2 उत्तरे
2
answers
दुर्बीण चा शोध कोणी लावला?
15
Answer link
दुर्बिण- हें दूर अंतरावरील पदार्थ पहाण्याचें दृग्यंत्र आहे. या यंत्राचा शोध कोणी लावला याबद्दल अनेक वेळां वादविवाद झालेला आहे. डेमॉक्रिटस यानें आकाशगंगा ही अनेक तारकासमूह मिळून झालेली आहे असें प्रसिद्ध केले त्यावरून त्याला दुर्बिण माहीत असावी असा कित्येकांचा तर्क आहे. त्यानंतर बेकन, पोर्टा, डिजिस वगैरे शास्त्रज्ञांच्या ग्रंथांतून सांपडणा-या कांहीं उल्लेखांवरून त्यांस दुर्बिणीसारखें एखादें यंत्र माहीत असावें असा कित्येकांचा तर्क आहे. तथापि इ. स. १६०० च्या पूर्वी दुर्बिण अज्ञात होती; निदान तिचें व्यावहारिक महत्त्व पटलें नव्हतें ही गोष्ट मात्र खरी. दुर्बिणीच्या शोधाचें श्रेय लिपर्से, जॅनसेन आणि मेरिअस या तिघांपैकीं कोणाकडे द्यावयाचें हें अनिश्र्चित आहे. यांपैकीं कोणी तरी इ. स. १६०८ च्या सुमारास हॉलंडमध्यें दुर्बिणीचा शोध लावला ही गोष्ट मात्र खरी.
दुर्बिणीचा शोध लागल्यावर लवकरच तिचा प्रसार सर्व यूरोपभर झाला, व १६०९ सालीं गॉलिलिओ यास पदुआ येथें जी अध्यापकाची जागा मिळाली ती अध्यापकाची जागा मिळाली ती त्यानें केलेल्या एका दुर्बिणीमुळेंच होय असा समज आहे. गॅलिलिओ, प्रथम एक बाह्यगोल व एक अंतर्गोल अशीं दोन भिंगें (लेन्स) एका शिशाच्या नळीच्या दोन तोंडांत बसवून आपली दुर्बिण तयार करी. यानें आपलें सर्व आयुष्य दुर्बिणीची सुधारणा करण्यांत घालविलें व दृष्य पदार्थ तीन पटीपासून तेहेतीस पटीइतका मोठा दिसेल इतकी प्रगति त्यानें दुर्बिणींत केली. या सर्वांत मोठ्या दुर्बिणीनें गुरूचे उपग्रह, सूर्यावरील डाग, शुक्राच्या कला आणि चंद्रावरील पर्वत आणि द-या यांचा शोध लावला. तसेंच गुरूचे उपग्रह गुरूभोंवतीं फिरतात हें सिद्ध केलें आणि सूर्याची स्वत:च्या अक्षासभोवतीं गति सिद्ध करून कोपर्निकसच्या मतास पुष्टि दिली. गॅलिलिओच्या या शोधांमुळें या विशिष्ट तर्हेच्या दुर्बिणीस त्याचेंच नांव पडलें.
केप्लरनें दुर्बिणीमध्यें दोन्हीहि बाह्यगोल भिंगें वापरण्यापासून कांहीं विशिष्ट फायदे आहेत असें दाखविलें व अशा तर्हेची दुर्बिण सीनर यानें प्रथम तयार केली. अशाच तर्हेची विशेष महत्दर्शक शक्तीची दुर्बिण हायगेंझ यानें आपल्या भावाच्या मदतीनें तयार केली. अशा तर्हेच्या बारा फूट केंद्रांतराच्या दुर्बिणीनें त्यानें शनीचा सर्वांत तेजस्वी उपग्रह (टायटन) १६५५ सालीं शोधून काढला, व शनीच्या कड्याचें स्पष्टीकरण प्रसिद्ध केलें. परंतु या दुर्बिणीनें दिसणारी प्रतिमा गॅलिलिओच्या दुर्बिणीइतकी स्पष्ट दिसत नाहीं व महत्वदर्शकता वाढविण्यास केंद्रांतर वाढवावें लागतें. अशा तर्हेच्या ३०० फुटांपासून ६०० फूटांपर्यंत केंद्रांतर असणा-या दुर्बिणी औझौत वगैरेंनीं तयार केल्या. व जेम्स ब्रॅड्ले यानें एका दोनशेसवाबारा फूट केंद्रातराच्या दुर्बिणीनें शुक्राचा व्यास मोजला. या दुर्बिणीला नळी वापरीत नसत. त्यामुळें’तीस हवादुर्बिण’असें म्हणत. परंतु या दुर्बिणींचा उपयोग करणें फार त्रासदायक असे.
