नारळी पौर्णिमा
0
Answer link
नारळी पौर्णिमा म्हणजे काय
नारळी पौर्णिमेला समुद्रात पूजा केल्याने वरुण प्रसन्न होतात आणि मच्छीमारांचे सर्व प्रकारच्या प्रतिकूल घटनांपासून संरक्षण होते. “नारळी” हा शब्द “नारळ” (नारळ) आणि “पौर्णिमा” (पौर्णिमा) या शब्दांपासून बनला आहे. त्यामुळे श्रावण महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी नारळी पौर्णिमा साजरी केली जाते.
महाराष्ट्रीयन ब्राह्मण या दिवशी फलहार उपवास करतात (फळे, सुका मेवा आणि काही दुग्धजन्य पदार्थांवर आधारित अन्न). उपवासाच्या वेळी ते फक्त नरियाल किंवा नारळ खाणे पसंत करतात. नारळी पौर्णिमेला, भक्त निसर्गाचा सन्मान करण्यासाठी आणि त्यांचे आभार व्यक्त करण्याचा मार्ग म्हणून वनस्पती देखील लावतात.
नारळी पौर्णिमा का महत्त्वाची आहे?
मासेमारीच्या हंगामाची सुरुवात नारळी पौर्णिमेपासून होते. यामुळे, मच्छीमार उदारपणे भगवान वरुणांना प्रसाद देतात. ते विशेषत: समुद्रातून भरपूर मासे मिळवण्यासाठी त्याची कृपा मागण्यासाठी प्रार्थना करतात. पूजा समारंभ पूर्ण झाल्यावर मच्छीमार त्यांच्या सजवलेल्या बोटींसह समुद्रात प्रवेश करतात. थोड्या सागरी प्रवासानंतर, ते जमिनीवर परततात आणि उत्सवात कुटुंबात सामील होतात.
या दिवशी कुटुंब, मित्र आणि सहकारी गोड नारळाच्या जेवणाचा आनंद घेण्यासाठी जमतात. मच्छिमार नारळापासून बनवलेल्या विविध पदार्थ खातात, जे दिवसाचे मुख्य अन्न मानले जाते. या उत्सवाचा मुख्य आकर्षण म्हणजे गायन आणि नृत्य.
नारळी पौर्णिमेची पूजा करण्याची पद्धत
नारळी पौर्णिमेच्या दिवशी लोक विशेषतः समुद्र आणि पाण्याची देवता वरुणाची पूजा करतात. या दिवशी वरुण देवाला नारळ देण्याची प्रथा आहे. श्रावण पौर्णिमेच्या पूजा पद्धती भगवान वरुणांना प्रसन्न करतात आणि कलाकाराला समुद्राच्या कोणत्याही धोक्यांपासून वाचवतात असे मानले जाते.
किनारी प्रदेशात राहणारा मासेमारी समुदाय विशेषतः नारळी पौर्णिमा साजरी करण्याचा आनंद घेतो. या दिवशी लोक भगवान शिवाची पूजा देखील करतात. त्रिभुज शिव हे नारळाच्या तीन डोळ्यांचे प्रतीक असल्याचे म्हटले जाते आणि सावन हा भगवान शिवाचा आवडता महिना आहे. या दिवशी भगवान शंकराला नारळ आणि त्यांच्या आवडत्या वस्तू अर्पण केल्या जातात.
नारळी पौर्णिमेची परंपरा
संपूर्ण दक्षिण भारतीय समाज ही सुट्टी स्वतःच्या अनोख्या पद्धतीने पाळतो. या दिवशी, उपनयन किंवा यज्ञोपवीत सोहळा बहुतेक वेळा केला जातो. या दिवशी एखाद्या पवित्र नदीत स्नान करून धागा बदलण्याची प्रथा आहे. या कारणास्तव या घटनेला अबितम, श्रावणी किंवा ऋषी तर्पण असेही म्हणतात. या दिवशी पितरांच्या आत्म्याच्या सांत्वनासाठी ब्राह्मणांना अन्न किंवा दान देण्याचीही प्रथा आहे. नारळी पौर्णिमेची सुट्टी विशेषतः समुद्रकिनाऱ्याजवळ राहणारे लोक साजरी करतात.
नारळी पौर्णिमेचे स्मरण कोणत्या ठिकाणी केले जाते?
नारळी पौर्णिमेची देशव्यापी सुट्टी सुप्रसिद्ध आहे, परंतु महाराष्ट्रात ती सर्वात उत्साहाने पाळली जाते. राखी पौर्णिमा, रक्षाबंधन आणि श्रावणी पौर्णिमा ही या अनोख्या कार्यक्रमाची इतर नावे आहेत.
