संबंध सण कुटुंब रक्षाबंधन

रक्षाबंधन विषयी सविस्तर माहिती मिळेल का?

3 उत्तरे
3 answers

रक्षाबंधन विषयी सविस्तर माहिती मिळेल का?

18
🎉 *रक्षाबंधन! बहिण-भावाच्या प्रेमाचे बंधन*


👩‍❤️‍👨 *रक्षाबंधन - बहीण-भावाच्या प्रेमाचा गोड दिवस*

*🔰📶Maha Digi | Special*

📌 दरवर्षी श्रावण पौर्णिमेला रक्षाबंधनाचा सण साजरा केला जातो. हा दिवस म्हणजे बहीण-भावाच्या नात्याला आणखी घट्ट करणारा दिवस.

👉🏻 *दिवसाचे महत्व* : या दिवशी प्रत्येक बहीण आपल्या भावाच्या मनगटावर प्रेमाची निशाणी म्हणून पवित्र असा धागा बांधते, आणि भावाच्या आयुष्यात सुख-शांती लाभू दे, भावाच्या दीर्घायुष्याची मनोकामना करते. आपल्या बहिणीने समाजात ताठ मानेने जगावे यासाठी भाऊ आपल्या बहिणीच्या रक्षणाची जबाबदारी घेतो. भाऊ आपल्या बहिणीला राखी बांधल्यानंतर गिफ्ट देतो. बहीण आपल्या भावाला राखी बांधून तोंड गोड करते.

📍 *राखीचा शब्दशः अर्थ* : राखी' ह्या शब्दातच "रक्षण कर' - "राख म्हणजे सांभाळ' हा संकेत आहे. हा एक असा सण आहे केवळ भावा-बहिणीच्या रक्ताच्या नात्यातील नव्हे तर इतर जवळच्या नात्यातील भावा-बहिणींसाठी तितकाच महत्त्वपूर्ण आहे. रक्षाबंधन हे असे बंधन आहे जे मन आणि हृदयाला जोडते. जाणून घ्या कधी आहे राखी बांधण्याचा मुहूर्त.

😊 *असा साजरा होतो विविध भागात रक्षाबंधन* :

▪रक्षाबंधन अगदी लहानग्यांपासून ते वृद्धापर्यंत सर्वजण आनंदाने साजरा करतात.
▪उत्तर भारतात हा सण राखी म्हणुन प्रसिद्ध आहे. उत्तर भारतामध्ये नोकर आपल्या मालकाच्या हाताला राखी बांधण्याची परंपरा आहे.
▪दक्षिण भारतात कार्तिक महिन्यात कार्तिकेय सण असतो.
▪जैन धर्मामध्ये हा दिवस रक्षापर्व म्हणून पाळला जातो. त्या दिवशी जैन मंदिरातून राख्या ठेवलेल्या असतात, जैन मुनी त्यांचे आदराने ग्रहण करतात.



भाऊ- बहिणीच्या अतूट नात्याचा सण म्हणजे रक्षाबंधन



_आज संपूर्ण भारतामध्ये रक्षाबंधन मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात येत आहे. या सणामागचा इतिहास तुम्ही कधी जाणून घ्यायचा प्रयत्न केला आहे का? चला तर मग पाहुयात या सणाची सुरुवातइतिहास..._

🧐 *जाणून घ्या सणाचे महत्व* : रक्षाबंधन हा शब्द दोन शब्दांना जोडून बनवण्यात आला आहे. याचा अर्थ आहे रक्षा आणि बंधन. म्हणजे रक्षा बंधनात बांधले जाणे. हा एक असा सण आहे केवळ भावा-बहिणीच्या रक्ताच्या नात्यातील नव्हे तर इतर जवळच्या नात्यातील भावा-बहिणींसाठी तितकाच महत्त्वपूर्ण आहे. रक्षाबंधन हे असे बंधन आहे जे मन आणि हृदयाला जोडते.




