2 उत्तरे
2 answers

धातू म्हणजे काय?

1
सहजतेने इलेक्ट्रॉन देऊन धन (+) आयनतयार करणारी मूलद्रव्ये. 




■व्याख्या

धातूंची व्याख्या ही काही वेळा त्यांना प्राप्त असलेल्या घनभारीत रेणूंचा पुंजका व सुट्टे इलेक्ट्रॉन या वरुन केली जाते. धातू हे साधारणपणे ३ प्रकारात मोडतात. त्याचा प्रकार हा त्यांची आयोनायझेशन होऊ शकण्याची क्षमता. त्यांचे पुंजक्यांचे वैशिठ्य यावर ठरते. पिरियॉडिक टेबल वर त्यांना साधारणपणे बोरॉन व पोलोनियम मधील रेषेवर जे मुलद्र्व्ये आहेत ते धातूंना अधातूंपासून वेगळे करतात.

अजून दुसऱ्या व्याख्ये मध्ये अशी मूलद्र्व्ये जी सहजतेने इलेक्ट्रॉन देऊन धन (+) आयनतयार करतात.

अजून एका व्याख्येनुसार धातूंच्या इलेक्ट्रॉन बांधणीत त्यांचा वाहक बँड (conduction band) व व्हेल्न्स बँड ( valence band) हा एकमेकांना झाकून (overlap) टाकतो .


■धातूंचे गुण

साधारणत: धातू हे चमकदार, जास्त घनतेचे, पातळ पत्रा बनविता येण्याजोगे, लांब तार बनविता येण्याजोगे, उच्च विलयबिंदू असणारे, कठीण, वीज, उष्णता यांचे सुवाहक असतात.

■धातूंचे प्रकार

अल्क धातू

अल्कमृदा धातू

धातू (ट्रान्जिशन धातू)

पोस्ट ट्रान्जिशन धातू

लँथानॉईड

ऍक्टिनॉईड

■प्रमुख धातू


लोखंड

सोने

चांदी

ॲल्युमिनियम

निकेल

तांबे

झिंक

क्रोमियम

शिसे

उत्तर लिहिले · 30/7/2018
कर्म · 123540
0
metal म्हणजे काय ते इथे स्पष्ट केले आहे:

धातू (Metal): धातू एक रासायनिक घटक आहे जो सहजपणे इलेक्ट्रॉन गमावून सकारात्मक आयन (cation) तयार करतो आणि धातू बंध तयार करतो.

धातूंचे गुणधर्म:

  • चमक (Luster): धातूंना नैसर्गिकरित्या चकाकी असते.
  • कठोरता (Hardness): धातू साधारणपणे कठोर असतात, पण काही मऊ देखील असतात.
  • तन्यता (Ductility): धातूंना तार बनवण्याची क्षमता असते.
  • वर्धनीयता (Malleability): धातूंना हातोड्याने मारून पातळ पत्रे बनवता येतात.
  • विद्युत चालकता (Electrical Conductivity): धातू विद्युत आणि उष्णतेचे चांगले वाहक असतात.
  • उच्च ঘনত্ব (High Density): धातूंची घनता जास्त असते.
  • उच्च द्रवणांक आणि उत्कलनांक (High Melting and Boiling Points): धातूंचे द्रवणांक आणि उत्कलनांक उच्च असतात.

उदाहरण: लोखंड, तांबे, सोने, चांदी, अल्युमिनियम

उत्तर लिहिले · 19/3/2025
कर्म · 2480

Related Questions

धातुके म्हणजे काय?
कथील हा कोणत्या धातूपासून बनलेला संमिश्र आहे?
गन मेटल हा मिश्र धातू कोणत्या घटकांपासून तयार होतो?
जस्त धातूच्या समिश्रांपासून कोणत्या कलाकृती तयार होतात?
स्टीलमधील मिश्र घटक?
धातूची भांडी आणि धातूच्या विविध वस्तू?
रेशमी धागे कोणत्या धातूने बनवले जातात?