हिंदू नारळी पौर्णिमा ही एक महत्त्वाची सुट्टी म्हणून पाळतात जी मोठ्या प्रमाणावर पाळली जाते. हे प्रामुख्याने भारताच्या पश्चिम किनार्यावर महाराष्ट्रातील दमण आणि दीव, ठाणे, रत्नागिरी आणि कोकण यांसारख्या किनारी समुदायातील रहिवाशांनी पाळले जाते.
या दिवशी नारळी भात, नारळी भात, नारळाची करंजी असे पारंपारिक पदार्थ तयार केले जातात. या दिवशी पुरुष आणि स्त्रिया दोघेही पारंपारिक पोशाख करतात आणि परंपरेत सहभागी होतात. सोबत नारळ आणून ते पाण्यात देतात.
नारळी पौर्णिमेसाठी उपक्रम
या दिवशी कोणीही मासेमारीला जात नाही. याशिवाय या दिवशी कोणीही मासे खात नाही.
महासागर देवाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी नारळ पाण्यात टाकला जातो.
नारळ फेकणे ही एक शांत क्रिया मानली जाते.
ऑफरवर फक्त नारळ आहे; दुसरे कोणतेही फळ नाही. आणि याचे कारण असे आहे की सर्व प्रकारच्या हिंदू उत्सवांमध्ये, नारळ हे देवाला अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते.
नारळ, पाने आणि मानवांसाठी वापरण्यायोग्य साल निर्माण करणारे एकमेव झाड नारळाचे झाड आहे.
भगवान शिवाचे फळ मित्र, नारळ देखील तीन डोळे असलेले मानले जाते.
सर्व नकारात्मकता दूर करण्यासाठी कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी नारळ फोडणे भाग्यवान मानले जाते.
नारळी पौर्णिमा ही समुद्राची देवता वरुणाची पूजा करण्यासाठी समर्पित सुट्टी आहे आणि बहुतेक लोक मासेमारी आणि समुद्राशी संबंधित इतर व्यवसायांमध्ये गुंतलेले लोक पाळतात. हा सण, जो प्रामुख्याने महाराष्ट्राच्या किनारपट्टीच्या प्रदेशात साजरा केला जातो, तो मासेमारीच्या हंगामाची सुरुवात करतो.
5
Answer link
*🛶 कोळी बांधवांचा महत्वाचा सण ‘नारळी पौर्णिमा’*

💁♂ *आज नारळी पौर्णिमा; जाणून घ्या महत्व*
👉 शास्त्राप्रमाणे श्रावण पौर्णिमेस सागराची पूजा करून त्याला श्रीफळ अर्पण करतात म्हणून या दिवसाला नारळी पौर्णिमा असे म्हणतात.
👀 *जाणून घ्या आख्यायिका* : समुद्र किनारी राहणारा कोळी समाज नारळी पौर्णिमा हा सण साजरा करतात. समुद्राला नारळ अर्पण करून हा समाज आपली कृतज्ञता व्यक्त करतात. वरूण हा समुद्राचा रक्षक समजला जातो. त्याच्या पूजनाने सारी संकट टळावी अशी कामना केली जाते.
🌊 समुद्राला नारळ अर्पण करत पूजा करतात. म्हणून या सणाला नारळी पौर्णिमा असे म्हणतात. यादिवशी कोळी लोक आपल्या होळ्या घेऊन मासेमारी करण्यासाठी समुद्रात जातात.
🛶 या दिवशी होड्याना रंगरंगोटी करून सजविण्यात येतात. काही ठिकाणी तर कोळी बांधवांकडून भव्य मिरवणुका देखील काढण्यात येतात, अशी प्रथा आहे. पावसाळा हा माश्यांच्या प्रजननाचा काळ असल्याने कोळी बांधव या काळात मासेमारी करत नाहीत. श्रावणी पौर्णिमेस सागराला श्रीफळ अर्पण करून सागरपूजन झाले कि त्यानंतरच समुद्रात होड्या घेऊन मासेमारी सुरु होते.
🧐 *नारळ असे अर्पण करा* : या दिवशी अर्पण करावयाचे नारळ हे फळ शुभसूचक मानले जाते, तसेच ते सर्जनशक्तीचेही प्रतीक मानलेले आहे. यामुळे समुद्राला नारळ अर्पण करतांना तो पाण्यात फेकू नका, तर हळुवारपणे सोडा ! नारळी पौर्णिमेच्या दिवशी वरुणदेवतेला आवाहन करून सागराला नारळ अर्पण करतात.
🍱 महाराष्ट्रात नारळी पौर्णिमेदिवशी नाराळाचे विविध पदार्थ बनवले जातात. यामध्ये नारळी भात, नाराळाच्या वड्या असे गोडाधोडाचे पदार्थ बनवून हा सण साजरा केला जातो.