*अरे आला अरे आला राखी पुनवेचा सण*

*माऊलीच्या ममतेचं रुप गोजिरं बहिण...*

*जरी वेगळा वेगळा*
*तिचा-तुझा जन्म झाला*

*एक जीव दोन जागी*
*जणू विधात्याने केला*

*सलं विचारावी त्याला ज्याला नाही रे बहिण*

*सोन्या-चांदीची झळाळी*
*तिने बांधल्या धाग्याला*

*जन्मोजन्मीची पुन्याई*
*जणू येतसे फळाला*

*गाठ रेशमी सांगते ठेव ध्यानात वचन*

*काकणांची किणकिण*
*गोड पैंजणांची धून*

*घरा-दारात करीते*
*जणू सुखाचं शिंपण*

*इडा-पिडा दूर लावी तुझं करून औक्षण*

*नको गोडं-धोडं देऊ*
*नको जरतारी साडी*

*नाही मागतं दौलत*
*देरे माया देरे थोडी*

*झणी धावत येईल बघ साद तू देऊन!*


           *॥ रक्षाबंधन ॥*




    _आपला भाऊराया सुखी असावा, त्याने आई-वडिलांचा चांगल्या प्रकारे सांभाळ करावा, असे प्रत्येक विवाहित बहिणीला वाटत असते. तर आपली बहीण शिकावी, मोठेपणी चांगल्या घरी जावी, तिला कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, असे प्रत्येक भावाला आपल्या बहिणीबद्दल वाटत असते._

_भाऊ-बहिणीच्या या प्रेमाला उधाण येते ते राखी-पौर्णिमेच्या दिवशी. या दिवशी बहीण आपल्या भावाला राखी बांधते व भावाच्या आयुष्यात सुख-शांती लाभू दे, अशी प्रार्थना करते. तर भाऊसुद्धा आपल्या बहिणीच्या रक्षणासाठी राखी बांधून घेतो. राखी बांधल्यानंतर बहीण मिठाई देऊन भावाचे तोंड गोड करते._ _तर भाऊ आपल्या ताकदीप्रमाणे बहिणीला पैसे, वस्तू देऊन खुश करीत असतो._

    _हा राखी पौर्णिमेचा सण प्राचीन काळापासून चालत आला असून, पूर्वी हा सण ब्राम्हणांचा सण म्हणून ओळखला जात होता._

    _या दिवशी श्रावणी करणं हा प्रकार असतो. श्रावणी करणं म्हणजेच मन शुद्ध करणं._ _निरनिराळे मंत्र म्हणून गुरुजी होमहवन करतात व जमलेल्या लहान-थोरांना पंचगव्य देतात. प्रत्येक पुरुषाला नवीन यज्ञोपवीत घालायला देतात._

_या सणाबाबत खूप कथा प्रचलीत आहेत. महाभारतात या पवित्र सणाविषयी माहिती मिळते कि, त्या वेळी देव व दानव यांत जबरदस्त युद्ध झाले._

