7 उत्तरे
7 answers

प्रारब्ध म्हणजे काय?

13
मनुष्य त्याच्या आयुष्यात असंख्य कर्मे करतो. त्या सर्व कर्मांचे परिणाम हळूहळू साठत जातात. ज्याप्रमाणे दरमहा ठराविक रक्कम बँकेत भरल्यास ती आपल्या खात्यात जमा होत राहते व खात्याचा बॅलेंस वाढत जातो, अगदी तसेच, मनुष्याने केलेली कर्मे हळूहळू साठत जातात. कर्मफलाच्या खात्यातील या बॅलेंसला ‘संचित’ असे म्हणतात. मनुष्य जसे जसे कर्म करत जातो, तसतसे त्या कर्मफलांचे रुपांतर संचितात होत जाते व त्याचा बॅलेंस वाढत जातो. भारतीय तत्त्वविचारानुसार, या संचितात मनुष्याची जन्मोजन्मीची कर्मे साठवलेली असतात. संचिताचे भोग एकदम भोगणे शक्य नसते. यातील काही भोग आनंददायी तर काही दुःखद असतात. त्यामुळे कर्मफलांचे हे भोग मनुष्यास क्रमाक्रमाने भोगावे लागतात. संचितापैकी ज्या कर्मांचे भोग भोगण्यास प्रारंभ होतो, त्यास ‘प्रारब्ध’ असे म्हणतात. संचित म्हणजे कर्मफलांचा महासागर आहे, तर प्रारब्ध म्हणजे किनाऱ्यावर येणाऱ्या लाटा. अथांग सागरातील जे पाणी प्रवाही होऊन किनाऱ्यावर प्रकट होतं, त्याला आपण लाटा म्हणतो. त्याप्रमाणे, संचितातील असंख्य कर्मफलांपैकी जी फले भोगण्यासाठी प्रकट होतात, त्यांस प्रारब्ध म्हणतात.

कर्माचे काही परिणाम असे असतात कि ते तत्क्षणीच भोगावे लागतात. त्यास ‘क्रियमाण’ असे म्हणतात. उदाहरणार्थ, तापलेल्या तव्याला हात लावल्यास हात भाजतो. केलेल्या कर्माचे फल तिथल्या तिथे भोगावे लागते. हे झाले क्रियमाण. यासोबतच, संचिताच्या पेढीतील ज्या कर्मफलांचे भोग प्रारब्ध होऊन मनुष्य वर्तमानकाळी भोगत असतो, त्याचाही समावेश क्रियमाणात होतो. संचित म्हणजे महासागर, प्रारब्ध म्हणजे लाटा व क्रियमाण म्हणजे किनाऱ्यावर उभ्या असणाऱ्या मनुष्याच्या पायाला त्या क्षणी स्पर्श करणारे लाटांचे पाणी. थोडक्यात, संचित म्हणजे कर्मांचा भूतकाळ, प्रारब्ध म्हणजे वर्तमानकाळ, तर क्रियमाण म्हणजे चालू वर्तमानकाळ.

मर्सिडीज मध्ये मालकिणीच्या मांडीवर बसून तुच्छतेने बाहेरच्या जगाकडे पाहणारा टॉमी तर या उलट गल्लीबोळात भुंकून भुंकून हाडांचा सापळा झालेला स्ट्रीट डॉग ... आता दोन्हीही तस म्हणाल तर श्वानचं पण एक मर्सिडीज मध्ये तर एक रस्त्यावर…याला प्रारब्ध नाही तर काय म्हणणार..

निसर्गाच्या नंदनवनात स्वच्छंद विहार करणारे पोपटांचे थवे… तर त्यांच्यातले काही जन्मा पासूनचं पिंजऱ्यात जीवन कंठणारे ....
यालाच प्रारब्धच म्हणतात..
उत्तर लिहिले · 15/6/2018
कर्म · 5060
6
यावर बरीच उत्तरे आलीत,मी एक व्यावहारिक उदाहरण देऊ इच्छितो,
कोणी एक मनुष्य एका कंपनीत काम करतो त्याचा महिन्याचा पगार एका बँकेत जमा होतोय,
,☢साठलेला पगार हे (संचित)
☢त्यातील काही रक्कम तो रोजच्या व्यवहारासाठी काढून घेऊन वापरतोय ते आहे (प्रारब्ध)
☢व आज तो जे कम्पनीत काम करतोय याचा जो पगार पुढे जमा होणार आहे ते (क्रियमान)
मला वाटतंय हे उदाहरण सर्वांनाच नक्की समजेल
🙏🙏🙏
उत्तर लिहिले · 14/6/2018
कर्म · 4635
0

प्रारब्ध म्हणजे आपल्या मागील जन्मांतील कर्मानुसार या जन्मात भोगावे लागणारे सुख-दु:ख.

अधिक माहितीसाठी:

उत्तर लिहिले · 18/3/2025
कर्म · 3060

Related Questions

नमन लल्लाटी, संसारासी साटी?
संसारेंसी साटी. अर्थ काय?
जन्म सोयर सुतक झाले असताना मी नित्य नियमानुसार हनुमान चालीसा पाठ करू शकतो का?
जन्म सुतक अगदी लांबच्या व्यक्तीकडील असेल तर श्राद्ध करावे की नाही?
गुरू दत्तात्रेयांचे २४ उपदेशक कोण आहेत?
मृत्यू दिनांक 8/07/2024 तर पितर कधी जेऊ घालावे?
2025 पितृ पक्ष कधी आहे?