संशोधन शोध तंत्रज्ञान

वाफेवर चालणाऱ्या इंजिनाचा शोध कोणी लावला?

5 उत्तरे
5 answers

वाफेवर चालणाऱ्या इंजिनाचा शोध कोणी लावला?

5
वाफेवर चालणार्‍या आगगाडीचा जनक म्हणून जेम्स वॅट यांना ओळखले जाते. जेम्स वॅट लहानपणी अतिशय आळशी होता, असे त्याच्या न बोलण्यामुळे तरी वाटत होते. तो स्वयंपाकघरातत्याच्या आत्याबरोबर बसलेला असताना, विस्तवावर एका किटलीमध्ये पाणी उकळत होते. त्या पाण्याची वाफ किटलीच्या तोंडातून बाहेर पडत होती. जेम्स त्या वाफेवर एकदा कप व एकदा चमचा धरत होता व तो कप व चमचा वाफेच्या जोराने कसा खालीवर होतो, याचे निरीक्षण करत होता. त्याच्या आळशीपणाबद्दल त्याची आत्या नेहमीच कानउघाडणी करत असे. एकदा योगायोगाने जेम्सच्या कॉलेजच्या प्रयोगशाळेतील न्यूमनचे मॉडेल इंजिन जेम्सकडे दुरुस्तीला आले. इंजिन दुरुस्त करताना जेम्सच्या लक्षात आले, की हे इंजिन फक्त थोडाच वेळ काम देण्याच्या योग्यतेचे आहे. विचार केल्यावर त्याच्या ध्यानात आले, की न्यूमनचा बॉयलरफार लहान आहे. ज्यात दट्ट्या असतो त्या सिलिंडराच्या घनफळाच्या ३-४ पट वाफ असली, तरच तिच्यामार्फत दट्ट्या सिलिंडराच्या टोकापर्यंत लोटला जाऊ शकेल, असे त्यांना दिसून आले. अशा रीतीने या इंजिनात वाफ मोठ्या प्रमाणात वाया जाते, हे त्यांच्या लक्षात आले. न्यूमनच्या इंजिनमधील खाली-वर होणारा दांडा (दट्ट्या) जेव्हा खाली ओढला जाई, तेव्हा त्या सिलिंडरमधील पंपरॉड (दांडा) वर उचलला जाई. जेम्सने एका सिलिंडरमधील वाफ पंपाने दुसर्‍या सिलिंडरमध्ये नेऊन त्या सिलिंडरवर गार पाण्याचा मारा केला व त्या वाफेचे बाष्पीभवन करून, पोकळी निर्माण करायची असे ठरवले. त्यामुळे खर्च व वेळ वाचला. दोन सिलिंडरमध्ये त्याने एअरपंप बसवला. पुढे जेम्सने या इंजिनमध्ये पुष्कळ सुधारणा केल्या.
उत्तर लिहिले · 10/8/2018
कर्म · 2825
0
वाफेवर चालणाऱ्या इंजिनाचा शोध कोणी लावला ?
उत्तर लिहिले · 18/8/2022
कर्म · 0
0

जेम्स वॅट यांनी वाफेवर चालणाऱ्या इंजिनाचा शोध लावला.

जेम्स वॅट हे स्कॉटिश संशोधक आणि अभियंता होते. त्यांनी 1763 ते 1775 दरम्यान वाफेवर चालणाऱ्या इंजिनात सुधारणा केल्या. त्यांच्या सुधारणांमुळे इंजिन अधिक कार्यक्षम बनले आणि औद्योगिक क्रांतीला चालना मिळाली.

पहिला वाफेवर चालणारा इंजिन टॉमस न्यूकोमन यांनी 1712 मध्ये बनवला.

अधिक माहितीसाठी:

उत्तर लिहिले · 19/3/2025
कर्म · 2580

Related Questions

क्रांतीचा शोध कोणी लावला?
एडिसन ने विजेचा शोध लावण्यासाठी केलेल्या प्रयत्न तुमच्या शब्दात लिहा?
एडिसनने विजेचा शोध लावण्यासाठी केलेले प्रयत्न तुमच्या शब्दांत लिहा?
वास्को द गामा कोणत्या देशाचा दर्यावर्दी होता?
जोशेप स्वान कोण होते?
सन 1498 मध्ये भारतात येणारा पोर्तुगीज खलाशी कोण?
चाकाचा शोध मानवाच्या कोणत्या काळात लागला?