_दानवांकडून देव हरू लागले. इंद्रासहित सर्व देवांना सामना करणं कठीण झालं, तेव्हा गुरु बृहस्पतीने श्रावणातील_ _पौर्णिमेच्या दिवशी 'अपराजिता ' नावाचे रक्ष कवच इंद्राच्या उजव्या हाताला बांधले. तेव्हा देवांना दानवांवर वजय मिळविण्यास वेळ लागला नाही._
    _पुराणकथा अशी आहे कि, देव दानवांकडून पराजित होत होते, तेव्हा इंद्राची पत्नी इंद्राणीने स्वतःच्या पतीला विजय मिळावा म्हणून राखी बांधली होती._ _त्यानंतर इंद्राला युद्धात विजयसुद्धा मिळाला होता._
_पूर्वी राजा युद्धासाठी निघाला असता, त्याच्या रक्षणार्थ पुरोहित_
_त्याच्या हाताला राखी बांधत असे. आता हे काम बहीण करते. राजपूत लोक लढाईवर_ _जाण्यापूर्वी बहिणीकडून स्वतःला ओवाळून घेत व भाऊ सुखरूप घरी यावा म्हणून बहीण राखी बांधत असे._
    _सुरुवातीला हा सण उत्तर प्रदेशापुरताच मर्यादित होता. आता हा सण भारतवर्षात सर्वत्र साजरा होतो._
    _काही ऐतिहासिक घटनासुद्धा या सणाच्या बाबतीत आढळून येतात. गुजरातचा बादशहा बहादुरशहा याने चितोडगडावर चढाई केली, तेव्हा युद्ध होईल अशी परिस्थिती नव्हती. परंतु चितोडगडाच्या राजमाता, कर्णावतीने चतुराई वापरून मोगल सम्राट हुमायूनला एक राखी पाठवली आणि स्वतःचा भाऊ बनवले. हुमायूनने स्वतःचे सैन्य पाठवून चितोडगड वाचवला._
    _दुसरी एक ऐतिहासिक माहिती अशी आहे कि, सिकंदर जेव्हा झेलम नदीच्या किनारी आला, तेव्हा त्याने पहिले कि, एक हिंदू स्त्री नदीकिनारी पूजा करून, राखी अर्पण करीत आहे. तेव्हा सिकंदराने राखीचे महत्व त्या स्त्रीकडून समजून घेतले व राखी बांधून घेतली._
    _बहीण-भावाचे नटे दृढ करण्यासाठी, मित्रत्व, स्नेह व परस्परांतील प्रेम वृद्धिंगत करण्यासाठी राखी पौर्णिमा हा सण साजरा केला जातो._


*_🙏पौराणीक संदर्भ_*
रक्षाबंधनाची सुरवात केव्हा झाली, याबद्दल निश्‍चित पुरावा नाही; पण त्याविषयी एक आख्यायिका आहे. इतिहासामध्ये लिहिले आहे कि, "युद्धामध्ये इंद्रदेव दैत्यांकडून पराभवाच्या जवळ आला होता, तेव्हा ऋषींनी एक धागा मंत्रून इंद्राच्या पत्नीकडे दिला व तो धागा इंद्राच्या पत्नीने इंद्राला बांधला व इंद्राची रक्षा करण्यासाठी प्रार्थना केली. त्यावर इंद्राचा विजय झाला. आज हा धागा बहिण आपल्या भावाला बांधते पण पूर्वीच्या काळी, एकमेकांची रक्षा करण्यासाठी साठी हा धागा बांधण्यात येत होता.

*_🙏ऐतिहासिक संदर्भ_*
पूर्वीच्या काळात आपल्याला ज्या स्त्रीने राखी बांधली, तिच्या रक्षणार्थप्रसंगी प्राण द्यायचे ही राजपुतांची नीती होती. याची बरीच उदाहरणे आहेत. एवढेच नव्हे, तर चितोडवर जेव्हा बहादूरशहाने हल्ला केला, त्या वेळी राणी कर्णावतीने बाबरचा पुत्र हुमायूनला राखी भेट पाठवून आपले व आपल्या राज्याचे रक्षण करण्यास सांगितले. हुमायूनने देखील जाती-धर्म याचा विचार न करता चितोडचे रक्षण केले. तसेच युद्ध टाळण्या साठी अनेक स्त्रिया शत्रूला राखी बांधत असत. त्यामुळे होणारा नरसंहार टळला जात असे असेही अनेक दाखले इतिहासामध्ये आढळतात.

*_🙏रक्षाबंधन सणामागचा उद्देश_*
रक्षाबंधन फक्त बहीण भावापुरते मर्यादित नसून इतिहासात अगदी पत्नीने पतीला,आईने मुलाला व मुलीने वडिलांना राखी बांधल्याची कित्येक उदाहरणे आहेत. समाजातील मुलींची, मग ती बहिण असो, मैत्रीण असो, प्रेयसी असो, बायको असो किंवा अनोळखी मुलगी असो, त्यांची रक्षा करणे व त्यांना अन्यायापासून वाचवणे हे प्रत्येक नागरीकाचे कर्तव्य आहे. असा संदेश या परंपरेमधून समाजाला दिला जातो.

