औषधे आणि आरोग्य घरगुती उपाय आरोग्य व उपाय उपचार आरोग्य

मला गालगुंड झाले आहे कृपया काही उपाय सांगा?

2 उत्तरे
2 answers

मला गालगुंड झाले आहे कृपया काही उपाय सांगा?

16
गालफुगी ऊर्फ गालगुंड हा पॅरामिक्झोव्हायरस या विषाणूमुळे होणारा एक संसर्गजन्य आजार. हिवाळ्यात अन् वसंत ऋतूत याचे प्रमाण अधिक असते. सुदैवाने या आजाराचा प्रतिबंध करणारी ‘एमएमआर’ नावाची अत्यंत प्रभावी लस उपलब्ध आहे. या लसीच्या वापराने विकसित देशातून जवळजवळ हद्दपार होत चाललेला हा आजार आपल्याकडे मोठ्या प्रमाणात आढळतो. गालफुगी हा आजार छोट्या मुलापासून मोठ्या मुलांपर्यंत कुणालाही सहज होऊ शकतो. विशेषकरून शाळकरी मुलांत त्याचे प्रमाण अधिक असते. 5 ते 9 वर्षे वयोगटात सामान्यत: आढळणा-या या आजाराचे वैशिष्ट्य म्हणजे कानामागे असलेला पॅरोटीड नावाच्या लाळ तयार करणा-या ग्रंथीला येणारी सूज, हे आहे.
सुरुवात सर्दीने होते. थोड्याच दिवसात कानामागे सूज येते. एक ते दोन आठवड्यांपर्यंत हा आजार छळत राहतो. क्वचितप्रसंगी गालगुंडामुळे आरोग्याच्या गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात. श्रवणशक्ती कमी होणे, मेंदू किंवा हदय, मूत्रपिंडे किंवा सांध्यांना सूज येणे, या आजाराच्या गुंतागुंती होत. काही मुलांच्या टेस्टीजला सूज येऊ शकते. स्वादुपिंड सुजल्यास कमालीची पोटदुखी होऊ शकते. या आजाराचा फैलाव हवेमार्फत होत असतो. या आजाराचा संसर्ग झालेल्या रुग्णाच्या संपर्कात आल्याने त्याच्या श्वसनावाटे, शिंका, खोकला किंवा बोलण्यानेही हा आजार निरोगी मुलांना होतो. या आजाराची लक्षणे दिसून येण्यापूर्वी सुमारे आठवडाभर आधीच या आजाराला कारणीभूत ठरणारे विषाणू आढळतात, तर पॅरोटीड ग्रंथीला सूज आल्यापासून साधारणत: 7 दिवस हा रुग्ण इतरांना संसर्ग पोहोचवू शकतो. पण आजार होण्यापूर्वी 1-2 दिवस आणि सूज आल्यानंतर 5 दिवस या आजाराची बाधा दुस-यांना होण्याची शक्यता सर्वाधिक असते. कधी कधी या आजाराचा दुष्परिणाम थायरॉइड ग्रंथी, यकृत व स्त्रीबीज कोषावरही दिसून येतो. हे विषाणू शरीरात घुसल्यावर साधारणत: 12 ते 25 दिवसात या आजाराची लक्षणे दिसून येतात. या आजाराचे स्वरूप तसे सौम्य असले तरी कधी कधी त्यामुळे गंभीर गुंतागुंती होऊ शकतात.
 हा आजार झाल्यानंतर तो पूर्णपणे बरा होईपर्यंत मुलांना शाळेत न धाडणे श्रेयस्कर ठरते. मुलांनी आईवडील सांगतील ती डॉक्टरांनी दिलेली औषधी नियमितपणे घ्यावीत. पातळ अन्नपदार्थ, मीठ-साखर पाणी, सरबत असे द्रवपदार्थ थोडे थोडे पण खूप वेळा घ्यावेत. सूज आलेल्या भागावर बर्फाने शेकल्यास बरे वाटू लागते. विषाणूमुळे होणा-या या आजारावर निश्चित असे उपचार नाहीत. पण त्याचा प्रतिबंध करण्यासाठी एमएमआर ही लस मूल 15 महिन्यांचे झाल्यावर घेणे उत्तम.
उत्तर लिहिले · 15/9/2018
कर्म · 569265
0

गालगुंड (Mumps) हा एक विषाणूजन्य संसर्ग आहे जो लाळ ग्रंथींना (salivary glands) सूज आणतो. गालगुंडांवर कोणताही विशिष्ट उपचार नाही, परंतु लक्षणे कमी करण्यासाठी आणि गुंतागुंत टाळण्यासाठी आपण काही उपाय करू शकता:

घरगुती उपाय:

  • विश्रांती: पूर्णपणे आराम करा. यामुळे तुमच्या शरीराला संसर्गाशी लढण्यास मदत मिळेल.
  • भरपूर द्रव प्या: पाणी, ज्यूस किंवा सूपसारखे द्रव प्या. यामुळे डिहायड्रेशन टाळता येईल.
  • मऊ आणि गिळण्यास सोपे असलेले अन्न खा: खिचडी, दही, भात, उकडलेले बटाटे यांसारखे अन्न खा. लिंबूवर्गीय किंवा आंबट फळे खाणे टाळा, कारण त्यामुळे लाळ ग्रंथींमध्ये वेदना होऊ शकतात.
  • वेदना कमी करण्यासाठी: डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, वेदना कमी करण्यासाठी पॅरासिटामॉल (Paracetamol) किंवा आयबुप्रोफेन (Ibuprofen) घ्या.
  • गरम किंवा थंड compresses: सुजलेल्या भागावर गरम किंवा थंड पाण्याचा शेक घ्या.

डॉक्टरांना कधी भेटावे:

  • तीव्र डोकेदुखी
  • मान कडक होणे
  • चक्कर येणे
  • उलट्या होणे
  • ओटीपोटात दुखणे

प्रतिबंध:

  • गालगुंडांवर सर्वात प्रभावी प्रतिबंध म्हणजे MMR (Measles, Mumps, and Rubella) लस घेणे.

Disclaimer: हा सल्ला केवळ माहितीसाठी आहे आणि तो वैद्यकीय सल्ला म्हणून मानला जाऊ नये. कृपया आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

उत्तर लिहिले · 18/3/2025
कर्म · 5220

Related Questions

पुढील ग्रंथ वर्गीकरण प्रात्यक्षिक साहाय्यकारी कोष्टके व ड्युई डेसिमल वर्गीकरण पद्धतीनुसार कसे सोडवावे.1. औषधे 3. लोकसाहित्य 4. जैन धर्म आणि तत्त्वज्ञान?
स्पुटम कलेक्शनची इंग्रजी माहिती?
Sputum collectionब्लड रिलेटेड?
पीपीई म्हणजे काय?
आरोग्य संप्रेषण टिपा लिहा?
आरोग्य आणि लोकसंख्या कार्यक्रमांमध्ये माध्यमांचा प्रभाव स्पष्ट करा.
"swaduras che prakar?