सण हिंदु धर्म रक्षाबंधन

रक्षाबंधन का साजरा करतात?

3 उत्तरे
3 answers

रक्षाबंधन का साजरा करतात?

19
आज संपूर्ण भारतामध्ये रक्षाबंधन मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात येत आहे. या सणामागचा इतिहास तुम्ही कधी जाणून घ्यायचा प्रयत्न केला आहे का? चला तर मग पाहुयात या सणाची सुरुवात व इतिहास..._

*अरे आला अरे आला राखी पुनवेचा सण*

*माऊलीच्या ममतेचं रुप गोजिरं बहिण...*

*जरी वेगळा वेगळा*
*तिचा-तुझा जन्म झाला*

*एक जीव दोन जागी*
*जणू विधात्याने केला*

*सलं विचारावी त्याला ज्याला नाही रे बहिण*

*सोन्या-चांदीची झळाळी*
*तिने बांधल्या धाग्याला*

*जन्मोजन्मीची पुन्याई*
*जणू येतसे फळाला*

*गाठ रेशमी सांगते ठेव ध्यानात वचन*

*काकणांची किणकिण*
*गोड पैंजणांची धून*

*घरा-दारात करीते*
*जणू सुखाचं शिंपण*

*इडा-पिडा दूर लावी तुझं करून औक्षण*

*नको गोडं-धोडं देऊ*
*नको जरतारी साडी*

*नाही मागतं दौलत*
*देरे माया देरे थोडी*

*झणी धावत येईल बघ साद तू देऊन!*



           *॥ रक्षाबंधन ॥*

    _आपला भाऊराया सुखी असावा, त्याने आई-वडिलांचा चांगल्या प्रकारे सांभाळ करावा, असे प्रत्येक विवाहित बहिणीला वाटत असते. तर आपली बहीण शिकावी, मोठेपणी चांगल्या घरी जावी, तिला कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, असे प्रत्येक भावाला आपल्या बहिणीबद्दल वाटत असते._

_भाऊ-बहिणीच्या या प्रेमाला उधाण येते ते राखी-पौर्णिमेच्या दिवशी. या दिवशी बहीण आपल्या भावाला राखी बांधते व भावाच्या आयुष्यात सुख-शांती लाभू दे, अशी प्रार्थना करते. तर भाऊसुद्धा आपल्या बहिणीच्या रक्षणासाठी राखी बांधून घेतो. राखी बांधल्यानंतर बहीण मिठाई देऊन भावाचे तोंड गोड करते._ _तर भाऊ आपल्या ताकदीप्रमाणे बहिणीला पैसे, वस्तू देऊन खुश करीत असतो._

    _हा राखी पौर्णिमेचा सण प्राचीन काळापासून चालत आला असून, पूर्वी हा सण ब्राम्हणांचा सण म्हणून ओळखला जात होता._

    _या दिवशी श्रावणी करणं हा प्रकार असतो. श्रावणी करणं म्हणजेच मन शुद्ध करणं._ _निरनिराळे मंत्र म्हणून गुरुजी होमहवन करतात व जमलेल्या लहान-थोरांना पंचगव्य देतात. प्रत्येक पुरुषाला नवीन यज्ञोपवीत घालायला देतात._

_या सणाबाबत खूप कथा प्रचलीत आहेत. महाभारतात या पवित्र सणाविषयी माहिती मिळते कि, त्या वेळी देव व दानव यांत जबरदस्त युद्ध झाले._