*राखी बांधताना ताम्हण मध्ये कोणत्या गोष्टी असाव्या?*
http://www.uttar.co/answer/5b8212ce16f5a3171b161a02
सर्वात आधी तुम्हाला *रसुल खडकाळे* यांच्या कडून _रक्षाबंधन_ च्या हार्दिक शुभेच्छा
🎗🏵🎗 *रक्षाबंधन : राखी बांधताना ताम्हणमध्ये 'या' ७ वस्तू असाव्यात !*
🎗🏵🎗 🎗🏵🎗 🎗🏵🎗
राखी पौर्णिमा. बहीण-भावाचा पवित्र सण रक्षाबंधन. देशात रक्षाबंधनाचा सण साजरा केला जातो.  या दिवशी बहीण आपल्या भावाच्या हाताच्या मनगटावर राखी बांधून भावास दिर्घ आयुष्य आणि सुख लाभो मिळो म्हणून प्रार्थना करते.  दि. २६ ऑगस्टला रक्षाबंधन आहे. राखी बांधताना  ताम्हण किंवा ताटात ७ वस्‍तू आवर्जुन असाव्यात.

*कुंकू :* कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी कुंकू लावणे शुभ मानले जाते. या दिवशी बहीण भावाच्या कपाळावर तिलक लावून त्याच्या दीर्घायू होण्याची कामना करते. 

*अक्षता :* कुंकू लावल्यानंतर कपाळावर तसेच डोक्यावर अक्षता टाकतात.  याचा अर्थ भावावर शुभता बनलेली राहो. म्हणून ताटात अक्षता असाव्यात.

*नारळ :* नारळ म्हणजे श्रीफळ.  श्री अर्थात देवी लक्ष्मीचे फळ. हे फळ देताना बहिणीने प्रार्थना.

*रक्षा सूत्र, राखी :*  रक्षा सूत्र बांधल्याने त्रिदोष शांत होतात. त्रिदोष अर्थात वात, पित्त आणि कफ. या दोषांमुळेच शारीरिक आजार उद्भवतात. मनगटावर रक्षा सूत्र बांधल्याने शरीरात यांचे संतुलन राहते.

*गोड पदार्थ :*  राखी बांधल्यानंतर भावाला गोड खाऊ घातल्याने नात्यात गोडवा टिकून राहतो.


🤔 रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीला काय भेटवस्तू द्यायची हा सगळ्याच भावांना पडणारा मोठा प्रश्न असतो. त्यामुळे बहिणीला खूश करण्यासाठी तुम्ही काय काय भेटवस्तू देऊ शकता ते जाणून घ्या.

🎁 *बहिणीला गिफ्ट देण्यासाठी काही खास ऑप्शन्स*

🧭 *घड्याळ* : रक्षाबंधनच्या दिवशी तुम्ही वेळेचं महत्त्व लक्षात तुमच्या बहिणीला एक छान घड्याळ भेट म्हणून देऊ शकता.

💄 *मेकअप किट* : मुलींना मेकअप करायला खूप आवडतं त्यामुळे बहिणीला मेकअप किट गिफ्ट देण्याचा उत्तम पर्याय आहे.

🌟 *ईयरिंग* : फॅशन म्हटलं की, मुली साधारणतः ट्रेन्डनुसार ज्वेलरी वेअर करतात. सध्या सिल्वर ज्वेलरी ट्रेन्डमध्ये आहे. तुमचं बजेट असेल तर तुम्ही ओरिजनल सिल्वर ज्वेलरी खरेदी करू शकता. अन्यथा बाजारात सिल्वरप्रमाणे दिसणाऱ्या अनेक ज्वेलरी उपलब्ध असतात.

