नारळी पौर्णिमेबद्दल माहिती द्या?

💁♂ *आज नारळी पौर्णिमा; जाणून घ्या महत्व*
👉 शास्त्राप्रमाणे श्रावण पौर्णिमेस सागराची पूजा करून त्याला श्रीफळ अर्पण करतात म्हणून या दिवसाला नारळी पौर्णिमा असे म्हणतात.
👀 *जाणून घ्या आख्यायिका* : समुद्र किनारी राहणारा कोळी समाज नारळी पौर्णिमा हा सण साजरा करतात. समुद्राला नारळ अर्पण करून हा समाज आपली कृतज्ञता व्यक्त करतात. वरूण हा समुद्राचा रक्षक समजला जातो. त्याच्या पूजनाने सारी संकट टळावी अशी कामना केली जाते.
🌊 समुद्राला नारळ अर्पण करत पूजा करतात. म्हणून या सणाला नारळी पौर्णिमा असे म्हणतात. यादिवशी कोळी लोक आपल्या होळ्या घेऊन मासेमारी करण्यासाठी समुद्रात जातात.
🛶 या दिवशी होड्याना रंगरंगोटी करून सजविण्यात येतात. काही ठिकाणी तर कोळी बांधवांकडून भव्य मिरवणुका देखील काढण्यात येतात, अशी प्रथा आहे. पावसाळा हा माश्यांच्या प्रजननाचा काळ असल्याने कोळी बांधव या काळात मासेमारी करत नाहीत. श्रावणी पौर्णिमेस सागराला श्रीफळ अर्पण करून सागरपूजन झाले कि त्यानंतरच समुद्रात होड्या घेऊन मासेमारी सुरु होते.
🧐 *नारळ असे अर्पण करा* : या दिवशी अर्पण करावयाचे नारळ हे फळ शुभसूचक मानले जाते, तसेच ते सर्जनशक्तीचेही प्रतीक मानलेले आहे. यामुळे समुद्राला नारळ अर्पण करतांना तो पाण्यात फेकू नका, तर हळुवारपणे सोडा ! नारळी पौर्णिमेच्या दिवशी वरुणदेवतेला आवाहन करून सागराला नारळ अर्पण करतात.
🍱 महाराष्ट्रात नारळी पौर्णिमेदिवशी नाराळाचे विविध पदार्थ बनवले जातात. यामध्ये नारळी भात, नाराळाच्या वड्या असे गोडाधोडाचे पदार्थ बनवून हा सण साजरा केला जातो.
🥥 हिंदू धर्मासाठी इतर महिन्यांपेक्षा श्रावण महिना हा पवित्र मानला जातो. ऑगस्ट महिन्याच्या सुरूवातीला म्हणजेच 2 ऑगस्टला श्रावण महिन्याला सुरूवात झाली. नागपंचमी नंतर आता 14 ऑगस्टला महाराष्ट्र भर श्रावणी पौर्णिमा साजरी केली जाणार आहे. ही पौर्णिमा पोवती पौर्णिमा म्हणूनही ओळखली जाते.
🏝 जेव्हा श्रावण महिन्यात लागोपाठ दोन दिवशी पौर्णिमा असते तेव्हा पहिल्या दिवशी नारळी पौर्णिमा आणि दुसऱ्या दिवशी राखी पौर्णिमा साजरी केली जाते.सर्व कोळी बांधवांना नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा!
🌊 नारळी पौर्णिमा हा सण कोळी बांधवांसाठी महत्वाचा मानला जातो. श्रावणी पौर्णिमे दिवशी समुद्र किनारी राहणारे कोळी बांधव नारळी पौर्णिमा उत्साहाने साजरा करतात. कोळी बांधव समुद्राला नारळ अर्पण करत समुद्राप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करतात. तसेच समुद्राची पुजा करण्याची सुद्धा प्रथा आहे.
🎣 श्रावण महिना हा समुद्रातील माश्यांचा प्रजनन काळ असतो म्हणून मासेमारी थांबविली जाते. मात्र, नारळी पौर्णिमेनंतर कोळी बांधव आपल्या होड्या समुद्रात उतरवून मासेमारी करण्यास सुरूवात करतात.
*💁🏻 मुहूर्त*
◼ यावर्षी नारळी पौर्णिमा 14 ऑगस्ट रोजी आहे. तर यावेळी 14 ऑगस्ट दिवशी 3.47 ते 15 ऑगस्ट दिवशी 6.59 पर्यंत आहे. तर 14 ऑगस्ट रोजी सायंकाळी नारळी पौर्णिमा साजरी केला जाणार आहे.