परावर्तक दुर्बिण- न्यूटननें निरनिराळ्या रंगांच्या प्रकाशांच्या वक्रीभवनामध्यें फरक असतो हें सिद्ध करून दाखवीपर्यंत दुर्बिणींतून दिसणा-या दृश्यामध्यें भिंगाच्या वक्रतेपासून उद्धवणा-या चुकीपेक्षां इतर चूक असण्याचा संभव असेल अशी शास्त्रज्ञांस कल्पना नव्हती, ग्रेगरी यानें असें दाखविलें कीं, भिंगांचे वक्र जर गोलीयच्छेदांत असतील तर त्यांतून पडणारी प्रतिमा मूळ पदार्थाच्या बाजूला थोडीशी अंतर्वक्र असते. परंतु ही चूक शंकुच्छेदीय वक्रतेचीं भिंगें तयार करून दुर्बिण करतां आली नाहीं व परावर्तक दुर्बिण प्रथम बनविण्याचें श्रेय न्यूटनला मिळालें. त्याच्या मतें वक्रीभवनात्मक दुर्बिणींतील चूक भिंगाच्या गोलच्छेदीय वक्रतेमुळें होत नसून भिन्न रंगाच्या प्रकाशांच्या भिन्न वक्रीभवनामुळें होत असली पाहिजे. त्यानें अनेक प्रयोग करून प्रथम हें ठरविलें कीं, कोणत्याहि रंगाच्या प्रकाशाच्या किरणाचा आपातकोन परावृत्ता कोनाबरोबर असतो. यावरून त्यानें कथील व तांबें यांच्या मिश्र धातूची दुर्बिणींतील परावर्तकाच्या ठिकाणीं योजना करण्याचें अनेक प्रयोगांनंतर ठरविलें. न्यूटनच्या पहिल्याच दुर्बिणींतून त्याला गुरूचे उपग्रह व शुक्राच्या कला पाहतां आल्या. यानंतर या दुर्बिणींत जॉन हॅड्ले यानें प्रगति करून स. १७२३ मध्यें, सहा इंच मुख व ६२ ५/८ केंद्रांतर असून धातूचा परावर्तक घातलेली अशी २३० पट महतदर्शक दुर्बिण तयार केली हॅड्ले यानें ही युक्ति ब्रॅड्रले व मोलिनो यांस सांगितली. त्यांनीं अनेक दुर्बिणी तयार केल्या व त्यांपैकीं कांहीं फारच महतदर्शक होत्या. व एकीचें केंद्रांतर अवघें ८ फूट होतें. मोलिनो याजपासून ही युक्ति स्कालेंट आणि हर्न या दोन लंडनमधील चष्मे करण्यार्यांस मिळाली व त्यांनीं व्यापारी धोरणानें दुर्बिणी करण्यास सुरवात केली. तथापि ग्रेगरीच्या शोधास व्यावहारिक स्वरूप् देण्याचें कार्य एडिंबरो येथील शार्ट यानें केलें. हा आपल्या दुर्बिणींत प्रथम कांचेचे परावर्तक वापरीत असे पण पुढें तो धातूचे वापरूं लागला. यानें ग्रेगरी पद्धतीच्या अनेक दुर्बिणी तयार केल्या व पुष्कळ संपत्ति मिळविली. याच्या कांहीं दुर्बिणी अद्यापिहि चांगल्या स्थितींत आहेत.