👛 *पर्स* : पर्स ही प्रत्येक मुलीच्या आवडीची गोष्ट आहे. त्यामुळे तुम्ही एखादी छानशी हँड बॅग रक्षाबंधनासाठी बहिणीला देण्याचा विचार करू शकता.

📿 *ब्रेसलेट* : रक्षाबंधनच्या काही दिवस आधीच फ्रेंडशिप डे येतो. त्यामुळे बाजारात अनेक फॅन्सी आणि ट्रेन्डी ब्रेसलेट उपलब्ध असतात. तुम्ही तुमच्या बहिणीला एखादं छानसं ब्रेसलेट देऊ शकता.

👚 *कस्टमाइज टी-शर्ट* : अनेक ऑनलाईन वेबसाइट आहेत तिथे तुम्हाला अगदी स्वस्तात कस्टमाइज टी-शर्ट मिळतील. तुमच्या आवडीनुसार तुम्ही टी-शर्ट डिझाइन करू शकता.

👉 *ईअरफोन्स* : गाणी ऐकायला प्रत्येकालाच आवडतं त्यामुळे तुम्ही तुमच्या बहिणीला इअरफोन गिफ्ट करू शकता.

👗 *ड्रेस* : स्वत: जवळ कितीही कपडे असले तरी प्रत्येक मुलीला ते कमीच वाटत असतात. त्यामुळे तुम्ही तुमच्या लाडक्या बहिणीसाठी सुंदर ड्रेस घेऊ शकता.

💍 *गोल्ड ज्वेलरी* : रक्षाबंधनला बहिणीला गिफ्ट देण्यासाठी तुमचं बजेट जास्त असेल तर तुम्ही एखादी सोन्याची भेटवस्तू देऊ शकता.
_____________________________________
आज काल काही नालायक फेसबुक आणि व्हाट्स अँप ला .अश्या पोस्ट टाकत आहेत😡😡😡😡😡

सर्व लग्न झालेल्या साठी खुश खबर

बायका माहेरी जात आहे

रक्षा बंधन येत आहे 

आणि
गल्लीतल्या जुन्या लाफड्या वाल्या ऍटमपण त्यांच्या घरी येत आहेत 😡

त्यांच्यासाठी एक प्रश्न.??

तुमची बहिण पण येत असेल ना रक्षाबंधन ला माहेरी  
आधी तीपण कोणाची तरी ऍटम असेलच कि ..??😡😡

तुमची बायको पण माहेरी जातच असेल ना रक्षाबंधन ला तिचा पण जुना यार असेलच ना माहेरी ..??😡😡

आणि ....!
आई पण मामाचा घरी रक्षाबंधन ला जातच असेल
मग तुमच्या आईची पण तिथे सेटिंग असेलच ना..??😡😡

अरे नालायकांनो कधी अक्कल येईल तुम्हाला..??😡😡😡😡

आपणच आपल्या धर्माचा ,आपल्या सणांचा मजाक करता,🙇‍♂ अहो कधी सुधाराल..??
😡
जर तुमचा कडून कोणाचा सन्मान कारण होत नसेल ,,

तर....!😡😡

अपमान करायचा पण तुम्हाला काही अधिकार नाही,, 😡😡😡                     

🚩धर्म आणि  धार्मिक परंपरांचा सम्मान करा                                           

    🚩जय शिवराय🚩
एक कट्टर शिवभक्त.....