_दानवांकडून देव हरू लागले. इंद्रासहित सर्व देवांना सामना करणं कठीण झालं, तेव्हा गुरु बृहस्पतीने श्रावणातील_ _पौर्णिमेच्या दिवशी 'अपराजिता ' नावाचे रक्ष कवच इंद्राच्या उजव्या हाताला बांधले. तेव्हा देवांना दानवांवर वजय मिळविण्यास वेळ लागला नाही._
    _पुराणकथा अशी आहे कि, देव दानवांकडून पराजित होत होते, तेव्हा इंद्राची पत्नी इंद्राणीने स्वतःच्या पतीला विजय मिळावा म्हणून राखी बांधली होती._ _त्यानंतर इंद्राला युद्धात विजयसुद्धा मिळाला होता._
_पूर्वी राजा युद्धासाठी निघाला असता, त्याच्या रक्षणार्थ पुरोहित_
_त्याच्या हाताला राखी बांधत असे. आता हे काम बहीण करते. राजपूत लोक लढाईवर_ _जाण्यापूर्वी बहिणीकडून स्वतःला ओवाळून घेत व भाऊ सुखरूप घरी यावा म्हणून बहीण राखी बांधत असे._
    _सुरुवातीला हा सण उत्तर प्रदेशापुरताच मर्यादित होता. आता हा सण भारतवर्षात सर्वत्र साजरा होतो._
    _काही ऐतिहासिक घटनासुद्धा या सणाच्या बाबतीत आढळून येतात. गुजरातचा बादशहा बहादुरशहा याने चितोडगडावर चढाई केली, तेव्हा युद्ध होईल अशी परिस्थिती नव्हती. परंतु चितोडगडाच्या राजमाता, कर्णावतीने चतुराई वापरून मोगल सम्राट हुमायूनला एक राखी पाठवली आणि स्वतःचा भाऊ बनवले. हुमायूनने स्वतःचे सैन्य पाठवून चितोडगड वाचवला._
    _दुसरी एक ऐतिहासिक माहिती अशी आहे कि, सिकंदर जेव्हा झेलम नदीच्या किनारी आला, तेव्हा त्याने पहिले कि, एक हिंदू स्त्री नदीकिनारी पूजा करून, राखी अर्पण करीत आहे. तेव्हा सिकंदराने राखीचे महत्व त्या स्त्रीकडून समजून घेतले व राखी बांधून घेतली._
    _बहीण-भावाचे नटे दृढ करण्यासाठी, मित्रत्व, स्नेह व परस्परांतील प्रेम वृद्धिंगत करण्यासाठी राखी पौर्णिमा हा सण साजरा केला जातो._


*_🙏पौराणीक संदर्भ_*
रक्षाबंधनाची सुरवात केव्हा झाली, याबद्दल निश्‍चित पुरावा नाही; पण त्याविषयी एक आख्यायिका आहे. इतिहासामध्ये लिहिले आहे कि, "युद्धामध्ये इंद्रदेव दैत्यांकडून पराभवाच्या जवळ आला होता, तेव्हा ऋषींनी एक धागा मंत्रून इंद्राच्या पत्नीकडे दिला व तो धागा इंद्राच्या पत्नीने इंद्राला बांधला व इंद्राची रक्षा करण्यासाठी प्रार्थना केली. त्यावर इंद्राचा विजय झाला. आज हा धागा बहिण आपल्या भावाला बांधते पण पूर्वीच्या काळी, एकमेकांची रक्षा करण्यासाठी साठी हा धागा बांधण्यात येत होता.

*_🙏ऐतिहासिक संदर्भ_*
पूर्वीच्या काळात आपल्याला ज्या स्त्रीने राखी बांधली, तिच्या रक्षणार्थप्रसंगी प्राण द्यायचे ही राजपुतांची नीती होती. याची बरीच उदाहरणे आहेत. एवढेच नव्हे, तर चितोडवर जेव्हा बहादूरशहाने हल्ला केला, त्या वेळी राणी कर्णावतीने बाबरचा पुत्र हुमायूनला राखी भेट पाठवून आपले व आपल्या राज्याचे रक्षण करण्यास सांगितले. हुमायूनने देखील जाती-धर्म याचा विचार न करता चितोडचे रक्षण केले. तसेच युद्ध टाळण्या साठी अनेक स्त्रिया शत्रूला राखी बांधत असत. त्यामुळे होणारा नरसंहार टळला जात असे असेही अनेक दाखले इतिहासामध्ये आढळतात.

*_🙏रक्षाबंधन सणामागचा उद्देश_*
रक्षाबंधन फक्त बहीण भावापुरते मर्यादित नसून इतिहासात अगदी पत्नीने पतीला,आईने मुलाला व मुलीने वडिलांना राखी बांधल्याची कित्येक उदाहरणे आहेत. समाजातील मुलींची, मग ती बहिण असो, मैत्रीण असो, प्रेयसी असो, बायको असो किंवा अनोळखी मुलगी असो, त्यांची रक्षा करणे व त्यांना अन्यायापासून वाचवणे हे प्रत्येक नागरीकाचे कर्तव्य आहे. असा संदेश या परंपरेमधून समाजाला दिला जातो.

*राखी बांधताना ताम्हण मध्ये कोणत्या गोष्टी असाव्या?*
http://www.uttar.co/answer/5b8212ce16f5a3171b161a02
सर्वात आधी तुम्हाला *रसुल खडकाळे* यांच्या कडून _रक्षाबंधन_ च्या हार्दिक शुभेच्छा
🎗🏵🎗 *रक्षाबंधन : राखी बांधताना ताम्हणमध्ये 'या' ७ वस्तू असाव्यात !*
🎗🏵🎗 🎗🏵🎗 🎗🏵🎗
राखी पौर्णिमा. बहीण-भावाचा पवित्र सण रक्षाबंधन. देशात रक्षाबंधनाचा सण साजरा केला जातो.  या दिवशी बहीण आपल्या भावाच्या हाताच्या मनगटावर राखी बांधून भावास दिर्घ आयुष्य आणि सुख लाभो मिळो म्हणून प्रार्थना करते.  दि. २६ ऑगस्टला रक्षाबंधन आहे. राखी बांधताना  ताम्हण किंवा ताटात ७ वस्‍तू आवर्जुन असाव्यात.