निर्वर्ण दुर्बिणी:- चेस्टर मूर हॉल यानें असें पाहिलें कीं, मनुष्याच्या डोळ्याला असलेल्या भिंगांतून त्याच्या विशिष्ट आकारामुळें अशा तर्हेनें किरणांचें वक्रीभवन होतें कीं, नेत्रांत: पटलावर पूर्णपणें निर्वर्ण प्रतिमा पडते. त्याअर्थी अनेक भिन्न भिन्न वक्रीभवनशक्तींच्या भिंगांची एकत्र योजना करून हाच परिणाम कृत्रिम रीतीनें घडवून आणतां येणें शक्य आहे. अनेक प्रयोगांतीं व अनेक प्रकारचीं भिंगें योजून वक्रीभवनामुळें उद्धवणारी चूक घालवितां येते असें त्यास आढळून आलें व १७३३ सालीं पूर्णपणें निर्वर्ण प्रतिमा पाडणारी दुर्बिण त्यानें बनविली. परंतु हॉलनें या शोधाचा कांहींच उपयोग करून घेतला नाहीं. व हा शोध डोलंड यानें स्वतंत्र रीतीनें पुन्हां लावला. यानंतर विल्यम हर्षेल यानें निरनिराळे परावर्तक तयार करण्यांत बरेच परिश्रम करून तीन अतिशय उत्तम अशा दुर्बिणी तयार करून आपले ज्योतिषशास्त्रांतील अत्यंत महत्त्वाचे शोध लावले. या परावर्तक दुर्बिणीमुळें शुद्ध व पूर्णपणें सम घटक अशीं कांचेचीं प्रचंड भिंगें तयार करण्यास जी मोठी अडचण पडत असे ती दूर झाली. आतां थोडक्यांत यांपैकीं कांहीं दुर्बिणींची माहिती देऊं.
वक्रीभवनात्मक दुर्बिण:- या दुर्बिणींत पदार्थांच्या बाजूला एक बाह्यगोल भिंग बसविलेलें असून त्यांतून त्या पदार्थाची लहानशी प्रतिमा पडते. ती डोळ्याजवळ असलेल्या अंतर्गोल अगर बाह्यगोल भिंगांमुळें आपणांस मोठी होऊन दिसते. जेव्हां डोळ्याजवळच्या भिंगांचा व पदार्थाकडील भिंगांचा अक्ष एकाच रेषेंत असतो आणि दोहींकडील भिंगांचें केंद्र एकाच ठिकाणीं येतें त्यावेळीं पदार्थाकडील कांचेंतून येणारे समांतर किरण डोळ्याकडील भिंगांतूनहि समांतरच बाहेर पडतात, व त्यांचें डोळ्यांतील भिंगामधून जातांना केंद्रीकरण होऊन पदार्थाची प्रतिमा नेत्रांत: पटलावर पडते. जरी दृक्षास्त्रीय कांचा तयार करण्यामध्यें ब-याच सुधारणा झाल्या आहेत तरी १७५८ सालीं डोलंड ज्या तर्हेच्या क्राउन व गारेच्या कांचा वापरीत असे त्याच तर्हेच्या जवळ जवळ आजहि मोठाल्या वक्रीभवनात्मक कांचा दुर्बिणींतून वापरण्यांत येतात. क्राउन कांच व गारेची कांच यांतून येणा-या सूर्यकिरणांचा विछिन्न किरणपट निरनिराळा असतो ही गोष्ट अनेक दिवसांपासून परिचित आहे. गारेच्या त्रिपार्श्र्वीतून येणारा विच्छिन्नकिरणपट निळ्या बाजूला ओढल्यासारखा दिसून तांबड्याबाजूकडे आवळल्यासारखा दिसतो, व क्राउन कांचेचा याच्या उलट असतो. या दोषास उत्सर्जनदोष असें म्हणतात. अलीकडे हा उत्सर्जन दोष अतिशय अल्प असणा-या कांचा तयार होऊं लागल्या आहेत. परंतु अद्यापहि पूर्वीच्याच कांचा प्रचारांत आहेत. डोळ्याजवळील कांच अशा तर्हेची असली पाहिजे कीं, तिच्यांतून येणारी प्रमिमा पूर्णपणें सपाट पडली पाहिजे.
