शब्दाचा अर्थ

प्रबोधन युग म्हणजे?

4 उत्तरे
4 answers

प्रबोधन युग म्हणजे?

23
प्रबोधन युग म्हणजे काय?? 👇👇


प्रबोधनाची व्याख्या :-
*** डेव्हिस या इतिहासकाराच्या मते, "लोकांच्या स्वातंत्र्यवादी कल्पनांची मुक्त अभिव्यक्ती, म्हणजे" प्रबोधन"होय...


1) फ्रेंच विद्वान जुल्स मिलीकेत यांच्या मते, "जगाचा शोध, व '' माणसाचा शोध" या प्रबोधन काळातील दोन महत्वपूर्ण गोष्टी होत..

2) 'रेनेसान्स' या शब्दाचा अर्थ इंग्रजी अर्थ "प्रबोधन" होय. 'रेनेसान्स' या मूळ फ्रेंच शब्दाचा अर्थ 'पुनर्जन्म' किंवा 'पुनरूज्जीवन' असा होतो.

3) "प्रबोधन" म्हणजे जीवनाच्या सर्व क्षेत्रात झालेली प्रगती होय.

4) प्रबोधनामुळे धर्मसत्ता, राजसत्ता, अर्थव्यवस्था, समाजव्यवस्था, कला, साहित्य, विज्ञान, अशा विविध क्षेत्रांत प्रगती झाली.

5) मानवास श्रेष्ठत्व व सन्मान मिळून मानवतावादी नवधर्म वाढीस लागला.

6) वैज्ञानिक शोधामुळे मानवी जीवन सुखी व संपन्न झाले..

7) मानवामध्ये वास्तववाद, बुद्धिवाद, निसर्गवाद, वाढीस लागून आधुनिक युगाला सुरूवात झाली...
उत्तर लिहिले · 28/5/2018
कर्म · 77165
8
    युरोपीय इतिहासात मध्ययुगाचा अखेरचा टप्पा म्हणजे इसवी सनाचे 13 वे ते 16 वे शतक प्रबोधन युग म्हणून ओळखले जाते. या कालखंडात प्रबोधन, धर्मसुधारणा चळवळ आणि भौगोलिक शोध या घटनांमुळे आधुनिक युगाचा पाया घातला गेला. म्हणूनच या काळाला 'प्रबोधन युग'असे म्हणतात.
    प्रबोधनयुगात युरोपातील कला, स्थापत्य, तत्त्वज्ञान इत्यादी क्षेत्रात ग्रीक व रोमन परंपरांचे पुनरुज्जीवन घडून आले. यातूनच सर्वांगीण प्रगतीला चालना मिळाली.प्रबोधनकाळात मानवतावादाला चालना मिळाली. माणसाचा माणसाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. धर्म येवजी माणूस हा सर्व विचारांचा केंद्रबिंदू ठरला.प्रबोधन चळवळीने मानवी जीवनाची सर्वच क्षेत्रे व्यापून टाकली. ज्ञान, विज्ञान तसेच विविध कलांच्या क्षेत्रांत आपणांस प्रबोधन चळवळीचा अविष्कार पाहायला मिळतो. प्रबोधनकालीन कला व साहित्यामधून मानवी भावभावना आणि संवेदनाचे चित्रण होऊ लागले. लोकांना समजेल अशा प्रादेशिक भाषांमधून साहित्य निर्माण होऊ लागले.इ.स. 1450 च्या सुमारास जर्मनीच्या जोहान्स गुटेनबर्ग याने छपाई यंत्राचा शोध लावला. छपाई यंत्राचा शोध यामुळे नवे विचार,नव्या संकल्पना व ज्ञान समाजात सर्वांपर्यंत पोहोचू लागले....
उत्तर लिहिले · 23/7/2020
कर्म · 13290
0

प्रबोधन युग म्हणजे युरोपच्या इतिहासातील एक महत्त्वपूर्ण काळ होता, जो सुमारे 14 व्या शतकात सुरू झाला आणि 17 व्या शतकापर्यंत चालला.

या युगात कला, साहित्य, विज्ञान आणि तत्त्वज्ञानात मोठे बदल झाले. मध्ययुगीन विचारांना आव्हान देण्यात आले आणि नवीन कल्पनांना प्रोत्साहन देण्यात आले.

प्रबोधन युगाची काही महत्त्वाची वैशिष्ट्ये:

  • मानवतावाद: मानवी क्षमता आणि मूल्यांवर लक्ष केंद्रित केले गेले.
  • विज्ञान आणि तर्क: वैज्ञानिक दृष्टिकोन आणि तर्कावर आधारित ज्ञानाला महत्त्व दिले गेले.
  • कला आणि साहित्य: या काळात उत्कृष्ट कलाकृती आणि साहित्य निर्माण झाले. लिओनार्डो दा विंची आणि मायकल एन्जोलो यांसारख्या कलाकारांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले.
  • शोध आणि संशोधन: नवीन भूभाग आणि मार्गांचा शोध लागला, ज्यामुळे जगाचा दृष्टिकोन बदलला.

या युगामुळे युरोपमध्ये मोठे सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय बदल झाले, ज्याचा प्रभाव जगभर पसरला.

उत्तर लिहिले · 18/3/2025
कर्म · 960

Related Questions

उत्पादन म्हणजे काय ?
नियुक्ति म्हणजे काय?
भाववाढ ही संकल्पना थोडक्यात स्पष्ट करा?
ज्ञान संपादनाची व्याख्या कोणती?
स्वयं अध्यायन म्हणजे काय?
ताम्रपट म्हणजे नेमके काय?
कथा म्हणजे काय ते सांगून कथेचे स्वरूप कसे स्पष्ट कराल?