शिक्षण भाषा इंग्रजी भाषा अभ्यास

मला इंग्रजी बोलायला शिकायचे आहे, काय करू?

2 उत्तरे
2 answers

मला इंग्रजी बोलायला शिकायचे आहे, काय करू?

7
इंग्लिश शिकण्यासाठी खालील गोष्टी कराव्यात:

वाचन: जास्तीत जास्त इंग्रजी पुस्तके, पेपर वाचा. सुरुवातीला बऱ्याच शब्दांचे अर्थ माहित नसतील. त्यासाठी एक शब्दकोश(dictionary) जवळ ठेवा. आता सध्या मोबाईल वरही अनेक शब्दकोश उपलब्ध आहेत. नवीन शब्दांचे अर्थ एका वहीत लिहून ठेवत चला. असे करत राहिल्यास काही दिवसांनी तुमचा शब्दकोश वाढेल . आणि बोलताना या शब्दांचा वापर करता येईल.


ऐकणे: लहान मुलं जसे ऐकण्यातून भाषा शिकतात तसे तुनहीही शिकू शकता. इंग्रजी बातम्या बघा. इंग्रजी चित्रपटांचा सुद्धा यासाठी फायदा होतो. तसेच इंटरनेट वर अनेक वेबसाईट्स आहेत ज्या तुम्हाला स्टेप बाय स्टेप इंग्लिश ऐकवतात. त्या वापरा.


लिहिणे: इंग्रजी चे व्याकरण समजून घ्या. काळ शिका आणि त्यांच्या वापर करून दैनंदिन वापरातील वाक्ये लिहून काढा. ती बरोबर आहेत का नाही हे सुद्धा तपासून पहा.


बोलणे: लहान लहान वाक्ये तयार करून इंग्रजी बोलण्याचा प्रयत्न करा. जवळच्या मित्राला किंवा कुटुंबातील व्यक्तीला तुमच्यासोबत इंग्रजीमध्ये बोलायला सांगा. जेवढे जास्त बोलाल तेव्हढी जास्त इंग्रजीची सवय होईल. तुम्ही शिकलेल्या शब्दांचा बोलताना वापर करायचा प्रयत्न करा.


सरावात सातत्य ठेवल्यास थोडा आत्मविश्वास येईल आणि तुह्मी चांगला इंग्रजी शिकाल.

उत्तर लिहिले · 29/4/2018
कर्म · 585
0

तुम्ही इंग्रजी बोलायला शिकण्यासाठी खालील गोष्टी करू शकता:

1. मूलभूत गोष्टी शिका:
  • अक्षरमाला (Alphabet) आणि उच्चार (Pronunciation) शिका.
  • सामान्य शब्द (Common words) आणि वाक्ये (Sentences) शिका.
  • व्याकरणाचे (Grammar) नियम शिका.
2. भरपूर सराव करा:
  • इंग्रजीमध्ये बोलायला सराव करा.
  • मित्र किंवा कुटुंबातील सदस्यांबरोबर इंग्रजीमध्ये बोला.
  • इंग्रजी बोलणाऱ्या लोकांबरोबर संवाद साधा.
3. इंग्रजीमध्ये ऐका आणि वाचा:
  • इंग्रजी चित्रपट (Movies) आणि टीव्ही कार्यक्रम (TV shows) पाहा.
  • इंग्रजी गाणी (Songs) ऐका.
  • इंग्रजी पुस्तके (Books), वर्तमानपत्रे (Newspapers) आणि लेख (Articles) वाचा.
4. ऑनलाइन संसाधने वापरा:
  • Duolingo, Babbel, आणि Rosetta Stone सारख्या भाषा शिक्षण ॲप्स (Language learning apps) वापरा.
  • YouTube वर इंग्रजी शिकवणारे चॅनेल (Channels) पाहा.
  • ऑनलाइन इंग्रजी अभ्यासक्रम (Online English courses) करा.
5. क्लास लावा:
  • जवळच्या इंग्रजी स्पीकिंग क्लासमध्ये (English speaking classes) जा.

टीप: नियमित अभ्यास आणि सराव करणे महत्त्वाचे आहे.

उत्तर लिहिले · 18/3/2025
कर्म · 5280

Related Questions

कुछ घोषणा लेखनाच्या उद्देश व तंत्र विशद करा?
M81/YOGC506/EE/20260529 Q pepar?
माहिती प्रधान समाजामध्ये ग्रंथालयाची पारंपारिक भूमिका बदलून ती कशी व्यापक होत आहे ते स्पष्ट करा?
College la application deun 7 divas zale pn college TC det nahi?
शालेय व्यवस्थापन म्हणजे काय? शालेय व्यवस्थापनाचे कार्य स्पष्ट करा.
शालेय व्यवस्थापनात शिक्षकाची भूमिका स्पष्ट करा?
शालेय व्यवहाराप्रती जबाबदारी?