न्यूटननें आपल्या परावर्तक दुर्बिणींत योजलेल्या परावर्तकांमध्यें अलीकडे पुष्कळच फरक झाला आहे. चांदी, निकल, जस्त इत्यादि अनेक धातूंचें मिश्रण परावर्तकाकरितां वापरण्यांत येतें. तथापि चार भाग तांबें व एक भाग कथील किंवा २५२ भाग तांब्यास ११७.८ कथील हें मिश्रण सर्वांत उत्तम ठरलें आहे. या धातूचा परावर्तक कठिण व ठिसूळ असून त्यावर अतिशय उत्तम जिल्हई देतां येते. अलीकडे कांचेवर चांदीचा पत्रा बसवून तयार केलेले परावर्तक विशेष प्रचारांत येऊं लागलें आहे.
दुर्बिण तयार झाल्यावर ती बसविणें ही गोष्टहि महत्त्वाची आहे. ती मुळींच हलतां कामा नये, व तिला पाहिजे तशी वळवितां येऊन पाहिजे त्या दृश्यपदार्थाकडे सहज लावतां आली पाहिजे. जेव्हां दुर्बिणींनें दीर्घकालीन फोटो घ्यावयाचे असतात तेव्हां तिची गति पृथ्वीच्या दैनंदिन गतीबरोबर अगर दृश्य पदार्थाबरोबर ठेवतां आली पाहिजे. सध्यांच्या प्रचलित पद्धतीमध्यें इक्किटोरियल किंवा विषुववृत्तीय पद्धत सर्वांत उत्तम समजली जाते. हींत पृथ्वीच्या अक्षाशीं समांतर असा एक अक्ष बसविलेला असून त्याला धु्रवाक्ष (पोलर ऍक्सिस) असें म्हणतात व दुसरा त्याच्याशीं काटकोन करणारा अक्ष बसविलेला असून त्यास क्रांत्यक्ष (डेक्लिनेशन ऍक्सिस) असें म्हणतात. या अक्षाशीं दुर्बिणीची नळी काटकोन करून बसविलेली असते. या पद्धतीचेहि सहा निरनिराळे प्रकार आहेत ते असे:-
(अ) यामध्यें ध्रुवाक्षाचीं आवणें (बेअरिंग्ज) टोंकांशीं असतात व क्रांत्यक्ष धु्रवाक्षाच्या दोन्ही टोंकास जोडलेल्या आवरणावर बसविलेला असतो. दुर्बिण क्रांत्यक्षाच्या एका टोंकास जोडलेली असून दुस-या टोंकास तोल सांभाळण्याकरितां वजन लावलेलें असतें.
(आ) हींत ध्रुवाक्ष वरीलप्रमाणेंच बसविलेला असतो व दुर्बिण क्रांत्यक्षाच्या आवणांत बसविलेली असून धु्रवाक्षाशीं समांतर असते.
(इ) ध्रुवाक्षाचें वरील आवण वाढवून त्यांत क्रांत्यक्ष बसविलेला असतो. दुर्बिण क्रांत्यक्षाच्या एका टोंकांशीं बसविलेली असून दुस-या टोंकास वजन लाविलेलें असतें.
(ई) ध्रुवाक्षाच्या वरील टोंकाजवळचें आवण वाढवून त्याला एक चिमटा जोडून त्यांत क्रांत्यक्ष बसविलेला असतो आणि दुर्बिण क्रांत्यक्षाच्या आवणांच्या दरम्यान बसविलेली असते.
(उ) ध्रुवाक्षाच्या आवणामध्यें दुर्बिणीचें डोळ्याकडील भिंग बसविलेलें असतें आणि दुर्बिणीच्या अक्षाचा बराचसा भाग धु्रवाक्षाशीं समांतर असतो.
(ऊ) दुर्बिण ही स्थिर असून तिच्या अक्षाच्या दिशेनें एका बाह्य आरशावरून दृश्यपदार्थांपासून येणारे किरण परावर्तित करून पाठविले जातात.

0
Answer link
दूरबीनचा शोध हान्स लिपरशे (Hans Lippershey) या डच चष्मा बनवणाऱ्या व्यक्तीने 1608 मध्ये लावला.
त्यांनी लेन्स वापरून वस्तू मोठी दिसेल, असे उपकरण बनवले.
गॅलिलिओ गॅलीली यांनी या दुर्बिणीचा वापर करून खगोलशास्त्रात महत्वाचे शोध लावले.
अधिक माहितीसाठी: