कायदा कागदपत्रे प्रक्रिया मालमत्ता

महार वतन जमीन विकताना किंवा घेतानाची सर्व प्रोसेस तसेच सदर मिळकतीच्या परवानगी घेणे/देणे विषयी माहिती सांगा?

5 उत्तरे
5 answers

महार वतन जमीन विकताना किंवा घेतानाची सर्व प्रोसेस तसेच सदर मिळकतीच्या परवानगी घेणे/देणे विषयी माहिती सांगा?

5
महार वतन आणि कायदा १९६६

महार वतन आणि लॅन्ड रेव्हेन्यू कोड १९६६ :-

कलम लॅन्ड आणि रेव्हेन्यू कोड १९६६ कलम २९ खाली जमिनीचे ३ वर्गात केले आहे.

तीन वर्ग :-

१. अक्यूवंट / भोगवटादार १ :-

जो खातेदार फार पूर्वी पासून जमिनीचा कब्जेदार असून त्याला सदर जमीन विकण्याचा पूर्ण अधिकार बहाल केला आहे अशी जजमनी चा खातेदारचा वर्ग १ मध्ये समावेश होतो.

२. भोगवटादार वर्ग २(ब) :-

ज्या जमिनी खातेदाराला विकण्याचा अधिकार बहाल केला नाही असा खातेदार म्हणजेच भोगवटादार वर्ग २ (ब) होय या वर्ग २ (ब) भोगवटादाराचे प्रमाण विदर्भात जास्त आहे.

३. शासन लेसी- शासनाचे वतनास अबॉलिशन ऍक्ट १९५८ कलम ५ पोट कलम ३ अन्वये :-

महार वतन जमिनी रिग्रेड झाल्यानंतरही कलेक्टरच्या पूर्व परवानगीशिवाय विकत येणार नाही. असे बंधन घातलेले आहे. परवानगी देण्यापूर्वी शेतसाऱ्याच्या १० पट रक्कम नजराना भरवायला हवा अशी अट घातलेली आहे. यावरून महार वतनी जमीन वर्ग २ भूमिधिकारी वर्गात मोडते. हे निश्चित तिन्ही वर्गात मोडणारी जमीन शासनाला लॅन्ड रेव्हेन्यू कोड १९६६ कलम ५५ खाली घेता येते. त्याला महार वतन अपवाद नाही.

* कलम ५९ :-

बेकायदा कब्जेदाराला त्याच्याकडून जमीन काढून घेण्याचे अधिकार शासनाला दिले आहे. जी जमीन वर्ग-२ मध्ये मोडते ती कलेक्टरच्या पूर्व परवानगी शिवाय हस्तांतर झाली असल्यास ती अनअथोराइज्ड कब्जेदार होतो. त्याच्या कब्जातून जमीन परत घेता येते. शासनाने कलम ५९ खाली बेकायदा कब्जेदाराला, विक्रीची पूर्व परवानगी घेतली नाही. व नजराना भरला नसताना, खरेदी नंतर नजराना भरून परवानगी मागता येते असा मुंबई हायकोर्टाने निर्णय दिल्याने कलम ५९ खाली चालू असलेली कार्यवाही महाराष्ट्र शासनाने स्थगित केली.

महार वतन रिग्रेड झाली नसल्यास ती शासनाची जमीन होते. ती जमीन खरेदी करता येणार नाही किंवा कुळ म्हणून हक्क सांगता येणार नाही.

वरील केस मध्ये कुळ कायदा कलम ८८ २(ब) खाली जे स्पष्टीकरण उल्लेख केला नाही तो करावयाला हवा होता. म्हणजे महार वतन हे १९५८ पर्यंत शासकीय जमीनीत मोडत होते असे दिसून येते.

याशिवाय कुळ कायदा कलम ८८ खाली जे स्पष्टीकरण दिले आहे त्यानुसार महार वतन जमीन हि शासकीय होते. महार वतनदार शासनाने भाडेपट्ट्यावर करणारे असल्याने सदर जमीन वर्ग-३ मध्ये मोडते.

लॅन्ड रेव्हेन्यू कोड १९६६ कलम ६१ अन्वये जी जमीन कलेक्टर यांच्या परवानगी शिवाय हस्तांतरित करता येणार नाही अशी अट असेल त्या जमिनीबाबत दिवाणी न्यायालयाला ज्युरिडिक्शन नाही. त्याच प्रमाणे सदर जमिनी जप्त करता येणार नाही. कोर्टाच्या डिक्रीनुसार भूमिधारी खाली येणाऱ्या जमिनीवर डिक्रीची अंमलबजावणी करता येणार नाही.