*टीप , हि पोस्ट रक्षाबंधन वर जोक करणाऱ्या नालायकांसाठी*💯

*_❗अभिमानाची गोष्ट म्हणजे हा सण फक्त भारतासारख्या सुसंकृत देशात साजरा केला जातो._*

*रक्षाबंधन या पवित्र पर्वाच्या सर्वांना विचारधारामय शुभेच्छा ॥*
उत्तर लिहिले · 26/8/2018
कर्म · 569225
6
हिंदू पंचांगाप्रमाणे येणारी श्रावणात येणारी राखी पौर्णिमा ही नारळी पौर्णिमेच्या दिवशी किंवा पौर्णिमा लागोपाठ दोन दिवस असेल तर दुसऱ्या दिवशी असणाऱ्या पौर्णिमेला साजरी करतात. याच दिवसाला रक्षाबंधन म्हणतात. या दिवशी रक्षाबंधनाचा कार्यक्रम असतो..हा सण बहीण भावाच्या अतूट, उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा दिवस आहे. श्रावण पोर्णिमेस राखी बांधावी, असे धर्मशास्त्रात म्हटले आहे. या विधीस 'पवित्रारोपण' असेही म्हणतात. भावाचा उत्कर्ष व्हावा, आपल्या भावाने आपले रक्षण करावे, ही यामागची मंगल मनोकामना असते.
उत्तर भारतात हा सण राखी म्हणून प्रसिद्ध आहे. या दिवशी बहीण आपल्या भावाच्या उजव्या हाताच्या मनगटावर राखी बांधून भावास दीर्घ आयुष्य व सुख लाभो मिळो अशी कामना करतात. राखी बांधण्याचा अर्थ ती बांधणाऱ्या व्यक्तीच्या प्रेमरूपी बंधनात स्वतःला गुंतवून त्या व्यक्तीच्या रक्षणाची जबाबदारी स्वीकारणे. राखी बांधण्याच्या या सणातून स्नेह व परस्परप्रेम वृद्धिंगत करण्याची प्रथा अस्तित्वात आली आहे. रक्षाबंधन म्हणजे हातातील राखीस साक्षी मानून आपल्या बहिणीचे सदैव रक्षण करण्याचे वचन देणे.
काही प्रांतात नोकर आपल्या मालकाला, ब्राह्मण आपल्या यजमानाला, मुलगी आपल्या वडिलांना, आणि पत्नी नवऱ्याला राखी बांधते. आपल्यापेक्षा बलवान, समर्थ माणसाला राखी बांधून आपल्या रक्षणाचे वचन घेणे हीच यामागची भावना आहे.भारतीय समाजात ऐक्‍य आणि प्रेमभाव वाढीस लागावा यासाठी रक्षाबंधनाचा सण रजपूत लोकांत रूढ झाला. आजकाल मात्र बहीण-भावाच्या पवित्र प्रेमाचा सण म्हणून हा सण साजरा होतो. या दिवशी बहिणी आपल्या सख्ख्या भावाच्या हातावर राखी बांधतातच आणि शिवाय त्या बंधुत्वसमान नाते असलेल्या व्यक्तीसही राखी बांधतात.

हेतू व महत्त्व

पूर्वीपासून सासुरवाशीण मुली सणावारांसाठी माहेरी येत. त्या वेळी माहेरचे बालपण, लाड-प्रेम व सासरचा संसार यांची मनात घालमेल होई, ती आजही होतेच आहे. या मनाच्या खेळात आपला शाश्‍वत पाठीराखा कोणी असावाच, ही भावना मग भावाजवळ येऊन थांबते, ती कृष्णाचे रूप त्याच्यात बघतच. कोणत्याही क्षणी, प्रसंगी कुठेही हाक मारताच धावून येणारा भाऊ हे बहिणीचे मर्मस्थान असते. अशा भावाला रेशीमधाग्याची राखी बांधताना तिच्या मनात भीतीचा लवलेश राहत नाही. एक राखी जीवनभर रक्षणाची साथ देते. याला जात-धर्म-पंथाला छेद देत इतिहासही साक्षी आहे. हे संदर्भ लक्षात घेऊन "राखी' बांधली तर बांधून घेणारा आजन्म कृष्णासारखा होतो. म्हणूनच दुर्बलांचे रक्षण हाच संदर्भ, संस्कार महत्त्वाचा, हेच या दिवसाचे माहात्म्य आहे.
"राखी' ह्या शब्दातच "रक्षण कर' - "राख म्हणजे सांभाळ' हा संकेत आहे. कुठल्याही कर्तबगार, धाडसी शूरवीराने याचक, दुर्बल, वृद्ध, आजारी, असहाय, अपंग व अबलांचे रक्षण करणे हा धर्म आहे. हेच लक्षात घेऊन याच दिवशी रेशमी धागा अशा करारी पुरुषाच्या हाती बांधून त्याच्याकडून रक्षणाचे अभय घेण्याची ही प्रथा आहे. हे अभय शास्त्राधारे पौरोहित्य करणारे पुरोहित आपल्या यजमानघरी स्वतः सर्वांना राखीचा रेशीमधागा मंत्रोच्चारांसह बांधून देतात. यातला गर्भित अर्थ नात्याचे रक्षण करणे हाच आहे.