◼ दरम्यान, या सणा निमित्त प्रत्येक घरात नारळाचे विविध पदार्थ बनवले जातात. यात नारळी भात, नारळाच्या वड्या अशा पदार्थांचा समावेश असतो.
__________________________
*नारळी पौर्णिमा निमित्त नारळ बाबत माहिती*
( लेखक डॉ.किरण कल्याणकर )
*नारळ : Cocos nucifera : श्रीफल*
नारळ म्हणजे कल्पवृक्ष, नारळ म्हणजे अथांग समुद्राचा किनारा, नारळ म्हणजे वाऱ्यानी मस्त डोलणाऱ्या झावळ्या आणि वर पाहिले असता दिसणारी हिरवीगार शहाळी.
सण आयलाय गो, आयलाय गो नारळी पुनवेचा
मनी आनंद मावेना कोळ्यांच्या दुनियेचा ||
असे म्हणत, आपले कोळी बांधव दर्याराजा व वरुण देवतेस नारळ अर्पण करून नारळी पौर्णिमा किंवा राखी पौर्णिमा साजरी करतात.
भारताचा संपूर्ण समुद्र किनारा आणि लगतच्या परिसरात तसेच दक्षिण भारतात मोठ्या प्रमाणात नारळाचे उत्पादन घेतले जाते, किंबहुना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही नारळ उत्पादन करणाऱ्या देशांत भारताचा क्रमांक उच्च आहे.
अशा या नारळाला कल्पवृक्ष का म्हणतात, हा प्रश्न आपण सर्वांनीच शालेय जीवनात सोडवला आहे, आणि आज याच कल्पवृक्षाची आयुर्वेदिक माहिती आपण पाहणार आहोत.
🌴नारळाचे पाणी आणि खोबरे असे दोन्ही मधुर रस आणि विपाकाचे असून गुणांनी शीत (थंड), गुरू (पचायला जड) आणि स्निग्ध आहे.
*पुराणकालीन आख्यायिका नुसार*..... भगवान विष्णू जेव्हा क्षीरसागरातून भूलोकावर (पृथ्वीवर) आले तेव्हा ते सोबत लक्ष्मी आणि नारळाचे झाड घेऊन आले, यामुळे नारळाच्या झाडाला श्रीफल (श्री:लक्ष्मी ) असे नाव पडले. नारळ टणक असल्याने 'दृढफल' तर आकाराने मोठा असल्याने 'महाफल' असे म्हणतात, याच फलामध्ये भरपूर पाणी असल्याने 'रसफल' तर तीन डोळे असल्याने 'त्र्यक्षफल' म्हणतात, याशिवाय कल्पवृक्ष, दक्षिणात्य, तुंग(उंच असल्याने) असे बरेच पर्याय आयुर्वेदात वर्णन केले आहेत.
🌴 *आयुर्वेदाचे आद्यग्रंथ असलेल्या चरकसंहिते मध्ये*.... नारळाचे गुण वर्णन करताना पचायला जड, गोड रसाचा, शरीराची ताकद वाढविणारा, पित्त आणि वाताचे शमन करणारा असे म्हटले आहे.
नारळाचे पाणी गोवर, कांजिण्या, नागीण यासारख्या आजारांत अभ्यंतर आणि बाहेरूनही जखमा धुण्यासाठी वापरतात.
🌴नारिकेल जल हे शरीराचा दाह कमी करते, तहान भागवते, थंडावा उत्पन्न करते, भूक वाढवते व मनाला संतुष्ट करते, यामुळे आजारी किंवा हॉस्पिटल मध्ये असणाऱ्या रुग्णासाठी नारळपाणी घेवून जाण्याचा प्रघात पडला असावा, पण याचा अतिरेक जाणीवपूर्वक टाळावा.
नारळाच्या पाण्याचा दुसरा उत्कृष्ट उपयोग हा मूत्रविकारांत होतो, याने मूत्राची उत्पत्ती वाढते तसेच लघवी स्वच्छ व मोकळी होते, असे असूनही किडनी फेल्युर सारखे आजारांत मात्र याचा वापर वैद्यकीय सल्ल्यानेच करावा.