महार वतनी जमीन ६ (ब) हि हस्तांतरित करावयाची झाल्यास कलेक्टरची पूर्व परवानगी घ्यावी लागत असल्याने या केसेस चालविण्याचे अधिकार दिवाणी न्यायालयात देण्यात आलेला नाही.

महार वतन जमिनी रिग्रेड पूर्वी शासकीय होते रिग्रेड नंतर नवीन शर्ती नुसार हस्तांतरण करता येणार नाही.
वर्ग ६-ब जमीन विक्रीस परवानगी

महार इनाम वर्ग ६-ब जमीन विक्रीस परवानगी :-

महार वतनाच्या इनाम (बक्षीस) जमिनींचे केवळ कुटुंबाअंतर्गत हस्तांतरण करण्यास जिल्हाधिकारी यांच्या परवानगीची आवश्यकता नसल्याचे शासनाचे परिपत्रक आहे.महार वतनाच्या म्हणजे इनाम वर्ग ६ (ब) च्या जमिनींचे हस्तांतरण जिल्हाधिकारी यांच्या परवानगीशिवाय करता येत नाही. मात्र, शासनाच्या सप्टेंबर १९७७ च्या परिपत्रकामध्ये त्याच कुटुंबातील व्यक्तींमध्ये इनाम जमिनीचे हस्तांतरण करताना जिल्हाधिकारी यांच्या परवानगीची आवश्यकता नसल्याचे स्पष्ट केले होते. मात्र, कुटुंबाबाहेर इनामी जमिनीची खरेदी-विक्री करताना जिल्हाधिकारी यांची परवानगी घ्यावी लागते.

* आवश्यक कागदपत्रे :-

१. अर्जदाराचा अर्ज

२. जमिनीचे सन १९४० पासूनचे गट / सर्व्हे नंबरचे ७/१२ व त्यावरील फेरफार प्रमाणित प्रत.

३. एकत्रीकरणाचा उतारा - उपाधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयाचा

४. अर्जदार यांचे सर्व वारसांचे जमीन विक्रीस संमतीपत्र

५. खाते उतारा ८-अ प्रमाणे साधारकांचे संमतीपत्र

६. जमीन विक्री करणार यांचे प्रतिज्ञापत्र

७. विक्री करावयाचे जमीनबाबत दावा न्यायप्रविष्ठ नाही प्रतिज्ञापत्र

८. जमीन विक्री केल्यानांतर भूमिहीन होत नाही प्रतिज्ञापत्र

९. भूमीहिन होत असल्यास पुन्हा शासनाकडे जमीन मागणी करणार नाही या बाबतचे प्रतिज्ञापत्र

१०. मालकी हक्क अर्जदाराचा आहे व त्याबाबत भविष्यात काही वाद उद्भवल्यास सर्वस्वी जबाबदारी अर्जदार यांची राहील प्रतिज्ञापत्र

११. शासनाने विहित केलेली नजराना रक्कम बर्न्स तयार आहे.

१२. भूसंपादन, पुनर्वसन प्रस्ताव सुरु नाही बाबतचे प्रतिज्ञापत्र

१३. जमीन खरेदी करणार यांचे जमीन खरेदी नंतर कमाल मर्यादेपेक्षा अधिक जमीन धारण करणार नाही असे प्रतिज्ञापत्र.

१४. जमीन आहे त्या शर्तीवर घेणेस तयार असल्याचे प्रतिज्ञापत्र

१५. जमीन विक्री करणार यांचे मालकी हक्काची खात्री केलेली असून त्याबाबत भविष्यात वाद उद्भवल्यास जबाबदारी खरेदी करणार यांची राहील असे प्रतिज्ञापत्र

१६. जमीन खरेदी करणार हे शेतकरी असलेबाबत ७/१२ उतारा किंवा शेतमजूर असलेबाबत संबंधित तहसीलदार यांचा दाखला

१७. जमिनीचे संबंधित दुय्यम निबंधक यांचे कडील चालू बाजारमूल्यदर तक्त्यानुसार मूल्यांकन

१८. छाननी अंती आवश्यक अन्य कागदपत्रे.