आख्यायिका

रक्षाबंधनाची सुरवात केव्हा झाली, याबद्दल निश्‍चित पुरावा नाही; पण त्याविषयी एक आख्यायिका आहे. पूर्वी देवदानवांच्या युद्धात दानवांच्या शक्तीपुढे देवांचे काही चालत नसे. दानवांचा राजा वृत्रासुर याने देवांचा राजा इंद्र याला युद्धाचे आव्हान दिले. इंद्र आपले वज्र घेऊन युद्धास निघाला. त्या वेळी इंद्राला विजय मिळावा म्हणून त्याची पत्नी शुचीहिने विष्णूकडून मिळालेला एक दोरा (राखी) इंद्राच्या हातावर बांधला. त्या राखीच्या प्रभावाने इंद्राला त्या युद्धात विजय मिळेल, अशी तिची श्रद्धा होती. इंद्राचा विजय झाला आणि त्याचे गेलेले वैभव परत मिळाले. या प्रसंगाची अाठवण म्हणून मनगटावर राखी बांधण्याची पद्धत पडली, असे सांगितले जाते.

इतिहास

ऐतिहासिक काळात चित्तोडच्या राणी कर्मवतीने हुमायूँ बादशहाला राखी पाठवली व हुमायूँ बादशहाने पण आपल्या या बहिणीचे बहादुरशहाने केलेल्या आक्रमणापासून संरक्षण केले.

भारतीय संस्कृती कोशात सांगितलेला धार्मिक विधी

विधीचा प्रयोग असा- सूर्योदयी स्नान करतात. उपाकर्म करून ऋषींचे तर्पण करतात अपराह्नकाळीं राखी तयार करतात. तांदूळ, सोने व पांढऱ्या मोहऱ्या एकत्र करून त्यांची पुरचुंडी बांधल्याने रक्षा अर्थातच राखी तयार होते. मग तिची पूजा करतात. नंतर पुढील मंत्राने ती राखी मंत्री राजाला बांधे. -येन बद्धो बली राजा दानवेन्द्रो महाबल: | तेन त्वामपि बध्नामि रक्षे मा चल मा चल |( अर्थ- महाबली दानवेद्र बळी राजा जिने बद्ध झाला, त्या रक्षेने मी तुलाही बांधतो. हे रक्षे, तू चलित होवू नकोस.) यावरून मूळचे हे बंधन राजासाठी होते असे कळते.
या श्रावण पौर्णिमेला 'पोवती पौर्णिमा' असेही म्हणतात. कापसाच्या सुताच्या नवसुती (नऊ धाग्यांची जुडी) करून तिला आठ-बारा किंवा चोवीस गाठी मारतात व त्यांच्या ठिकाणी ब्रह्मा, विष्णू, महेश, ओंकार, सूर्य इत्यादी देवतांचे आवाहन करून हे पोवते प्रथम देवास वाहून नंतर तसलीच पोवती कुटुंबातील माणसांच्या मनगटावर बांधली जातात.

