शब्दाचा अर्थ कायदा वकील कायदेशीर व्याख्या

वकील म्हणजे काय आणि त्याची व्याख्या काय?

2 उत्तरे
2 answers

वकील म्हणजे काय आणि त्याची व्याख्या काय?

8
वकील (इंग्रजी: Lawyer/ लॉयर) हा लोकांना कायदेशीर बाबींमध्ये मार्गदर्शन करतो. कायद्याचा (लॉ) अभ्यास केलेल्या व्यक्तींना इंग्रजीत लॉयर म्हणतात. वकील हे विविध प्रकारचे असतात. ते कोणत्याही एका विषयात तज्ज्ञ असू शकतात. जसे, बिझनेस लॉयर, कमर्शियल लॉयर, अॅडमिनिस्ट्रेटिव्ह लॉयर, कॉन्ट्रॅक्ट लॉयर, कन्स्ट्रक्शन लॉयर, टॅक्स कन्सल्टंट, प्राॅपर्टी लॉयर इत्यादी.

भारतातील उच्च किंवा सर्वोच्च न्यायालयात वकिली करणाऱ्याला अॅडव्होकेट म्हणतात. इंग्लंडमधील बॅरिस्टरची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या वकिलाला बॅरिस्टर म्हणतात.

भारतामध्ये अॅडव्होकेट्स अॅक्ट, १९६१ नुसार जी व्यक्ती सन्मानीय उच्च न्यायालयामध्ये प्रॅक्टिस करण्यासाठी पात्र असते तिलाअॅडव्होकेट म्हटले जाते. आणि ज्याच्याकडे कायद्याची (लॉ) पदवी आहे त्याला लॉयर म्हणले जाते. अॅडव्होकेट्स अॅक्ट, १९६१ मध्ये अॅडव्होकेट या संज्ञेशिवाय न्यायालयात वकिली करणाऱ्यांसाठी वेगळा शब्द वापरला जात नाही.
उत्तर लिहिले · 8/7/2018
कर्म · 123540
0
वकील म्हणजे कायद्याची पदवी घेतलेली व्यक्ती, जी लोकांना कायदेशीर सल्ला आणि न्यायालयात प्रतिनिधित्व पुरवते.
व्याख्या:
  • वकील हा कायद्याचा अभ्यास करून त्याची परीक्षा उत्तीर्ण झालेला असतो आणि त्याला न्यायालयात खटले चालवण्याचा परवाना असतो.
  • वकील आपल्या अशिलांच्या (clients) वतीने न्यायालयात युक्तिवाद करतात, कागदपत्रे सादर करतात आणि कायदेशीर प्रक्रियेत मदत करतात.
  • वकील लोकांना कायदेशीर सल्ला देतात, करारादे तयार करतात आणि इतर कायदेशीर बाबींमध्ये मार्गदर्शन करतात.
वकिलाची भूमिका:
  • कायदेशीर सल्ला देणे
  • न्यायालयात प्रतिनिधित्व करणे
  • दस्तऐवज तयार करणे
  • समझौता वाटाघाटी करणे
वकिलाचे प्रकार:
  • दिवाणी वकील (Civil Lawyer)
  • फौजदारी वकील (Criminal Lawyer)
  • कंपनी वकील (Corporate Lawyer)
  • घटनात्मक वकील (Constitutional Lawyer)
उत्तर लिहिले · 18/3/2025
कर्म · 1080

Related Questions

प्रयोजनार्थ म्हणजे काय?
पंचायत होणे अर्थ?
परिशिष्ट म्हणजे काय?
निरंतर लावण चिठ्ठी म्हणजे काय?
व्यर्थ ठराव म्हणजे काय? कोणतेही तीन व्यर्थ ठराव लिहा.
व्यर्थ ठराव स्पष्ट करा?
उभयतांनी म्हणजे काय?