3 उत्तरे
3
answers
एफ.आय.आर. म्हणजे काय असतं आणि तो का काढला जातो?
25
Answer link
FIR म्हणजे,
first information report
प्रथम माहीती अहवाल
एखादा गुन्हा घडला तर तक्रार द्यायला आल्यानंतर पोलीस पाहतात की तो गुन्हा दखलपात्र आहे की अदखलपात्र आहे, जर गुन्हा अदखलपात्र असेल तर फक्त NC (non cognizable) रजिस्टर मध्ये नोंदवतात, आणि दखलपात्र असेल तर त्याला ज्या रजिस्टर मध्ये नोंदवून घेतला जातो त्याला FIR रजिस्टर म्हणतात,
आता दखलपात्र आणि अदखलपात्र
गुन्ह्याची गांभीर्य किती आहे त्यावरती अवलंबून असते,
जर तुमचं प्रवास करत असताना पाकिट चोरीला गेलं आणि आपण तक्रार द्यायला आला तर ती झाली NC,
आणि,
जर तुमच्या घरी रात्री दरोडा पडला आणि तुम्ही तक्रार घेऊन आला तर ती झाली FIR,
तुम्ही काही करा नोंद FIR किंवा NC तुम्हला त्याची पोहोच नक्की मिळते ती न चुकता घ्या, आता तर तुमची तक्रार ऑनलाईन घेतली जाते , CCTNS वरती, त्यामुळे तुम्ही तक्रार केली की तुम्हाला लगेच sms येतो, तुमच्या तक्रारीचा काय प्रगती झाली ते पण समजत, आणि तुमचा तक्रारी चा तपास कुठल्या अधिकाऱ्याकडे आहे ते पण समजत, तेंव्हा तुम्ही घरी बसून follwup घेऊ शकता,
आता चोरी कशाला म्हणायचं आणि दरोडा कशाला म्हणायचं हे पण आहे सांगण्यासारखं पण इथं अपेक्षित उत्तर याना मिळालं असावं, म्हणून stop करतो,
धन्यवाद,
आपल्या सेवेसाठी,
महाराष्ट्र पोलीस सदैव तत्पर..

FIR म्हणजे काय व नियम ?
*आज जाणून घेऊया FIR म्हणजे काय आणि कोण ती दाखल करू शकतो?*
खरं तर FIR आपल्या सुविधेसाठी आहे पण आपण त्याचा उपयोग करून घेत नाही. ह्याचा उपयोग कसा करून घ्यावा हे माहित असणे अतिशय आवश्यक आहे कारण FIR ची सुविधा ही प्रत्येक नागरिकाच्या सुरक्षेसाठी आहे.
चला आज जाणून घेऊया FIR म्हणजे काय आणि कोण ती दाखल करू शकतो?
*सर्वात पहिल्यांदा जाणून घेऊया FIR म्हणजे काय ?*
FIR म्हणजे First Information Report!
ही FIR पोलीस दाखल करून घेतात. FIR हा एक महत्वाचा दस्तऐवज असतो ज्यात गुन्ह्याची पहिली आधिकारीक माहिती असते.
*भारतीय कायद्यामध्ये गुन्ह्यांचे २ प्रकारात वर्गीकरण केले आहे.*
पहिला म्हणजे Cognizable Offence– ह्या आरोपीला पोलिस वॉरंट शिवाय अटक करू शकतात . शिवाय ह्या प्रकारच्या गुन्ह्यामध्ये पोलीस कोर्टाच्या आदेशाशिवाय केस बद्दल तपास सुरू करू शकतात.
दुसरा प्रकार आहे Non Cognizable Offence- ह्यात वॉरंट शिवाय पोलीस आरोपीला अटक करू शकत नाहीत आणि कोर्टाच्या आदेशाशिवाय केसचा तपास सुरू करू शकत नाहीत. म्हणूनच गुन्हा घडल्यावर FIR दाखल करणे अतिशय आवश्यक आहे कारण त्याशिवाय पोलीस कुठल्याही केस चा तपास करू शकत नाहीत.
*FIR कोण दाखल करु शकतो?*
FIR नोंदवण्यासाठी तुमच्या संदर्भातच गुन्हा घडायला हवा असे आवश्यक नाही. तुम्ही जर गुन्ह्याचे प्रत्यक्ष साक्षीदार असाल तरीही तुम्ही गुन्ह्यासंदर्भात FIR नोंदवू शकता. ह्याशिवाय जर इतर व्यक्तीच्या संदर्भातही घडलेल्या गुन्ह्याचा पुरावा तुमच्याकडे असेल तरीही तुम्ही FIR दाखल करू शकता.