*कुंकू :* कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी कुंकू लावणे शुभ मानले जाते. या दिवशी बहीण भावाच्या कपाळावर तिलक लावून त्याच्या दीर्घायू होण्याची कामना करते. 

*अक्षता :* कुंकू लावल्यानंतर कपाळावर तसेच डोक्यावर अक्षता टाकतात.  याचा अर्थ भावावर शुभता बनलेली राहो. म्हणून ताटात अक्षता असाव्यात.

*नारळ :* नारळ म्हणजे श्रीफळ.  श्री अर्थात देवी लक्ष्मीचे फळ. हे फळ देताना बहिणीने प्रार्थना.

*रक्षा सूत्र, राखी :*  रक्षा सूत्र बांधल्याने त्रिदोष शांत होतात. त्रिदोष अर्थात वात, पित्त आणि कफ. या दोषांमुळेच शारीरिक आजार उद्भवतात. मनगटावर रक्षा सूत्र बांधल्याने शरीरात यांचे संतुलन राहते.

*गोड पदार्थ :*  राखी बांधल्यानंतर भावाला गोड खाऊ घातल्याने नात्यात गोडवा टिकून राहतो.

आज काल काही नालायक फेसबुक आणि व्हाट्स अँप ला .अश्या पोस्ट टाकत आहेत😡😡😡😡😡

सर्व लग्न झालेल्या साठी खुश खबर

बायका माहेरी जात आहे

रक्षा बंधन येत आहे 

आणि
गल्लीतल्या जुन्या लाफड्या वाल्या ऍटमपण त्यांच्या घरी येत आहेत 😡

त्यांच्यासाठी एक प्रश्न.??

तुमची बहिण पण येत असेल ना रक्षाबंधन ला माहेरी  
आधी तीपण कोणाची तरी ऍटम असेलच कि ..??😡😡

तुमची बायको पण माहेरी जातच असेल ना रक्षाबंधन ला तिचा पण जुना यार असेलच ना माहेरी ..??😡😡

आणि ....!
आई पण मामाचा घरी रक्षाबंधन ला जातच असेल
मग तुमच्या आईची पण तिथे सेटिंग असेलच ना..??😡😡

अरे नालायकांनो कधी अक्कल येईल तुम्हाला..??😡😡😡😡

आपणच आपल्या धर्माचा ,आपल्या सणांचा मजाक करता,🙇‍♂ अहो कधी सुधाराल..??
😡
जर तुमचा कडून कोणाचा सन्मान कारण होत नसेल ,,

तर....!😡😡

अपमान करायचा पण तुम्हाला काही अधिकार नाही,, 😡😡😡                     

🚩धर्म आणि  धार्मिक परंपरांचा सम्मान करा                                           

    🚩जय शिवराय🚩
एक कट्टर शिवभक्त.....

*टीप , हि पोस्ट रक्षाबंधन वर जोक करणाऱ्या नालायकांसाठी*💯
*_❗अभिमानाची गोष्ट म्हणजे हा सण फक्त भारतासारख्या सुसंकृत देशात साजरा केला जातो._*

*॥ रक्षाबंधन या पवित्र पर्वाच्या सर्वांना विचारधारामय शुभेच्छा ॥*

■■■■■■■■■■■■■■■■■■ —

उत्तर लिहिले · 26/8/2018
कर्म · 569225
8
भारतीय संस्कृतीत प्रमुख सणामध्ये 'रक्षाबंधन' हा सण भाऊ-बहिणीचा स्नेह व उत्सवाचे पर्व म्हणून साजरा केला जातो. देशभरात ह्या सणाची वेगवेगळ्या नावाने ओळख आहे. उत्तर भारतात 'कजरी-पौर्णिमा', पश्चिम भारतातात 'नारळी पौर्णिमा' या नावाने तो साजरा केला जातो. 

