शिक्षण शब्दाचा अर्थ स्वयं अध्ययन

स्वयं अध्ययन म्हणजे काय?

3 उत्तरे
3 answers

स्वयं अध्ययन म्हणजे काय?

14
स्वयंअध्ययन म्हणजे काय? अभ्यासासाठी दुसऱ्यावर अवलंबून न राहता स्वतःच विविध विषयांचा अभ्यास करणे, दुसऱ्याच्या नोटस्‌ अथवा बाजारपेठेतील रेडिमेड नोटस्‌ न हाताळता स्वतःच्या नोटस्‌ तयार करणे होय. या व्यतिरिक्त वार्षिक, सहामाही, मासिक व दैनंदिन अभ्यासाचे नियाजन करणे. आकलन, साठवण व वेळच्या वेळी उजळणी करून अभ्यासात रममाण होणे म्हणजे स्वयंअध्ययन पद्धतीचा वापर करणे होय. या पद्धतीमुळे तरुणाच्या सर्वांगीण उन्नतीच्या शक्‍यता बळावतात.

सुरुवातीला या पद्धतीसाठी वेळ लागत असला, तरी काही दिवसांनी याचे फायदेच अधिक वाट्याला येतात. आजकाल अनेक क्‍लासेसमुळे मुलांची स्वयंअध्ययनाची सवयच संपत चालली आहे. केवळ मार्कांच्या फूटपट्ट्या लावून आपण जगातील समृद्ध ज्ञान समजावून घेण्याचा प्रयत्न करतोय. केवळ घोकंपट्टीच्या तंत्राने बोलके पोपट तयार होत असतीलही; पण या समाजाला चिंतनशील, अनुभवसंपन्न व ज्ञानी अधिकाऱ्याची गरज आहे. त्यासाठीच आयोगाकडून बदलण्यात आलेल्या अभ्यासक्रमात आकलनाला अन्यन्यसाधारण महत्त्व दिले गेले आहे. या स्पर्धा परीक्षेत असाच विद्यार्थी स्वतःचे अस्तित्व निर्माण करू शकतो. ज्याच्याकडे एकलव्यासारखी तळमळ, स्वयंअध्ययनाची पद्धती आणि चिकाटी आहे.

उत्तर लिहिले · 25/5/2018
कर्म · 800
0
निबंध लेखनाचे महत्व सांगा
उत्तर लिहिले · 27/6/2022
कर्म · 0
0

स्वयं अध्ययन म्हणजे स्वतःहून शिकणे. ह्यामध्ये, व्यक्ती स्वतःच्या गतीने आणि आवडीनुसार शिक्षण घेते.

स्वयं अध्ययनाची काही वैशिष्ट्ये:

  • स्वतःच्या गतीने शिकणे: व्यक्तीला विषय समजून घेण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो.
  • आवडीनुसार निवड: शिकणारा स्वतःच्या आवडीचे विषय निवडू शकतो.
  • वेळेची बचत: क्लासरूममध्ये जाण्याची गरज नसते, त्यामुळे वेळ वाचतो.
  • जबाबदारी: स्वतःच्या शिक्षणाची जबाबदारी स्वतःवर असते.

स्वयं अध्ययन कसे करावे:

  • शिकण्यासाठी ध्येय निश्चित करा.
  • शिकण्याची योजना तयार करा.
  • शिकण्यासाठी योग्य साधने (पुस्तके, इंटरनेट, व्हिडिओ) वापरा.
  • वेळेचे व्यवस्थापन करा.
  • प्रगतीचा मागोवा घ्या.

स्वयं अध्ययनाचे फायदे:

  • आत्मविश्वास वाढतो.
  • समस्या सोडवण्याची क्षमता वाढते.
  • नवीन गोष्टी शिकण्याची आवड निर्माण होते.

स्वयं अध्ययन एक प्रभावी शिक्षण पद्धती आहे, जी व्यक्तीला स्वतःच्या विकासासाठी मदत करते.

अधिक माहितीसाठी, आपण हे पाहू शकता:

उत्तर लिहिले · 18/3/2025
कर्म · 1240

Related Questions

स्वयं अध्ययन म्हणजे काय ते स्पष्ट करा?
स्वय अध्यायन म्हणजे काय?
स्वयं अध्यायन म्हणजे काय?