भूगोल सामान्य ज्ञान जलाशय

महाराष्ट्रातील सर्वात मोठा तलाव कोणता?

3 उत्तरे
3 answers

महाराष्ट्रातील सर्वात मोठा तलाव कोणता?

3



Home  Travel

Travelबुलढाणा

लोणार एक चमत्कारिक जलाशय….

By

 माझा विदर्भ

 -

January 24, 2016

2

1362

    

(बुलढाणा प्रतिनिधी : चंचलेश जाधव)–

पर्यटनाच्या नावावर आपण जगभरातल्या पर्यटन स्थळांना शोधत असतो, त्यासाठी वाट्टेल तेवढे पैसेही मोजतो. पण आपल्याच राज्यात काही असे पर्यटन स्थळ आहेत ज्यांना बघायला विदेशी पर्यटक देखील येतात. आम्ही असचं एक पर्यटन स्थळ आपल्यासाठी घेऊन आलो आहे. जिथे तुम्हाला विज्ञान, निसर्ग आणि संस्कृती या तिघांचाही मेळ बघायला मिळेल.
‘लोणार विवर’, महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवर म्हणजे सुमारे पन्नास हजार वर्षांपूर्वी उल्कापाताने जो प्रचंड खड्डा पडला त्यातून निर्माण झालेला एक चमत्कारिक जलाशय. जागतिक कीर्तीचा हा लोणार सरोवर जागतिक पातळीवरचा तिसऱ्या क्रमांकाचा सरोवर आहे.लोणार या ठिकाणी एका मोठ्या आकाराचा अशनी पाषाण आढळून तेथे १८०० मीटर्स रुंदीचे व १७० मीटर्स खोलीचं एक ‘विवर’ तयार झालं. या विवराच्या ठिकाणी सध्या एक नयनरम्य असं खा-या पाण्याचं सुंदर सरोवर तयार झालं आहे. या सरोवराचं भूगर्भशास्त्रीय सर्वेक्षण सर्वप्रथम १८२३ मध्ये सी.जे.ई. अलेक्झांडर यांनी केलं आणि त्यांनी आपल्या पृथक्करणात हे सरोवर उल्कापातामुळे निर्माण झाल्याची नोंद केली. १८२३ पर्यंत सर्व लोकांचा असा समज होता, की या सरोवराच्या जन्माचा संबंध ज्वालामुखीचा उद्रेक असावा. जगात अशा प्रकारचे केवळ तीन सरोवर असल्या कारणाने ‘नासा’ ने देखील या सरोवराची दखल घेतली.
प्राचीनात या सरोवराचा उल्लेख ‘विराजतीर्थ’ किंवा बैरजतीर्थ असा केला जात असे. सत्ययुगात लोणार सरोवर वैरज तीर्थ या नावाने ओळखले जात असे. लोणासुराच्या कथेनुसार विष्णूने लोणासुराचा वध केला व या सरोवराच्या खोलगट भागात त्याचे दफन करण्यात आले. त्याच्या रक्तापासून सरोवरातील पाणी तयार झाले, अशी आख्यायिका आहे.
औरंगाबाद शहरापासून १५० कि.मी. अंतरावर बुलढाणा जिल्ह्यात असणाऱ्या या सरोवराच्या एका बाजूस स्वच्छ पाण्याची अखंड वाहणारी धार (झरा) असून त्या धारेचा उगम गंगे पासून झाल्याचे भाविक मानतात. तर दुसऱ्या बाजूस देवीचे मंदिर आहे. याशिवाय येथे सीताना हिनी व रामगया असे दोन झरे आहेत. या परिसरात अंदाजे बाराशे वर्षांपूर्वीची मंदिरे आहेत.त्यातील १५ मंदिरे विवरातच आहेत. सरोवरासोबतच या शहरात अद्यापही उभ्या असलेल्या पुरातन अशा वास्तू आहेत. या सर्व मंदिरांचं बांधकाम हेमाडपंती पद्धतीने केलेलं आहे. त्यासोबतच लोणार सरोवराला त्याच्या आजूबाजूला लाभलेल्या निसर्गामुळे अभयारण्याचा दर्जा देण्यात आला आहे.
उल्कापातासारख्या आकस्मिक घटनेतून लोणारसारखे महाविशाल सरोवर निर्माण होणे, हा त्या काळच्या भाविक लोकांना परमेश्वरी चमत्कार वाटला नाही तरच नवंल.पण आजच्या विज्ञान युगात असा विचार करण्याबरोबर वनस्पती व प्राणी यांच्या वैविध्यपूर्ण विपुलतेने सजलेला लोणार सरोवराचा विज्ञानाच्या भूमिकेतून अभ्यास देखील केला जातो. असंख्य जातींचे प्राणी, पक्षी आणि वनस्पती यांचं लोणार हे माहेरघर आहे. मोर, हरणं, सरडे, काळे करकोचे, लाल रंगाच्या टिटव्या, घुबड, खारी, सहस्र पाद कीटक, लंगूर माकडं इत्यादी प्राणी तेथे आढळून येतात. तर सीताफळ, बाभळी, कडूनिंब, निलगिरी, बांबू, ताग, राम फळ इत्यादी विविध जातींची झाडं देखील तेथे आहेत.
लोणार परिसराचे पाच विभाग होतात. पहिला म्हणजे उल्कापातामुळे झालेल्या विवराच्या बाहेरचा प्रदेश, मग त्याचा उताराचा भाग, मग तिसरा तळाचा सपाट भाग, चौथा सरोवराच्या भोवतालीचा दलदलीचा भाग आणि पाचवा व शेवटचा भाग म्हणजे सरोवर. सरोवराच्या पाण्यातील क्षाराचं प्रमाण अती उच्च असून ते दहा ते साडे दहा पी. एच. एवढ आहे. त्यात कोणताही जीव जगूच शकत नाही. सरोवराजवळ राज्य वन खात्याने परिसरात ताग, निलगिरी, फणस, आंबा, माड, इत्यादी अनेक झाडं लावून त्यांची निगा राखली आहे.
उत्तर लिहिले · 13/8/2018
कर्म · 1295
0
महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण कोयना धरण आहे.
उत्तर लिहिले · 18/4/2022
कर्म · 0
0

महाराष्ट्रातील सर्वात मोठा तलाव शिवसागर तलाव आहे.

हा तलाव कोयना जलविद्युत प्रकल्पाचा भाग आहे आणि कोयना नदीवर बांधलेल्या धरणाने तयार झाला आहे.

इतर माहिती:

  • സ്ഥळ: सातारा जिल्हा
  • ક્ષમતા: ११६ टीएमसी (TMC)

संदर्भ:

  1. विकिपीडिया - कोयना जलविद्युत प्रकल्प
उत्तर लिहिले · 19/3/2025
कर्म · 1080

Related Questions

मृत समुद्राची माहिती मिळेल का?
जगातील सर्वात मोठा जलसाठा कोणता आहे?
महाराष्ट्रातील कोणता जिल्हा तळी व तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो? महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात सर्वात जास्त तलाव आहेत?
चांदोली धरणाच्या जलाशयाचे नाव काय आहे?
महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक तळी आहेत?
जगातील सर्वात मोठा जलसाठा कोणता?
उजनी धरणाच्या जलाशयाचे नाव काय?