कागदपत्रे
जात व कुळे
प्रक्रिया
सामाजिक न्याय
जात प्रमाणपत्र
जात पडताळणी दाखला काढण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात (cast NT-B)?
2 उत्तरे
2
answers
जात पडताळणी दाखला काढण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात (cast NT-B)?
21
Answer link
Caste Validity साठी सर्व प्रथम www.barti.maharashtra.in/ccvis या वेबसाईटवर जाऊन सर्च करा.! त्यावर गंभीरपणे फॉर्म भरून घ्या..त्यावर चुका होणार नाहीत याची काळजी घ्या..! ऑनलाईन फॉर्म भरताना ही कागदपत्रे सोबत असावीत..! तुमचे जातीचे प्रमाणपत्र, तुमच्या रक्तातील नात्यातील जातीचे प्रमाणपत्र, आधार कार्ड, नोकरीसाठी असेल तर नोकरीचे ऑर्डर , त्या ऑफिसचे लेटर अथवा कॉलेजसाठी असेल तर (फक्त 12 वी. विज्ञान शाखेसाठीच लागू आहे ) शैक्षणिक प्रमाणपत्र, प्रिन्सिपलचे लेटर, कुटुंबाची वंशावळ जोडावी आणि महत्वाचा म्हणजे जातीचा सर्वात जुना पुरावा जोडावा, (पण सध्या ही अट शाशन रद्द करणार आहे पण जो परियन्त शाशन निर्णय येणार नाही त्याबद्दल काही सांगता येणार नाही) हे प्रमाणपत्र न निघण्याचे कारण म्हणजे अनेक जाणाकडे हा जुना पुरावा उपलब्ध नसतो..! ऑनलाईन फॉर्म भरून वरील सर्व कागदपत्रे सोबत जोडून आपल्या संबंधित जिल्ह्यातील सामाजिक न्याय विभागात submit करावे (जात वैधता पडताळणी समिती) त्यांच्याकडून तशी रीतसर पावती घ्यावी..!
धन्यवाद...!
सब का मंगल हो..!!
धन्यवाद...!
सब का मंगल हो..!!
0
Answer link
जातीचा दाखला (Cast Certificate) NT-B मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे खालीलप्रमाणे आहेत:
नोंद:
- अर्जदाराचेdocuments कागदपत्रे:
- आधार कार्ड
- पॅन कार्ड (असल्यास)
- रेशन कार्ड (असल्यास)
- शाळा सोडल्याचा दाखला (School Leaving Certificate)
- जन्माचा दाखला (Birth Certificate)
- प्रतिज्ञापत्र (Affidavit)
- वडिलांचे कागदपत्रे:
- आधार कार्ड
- जात प्रमाणपत्र (Cast Certificate)
- नोकरी करत असल्यास नोकरीचा दाखला
- आजोबांचे कागदपत्रे:
- शाळा सोडल्याचा दाखला (School Leaving Certificate)
- जात प्रमाणपत्र (Cast Certificate) (असल्यास)
- मालमत्तेचे कागदपत्र (Property document) (असल्यास)
- इतर कागदपत्रे:
- ग्रामपंचायत / नगर पालिका प्रमाणपत्र
- वंशावळ (Family tree)
नोंद:
- अर्जदाराच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याकडे NT-B जातीचा दाखला असल्यास, अर्जदाराला दाखला मिळवणे सोपे होते.
- अधिक माहितीसाठी, तुम्ही तुमच्या जवळील सेतू केंद्र किंवा तहसील कार्यालयात संपर्क साधावा.