🌴नारळाचे तेल हे मुख्यतः केश्य (केसांची वाढ करणारे) आहे, तसेच याचे घरी काढलेले तेल हे दररोज पोटात घेतले असता सांधेदुखी तसेच वाताचे आजार कमी होतात, तसेच टाळूवर चोळले असता मस्तकास शांती मिळते, स्ट्रेस किंवा ताण तणावाचे वातावरण असता, वाढलेल्या रक्तदाबासारखे व्याधी असणाऱयांनी याचा नित्य वापर करावा.
गजकर्ण, इसब, खरूज यासारख्या त्वचविकारांतही निंब, सारिवा, कुटज यासारख्या औषधी द्रव्यांनी सिद्ध केलेले नारिकेल तेल बाहेरून लावण्यास उपयुक्त ठरते.
अशा या बहुगुणी कल्पवृक्षाचा अनेक औषधी कल्पामध्ये वापर केला जातो; अतिसार, ग्रहणी, प्रवाहिका (Colitis) ई. व्याधीत श्रीफळकुसुमवटी तर आम्लपित्त तसेच ऍसिड पेप्टिक डिसऑर्डर सारख्या आजारांत नारिकेल लवण सारखी औषधे अनेक आयुर्वेदिक डॉक्टर यशस्वीपणे वापरतात. गर्भिणी अवस्थेत काही स्त्रियांमध्ये ओलिगोहैड्रोमनिया (गर्भ पिशवीतील पाणी कमी होणे) हे लक्षण आढळते अशा वेळी नारळ पाणी व सोबत आयु. औषधांची योजना केली असता ही लक्षणे दूर होतात, व बाळाची वाढ प्रसूती काळापर्यंत सुलभतेने होते.
औषधी वनस्पतींचा नावावरून असलेल्या मोजक्या सणांमध्ये नारळी पौर्णिमेचा समावेश होतो (ईतर उदा. वटपौर्णिमा, आमलकी एकादशी) भारतीय सण हे वातावरणात आणि निसर्गात होणारे बदल आणि शरीरस्वास्थ्यावर त्याचे होणारे विपरीत परिणाम हे टाळण्याच्या दृष्टीने योजले गेले आहेत, अनेक सण आणि त्यात वापरले जाणारे औषधी पदार्थ हे त्या ऋतूमध्ये शरीरास उपकारक ठरतात, उदा. श्रावण मासामध्ये वाढलेला वात दोष हा जठराग्नीला मंद करतो, अशा वेळी येणारा पहिला सण म्हणजे नागपंचमी, जो की साजरा करताना गाईचे दूध आणि साळीच्या लाह्या यांचा प्रसाद केला जातो, मंद झालेला जठराग्नी या लघु (हलक्या) आहाराने प्रज्वलित करणे आणि प्रदीप्त झाला असता काही दिवसांनी येणाऱ्या नारळी पोर्णिमेला वेलदोडे, लवंग, आणि खोबरे घालून साजूक तुपात तयार केलेला नारळी भात हा निश्चितच या विकृत वाताला वेसण घालतो. अशा पद्धतीने क्रमाने जठराग्नी दीप्त झाला की येणाऱ्या गोपाळकाला सणाला दूध, दही, लोणी यासाठी आपली पचनशक्तीही तयार झालेली असते.
*(लेखक आयुर्वेदाचार्य डॉ.कल्याणकर किरण, मुंबई यांच्या फेसबुक वॉल वरून.)* *संकलन- सुनिल मोरे,शिंदखेडा जि.धुळे*
*नारळी पौर्णिमा*
------------------------
*★नारळी पौर्णिमेची माहिती आणि महत्व ★*
सण, उत्सव व व्रते यांच्यामागचे शास्त्र लक्षात घेऊन श्रद्धापूर्वक साजरे करण्यात आपलेच कल्याण असते. वास्तविक आपल्या जीवनात नेहमीच संयम पाहिजे, पण तो पाळला जात नाही; म्हणून निदान सण, धार्मिक उत्सव व व्रतांच्या दिवशी तरी तो पाळला जावा, म्हणजे हळूहळू नेहमीच संयमित जीवन जगता येईल. कर्मकांडाच्या दृष्टीने सण, धार्मिक उत्सव व व्रते इतकी महत्त्वाची आहेत की, वर्षातील जवळजवळ ७५ टक्के तिथींना यांपैकी काही ना काही असतेच. यात श्रावण महिन्याला सण, धार्मिक उत्सव व व्रतांचा महिनाच म्हटले जाते. या महिन्यात येणार्या सण, धार्मिक उत्सव व व्रतांमध्ये नारळी पौर्णिमा हा एक सण साजरा केला जातो.
