
38-या जगातील सर्वात उत्तुंग यश त्यांनाच मिळालेले आहे, ज्यांना ते यश मिळविण्याची अजिबातच शक्यता नसतांना देखील त्यांनी ते यश मिळविण्यासाठी, त्यांनी अथक व सातत्यपूर्ण प्रयत्न सुरूच ठेवलेत.
39- वाट पाहणाऱ्यांना तितकेच मिळते जितके प्रयत्न करणाऱ्यांनी सोडून दिलेले असते.
40- आपले ध्येय साधण्याकरिता तुम्हाला त्या ध्येयावर लक्ष केन्द्रित करावे लागेल.

मित्रांनो डॉ ए  पी जे अब्दुल कलाम यांचे हे ४० विचार तुम्हाला आवडले का. तसे  सर्व विचार प्रेरकच आहेत तरी यातला कोणता तुम्हाला सर्वात जास्ती आवडला हे कॉमेंट करून सांगा.  हे विचार शेर करा तुमच्या मित्रांसोबत आणि आमच्या फेसबुक पेज *GK जनरल नॉलेज ग्रुप* 👉🏻 https://bit.ly/2POeFxB  ला लाईक व जॉईन करा तिकडे तुम्हाला खूप काही प्रेरक लेख, कविता आणि विडिओ इत्यादी चा खजिनाच मिळेल धन्यवाद…


*💐भारताच्या ह्या थोर सुपुत्रास  वाहिलेली श्रद्धांजली.*
डॉ.ए पी जे अब्दुल कलाम संपत्ती





डॉ ए पी जे अब्दुल कलाम हिंदी

डॉ. कलाम यांनी एका शाळेमध्ये केलेल्या भाषणात १० नियम सांगितले जे कोणत्याही शाळेत शिकविले गेले पाहिजेत.*
आवडली पोस्ट तर नक्की शेअर करा
---------------------------------------------
👍 नियम १ – आयुष्य खडतर आहे, त्याची सवय करुन घ्या.
👍 नियम २ – जग कधीच तुमच्या स्वाभिमानाची पर्वा करत नाही. स्वत:बद्दल अभिमान बाळगण्याआधी काहीतरी करुन दाखवा. स्वतःला सिध्द करा.
👍 नियम ३ – कॉलेजमधुन बाहेर पडल्या पडल्या पाच आकडी पगाराची अपेक्षा करु नका. एका रात्रीत कोणी वाइस प्रेसिडंट होत नाही, त्या पदापर्यंत पोहोचण्यासाठी अपार कष्ट करावे लागतात .
👍 नियम ४ – आज कदाचीत तुम्हाला तुमचे शिक्षक कडक आणि भितीदायक वाटत असतील, कारण अजुन बॉस नावाचा प्राणी तुमच्या आयुष्यात यायचाय.
👍 नियम ५ – तुम्ही केलेली चुक ही सर्वस्वी तुमची चुक आहे आणि तुमचा पराजय हा सर्वस्वी तुमचा पराजय आहे. कोणाला दोष देऊ नका, झालेल्या चुकीपासुन धडा घ्या आणि पुढे चालत रहा.
👍 नियम ६ – तुमचे पालक तुम्ही जन्माला यायच्या आधी एवढे कंटाळवाणे आणि अरसिक नव्हते जेवढे तुम्हाला ते आता वाटतात. तुमचेच संगोपन करण्याठी त्यांनी जे अमाप कष्ट घेतलेत त्यामुळेच आज त्यांचा स्वभाव असा झाला आहे.
👍 नियम ७ – उत्तेजनार्थ पारितोषिक हा प्रकार फक्त शाळेतच पहायला मिळ्तो. काही शाळांमध्ये तर अगदी पास होइपर्यंत परीक्षा देता येते. बाहेरच्या जगातील पध्दत मात्र वेगळीच असते. ख-या जगात हरणार्‍याला कोणीही दुसरी संधी देण्यास तयार नसतो.
👍 नियम ८ – आयुष्याच्या शाळेत इयत्ता आणि तुकडी नसते, त्यामध्ये मे महिन्याची सुट्टी नसते. स्वतःचा शोध घ्यायला, नविन काही शिकायला कोणि तुम्हाला वेळ नाही देत. तो वेळ तुमचा तुम्हालाच शोधायचा असतो.
👍 नियम ९ – टीव्ही वरचे जीवन काही खरे नसते आणि खरे आयुष्य म्हणजे टीव्ही वरची सीरियल नसते. ख-या आयुष्यात आराम नसतो , असते ते फक्त काम आणि काम.
👍 नियम १० – स्वप्न ते नाहीत जे तुम्ही रात्री झोपेत बघतात , स्वप्न ते आहे जे तुम्हाला झोपूच देत नाही ।

Think Good!
Do Good!!
Be Good!!!
उत्तर लिहिले · 28/8/2018
कर्म · 569245

Related Questions

विदर्भात एकूण किती शास्त्रज्ञ आहेत व त्यांनी कोणकोणते संशोधन केले?
विदर्भात एकूण किती शास्त्रज्ञ आहेत आणि त्यांनी कोण-कोणते संशोधन केले?
'मिसाइल मॅन' कोणाला संबोधले जाते?
पृथ्वी स्वतःभोवती फिरते हे सत्य सांगितल्याबद्दल कोणत्या शास्त्रज्ञाचा छळ करण्यात आला?
जगामध्ये सुपर कम्प्युटर टेक्नोलॉजी कोणत्या शास्त्रज्ञाने निर्माण केली?
विदर्भात एकूण किती वैज्ञानिक आहे व त्यांची नावे?
सूर्य उगवताच पृथ्वीवर किरणे पडण्यासाठी किती कालावधी लागतो? पृथ्वी स्वतःभोवती फिरते हे सत्य सांगितल्याबद्दल कोणत्या शास्त्रज्ञाचा छळ करण्यात आला? कोणता वायू हवेपेक्षा हलका आहे?