उपकरणे
तंत्रज्ञान
ग्याझेट करणे म्हणजे काय आहे?
मूळ प्रश्न: मला नावात बदल करावयाचा आहे, तरी तो कसा करावा व नावात बदल करण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे आवश्यक आहेत, याविषयी मार्गदर्शन मिळेल का?
यासाठी तुम्हाला नावात बदलाचे शासकीय राजपत्र(गॅजेट) करून घ्यावे लागेल. ही सुविधा आता पूर्णपणे ऑनलाईन झाली आहे.
ऑनलाईन नाव बदल प्रक्रिया करण्यासाठी खालील स्टेप्स पहा:
१. https://dgps.maharashtra.gov.in/ या लिंकवर क्लीक करा
२. नंतर ऑनलाईन सेवा या सेक्शनखाली "नावात बदल करणे" या लिंक वर क्लीक करा.

३. नंतर तुमचे अकाउंट तयार करा
४. पुढे येणारी सर्व माहिती भरा.
५. रेशनकार्ड़,शाळेचा दाखला, आधार कार्ड, लग्नाचे सर्टिफिकेट, लग्न पत्रिका, तसेच संबंधित डॉकुमेंट्सच्या स्कॅन फाईल्स जवळ असुद्या आणि योग्य रकान्यात अपलोड करा.
६. नंतर इंटरनेट बँकिंग वापरून ऑनलाईन फी भरा. (उत्तर लिहिते वेळी फी ३५० रुपये).
७. १५ दिवसात नाव बदलाचे गॅजेट तयार होईल.
हा पुरावा वापरून तुम्ही तुमच्या सध्याच्या कागदपत्रात (जसे कि पासपोर्ट, आधार कार्ड, राशन कार्ड, पण कार्ड, इत्यादी.) बदल करू शकता. यात मात्र वेळ आणि पैसे जातील याची नोंद घ्यावी.
1 उत्तर
1
answers