*नारळी पौर्णिमेला करण्यात येणारे वरूणदेवतेचे पूजन*
पावसाळा संपत आला की समुद्र शांत होतो, तेव्हा नारळी पौर्णिमा साजरी करतात. नागपंचमी नंतर श्रावणात येणारा हा दुसरा सण आहे. श्रावणी पौर्णिमेलाच नारळी पौर्णिमा असेही म्हणतात. या दिवशी कोळी बांधव व समुद्रकिनारी रहाणारे लोक वरुणदेवतेप्रीत्यर्थ समुद्राची पूजा करून त्याला नारळ अर्पण करतात. या दिवशी अर्पण करावयाचे नारळ हे फळ शुभसूचक आहे, तसेच ते सर्जनशक्तीचेही प्रतीक मानलेले आहे. नदीपेक्षा संगम व संगमापेक्षा सागर जास्त पवित्र आहे. `सागरे सर्व तीर्थानि’ असे वचन आहे. सागराची पूजा म्हणजेच वरुणदेवतेची पूजा. जहाजांनी मालाची वाहतूक करतांना वरुणदेव प्रसन्न असल्यास तो साहाय्य करतो.
------------------------------------------------
*नारळी पौर्णिमेच्या दिवशी समुद्राची पूजा करून नारळ अर्पण का करावा ?*
-----------------------------------------------
*नारळी पौर्णिमेच्या दिवशी आपतत्त्वात्मक यमलहरींचे आधिक्य असल्याने व नारळाच्या पाण्यातील तेजतत्त्व यमलहरींना ताब्यात ठेवत असल्याने जलावर ताबा मिळवणार्या सागररूपी वरुणदेवतेला नारळ अर्पण करतात.*
या दिवशी ब्रह्मांडात आपतत्त्वात्मक यमलहरींचे आधिक्य असते. या लहरी ब्रह्मांडात भोवर्याप्रमाणे गतिमान असतात. वरूणदेवता ही जलावर ताबा मिळवणारी व त्याचे संयमन करणारी असल्याने या दिवशी सागररूपी वरुणदेवतेला आवाहन करून तिला नारळ अर्पण करून ब्रह्मांडात कार्यरत असणार्या यमलहरींना ताब्यात ठेवण्यासाठी प्रार्थना केली जाते. नारळातील पाण्यात तेजतत्त्वाचे प्रमाण अधिक असते. नारळातील पाणी हे आपतत्त्वाचे प्रमाण जास्त असणार्या यमलहरी ग्रहण करण्यात अतिशय संवेदनशील असते. वरुणदेवतेला आवाहन करतांना तिच्या कृपाशीर्वादाने यमलहरी नारळाच्या पाण्याकडे आकृष्ट होतात. नारळाच्या पाण्यातील तेजतत्त्व या यमलहरींना ताब्यात ठेवून त्यांतील रज-तम कणांचे विघटन करून त्यांना सागरात विलीन करते; म्हणून या दिवशी वायुमंडलातील यमलहरींचे नारळाच्या माध्यमातून उच्चाटन करून सागररूपी वरुणदेवतेच्या चरणी त्यांचे समर्पण करण्याला महत्त्व आहे. यामुळे वायुमंडलाची शुद्धी होते. यमलहरींच्या वातावरणातील अधिक्यामुळे शरीरात अधोगामी वहाणारे वायु कार्यरत् झाल्याने पाताळातून प्रक्षेपित होणार्या त्रासदायक लहरी पटकन जिवाच्या तळपायाकडे आकृष्ट झाल्याने त्याला त्रास होण्याची शक्यता जास्त असते.
-------------------------–--------------------
*समुद्राला नारळ `अर्पण’ कसा कराल ?*
-------------------------------------------------
नारळी पौर्णिमेच्या दिवशी समुद्राला नारळ अर्पण करतांना तो पाण्यात फेकू नका, तर हळुवारपणे सोडा ! नारळी पौर्णिमेच्या दिवशी वरुणदेवतेला आवाहन करून सागराला नारळ अर्पण करतात. ते करतांना काही जण नारळ पाण्यात फेकतात. त्यामुळे नारळ अर्पण करण्यामागील अपेक्षित लाभ मिळत नाही; म्हणून तो भावपूर्णपणे हळुवार पाण्यात सोडावा!…
*कोळ्यांचा महत्त्वाचा सण म्हणजे नारळी पौर्णिमा.*
कोळीवाड्यांमध्ये आज हा सण धुमधडाक्यात साजरा होणार आहे. कोळ्यांनी समुद्रात होड्या सोडण्यासाठी जय्यत तयारी केली आहे. होड्या रंगरंगोटी करून सजवण्यात आल्या आहेत. दर्या सागराला आपला मान देण्यासाठी कोळी महिला नैवेद्याच्या तयारीला लागल्या आहेत. सोन्याचा नारळ अर्पण करून खवळलेल्या दर्याराजाला शांत करून त्याप्रती असलेली कृतज्ञता व्यक्त केली जाणार आहे. तसेच काही ठिकाणी भव्यदिव्य मिरवणुका काढण्यात येणार आहेत.
