2 उत्तरे
2
answers
हॉलीवूड चित्रपटांमध्ये गाणी का नसतात?
22
Answer link
हा प्रश्न मला हि पडला होता, त्याची संभावित कारणे खालील प्रमाणे :
- हॉलिवूड मूवी स्वतःचा जो विषय जो टॉपिक असतो त्याला पूर्णपणे पकडून ठेवायचा प्रयत्न करतात. त्यांना हे माहित असते कि भुताच्या चित्रपटात रोमँटिक गाणे का टाकावे ? एखादा हिरो युद्धासाठी जातोय तर त्याच्या पत्नीने आपले दुःख गावुनच का दाखवे? म्हणून हॉलिवूड मूवी जास्त प्रमाणात टॉपिक बेस्ड असतात. "आपल्या चित्रपटात एखादे गाणे आले कि आपण त्याला पुढे पळवतो हा पुरावा झाला ह्या कारणाचा".
- हॉलिवूड मूवी मध्ये त्यांच्याकडे प्रेक्षकांना दाखवण्यासाठी पहिल्या पासूनच खूप काही असते. त्यांना त्यांनी मांडलेली कल्पनाच फक्त लोकांना पटवून द्यायची असते म्हणून त्यांचं लक्ष कल्पनेवर असते. "वाटत म्हणून त्याचे चित्रपट फार फार तर २ तासाचे असतात".
- पाश्चिमात्य देशात अगोदर पासूनच चित्रपट सृष्टीत संगीत चित्रपट आणि मारामारी(Action) चित्रपट असे दोन विभाग पडलेले आहे. त्यांना पाहण्यासाठी चित्रपट असतात आणि ऐकण्यासाठी अल्बम असतात.
- हॉलिवूड चित्रपट मध्ये गाणे असतात पण ते बॅकग्राऊंड मध्ये वाजतात. कमी वेळेचे असतात आणि सहसा पुढे पुढे सीनमध्ये येत नाहीत. एक Supplement साठी त्यांच्या उद्देश असतो.
- त्यांच्ये गाणे सहसा ट्रेलर मध्ये किंवा चित्रपट संपल्यावर जी नावं वर वर जातात तिथेच वाजतात. ती त्यांची थिम सॉंग्स असतात.
- असं नाहीय की त्यांच्या चित्रपटात गाणी नसतात. असतात पण आपले लक्ष तिकडे ह्यासाठी जात नाही कारण ते आपल्यासारखे थोडे ना आयटम सोंग, धांगडधिंगा नाच, चलावो ना नैनो से बाण रे करतात. असतात गाणी पण जरा विषयाला साजेसे असेच.
- "भारतात चित्रपट सृष्टी बऱ्याच काळानंतर जन्माला आली होती. त्यामानाने पाश्चिमात्य देश बरेच पुढे निघून गेले होते. आपल्याकडे त्यावेळेस किंवा त्यांच्या पेक्षा पण खूप खूप जास्त जुने असे नाट्यशास्त्र आणि संगीतशास्त्र हे होतेच. चित्रपट सृष्टी हि त्यानंतर आली पण आपली संगीत आणि चित्रपट ह्यांची ती बॉण्डिंग काही तुटली नाही. कारण नाटक जी व्हायची त्यात संगीत हे असतंच. तेच पुढे चित्रपट सृष्टीने पण नेले."
हॉलिवूड चित्रपट मध्ये पण गाणी असतात, माझी काही आवडती गाणी खालील प्रमाणे:
- Love Me Like You Do.. Movie: 50 Shades Of Gray
- My Heart Will Go On.. Movie : Titanic
- I am alive.. Movie: Stuart Little 2
- Tokio Drift Theme Song.. Movie: Fast & Furious 3
आणि यादी अशीच पुढे जाते..
0
Answer link
हॉलीवूड चित्रपटांमध्ये गाणी न वापरण्याची अनेक कारणे आहेत, त्यापैकी काही खालीलप्रमाणे:
- कथेवर लक्ष केंद्रित करणे: हॉलीवूड चित्रपटांमध्ये कथेला अधिक महत्त्व दिले जाते. गाणी कथानकात व्यत्यय आणू शकतात आणि प्रेक्षकांचे लक्ष विचलित करू शकतात, असे मानले जाते.
- वास्तववादी दृष्टीकोन: हॉलीवूड चित्रपट अनेकदा वास्तववादी चित्रण करण्याचा प्रयत्न करतात. पात्रांना अचानक गाणे गाताना दाखवणे हे Jarring आणि अवास्तव वाटू शकते.
- जागतिक प्रेक्षक: हॉलीवूड चित्रपट जगभरात प्रदर्शित होतात. गाणी भाषा आणि संस्कृतीspecific असू शकतात, ज्यामुळे ती जागतिक प्रेक्षकांसाठी कमी आकर्षक ठरतात.
- खर्चिक: गाणी तयार करणे आणि चित्रपटात समाविष्ट करणे खूप खर्चिक असू शकते.
याव्यतिरिक्त, काही हॉलीवूड चित्रपटांमध्ये गाणी वापरली जातात, विशेषत: संगीतप्रधान चित्रपटांमध्ये (musicals). तथापि, बहुतेक चित्रपटांमध्ये गाण्यांचा वापर कमी असतो.