🥥 हिंदू धर्मासाठी इतर महिन्यांपेक्षा श्रावण महिना हा पवित्र मानला जातो. ऑगस्ट महिन्याच्या सुरूवातीला म्हणजेच 2 ऑगस्टला श्रावण महिन्याला सुरूवात झाली. नागपंचमी नंतर आता 14 ऑगस्टला महाराष्ट्र भर श्रावणी पौर्णिमा साजरी केली जाणार आहे. ही पौर्णिमा पोवती पौर्णिमा म्हणूनही ओळखली जाते.
🏝 जेव्हा श्रावण महिन्यात लागोपाठ दोन दिवशी पौर्णिमा असते तेव्हा पहिल्या दिवशी नारळी पौर्णिमा आणि दुसऱ्या दिवशी राखी पौर्णिमा साजरी केली जाते.सर्व कोळी बांधवांना नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा!
🌊 नारळी पौर्णिमा हा सण कोळी बांधवांसाठी महत्वाचा मानला जातो. श्रावणी पौर्णिमे दिवशी समुद्र किनारी राहणारे कोळी बांधव नारळी पौर्णिमा उत्साहाने साजरा करतात. कोळी बांधव समुद्राला नारळ अर्पण करत समुद्राप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करतात. तसेच समुद्राची पुजा करण्याची सुद्धा प्रथा आहे.
🎣 श्रावण महिना हा समुद्रातील माश्यांचा प्रजनन काळ असतो म्हणून मासेमारी थांबविली जाते. मात्र, नारळी पौर्णिमेनंतर कोळी बांधव आपल्या होड्या समुद्रात उतरवून मासेमारी करण्यास सुरूवात करतात.
*💁🏻 मुहूर्त*
◼ यावर्षी नारळी पौर्णिमा 14 ऑगस्ट रोजी आहे. तर यावेळी 14 ऑगस्ट दिवशी 3.47 ते 15 ऑगस्ट दिवशी 6.59 पर्यंत आहे. तर 14 ऑगस्ट रोजी सायंकाळी नारळी पौर्णिमा साजरी केला जाणार आहे.
◼ दरम्यान, या सणा निमित्त प्रत्येक घरात नारळाचे विविध पदार्थ बनवले जातात. यात नारळी भात, नारळाच्या वड्या अशा पदार्थांचा समावेश असतो.
__________________________
*नारळी पौर्णिमा निमित्त नारळ बाबत माहिती*
( लेखक डॉ.किरण कल्याणकर )
*नारळ : Cocos nucifera : श्रीफल*
नारळ म्हणजे कल्पवृक्ष, नारळ म्हणजे अथांग समुद्राचा किनारा, नारळ म्हणजे वाऱ्यानी मस्त डोलणाऱ्या झावळ्या आणि वर पाहिले असता दिसणारी हिरवीगार शहाळी.
सण आयलाय गो, आयलाय गो नारळी पुनवेचा
मनी आनंद मावेना कोळ्यांच्या दुनियेचा ||
असे म्हणत, आपले कोळी बांधव दर्याराजा व वरुण देवतेस नारळ अर्पण करून नारळी पौर्णिमा किंवा राखी पौर्णिमा साजरी करतात.
भारताचा संपूर्ण समुद्र किनारा आणि लगतच्या परिसरात तसेच दक्षिण भारतात मोठ्या प्रमाणात नारळाचे उत्पादन घेतले जाते, किंबहुना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही नारळ उत्पादन करणाऱ्या देशांत भारताचा क्रमांक उच्च आहे.
अशा या नारळाला कल्पवृक्ष का म्हणतात, हा प्रश्न आपण सर्वांनीच शालेय जीवनात सोडवला आहे, आणि आज याच कल्पवृक्षाची आयुर्वेदिक माहिती आपण पाहणार आहोत.
🌴नारळाचे पाणी आणि खोबरे असे दोन्ही मधुर रस आणि विपाकाचे असून गुणांनी शीत (थंड), गुरू (पचायला जड) आणि स्निग्ध आहे.
*पुराणकालीन आख्यायिका नुसार*..... भगवान विष्णू जेव्हा क्षीरसागरातून भूलोकावर (पृथ्वीवर) आले तेव्हा ते सोबत लक्ष्मी आणि नारळाचे झाड घेऊन आले, यामुळे नारळाच्या झाडाला श्रीफल (श्री:लक्ष्मी ) असे नाव पडले. नारळ टणक असल्याने 'दृढफल' तर आकाराने मोठा असल्याने 'महाफल' असे म्हणतात, याच फलामध्ये भरपूर पाणी असल्याने 'रसफल' तर तीन डोळे असल्याने 'त्र्यक्षफल' म्हणतात, याशिवाय कल्पवृक्ष, दक्षिणात्य, तुंग(उंच असल्याने) असे बरेच पर्याय आयुर्वेदात वर्णन केले आहेत.
