पावसाबद्दल निबंध मिळेल का?
पाउसाची सुरुवात रोमहर्शक असते. आधी कडाक्याचा उन्हाळा पडतो. पेपरमधल्या वृत्तपत्रात बातम्या येउ लागतात. 'उन्हाळा कमी होता की काय म्हणून आता पावसाने मारलेली आहे' अशी बातमी तर नेमीच असते (‘दडी’ हे लिहायचे राहिले ते कंसात लिहिले आहे ). सबंध आसमंत वातानुकुलित झालेला असल्याने खूप धूळफेक होत असते. (‘वात’ म्हणजे वारा हे कालच कोरडे सरानी शिकवले. कधी कधी ते ‘पोरांनी वात आणलाय ह्या’ असे म्हणतात त्याचा अर्थ मात्र कळत नाही.) अशा हवामानात सर्व पक्षी कोकीलकूजन करायचे थांबवून झाडांमधे गुपत होतात. काळे ढग जमल्यामुळे आकाशात थेटरमधे उशिरा गेल्यावर असतो तसा काळाकुट्ट अंधार होतो व मधेच डोअर किपरने लखकन बॅटरी मारावी तशी वीज चमकून जाते. सगळीकडे शेतकरी आभाळाला डोळे लावून बघत असतात आणि शेतकरण्या त्यांच्याकडे बघत असतात. अशा मंगल वातावरणात वरूण राजाचे आग मन होते.
भारतात पाउस अंदमान येथे बनतो. तो वळत वळत केरळ गावात आणि तिथून वळत वळत पुणे शहरात येतो. म्हणूनच त्याला वळीव म्हणतात किंवा काहीजण वळवाचा पाउस ही म्हणतात. (आम्ही समोरच्या गोगटे काकाना त्यांच्यासमोर 'काका' आणि इतर काळी 'तात्या विनचू' म्हणतो तसेच हेही दोन सन्मानार्थी शबद आहेत)
काल पुण्याच्या शहराच्या आत पाउस पडला. पुणे हे प्राचीन व प्रेकशणीय शहर आहे. तिथे शिन्दे छत्री, शनिवारवाडा, सिटी प्राईड, पर्वती, काकडे मॉल अशी पर्यटन स्थळे आहेत. ह्यातल्या काही ठिकाणी घरचे लोक मला रविवारी पर्यटनाला नेतात.
काल पाउसाबरोबर गाराही पडल्या. गोगटे काकानी बराचश्या जमवून त्यांच्या घरच्या माठात टाकल्या. ते कुठलीही फुकट गोशट वाया घालवत नाईत.
अंत्या आतिशय बावळट आहे. तो बाबांचे हेलमेट घालून गारा वेचायला आला होता. मग मीही छतरी घेऊन गेलो. पण छतरी उलटी करुन गारा वेचल्याने ती फाटली. समोरच्या मंगूने नवीन शरटं घातला होतान तर तसाच भिजायला आला आणि चिखलात घसरून पडला. (तो घरी गेल्यावर त्याच्या कानफाट नावाच्या अवयवावर त्याच्या बाबानी निरघुण प्रहार केले ते त्याना अजिचबात शोभत नाही.) एका दिवसात मंगूला एव्हढे मोठे गालगुंड कसे झाले हा प्रश्न वर्गात दुस़ऱ्या दिवशी सर्वाना पडला.
असा हा रोमहर्शक रुतु मला आतिचशय आवडतो
पावसावर निबंध
पाऊस हा निसर्गाचा एक अनमोल घटक आहे. तो केवळ जीवनासाठीच नव्हे, तर पृथ्वीवरील प्रत्येक सजीवासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. पाऊस म्हणजे आकाशातून पडणारे पाणी, जे आपल्या जीवनाला आधार देते.
पावसाचे महत्त्व
- शेतीसाठी आवश्यक: पाऊस शेतीसाठी अत्यंत आवश्यक आहे. भारतीय शेती मोठ्या प्रमाणावर पावसावर अवलंबून असते. योग्य वेळी आणि पुरेसा पाऊस झाला, तरच धान्य, फळे आणि भाज्यांचे उत्पादन चांगले होते.
- पाण्याची उपलब्धता: पाऊस नद्या, तलाव आणि विहिरी भरतो, ज्यामुळे आपल्याला पिण्यासाठी आणि इतर कामांसाठी पाणी उपलब्ध होते.
- पर्यावरणाचे संतुलन: पाऊस पर्यावरणाचे संतुलन राखतो. तो हवामानाला थंड ठेवतो आणि प्रदूषण कमी करतो.
- वनस्पती आणि प्राणी जीवन: पाऊस वनस्पती आणि प्राणी जीवनासाठी आधार आहे. जंगले आणि वने पावसाच्या पाण्यावरच वाढतात, ज्यामुळे अनेक प्राण्यांना आश्रय मिळतो.
पावसाळ्याचे वर्णन
पावसाळा सुरू झाला की, निसर्गात एक नवचैतन्य निर्माण होते. जमिनीतून येणारा सुगंध, ढगांचा गडगडाट आणि विजांचा लखलखाट हे पावसाळ्याचे वैशिष्ट्य आहे. मोर नाचू लागतात, बेडूक डराव-डराव करतात आणि पक्षी किलबिलाट करतात.
अतिवृष्टी आणि दुष्काळ
अतिवृष्टीमुळे पूर येतात आणि त्यामुळे शेती आणि मालमत्तेचे मोठे नुकसान होते. तर, काहीवेळा पाऊस न पडल्यामुळे दुष्काळ पडतो, ज्यामुळे पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होते आणि शेतीत नुकसान होते.
पावसाचे संरक्षण
- पावसाचे पाणी वाचवण्यासाठी उपाय करणे आवश्यक आहे.
- पाणी साठवण तलाव आणि बंधारे बांधावेत.
- वृक्षारोपण करून जंगले वाढवावीत.
- पाण्याचा वापर जपून करावा.
पाऊस हा जीवनाचा आधार आहे, त्यामुळे त्याचे महत्त्व जाणून त्याचे संरक्षण करणे हे आपले कर्तव्य आहे.