2 उत्तरे
2
answers
सर्वे म्हणजे काय?
7
Answer link
सर्व्हे म्हणजे आढावा घेणे,पाहणी करणे,माहीती घेणे,माहीती मिळवणे.उदाहरणार्थ:- एव्हरेडी कंपनी जी घड्याळात घालण्याचे, खेळण्यात घालण्याचे वगैरेचे सेल बनवते.कंपनी एका महीन्याला समजा घड्याळात घालण्याच्या सेलचे पन्नास कोटी उत्पादन करते.हे सर्व उत्पादन विकले जाते.आता कंपनी आपले उत्पादन दुपटिने वाढवण्याचा विचार करते.परंतु विचार करण्याप्रमाणे लगेच उत्पादन वाढवत नाही.कारण इतरही तीन चार कंपन्यासुद्धा अशा सेलचे उत्पादन करून विकत असतात.अशावेळी वाढीव उत्पादन विकले जाइल की नाही हे अजमावण्यासाठी किंवा विकले जाण्यासाठी कंपनी आपल्या मार्केटिंग डिपार्टमेंट मधून काहीजणाना या कामासाठी नेमते व सर्व्हे करते.किंवा एकाद्या मार्केटिंग एजन्सीला सरव्हे करण्याचे काँन्ट्रँक्ट देते.सर्व्हे म्हणजे जनमत अजमावणी.तर सर्व्हेसाठी आवश्यकतेनुसार पन्नास शंभर माणसांची टिम बनवली जाते.या टिममधील माणसे वेगवेळ्या एरियात जाऊन लोकांशी प्रत्यक्ष संपर्क साधून त्यांना या सेलविषयी (बनवलेल्या प्रश्नावलीनुसार) त्यांचे मत विचारते, हे सेल आवडतात की नाही, का आवडतात/ आवडत नाही, दुसऱ्या कंपनीचे सेल वापरता का/ का वापरता, आपल्या सेलबद्दल समाधानी आहात की नाही ,सेलमधे काही सुधारणा हवी असे वाटते का, इत्यादी प्रश्न विचारून एक अहवाल बनवला जातो.या अहवालावरून कंपनी ठरवते की विचार केल्याप्रमाणे उत्पादन वाढवावे की नाही, की उत्पादन थोडेसे वाढवावे, आपली विक्री जास्त होण्यासाठी दुसऱ्या कंपनीची विक्री कशी कमी होईल याची योजना कशी आखावी, त्यासाठु किमत करावी की काही स्किम काढावी जेणेकरून आपल्या सेलची विक्री वाढेल.अशाप्रकारे विचार करून कंपनी काही निर्णयाप्रत पोहोचते.पण कंपनी निर्णयाप्रत कशामुळे पोहोचली याचे कारण म्हणजे कंपनीने घेतलेल्या आढाव्यावरून/केलेल्या पाहणीवरून/मिळवलेल्या माहीतीवरून म्हणजेचे केलेल्या सर्व्हेवरून.
0
Answer link
सर्वेक्षण म्हणजे विशिष्ट उद्दिष्टांसाठी माहिती गोळा करण्याची एक पद्धत आहे.
सर्वेक्षण (Survey) म्हणजे काय?
सर्वेक्षण म्हणजे लोकांकडून माहिती गोळा करण्याची एक पद्धत आहे. हे विशिष्ट उद्दिष्टांसाठी केले जाते.
सर्वेक्षणाचे काही प्रकार:
- जनगणना: संपूर्ण लोकसंख्येची माहिती गोळा करणे.
- नमुना सर्वेक्षण: लोकसंख्येच्या एका लहान गटाकडून माहिती गोळा करणे.
- मत सर्वेक्षण: निवडणुकीत कोणाला किती मते मिळतील याचा अंदाज घेण्यासाठी केलेले सर्वेक्षण.
सर्वेक्षणाचे फायदे:
- समाजाच्या गरजा व समस्या समजून येतात.
- धोरणे आणि योजना बनवण्यासाठी उपयुक्त माहिती मिळते.
- लोकांच्या मनात काय आहे हे जाणून घेता येते.