कायदा जिल्हा जात व कुळे पंचायत समिती पंचायत राज

पेसा कायदा म्हणजे काय आणि तो कशाशी संबंधित आहे?

2 उत्तरे
2 answers

पेसा कायदा म्हणजे काय आणि तो कशाशी संबंधित आहे?

13
पंचायत विस्‍तार (अनुसूचित क्षेत्र) अधिनियम 1996 (पेसा) हा कायदा २४ डिसेंबर १९९६ रोजी अस्तित्वात आला. या कायद्या अंतर्गत देशातील एकूण १० राज्यांचा समावेश होतो. त्यामध्ये- १) महाराष्ट्र २) गुजरात ३) आंध्र प्रदेश ४) मध्यप्रदेश ५) झारखंड ६) ओरिसा ७) छत्तिसगड ८) हिमाचल प्रदेश ९) राजस्थान १०) तेलंगाना या राज्यांनाच पेसा हा कायदा लागू आहे. तसेच, महाराष्ट्र राज्यातील एकूण १३ जिल्हे - १) अहमदनगर २) पुणे ३) ठाणे ४) पालघर ५) धुळे ६) नंदुरबार ७) नाशिक ८) जळगाव ९) अमरावती १०) यवतमाळ ११) नांदेड १२) चंद्रपूर १3) गडचिरोली यांना पेसा हा कायदा लागू आहे.

हा कायदा अनुसूचित क्षेत्रातील आदिवाशी लोकांशी संबंधित असून आदिवाशींची संस्कृती, प्रथा, परंपरा यांचे जतन व संवर्धन करणे व ग्रामसभेच्या माध्यमातून आदिवाशींची स्वशासन व्यवस्था बळकट करणे हे पेसा या कायद्याचे प्रमुख सूत्र आहे. या कायद्यान्वये अनुसूचित क्षेत्रातील ग्रामसभेस अनुसूचित क्षेत्राबाहेरील ग्रामसभेपेक्षा म.ग्रा.पं. अधिनियम १९५८, कलम ५४ ने विशेष अधिकार देण्यात आले आहेत. ------------------------------------------------------------------------------------------

पंचायत विस्‍तार (अनुसूचित क्षेत्र) अधिनियम 1996 (पेसा)

महाराष्‍ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्‍तारित करण्‍याबाबत)

नियम 2014 बाबत

पेसा (पंचायत विस्‍तार अनुसूचित क्षेत्र अधिनियम 1996 ) नाशिक विभागातील पाच जिल्‍हयातील अनूसूचित क्षेत्रातील खालील तालुक्‍यामध्‍ये लागू आहे.

नियम 2014 मधील महत्‍वाच्‍या तरतुदी

नियम (10) ग्रामसभेच्‍या स्‍थायी समित्‍या, (शांतता, मादकद्रव्‍य, नियंत्रण, न्‍याय साधन संपत्‍ती नियोजन व व्‍यवस्‍थापन )नियम (14) ग्रामसभाकोषनियम (18) शांतता समितीनियम (21) साधन संपत्‍ती नियोजन व व्‍यवस्‍थापन समितीनियम (23) भु व्‍यवस्‍थापन गांवाच्‍या भू अभीलेखे योग्‍य अचूक नोंदी आहे का ?  याचा आढावा घेणे / धनकोच्‍या जमीन गहाण संबंधातील सर्व प्रकरणाची माहिती ग्रामसभेसमोर ठेवावी.नियम (24) जमीनीचे अन्‍य संक्रमणास प्रतिबंध 
MLRC Code 1966 मधील तरतुंचा भंग करून व्‍यवहार झाला असल्‍याची ग्रामसभेची खात्री झाल्‍यास त्‍याचा तपशिल नमुद करून ठराव सक्षम अधिका-याकडे पाठवेल.नियम (25) अन्‍य संक्रमण केलेली जमीन परत करण्‍याचा ठराव सक्षम अधिका-याकडे पाठविणेनियम (26) (2) भुसंपादन व पुर्नवसन बाबत शिफारसनियम (28) जलस्‍त्रोत नियोजन व व्‍यवस्‍थापननियम (28) जलस्‍त्रोत नियोजन व व्‍यवस्‍थापननियम (32) गौण खनिज लिलाव व पटटा देण्‍यापूर्वी ग्रामसभेची शिफारस अनिवार्यनियम (36) मादक द्रव्‍य पदार्थाचे विनियमननियम (37) नविन दारू / मादक पदार्थ निर्मीती करीता परवानगी घ्‍यावी लागेलनियम (40)  Excise Dept. ला कोणत्‍याही वर्षी दारूचे दुकान चालू ठेवण्‍यासाठी सभेकडे प्रस्‍ताव दयावा लागेल.
दारू दुकाने बंदचा ग्रामसभेस अधिकारनियम (41) गौण वनोत्‍पादन व्‍यवस्‍थापन ग्रामसभेकडे ( कापणी / निविदा / विक्री )नियम (43) बाजारावर नियंत्रणनियम (44) सावकारी व्‍यवहार नियंत्रण समितीनियम (45) लाभार्थी निवड ग्रामसभेमार्फतनियम (46) योजना / प्रकल्‍प यांना मान्‍यतानियम (48) निधी वापर प्रमाणपत्र ग्रामसभेस अधिकार

