शब्दाचा अर्थ क्षेपणास्त्र तंत्रज्ञान

क्रूझ क्षेपणास्त्र म्हणजे काय?

2 उत्तरे
2 answers

क्रूझ क्षेपणास्त्र म्हणजे काय?

3
हवाई दलाच्या ‘सुखोई-३०’ प्रकारच्या ४० लढाऊ विमानांवर ब्रह्मोस क्रूझ क्षेपणास्त्रे बसवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती हवाई दलाच्या सूत्रांनी दिली. पाकिस्तान आणि चीन यांच्याशी एकाच वेळी युद्धाची शक्यता नाकारता येत नसताना सुखोई ब्रह्मोस सज्ज केल्याने हवाई दलाच्या मारक क्षमतेत मोठी वाढ होणार आहे.

मुळात सुखोई हे अत्यंत कार्यक्षम लढाऊ विमान आहे. त्यावर ब्रह्मोससारखे जगातील सर्वाधिक वेगवान क्रूझ क्षेपणास्त्र बसवल्यावर त्याची मारक क्षमता बरीच वाढणार आहे. ब्रह्मोस हे भारत आणि रशियाच्या संयुक्त विद्यमाने तयार करण्यात आलेले क्षेपणास्त्र आहे. त्याचे वजन २.५ टन असून ते ध्वनीच्या २.८ पट वेगाने २९० किलोमीटरवरील लक्ष्याचा पारंपरिक किंवा आण्विक स्फोटकांनिशी अचूक वेध घेऊ शकते. आजवर त्याचा पल्ला वाढवण्यावर नियंत्रणे होती.

मात्र गतवर्षी भारताला मिसाइल टेक्नॉलॉजी कंट्रोल रिजिम (एमटीसीआर) या संघटनेचे सदस्यत्व मिळाल्यानंतर ती नियंत्रणे हटू शकतील आणि ब्रह्मोसचा पल्ला ४०० किमीपर्यंत वाढवणे शक्य होईल.

हवाई दलाने २२ नोव्हेंबर रोजी सुखोईवरून ब्रह्मोस डागण्याची यशस्वी चाचणी घेतली होती. ब्रह्मोस क्षेपणास्त्रे डागण्यासाठी सुखोई विमानांमध्ये काही रचनात्मक, इलेक्ट्रॉनिक आणि सॉफ्टवेअरचे बदल करावे लागतील. त्याचे काम सुरू करण्यात आले आहे. त्या कामाचे निश्चित वेळापत्रक जाहीर करण्यात आले नसले तरी २०२० सालापर्यंत ४० सुखोई विमानांवर ब्रह्मोस बसवण्याची प्रक्रिया पूर्ण होईल असा अंदाज आहे. त्यामुळे शत्रूपासून सुरक्षित अंतरावर राहून शत्रूच्या प्रदेशात खोलवर आणि अचूक मारा करण्याची क्षमता वाढणार आहे.

उत्तर लिहिले · 2/5/2018
कर्म · 123540
0
क्रूझ क्षेपणास्त्र (Cruise Missile):

क्रूझ क्षेपणास्त्र हे एक स्वयंचलित क्षेपणास्त्र आहे. ते लांब पल्ल्यापर्यंत मारा करू शकते. हे क्षेपणास्त्र स्वतःच्या इंजिनच्या साहाय्याने वातावरणात उडते आणि लक्ष्यावर अचूक हल्ला करते.

  • कार्यप्रणाली: क्रूझ क्षेपणास्त्र हे विमानप्रमाणे उडते.
  • मार्गदर्शन: हे क्षेपणास्त्र जीपीएस (GPS), इनर्शियल नेव्हिगेशन (inertial navigation) आणि टेरेन-कंटूर मॅचिंग (terrain-contour matching) यांसारख्या प्रणालींचा वापर करून आपल्या लक्ष्याचा अचूक वेध घेते.
  • प्रकार: क्रूझ क्षेपणास्त्रांचे अनेक प्रकार आहेत, जसे की जमिनीवरून मारा करणारे, समुद्रावरून मारा करणारे आणि हवेतून मारा करणारे.
  • उदाहरण: ब्रह्मोस हे एक सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र आहे, जे भारत आणि रशियाने संयुक्तपणे विकसित केले आहे.

क्रूझ क्षेपणास्त्रे कमी उंचीवरून उडतात त्यामुळे ती रडारला लवकर दिसत नाहीत, ज्यामुळे शत्रूंना त्यांचा मागोवा घेणे कठीण होते.

अधिक माहितीसाठी आपण खालील दुवे पाहू शकता:

उत्तर लिहिले · 18/3/2025
कर्म · 1100

Related Questions

बॅलेस्टिक क्षेपणास्त्र म्हणजे काय?
मिसाइल मॅन चा शोध कोणी लावला?