*FIR दाखल करताना काय माहिती द्यावी लागते?*
FIR नोंदवताना FIR दाखल करणाऱ्याचे नाव, गुन्हा घडल्याची तारीख, दिवस आणि घटनास्थळाची माहिती पोलिसांना द्यावी लागते. ह्याशिवाय गुन्ह्याची FIR दाखल करताना त्या व्यक्तीने गुन्हा घडल्याचे पुरावे सादर करणे आवश्यक आहे. तसेच ज्याच्या विरुद्ध FIR दाखल करायची आहे त्या व्यक्तीचे नाव आणि इतर सर्व माहिती सुद्धा पोलिसांना द्यावी लागते .
*ह्याशिवाय FIR बद्दल काही महत्वाच्या बाबी माहीत असणे फायद्याचे आहे.*
Criminal Procedure code 1973 च्या सेक्शन 154 अन्वये FIR मध्ये नोंदवलेली माहिती प्रमाणित केली जाते. तसेच FIR ची एक प्रत FIR दाखल करणाऱ्या व्यक्तीस दिली जाते. FIR ची प्रत मिळणे हा प्रत्येकाचा हक्क आहे. तसेच FIR दाखल करण्यास कोणताही चार्ज लागत नाही. जर तुमची FIR , Cognizable Offence च्या वर्गात येत असेल तर तुम्ही दिलेल्या माहितीच्या आधारे पोलीस तक्रार नोंदवू शकतात .
*पोलिसांनी तक्रार दाखल करून घेण्यास नकार दिल्यास काय करावे?*
जर कुठल्याही पोलीस स्टेशनला पोलीस तुमची FIR दाखल करून घेण्यास नकार देत असतील तर तुम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार करू शकता. त्यांचा आदेश पोलीस नाकारू शकत नाहीत. तसेच तुम्ही तुमची तक्रार पोस्ट द्वारे सुद्धा पाठवू शकता. ह्या संदर्भात पोलिसांविरुद्ध तक्रार करायची असल्यास तुम्ही राज्याच्या Human Rights Commission च्या ऑफिसमध्ये जाऊन तक्रार करू शकता .
*काही महत्त्वाचे :*
ही सुविधा प्रत्येक नागरिकाच्या सुरक्षेसाठी दिली आहे. परंतू ह्याचा गैरवापर करणे कायद्याने गुन्हा आहे. म्हणूनच कधीही खोटी किंवा चुकीची FIR दाखल करू नका. ह्याने तुम्हालाच शिक्षा होऊ शकते.
पुराव्यांशी कधीही छेडछाड करू नका.
पोलिसांना कधीही खोटी, चुकीची किंवा अर्धवट माहिती देऊ नका. किंवा FIR मध्ये खोटी, चुकीची माहिती लिहू नका.
ह्या काही गोष्टी लक्षात ठेवल्यास तुम्हाला स्वतःला FIR दाखल करणे सोपे जाईल किंवा प्रसंगी कुणालाही FIR दाखल करून द्यायला मदत करता येईल.
अधिक माहितीसाठी खालील लिंक उघडा
https://www.uttar.co/answer/5b8f00f7d023b908281a8101

0
Answer link
एफ.आय.आर. (First Information Report) म्हणजे काय?
एफ.आय.आर. म्हणजे प्रथम माहिती अहवाल. जेव्हा एखादा cognizable गुन्हा ( Policie investigation करू शकणारा गुन्हा ) घडतो, तेव्हा पोलिसांना त्याबद्दल दिलेली पहिली माहिती म्हणजेच एफ.आय.आर. असतो. ही माहिती लेखी स्वरूपात नोंदवली जाते.
एफ.आय.आर. का काढला जातो?
एफ.आय.आर. खालील कारणांसाठी काढला जातो:
- गुन्ह्याची नोंद: एफ.आय.आर. दाखल केल्याने पोलिसांना गुन्ह्याची औपचारिक माहिती मिळते.
- तपास सुरू करणे: एफ.आय.आर. दाखल झाल्यावर पोलीस गुन्ह्याचा तपास सुरू करू शकतात.
- न्यायालयीन प्रक्रिया: एफ.आय.आर. हा न्यायालयीन प्रक्रियेचा महत्त्वाचा भाग आहे.
- पिडीतांना मदत: एफ.आय.आर. दाखल झाल्यावर पिडीतांना सरकारी मदत मिळू शकते.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा: