व्यक्तिमत्व व्यक्ती इतिहास महाराष्ट्राचा इतिहास

शाहू महाराजांचा मृत्यू कधी झाला व कसा?

2 उत्तरे
2 answers

शाहू महाराजांचा मृत्यू कधी झाला व कसा?

11
छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचा जन्म २६ जून
१८७४ रोजी कागलच्या जहागीरदार घाटगे
घराण्यातील जयसिंगराव आणि राधाबाई ह्या
दांपत्याच्या पोटी झाला. त्यांचे पूर्वाश्रमीचे नाव
यशवंतराव होते. चौथ्या शिवाजीं राजांच्या
अकाली निधनानंतर ते १७ मार्च १८८४ रोजी
कोल्हापूरच्या गादीवर दत्तक गेले.

१९१९ साली छत्रपती शाहू महाराजांच्या
सामाजिक कार्याचा गौरव म्हणून कानपूर येथे कुर्मी क्षत्रिय सभेने त्यांना ‘ राजर्षी‘ पदवी बहाल केली.

त्यांच्या कार्यामुळे दलित-पतितांचा उद्धारक,
रयतेचा राजा म्हणून त्यांची प्रतिमा जनसामान्यात निर्माण झाली. या राजाने अज्ञानी बहुजन समाजाला जागृत करण्याचे व्रत अखेरपर्यंत सांभाळले.

अखेरच्या दिवसांत द्वितीय चिरंजीव शिवाजी
यांच्या अपघाती निधनाने ते खचून गेले, तशातच मधुमेहाने ते ग्रासले होते. अखेर मुंबई येथे ६ मे १९२२ रोजी वयाच्या अवघ्या अठ्ठेचाळीसाव्या वर्षी हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्यानंतर त्यांचे पुत्र
राजाराम महाराज कोल्हापूरच्या गादीवर आले.

उत्तर लिहिले · 25/6/2018
कर्म · 26370
0

छत्रपती शाहू महाराज यांचा मृत्यू ६ मे १९२२ रोजी झाला.

मृत्यू कसा झाला:

  • शाहू महाराजांना मधुमेह (Diabetes) होता.
  • मधुमेहामुळे त्यांचे शरीर कमजोर झाले होते.
  • अखेरीस ६ मे १९२२ रोजी मुंबई येथे त्यांचे निधन झाले.

संदर्भ:

उत्तर लिहिले · 18/3/2025
कर्म · 1040

Related Questions

जिवा महाले यांची वंशावळ?
धनंजय मुंडेंवर आरोप करणारा रणजीत कासले कोण आहे?
धावजी पाटील यांच्याबद्दल माहिती?
पुण्यातील दीनानाथ मंगेशकर दवाखाना व भाऊसाहेब खिलारे यांचा काय संबंध आहे?
भाऊसाहेब खिलारे पुणे कोण आहेत?
भाऊसाहेब खाणारे, पुणे कोण आहेत?
भूषण गगराणी कोण आहेत?