इंद्र दानवांकडून पराजीत झाले होते. तेव्हा त्यांच्या उजव्या हातावर त्यांची पत्नी इंद्राणीने रक्षासूत्र बांधले होते. त्याने इंद्रदेवाचा आत्मविश्वास वाढला होता. त्यानंतर त्यांनी दानवावर विजय मिळवला होता. अशी पौराणिक कथा आहे. तसेच महाभारतात श्री कृष्‍णाच्या हाताच्या बोटाला जखम होऊन त्यातून रक्त वाहत होते. तेव्हा पांडवांची पत्नी द्रौपदीने आपल्या साडी किनार फाडून श्रीकृष्‍णाच्या बोटाला बांधून दिले होते. तेव्हापासून श्री कृष्णाने द्रोपदीचे रक्षण करण्‍याचा संकल्प केला होता व आजीवन त्यांनी दौपदीचे रक्षण केले. 

भारतीय इतिहासात रक्षाबंधन संदर्भात अनेक उदाहरणे आहेत. चित्तौढगडची राणी कर्मावतीने बहादुरशाहपासून स्वत:ची रक्षा करण्यासाठी मुघल हुमायूला राखी बांधल्याचे उदाहरण आहे. हुमायूने राणीच्या रक्षणासाठी प्राणाची बाजी लावली होती. 

नोबल पुरस्कार विजेते रविंद्रनाथ टागोर यांनी बंगाल विभाजनानंतर हिंदु व मुस्लिम यांच्यात सलोखा निर्माण करण्‍यासाठी दोन्ही समुदायांना एकमेकांच्या हातावर रक्षासूत्र बांधण्याची विनंती केली होती. 

पौराणिक कथा व इतिहात चाळता रक्षाबंधन या सणात काळानुरूप बदल झालेला आढळतो. आता तर हे पर्व भाऊ-बहिणीच्या अतुट नात्याचे, प्रेमाचे, स्नेहाचे व बंधनाचे पर्व म्हणून देशात साजरे होताना दिसते. त्यात बहिण आपल्या भावाच्या उजव्या हातावर राखी बांधत असते व भाऊ आपल्या लाडक्या बहिणीच्या रक्षणाचे दायित्त्व स्विकारत असतो. 

काळ बदलला असला तरी आज माहिती तंत्रज्ञानाच्या युगात भाऊ- बहीनींच्या स्नेहाचा 'रक्षाबंधण' या सणाचे महत्त्व कायम आहे.
उत्तर लिहिले · 26/8/2018
कर्म · 10125
0

रक्षाबंधन हा भारतातील एक महत्त्वाचा सण आहे. हा सण भाऊ आणि बहीण यांच्यातील प्रेम आणि संरक्षणाच्या बंधनाचे प्रतीक आहे.

हा सण साजरा करण्यामागील काही कारणे खालीलप्रमाणे आहेत:

  • पौराणिक कथा:
    • महाभारतानुसार: जेव्हा कृष्णाला युद्धात जखम झाली, तेव्हा द्रौपदीने तिच्या साडीचा पदर फाडून कृष्णाच्या मनगटावर बांधला. या कृतीमुळे कृष्णाने द्रौपदीला आपली बहीण मानले आणि तिच्या रक्षणाचे वचन दिले.
    • भविष्य पुराणानुसार: इंद्र आणि इंद्राणी यांच्या कथेत, इंद्राणीने इंद्राच्या मनगटावर एक पवित्र धागा बांधला, ज्यामुळे त्याला युद्धात विजय मिळाला.
  • सामाजिक महत्त्व:
    • हा सण कुटुंबांना एकत्र आणतो.
    • भाऊ-बहिणींमधील नाते अधिक दृढ करतो.
    • स्त्रियांच्या संरक्षणाचे महत्त्व वाढवतो.
  • सांस्कृतिक महत्त्व:
    • रक्षाबंधनाच्या दिवशी बहीण भावाच्या मनगटावर राखी बांधते आणि भाऊ तिची रक्षा करण्याचे वचन देतो.
    • बहीण भावाला मिठाई भरवते आणि भाऊ तिला भेटवस्तू देतो.
    • हा सण प्रेम, त्याग आणि रक्षणाचे प्रतीक आहे.

त्यामुळे, रक्षाबंधन हा केवळ एक सण नसून तो भाऊ-बहिणीच्या अतूट नात्याचा उत्सव आहे.

उत्तर लिहिले · 19/3/2025
कर्म · 1040

Related Questions

रक्षाबंधन म्हणजे काय?
रक्षा बंधन माहिती द्या?
राखी बांधताना ताम्हण मध्ये कोणत्या गोष्टी असाव्यात?
रक्षा बंधन चे काही मराठी शेर शायरी आहेत का, असतील तर प्लीज लवकर सांगा?
रक्षाबंधन विषयी सविस्तर माहिती मिळेल का?