पेसा कायदयाच्‍या अनुषंगाने मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1959 मध्‍ये करण्‍यात आलेल्‍या सुधारणा 54 (A)

ब  योजना / प्रकल्‍प / कार्यक्रम हाती घेताना ग्रामसभा मान्‍यता

क  निधी विनयोग प्रमाणपत्र ग्रामसभेला मान्‍यतेने

ड  लाभार्थी निवड

ई  मादक द्रव्‍य विक्री / सेवन प्रतिबंध

फ  गौण वनोत्‍पादन मालकी हस्‍तांतरण व महाराष्‍ट्र गौण वनोत्‍पादन (व्‍यापार विनयमन ) अधिनियम 1997 तरतुदीनुसार विक्री / व्‍यवस्‍थापन अधिकार

ग  अन्‍य संग्रमीत जमीन परत देण्‍यासाठी जिल्‍हाधिकारी यांना शिफारस

ह  मुंबई सावकार अधिनियम 1946 – सावकारी लायसनसाठी पंचायतीची शिफारस

जे     लघुजलसंचयाची योजना आखणे
के     बाजार स्‍थापन्‍याची परवानगी
एल    भुसंपादन / पुर्नवसन संदर्भात ग्रामसभेशी विचारविनिमय
एम    गौण खनिज परवाने / लिलाव विचार विनिमय

(माहिती संकलित)

स्पर्धा परीक्षेच्या उत्तरासाठी खालील दुव्याला टिचकी द्या...
https://mpscofficerss.blogspot.com/2017/10/blog-post_11.html?m=1
उत्तर लिहिले · 19/6/2018
कर्म · 458560
0

पेसा कायदा (PESA Act):

पेसा कायदा, म्हणजे पंचायत (अनुसूचित क्षेत्रांवरील विस्तार) अधिनियम, 1996. हा कायदा २४ डिसेंबर १९९६ रोजी लागू करण्यात आला.

हा कायदा भारतीय संविधानाच्या अनुच्छेद २४३ (एम) चा भाग आहे.

कशाशी संबंधित आहे:

  • हा कायदा अनुसूचित क्षेत्रातील लोकांसाठी आहे.
  • ग्रामसभांना अधिकार देणे, जेणेकरून ते स्वतःच्या विकासाचे निर्णय घेऊ शकतील.
  • नैसर्गिक संसाधनांचे व्यवस्थापन करण्याचा अधिकार ग्रामसभांना मिळवुन देणे.
  • रूढी आणि परंपरांचे जतन करण्याचा अधिकार आदिवासी समुदायांना देणे.
  • ग्रामसभांच्या सहभागातून विकास योजना तयार करणे.

उत्तर लिहिले · 18/3/2025
कर्म · 1040

Related Questions

73 व्या घटनादुरुस्तीने नगरपालिकांना घटनात्मक दर्जा दिला?
पंचायत राज व्यवस्था कशाला म्हणतात?
पंचायत राज पद्धतीचे जनक कोण?
कोणती समिती महाराष्ट्रात पंचायत राजशी संबंधित नाही?
भारताच्या संविधानातील कोणत्या घटनादुरुस्तीमुळे पंचायत राज संस्था आणि नगरपालिकांमध्ये महिलांना आरक्षण देण्यात आले?
पंचायतींना कितव्या घटनादुरुस्तीने घटनात्मक दर्जा प्राप्त झाला?
जनतेतून निवडून आलेल्या सरपंचाने स्वखुशीने राजीनामा दिला तर पुढील कार्यकाळासाठी सरपंच निवड कशी केली जाते?