राजकारण राजकारणी भारतातील राजकारण

पूर्ण भारतामध्ये किती आमदार व खासदार आहेत?

2 उत्तरे
2 answers

पूर्ण भारतामध्ये किती आमदार व खासदार आहेत?

5
लोकसभा व राज्यसभेतील सभासदांना खासदार असे म्हणतात. लोकसभेतील खासदार हे निवडणुकीतून निवडले जातात. लोकसभेत एकूण 545 खासदार आहेत. राज्यसभेतील खासदार विशिष्ट मतदारसंघांतून निवडले जातात. हे सहसा विविध क्षेत्रातील मान्यवर असतात. कला, क्रीडा, साहित्य, उद्योग, सहकार, सामाजिक संस्था अश्या ठिकाणी काम करत असणाऱ्यांना या राज्यसभेत खासदारकी मिळते.
देशात सहा राज्यांमध्ये विधान परिषद असून घटक राज्याचे हे वरिष्ठ सभागृह आहे. महाराष्ट्र, बिहार, कर्नाटक, जम्मू-काश्मीर, उत्तर प्रदेश, तेलंगण आणि आंध्र प्रदेशात विधान परिषद अस्तित्वात आहेत. घटनेच्या कलम 169 (1) नुसार विधानसभेने सभासदांच्या किंवा दोन तृतीयांश सभासदांनी उपस्थितीने बहुमताने ठराव केल्यास संसद राज्यात विधान परिषद अस्तित्वात आणते. विधान परिषदेची सदस्य संख्या किती असावी, हे घटनेने निश्चित केलेले नाही. कलम 171 नुसार विधान परिषदेत किमान 40 सभासद किंवा विधानसभेच्या एकूण सभासद संख्येच्या एक तृतीयांश पेक्षा जास्त सदस्य नसतात. विधान परिषद तत्त्वत: वरिष्ठ सभागृह असले तरी व्यवहारात ते कनिष्ठ सभागृह आहे. या सभागृहाला सर्वच बाबीत कमी अधिकार आहेत.
उत्तर लिहिले · 26/8/2018
कर्म · 3700
0

भारतामध्ये आमदार (MLA) आणि खासदार (MP) यांची एकूण संख्या खालीलप्रमाणे आहे:

  • आमदार (MLA): भारतातील राज्य विधानसभांमध्ये एकूण अंदाजे 4,120 आमदार आहेत.
  • खासदार (MP): भारताच्या संसदेत दोन प्रकारांचे खासदार असतात:
    • लोकसभा खासदार: 543 (directly elected)
    • राज्यसभा खासदार: 245 (indirectly elected)
    • एकूण खासदार: 543 + 245 = 788

त्यामुळे, आमदार आणि खासदार मिळून एकूण संख्या 4,120 + 788 = 4,908 होते.

उत्तर लिहिले · 19/3/2025
कर्म · 4280

Related Questions

आचार संहिता असताना प्रचार करू शकतो का?
२०२६ ला मुख्यमंत्री कोण होईल?
महानगर पालिका निवडणुकीचे प्रचार कोणत्या तारीख पासुन सुरू होणार?
२०२५ ची सध्याच्या निवडणुकीची आचार संहिता किती तारखेला संपणार?
राज्यातील आचार संहिता किती तारखेला संपणार?
नवीमुंबईमध्ये भाजप आणि शिवसेनेची युती होणार आहे का?
लोकशाही चे महत्व स्पष्ट करा?