कायदा जात प्रमाणपत्र

जात पड़ताळणी कागदपत्रे कोणती लागतात?

Caste Validity साठी सर्व प्रथम www.barti.maharashtra.in/ccvis या वेबसाईटवर जाऊन सर्च करा.! त्यावर गंभीरपणे फॉर्म भरून घ्या..त्यावर चुका होणार नाहीत याची काळजी घ्या..! ऑनलाईन फॉर्म भरताना ही कागदपत्रे सोबत असावीत..!  तुमचे जातीचे प्रमाणपत्र, तुमच्या रक्तातील नात्यातील जातीचे प्रमाणपत्र, आधार कार्ड, नोकरीसाठी असेल तर नोकरीचे ऑर्डर , त्या ऑफिसचे लेटर  अथवा कॉलेजसाठी असेल तर (फक्त 12 वी. विज्ञान शाखेसाठीच लागू आहे ) शैक्षणिक प्रमाणपत्र, प्रिन्सिपलचे लेटर, कुटुंबाची वंशावळ जोडावी  आणि महत्वाचा म्हणजे जातीचा सर्वात जुना पुरावा जोडावा, (पण सध्या ही अट शाशन रद्द करणार आहे पण जो परियन्त शाशन निर्णय येणार नाही त्याबद्दल काही सांगता येणार नाही) हे प्रमाणपत्र न निघण्याचे कारण म्हणजे अनेक जाणाकडे हा जुना पुरावा उपलब्ध नसतो..! ऑनलाईन फॉर्म भरून वरील सर्व कागदपत्रे सोबत जोडून आपल्या संबंधित जिल्ह्यातील सामाजिक न्याय विभागात submit करावे (जात वैधता पडताळणी समिती) त्यांच्याकडून तशी रीतसर पावती घ्यावी..!

धन्यवाद...!
सब का मंगल हो..!!
1 उत्तर
1 answers

जात पड़ताळणी कागदपत्रे कोणती लागतात?

16
—————————————————————————————————————————                                     जात पडताळणी

उच्च शिक्षणासाठी स्कॉलरशिप,आरक्षणासाठी पात्र दर्शवण्यासाठी,निवडणुकीतील आरक्षण,नोकरीसाठी इ. आवश्यक असते.१२ वी विज्ञान शाखेतील विद्यार्थी,निवडणुकीतील उमेदवार व नोकरवर्ग व्यक्ती यांचे जातपडताळणी प्रस्ताव सम्बन्धित कार्यालयातून पाठविले जातात.

विहित नमुन्यातील अर्ज जो काटेकोरपणे उमेदवाराचा मोबाईल नंबर,वडिलांचा मोबाईल नंबर सह भरणे आवश्यक आहे.उमेदवाराचा प्राथमिक शाळेचा शाळा सोडल्याचा दाखला.उमेदवाराचा जातीचा ओरिजनल दाखल.वडिलांचा प्राथमिक शाळेचा शाळा सोडल्याचा दाखला.वडिलांचा जातीचा दाखला उपलब्ध असल्यास.आजोबांचा शाळा सोडल्याचा दाखला नसल्यास गाव नमुना क्र.१४ उतारा जन्म मृत्यू नोंदीचा दाखला.अर्जदाराच्या कुटुंबातील वडील,मुलगा,मुलगी,भाऊ,बहिण,यांची जात प्रमाणपत्र पडताळणी झाली असल्यास त्या प्रमाणपत्राची झेरॉक्स प्रत.जर वडिलांचा शाळा सोडल्याचा दाखलयात किंवा जन्म मृत्यू दाखल्यात जातीचा उल्लेख नसेल तर अर्जदाराचे काका,आजोबा,आत्या,पंजोबा,खापर पंजोबा,यांचे जातीचे स्पष्ट नोंद आहे अस प्राथमिक शाळा सोडल्याचे किंवा जन्म मृत्यूचे दाखले.नाते संबंध सिद्धतेसाठीमहसुली पुरावे ज्यात ७/१२ उतारा,वारसनोंद,वाटणीनोंद,हक्काचे पत्रक,फेरफार नोंद,कडईपत्रक.१०० रुपयाच्या स्टँपवरील वंशावळ मुळप्रत जोडावी.व१०० रुपयाच्या स्टँपवरील अर्जदाराचे वैयक्तिक प्रतिज्ञापत्र मूळप्रत जोडावे.नाव आडनाव यात बदल असल्यास राजपत्र अथवा प्रतिज्ञापत्र जोडावे.अर्जासोबत जोडलेली कागदपत्रे हि सम्बन्धित अधिकाऱ्यांनीच दिलेली आहे असे प्रतिज्ञापत्र सोबत जोडावे.अर्जदाराने सादर केलेले दस्तऐवज मोडी लिपीतील असतील तर मोडीमधील दस्तऐवजाचे शासनमान्यता प्राप्त मोडी वाचकाकडून मराठीत रुपांतर करून तसे प्रतिज्ञापत्र स्टँप पेपरवर करावे. व मूळप्रत जोडावी.
उत्तर लिहिले · 18/7/2018
कर्म · 35170