धार्मिक महत्व

श्रावण पोर्णिमेसच "[[श्रावणी== " असे देखील म्हटले जाते. पाऊस पडल्यानंतर आनंदी झालेले लोक समाधानाने वेदपुराणाची कथा ऐकण्याचे उत्सव साजरे करीत. तर कुमारांना शिक्षण घेण्यास सुरवात करण्याचा मुहूर्त याच काळात काढला जात असे. अध्ययनाचा प्रारंभ, शौर्याचे शुभचिन्ह या दोन गोष्टी मनोमन लक्षात ठेवणे व तसे आचरण करणे म्हणजे "श्रावणी' साजरी करणे होय. श्रावण नक्षत्रावर श्रावणी करतात.

प्रांतानुसार

रक्षाबंधनच्या सणाप्रमाणे दक्षिण भारतात कार्तिक महिन्यातकार्तिकेय सण असतो. या दिवशी बहीण आपल्या भावास जेवण देऊन त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते व भाऊ तिचे रक्षण करण्याचे वचन देतो. रक्षाबंधन हे आपल्या व इतरांच्या जीवनामध्ये पवित्रता व मांगल्य निर्माण करण्याचे बंधन आहे. जैन लोक हा दिवस रक्षापर्व म्हणून पाळतात. त्या दिवशी जैन मंदिरातून राख्या ठेवलेल्या असतात. जैन मुनी त्यांचे आदराने ग्रहण करतात. उत्तर भारतात नोकर मालकाच्या हाताला राखी बांधतात.

आख्यायिका

राखी बांधताना बहिणीने म्हणावे, - येन बद्धो बली राजा दानवेन्द्रो महाबलः। तेन त्वामनुबध्नामि रक्षे मा चल मा चल ।। (दानवांचा राजा बली यांच्या हातात दैत्यगुरू शुक्राचार्य यांनी जशी रक्षा (राखी) बांधली होत तशीच ही राखी मी तुझ्या हाताला बांधत आहे.)
उत्तर लिहिले · 7/8/2017
कर्म · 80330
0
रक्षाबंधन हा भारतातील एक महत्त्वाचा सण आहे. हा सण भाऊ आणि बहिणीच्या पवित्र प्रेमाचे प्रतीक आहे. रक्षाबंधन श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो. या दिवशी बहीण आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधते आणि त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. भाऊ आपल्या बहिणीला तिच्या संरक्षणाचे वचन देतो.

उत्सव कसा साजरा करतात:

  • बहीण भावाच्या मनगटावर राखी बांधते.
  • भाऊ बहिणीला भेटवस्तू देतो.
  • कुटुंबातील सदस्य एकत्र येतात आणि जेवण करतात.
  • नवीन कपडे परिधान केले जातात.

पौराणिक कथा:

महाभारतानुसार, जेव्हा कृष्णाला दुखापत झाली, तेव्हा द्रौपदीने तिच्या साडीचा एक तुकडा फाडून कृष्णाच्या हाताला बांधला. कृष्णाने तिचे हे प्रेमळ कृत्य पाहून तिचे रक्षण करण्याचे वचन दिले. तेव्हापासून रक्षाबंधनाचा सण सुरू झाला, असे मानले जाते. अधिक माहितीसाठी हे पहा

महत्व:

  • भाऊ आणि बहिणीच्या नात्याला अधिक दृढ करतो.
  • प्रेम, त्याग आणि संरक्षणाचे प्रतीक आहे.
  • सामाजिक बांधिलकी जपतो.

रक्षाबंधनाच्या दिवशी अनेक ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. हा सण केवळ भारतातच नव्हे, तर जगभरात जिथे भारतीय लोक राहतात, तिथे साजरा केला जातो.

उत्तर लिहिले · 16/3/2025
कर्म · 1040

Related Questions

रक्षाबंधन म्हणजे काय?
रक्षा बंधन माहिती द्या?
रक्षाबंधन का साजरा करतात?
राखी बांधताना ताम्हण मध्ये कोणत्या गोष्टी असाव्यात?
रक्षा बंधन चे काही मराठी शेर शायरी आहेत का, असतील तर प्लीज लवकर सांगा?