मुंबई , ठाणे आणि नवी मुंबईतील ऐरोली, बोनकोडे,वेसावा, माहीम, मढ, सातपाटी, ओवला, चारकोप, मालवणी, वाशी-सारसोळे, बेलापूरमधील दिवाळे कोळीवाड्यात मंगळवारी नारळी पौर्णिमेच्या तयारीची लगबग पाहायला मिळत होती. कोळी महिलांसह बच्चेकंपनी घराघरात सजावट करताना दिसत होती. तर कोळ्यांनी किनारी नांगरून ठेवलेल्या होड्यांना रंगरंगोटी केली आहे. तसेच काही ठिकाणी होड्या सजावटीचे कामही सुरू होते. नैवेद्यासाठी कोळी महिला ओल्या नारळाच्या करंज्या, नारळी भात, नारळी पाक तयार करण्यात गुंतल्या होत्या. एकूणच कोळीवाड्यातील उत्साह शिगेला पोहोचल्याचे चित्र सर्वत्र पाहायला मिळत होते. बुधवारी नारळाची विधिवत पूजा करून तो समुद्राला अर्पण केला जाणार आहे. ढोलताशांच्या गजरात मिरवणुकाही काढण्यात येणार आहेत. सर्वप्रथम नारळ मंदिरात ठेवून सर्व कोळी मंदिरांमध्ये एकत्र जमणार आहेत. त्यानंतर दर्याराजाला नारळ अर्पण करून आपले गाऱ्हाणे मांडणार आहेत. “मासळीचा दुष्काळ सरू दे, दर्याचे धन माझ्या होरीला येऊ दे’ अशी मागणी केली जाणार आहे. असा धुमधडाक्यात साजरा होणारा आज नारळी नारळी पुनवचा सन आपल्याला अनुभवायला मिळणार आहे. आपण साजरी केलेली नारळी पौर्णिमेची धम्माल आम्हला जरूर कळवा.
*” सर्व बांधवांना नारळी पौर्णिमेच्या मनःपूर्वक शुभेच्छा ” !!*
-----------------------------------------------
*संकलन :- सतीश अलोणी @*
------------------------------------------------
1. समुद्राची पूजा: या दिवशी समुद्राची पूजा केली जाते. मान्सूनच्या काळात समुद्रातील धोके टळावेत आणि मासेमारी व्यवस्थित चालावी, यासाठी कोळी बांधव वरुणदेवाची प्रार्थना करतात.
2. नारळ अर्पण: समुद्राला नारळ अर्पण करणे हे या सणाचे मुख्य वैशिष्ट्य आहे. नारळ हा शुभ आणि पवित्र मानला जातो, त्यामुळे तो समुद्राला अर्पण करून कृतज्ञता व्यक्त केली जाते.
3. कोळी बांधवांचा सण: नारळी पौर्णिमा हा कोळी बांधवांसाठी खूप महत्त्वाचा सण आहे. ते त्यांच्या बोटींची पूजा करतात, त्या सजवतात आणि समुद्रात मिरवणूक काढतात.
4. रक्षाबंधन: याच दिवशी रक्षाबंधन देखील असते, त्यामुळे या सणाचे महत्त्व आणखी वाढते. बहिण भावाला राखी बांधते आणि भाऊ तिचे रक्षण करण्याचे वचन देतो.
5. पारंपरिक खाद्यपदार्थ: या दिवशी नारळाचे विविध पदार्थ बनवले जातात, जसे नारळी भात, नारळाची बर्फी आणि नारळाच्या वड्या.
- समुद्रावर जाऊन पूजा करणे.
- नारळ अर्पण करणे.
- बोटींची सजावट करणे.
- गाणी आणि नृत्ये करणे.
- नारळाचे पदार्थ बनवून वाटणे.