Related Questions

झापाचीवाडी गावचा पोलीस पाटील कोण?
कोणत्याही गावातील चोरीचा बैल दुसऱ्या गावात कोणी विकत घेतलेला असल्यास, त्याविषयी त्या गावच्या सरपंचाला पोलीस स्टेशनला बोलावले जाऊ शकत का? व त्यांना स्वतःचे खर्चे करून जावे लागेल का? काय प्रोसिजर असते ते सांगा?
माझ्या गावात स्टोन क्रेशर मशीन आहे, तरी त्यांना ग्रामपंचायत कर लागू आहे. त्यांना ग्रामपंचायतीतर्फे विनंती अर्ज करून कर पट्टी भरायला सांगितली, तरी त्यांनी ती न दिल्यास काय प्रोसिजर करावी लागेल?
31 वर्षांपूर्वी मोठ्या भावाने भावांचे (आनेवारी) वाटप अर्ज करून केलेले आहे. फेरफार तसाच आहे आणि त्यानुसार वहिवाट चालू आहे. 15 वर्षांनंतर चुलत भावांनी गट वाटप (रजिस्टर) केले. परगावी 2 एकर जमीन मोठ्या भावाच्या नावे होती, ती खराब जमीन डोंगरपड होती. वारसा हक्काने मिळालेल्या जमिनीच्या वाटणीवरून चुलत भावांमध्ये वाद होत आहेत, तर ते वाटप कायद्याने परत होऊ शकेल का?
शेजारच्याने जागा न सोडता अनधिकृत बांधकाम करून आमच्या बाजूने खिडक्या ठेवल्या आहेत, याची तक्रार कुठे करून न्याय मिळवावा?
मी आणि माझी पत्नी, दोन मुले व वडील असा ५ व्यक्तींचा परिवार आहे. वडिलांच्या नावे जमीन, राशनकार्ड व सर्व काही वडिलांच्याच ताब्यात आहे. ते आम्हाला जमीन व राशनमधील काहीही देत नाहीत. त्याकरिता, मला माझे राशन वेगळे मिळेल का किंवा राशनकार्ड वेगळे करू शकतो का?
मला माझा मुलगा, सून कोणीही सांभाळ करण्यास तयार नाही. जमीन सर्व त्यांच्या नावावर आहे. माझ्याजवळ काहीही नाही आणि रेशन कार्ड पण त्यांच्या नावाचे आहे. त्यामध्ये माझे पण नाव आहे, पण त्यामधील धान्य ते मला देत नाही. त्याकरिता मला त्यांच्या रेशनमधून नाव कमी करून स्वतःचे राशन मिळू शकेल का?