🌴 *आयुर्वेदाचे आद्यग्रंथ असलेल्या चरकसंहिते मध्ये*.... नारळाचे गुण वर्णन करताना पचायला जड, गोड रसाचा, शरीराची ताकद वाढविणारा, पित्त आणि वाताचे शमन करणारा असे म्हटले आहे.
नारळाचे पाणी गोवर, कांजिण्या, नागीण यासारख्या आजारांत अभ्यंतर आणि बाहेरूनही जखमा धुण्यासाठी वापरतात.
🌴नारिकेल जल हे शरीराचा दाह कमी करते, तहान भागवते, थंडावा उत्पन्न करते, भूक वाढवते व मनाला संतुष्ट करते, यामुळे आजारी किंवा हॉस्पिटल मध्ये असणाऱ्या रुग्णासाठी नारळपाणी घेवून जाण्याचा प्रघात पडला असावा, पण याचा अतिरेक जाणीवपूर्वक टाळावा.
नारळाच्या पाण्याचा दुसरा उत्कृष्ट उपयोग हा मूत्रविकारांत होतो, याने मूत्राची उत्पत्ती वाढते तसेच लघवी स्वच्छ व मोकळी होते, असे असूनही किडनी फेल्युर सारखे आजारांत मात्र याचा वापर वैद्यकीय सल्ल्यानेच करावा.
🌴नारळाचे तेल हे मुख्यतः केश्य (केसांची वाढ करणारे) आहे, तसेच याचे घरी काढलेले तेल हे दररोज पोटात घेतले असता सांधेदुखी तसेच वाताचे आजार कमी होतात, तसेच टाळूवर चोळले असता मस्तकास शांती मिळते, स्ट्रेस किंवा ताण तणावाचे वातावरण असता, वाढलेल्या रक्तदाबासारखे व्याधी असणाऱयांनी याचा नित्य वापर करावा.
गजकर्ण, इसब, खरूज यासारख्या त्वचविकारांतही निंब, सारिवा, कुटज यासारख्या औषधी द्रव्यांनी सिद्ध केलेले नारिकेल तेल बाहेरून लावण्यास उपयुक्त ठरते.
अशा या बहुगुणी कल्पवृक्षाचा अनेक औषधी कल्पामध्ये वापर केला जातो; अतिसार, ग्रहणी, प्रवाहिका (Colitis) ई. व्याधीत श्रीफळकुसुमवटी तर आम्लपित्त तसेच ऍसिड पेप्टिक डिसऑर्डर सारख्या आजारांत नारिकेल लवण सारखी औषधे अनेक आयुर्वेदिक डॉक्टर यशस्वीपणे वापरतात. गर्भिणी अवस्थेत काही स्त्रियांमध्ये ओलिगोहैड्रोमनिया (गर्भ पिशवीतील पाणी कमी होणे) हे लक्षण आढळते अशा वेळी नारळ पाणी व सोबत आयु. औषधांची योजना केली असता ही लक्षणे दूर होतात, व बाळाची वाढ प्रसूती काळापर्यंत सुलभतेने होते.
औषधी वनस्पतींचा नावावरून असलेल्या मोजक्या सणांमध्ये नारळी पौर्णिमेचा समावेश होतो (ईतर उदा. वटपौर्णिमा, आमलकी एकादशी) भारतीय सण हे वातावरणात आणि निसर्गात होणारे बदल आणि शरीरस्वास्थ्यावर त्याचे होणारे विपरीत परिणाम हे टाळण्याच्या दृष्टीने योजले गेले आहेत, अनेक सण आणि त्यात वापरले जाणारे औषधी पदार्थ हे त्या ऋतूमध्ये शरीरास उपकारक ठरतात, उदा. श्रावण मासामध्ये वाढलेला वात दोष हा जठराग्नीला मंद करतो, अशा वेळी येणारा पहिला सण म्हणजे नागपंचमी, जो की साजरा करताना गाईचे दूध आणि साळीच्या लाह्या यांचा प्रसाद केला जातो, मंद झालेला जठराग्नी या लघु (हलक्या) आहाराने प्रज्वलित करणे आणि प्रदीप्त झाला असता काही दिवसांनी येणाऱ्या नारळी पोर्णिमेला वेलदोडे, लवंग, आणि खोबरे घालून साजूक तुपात तयार केलेला नारळी भात हा निश्चितच या विकृत वाताला वेसण घालतो. अशा पद्धतीने क्रमाने जठराग्नी दीप्त झाला की येणाऱ्या गोपाळकाला सणाला दूध, दही, लोणी यासाठी आपली पचनशक्तीही तयार झालेली असते.
*(लेखक आयुर्वेदाचार्य डॉ.कल्याणकर किरण, मुंबई यांच्या फेसबुक वॉल वरून.)* *संकलन- सुनिल मोरे,शिंदखेडा जि.धुळे*