* निर्णय घेणारे अधिकारी :-

१. महार इनाम वर्ग ६-ब जमीन विक्रीस परवानगी देणे निर्णय अप्पर जिल्हा अधिकारी आहेत.
उत्तर लिहिले · 4/5/2018
कर्म · 15530
2
महार वतन जमीन विकताना परवानगीसाठी अर्ज कोणी करायचा असतो.
माझ्या आजोबांनी महार वतन जमीन १९६७ साली बिना परवानगीने विकत घेतली आहे. ७/१२ ला माझे नाव आहे. सदर जमीन मला विकायची आहे व मी महार वतन घराण्यातील नाही, तर विक्रीकामी मी अर्ज करू शकतो का?
उत्तर लिहिले · 29/9/2018
कर्म · 60
0
महार वतन जमीन विकताना किंवा घेताना येणाऱ्या अडचणी व त्याची प्रोसेस आणि परवानगी घेणे व देण्यासंबंधी माहिती खालीलप्रमाणे:

महार वतन जमीन: विक्री आणि खरेदी प्रक्रिया

महार वतन जमिनीच्या विक्री आणि खरेदी प्रक्रियेमध्ये अनेक कायदेशीर आणि प्रशासकीय बाबींचा समावेश असतो. या जमिनी पूर्वी महार समाजातील लोकांना विशिष्ट सेवा बजावल्याबद्दल देण्यात आल्या होत्या. या जमिनींची विक्री, खरेदी किंवा हस्तांतरण करताना शासनाच्या नियमांनुसार परवानगी घेणे आवश्यक आहे.

विक्री प्रक्रिया:

  1. जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी: महार वतन जमीन विकण्यासाठी सर्वप्रथम जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेणे आवश्यक आहे. महाराष्ट्र शासन
  2. अर्जाची प्रक्रिया: परवानगीसाठी अर्ज सादर करताना जमिनीचे सर्व कागदपत्रे, जसे की मूळ वतनपत्र, जमिनीचा नकाशा, आणि इतर संबंधित कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे.
  3. शर्ती व नियम: जमिनीच्या विक्रीसाठी काही शर्ती व नियम जिल्हाधिकारी ठरवू शकतात, ज्यांचे पालन करणे आवश्यक आहे.
  4. खरेदीदाराची निवड: जमीन खरेदीदार निवडताना, तो व्यक्ती जमीन खरेदी करण्यास पात्र आहे की नाही हे तपासणे आवश्यक आहे.

खरेदी प्रक्रिया:

  1. जमिनीची तपासणी: जमीन खरेदी करण्यापूर्वी जमिनीचे मालकी हक्क, जमिनीवरील कर्ज आणि इतर भार तपासणे आवश्यक आहे.
  2. दस्त नोंदणी: खरेदीखत नोंदणीकृत करणे आवश्यक आहे. यासाठी मुद्रांक शुल्क आणि नोंदणी शुल्क भरावे लागते. नोंदणी आणि मुद्रांक विभाग, महाराष्ट्र शासन
  3. फेरफार: खरेदीखत नोंदणीनंतर जमिनीच्या मालकी हक्कामध्ये बदल करण्यासाठी तलाठी कार्यालयात फेरफार अर्ज दाखल करणे आवश्यक आहे.

परवानगी प्रक्रिया:

  1. आवश्यक कागदपत्रे: परवानगीसाठी अर्ज करताना जमिनीचे मालकीपत्र, नकाशा, फेरफार नोंदी, आणि इतर आवश्यक कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे.
  2. अर्ज कोठे करावा: परवानगीसाठी अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयात किंवा संबंधित तहसील कार्यालयात सादर करावा लागतो.
  3. किती वेळ लागतो: अर्जावर कार्यवाही करण्यासाठी साधारणपणे काही महिने लागू शकतात.

कायदेशीर सल्ला: या प्रक्रियेमध्ये गुंतागुंत असल्याने, कायदेशीर सल्ला घेणे उचित राहील.

उत्तर लिहिले · 18/3/2025
कर्म · 1040

Related Questions

गहाण खत म्हणजे काय?
Sale deed म्हणजे काय?
खरेदी प्रमाणे माझी जागा १५ फूट पूर्व पश्चिम २८ फूट आहे, तरी मला माझी जागा पूर्णपणे मिळू शकते का?
खरेदी प्रमाणे माझी जागा पण उत्तर ते दक्षिण?
वजन व समोरच्या व्यक्तीची जागा खरेदी केलेली आहे व माझी जागाही आठ अ प्रमाणे आहे, तर कोणाला कोणाची जागा त्याच्या हक्काप्रमाणे मिळेल?
घरकूल बांधकामास शेजारील व्यक्ती अडथळा आणत आहे?
माझी जागा खरेदी प्रमाणे 15x28 आहे आणि मी माझ्या जागेवर 14x28 प्रमाणे बांधकाम करत आहे, आणि शेजारील व्यक्ती बांधकाम करण्यास अडवत आहे, तर काय करावे लागेल?